Jayavi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 3:03 am: |
| 
|
श्यामली,पूनम, मीनू, सारंग, राजकन्या, सुधीर, वैभवा........तहे दिल से शुक्रिया दोस्तो .... मीनू, धुक्यामधे..एकदम पटेश. बदल करते तसा. प्रसाद, खूप छान........ पण तुझ्या ह्या शब्दांना खूप छान अर्थ असतो...काहीबाही नसतं हं 
|
प्रसाद, जबरी पुनरागमन रे मित्रा... लग्न झाल्यानंतरची इथे टाकलेली पहिली कविता ना रे.. एकदम झ्याक रे मित्रा
|
वा!!! वा!!! काय सुंदर्-सुंदर कविता आहेत तुमच्या. वा!! मज़ा आ गया दोस्तो. कोणाबद्दल काय काय लिहावं काहीच कळत नाही. श्री
|
जगणे......... कसले हे जीणे वाट्याला आले भास उन्हाचे सुखाच्या सावलीला आले पाचोळा होतो जरी मी वठलेला निष्पर्ण नव्हतो काय असा अपराध घडला बागेत तुझ्या फ़ुलांच्या भाळी काटा आला जिथे जिथे पाउल पडलं कायम ठेचांनीच दुखावल हाय दैवा, घात असा केलास भर उन्हात चांदण्यांनी चटका दिलास फ़िर्याद मागु कोणाकडे अश्रुंनी फ़ितुरी केली श्वासांनी दगा दिला
|
Jo_s
| |
| Tuesday, January 09, 2007 - 3:22 am: |
| 
|
प्रसाद सुंदरच रचना सध्या काय फुललाय हा बगिचा ... मस्त अजून येउदेत मित्रांनो
|
Meenu
| |
| Tuesday, January 09, 2007 - 3:39 am: |
| 
|
प्रसाद खासच .. .. वैभव आता तुझ्याकडुनही येऊ दे बरं काही तरी झकास असं ..
|
Sarang23
| |
| Tuesday, January 09, 2007 - 3:47 am: |
| 
|
वा! प्रसाद दिल खुश कर दिया दोस्त! welcome back
|
कांचनगंधा "जगणे" खासचं. श्री
|
मानसरोवर ... लाटांमधली वाढत जाता खळखळ मन माझे होई आशंकित रे पळ पळ मज वाटे सत्वर पैलतीर गाठावा तू बोट धरावे हीच विनंती केवळ तव स्पर्शाने तन हलके हलके व्हावे ओंडक्यापरी लाटा ओलांडत जावे ढवळून निघावी विकार भरली दलदल मन नितळ जळाची संथ तृप्तता केवळ डोळे भरुनी भवसागर बघुनी घ्यावा अन अलिप्ततेने पाय तटी लागावा ओंडका सोडुनी द्यावा जळात मागे श्वासांमधली हलकेच सरावी वर्दळ बघ मानस माझे मानसरोवर आता तू यथेच्छ डुंबावेस अंतरी त्राता दोघांस पटावी ओळख ही जन्मांची बाहेर अंतरी एकचि परिचित परिमळ
|
Sarang23
| |
| Tuesday, January 09, 2007 - 4:11 am: |
| 
|
वा!! वैभवा, "बाहेर अंतरी एकचि परिचित परिमळ" मध्ये सगळे काही अगदी तुडुंब भरले आहे! केवळ महान!!! मानसरोवर केवळ निखळ प्रतिभेतून आलय याची प्रचिती प्रत्येक कडव्यात आणि विशेषतः शेवटच्या ओळीत येतेच आहे!
|
तुझ्या कंठी मंगळसुत्र माझे... कळी तुझी गंध माझा मळी तुझी छंद माझा डोळे तुझे पाणी माझे बोल तुझे गाणी माझे स्वप्न तुझे भास माझा शरीर तुझे श्वास माझा इद्रंधनुष्य तुझे रंग माझे मंदिर तुझे अभंग माझे स्वर तुझे शब्द माझे तुझ्या कंठी मंगळसुत्र माझे श्री
|
वैभवा सही रे. श्री
|
Psg
| |
| Tuesday, January 09, 2007 - 4:33 am: |
| 
|
वा वैभव.. केवळ आहे!
|
Mankya
| |
| Tuesday, January 09, 2007 - 4:59 am: |
| 
|
धन्यवाद मित्रानो.... ! मीनु जबरदस्तच... प्रकाश अप्रतिम..... जया सहिच कि... वैभव... Master's stroke !!
|
Shyamli
| |
| Tuesday, January 09, 2007 - 5:14 am: |
| 
|
वैभव... Master's stroke !!>>> u said it maNik धन्यवाद वैभव, बरीच वाट बघावी लागली पण, वैभव, आजपर्यंतच्या सगळ्या कवितांमधली ही सगळ्यात जास्त आवडलेली कविता जीओ
|
Shyamli
| |
| Tuesday, January 09, 2007 - 5:18 am: |
| 
|
पापणीतला सूर्य तुम्हाला तुकडा तुकडा वाटत राहतो,>>> वाह प्रसाद, आज का तो दिन बन गया thank u लोक्स
|
R_joshi
| |
| Tuesday, January 09, 2007 - 5:33 am: |
| 
|
वैभव आपल्यासाठि शब्दच नाहित. सर्वांच्या कविता उत्तम
|
Meenu
| |
| Tuesday, January 09, 2007 - 6:33 am: |
| 
|
मळी तुझी छंद माझा >> बोल तुझे गाणी माझे >>> श्री पहिलं वाक्य जरा उलगडुन सांगाल का ?.. मळी काय असतं ..? दुसर्या वाक्यात व्याकरण चुकलयस नाही वाटत आहे का .. तुझ्या कंठी मंगळसुत्र माझे >>> आणि हो याचाही अर्थ उलगडलात तर बरं होईल. कांचनगंधा तुमची कविता कळली नाही. तुम्ही खुप कविता लिहीता पण बर्याचशा कळत नाहीत. संवाद अपेक्षित नसेल तर काही प्रश्न नाही. चालु दे.
|
Devdattag
| |
| Tuesday, January 09, 2007 - 6:38 am: |
| 
|
प्रसाद, वैभव, जयावि.. ..
|
ही रात्र कशी प्रिये, ही रात्र कशी तु आली माझ्यापशी मंद वारा रिमझिम धारा झाला सखे सुगंध वारा सोबतीस त्याला आल्या गारा ही रात्र कशी... नको जाऊ त्या किनारा मला तुझा हवा निवारा येशील का माझ्या दारा? होशील का माझा सहारा? सांग प्रिये मजला शपथ प्रेमाची तुजला! सांग ना मजला ही रात्र कशी... ये ना घरात का ऊभी अंगनात? हा राग कसला? सोड ना गं... मला तुझ्याजवळ ओढ ना गं... तुझे हात दे माझ्या हातात बेधुंद होऊया प्रेमात... ही रात्र कशी! तु आली माझ्यापशी... श्री
|