Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 08, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » कथा कादंबरी » एक सॉफ्टकथा » Archive through January 08, 2007 « Previous Next »

Jhuluuk
Thursday, November 30, 2006 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Its going good, keep it up !!

Swaatee_ambole
Thursday, November 30, 2006 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी, बरेच दिवसांनी? झकास चालल्ये कथा. :-)

Sakheepriya
Friday, December 01, 2006 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी, मस्त चालू आहे कथा!
मेल बघ!


Sanghamitra
Friday, December 01, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


यावर एक खात्रीचा उपाय माझ्याकडे होता.
आणि आत्ताचं तरी ठीक होतं. टीन्समधे तर काय कुठल्या मुलाच्या कुठल्या गोष्टीने आपण इम्प्रेस होऊ काही सांगता येत नाही.
माझी कॉलेजातली मैत्रीण मना तर फार रंगवून सांगायची तिचे टीन्Sअमधले सगळे मूर्खपणे.
कुणाचं अक्षर छान म्हणून आवडला, कुणाची केसांची स्टाईल छान म्हणून.
एक तर मुलगा काय मस्त सायकल चालवतो म्हणून तिचा क्रश.
तिच्या ट्युशनमधे होता तो. तो यायच्या वेळी ही बस स्टॉपवर असायची.
" तो अस्सा स्टायलिश टर्न घ्यायचा ना की बस आपुन फिदा. "
मी म्हटलं " मग काय झालं त्याचं पुढं? "
" काही नाही गं चारच दिवसांनी तो स्टायलिश टर्न घेताना धपकन पडला. आणि रडायला लागला.
श्या आठवीतल्या मुलानं पडल्यावर रडायचं असतं का? झालं माझा क्रश एकदम क्रशच झाला. "
तर या अशा एकूणच स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवांवरून काढ्यण्यात आलेला निष्कर्ष फार प्रभावी होता.
अशा "इम्प्रेस्ड बाय" मधे सारख्या वाईट गोष्टी शोधायच्या. निगेटिव्ह पॉईंट्स. आणि तो स्पार्क कुठे आग लावायच्या आत विझवूनच टाकायचा.
हा उपाय चालतो. चालतोच.
फक्त अगदी अर्ली स्टेजमधेच ऍक्शन घ्यावी लागते.
आणि काही पथ्यं पाळावी लागतात.
पहिलं म्हणजे हे ठरवलं की स्वतःच्या ब्रेन्वॉशिंगसाठी थोडा वेळ काढायचा ज्यावेळी " तो " तुमच्यासमोर नसेल.
आता किती वेळ ते तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे.
दुसरं सतत सावध रहावं लागतं. आणि तुमचं मन खंबीर हवं. जरा कुठं मनाने दुबळेपणा दाखवला की प्रेमाचा ज्वर दुप्पट वेगाने उलटणारच टायफॉईडसारखा.
आता दिविशचे निगेटिव्ह पॉईंट्स काय याच्यावर विचार सुरू झालेला.
हं मला नाव नव्हतं आवडलं त्याचं. हे काय नाव आहे का? अर्थ काय म्हणे त्याचा. उगीच कायतरी स्टायलिश नाव ठेवायचं म्हणून काही पण. मी दिविशवर गुगलून पाहिलं. अनपेक्षित आणि इर्रेलेव्हंट उत्तरं आली.
ज़ेकोस्लोवाकियामधे आडनाव असतं म्हणे दिविश. वा.
आणि स्वाहिली इंग्लिश आणि अजून एका कुठल्या तरी भाषेच्या मिश्रणाला पण divish म्हणतात.
थोडक्यात कुठल्या हिंदुस्तानी भाषेत तरी त्याला काही अर्थ नाहीये.
आता हा काही फारसा सॉलिड पॉईंट नव्हता. आणि या मौलिक माहितीमुळे त्या स्पार्क मधे काहीही फरक पडला नाहीये हे मला कुठेतरी जाणवत होतं पण सध्या असू दे.
खरं तर त्याच्यात न आवडण्यासारखं मला काही सापडेनाच. आणि मी तरी इतका अट्टहास का करत होते?
मी काही extra ordinary होते आणि अतिशय उज्ज्वल भविष्य माझी वाट पहात होतं असं काही नव्हतं. वाट्टेल ते करून खूप पैसा मिळवायचाच किंवा परदेशात जाऊन स्थायिक व्हायचंच अशी ध्येयं ही मी स्वतःपुढे ठेवली नव्हती. माझ्यावर घरातून कुठली जबाबदारीही नव्हती किंवा कुणाच्या तरी अपूर्ण अपेक्षा महत्वाकांक्षांचे ओझेही नव्हते.
आणि तो काही मला लगेच लग्नाची मागणी घालत नव्हता. किंवा या आणि अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून मी त्याला आवडतच असेन असा ठाम निष्कर्षही निघत नव्हता.
मग हे असं कमिटमेंट फोबिक सारखं का वागत होते मी?

क्रमशः


Manaswii
Friday, December 01, 2006 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं पण सयु आणि दिविश are going steady न? मग हि रसा कोण??
i'm confused .. :|
परत नीट वाचुन बघावी लागेल.


Psg
Friday, December 01, 2006 - 11:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी, मस्त लिहितेस गं काय फ़्लो आहे.. छान वाटतय वाचायला.. लिही भरभर.. :-)

मनु, रसा ( btw , सन्मे हे काय नाव आहे का? ) ही सयुची मैत्रिण आहे.. ती कथा सांगतिये तिच्या perspective मधून..

हो ना सन्मी? :-)


Ramani
Saturday, December 02, 2006 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी दिविशवर गुगलून पाहिलं >>>>>
मस्तच शब्दप्रयोग. आवड्याच. कथा पण मस्त चालू आहे. मी रोज येउन बघतेय काहि प्रगती आहे का म्हणुन. आज जरा पुढे सरकलेली दिसली मग लगेच घरी आल्यावर वाचुन काढली.

Rupali_rahul
Saturday, December 02, 2006 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं लिहि ना ग संघमित्रा पटपट...

Srk
Monday, December 04, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, तुला प्रत्येक भाग पोस्ट करण्याची डेडलाईन द्यायला हवी. :-) सॉफ्टकथा आहे ना! छानच जातेय कथा.

Aaftaab
Monday, December 04, 2006 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान..
छोटी छोटी वाक्य अगदी सुहास शिरवळकरांच्या कथांमध्ये असतात तशी..
keep it up..


Sanghamitra
Wednesday, December 06, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्त लोक तुम्ही वाचताय. छान छान प्रतिक्रिया देताय हे खूपच inspiring आहे. गोष्ट डोक्यात तयार आहे पण पूर्ण करायला वेळ मिळत नाहीये. पण लौकरच टाकेन. आणि आता कधीही पूर्ण कथा तयार झाल्याशिवाय इथे पोस्ट करणार नाही. promise.
पूनम बरोबर आहे तू म्हणतेस ते. रसा (म्हणजे पृथ्वी :-) ) तिच्या perspective मधून सांगतेय ही गोष्ट.


Chinnu
Wednesday, December 06, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मे, नो वरीज. तुला जमेल तशी टाक कथा. आता आणि तब्बेत कशी आहे?
या कथेचं आणि पात्रांची नावे छान आहेत ग.


Sahi
Wednesday, December 06, 2006 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटायला लागले आहे कि ह्या लेखक मन्ड्ळीसाटी एखादी सोय हवी की जेथे ह्यान्ना त्यान्च्या कथान्चे भाग सवडीनी लिहिता आणी स्टोअर करता येतील.कथा पुर्ण ज़ाली की पब्लीश बटन दाबायचे की आम हितगुजकरान्ना अखन्ड वाचता येतील. माज़्या ओनलाईन क्लासमधे टर्म पेपर साठी ही सोय आहे

Maku
Friday, December 08, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोनी मदत करू शकेल का...
मला पन कथा लिहय्ची आहे... पन ति कुथे जाउन लिहायची ते मला कोनी तरी सानगता का ....
plzzzz
mi star new thread madhe jaun type kele tari pan yeth nahi aahe ....

Rachana_barve
Sunday, December 10, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी कथा छान चालली आहे. deadline नाही का ह्या कथेला काही? :-O

Paresh_joshi
Tuesday, December 19, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी कुठे गायब आहेस कथा पुर्ण करणार आहेस का नाहीस?

Ramani
Thursday, December 21, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा अहो आहात कुठे???

Sakhi_d
Saturday, December 23, 2006 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, आहेस कुठे??
खुप छान लिहितेस पण अस मध्येच नको ना थांबू......... लवकर पुढचा भाग टाक.


Manutai
Saturday, December 23, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते कथा अर्धि सोडण्याबद्दल काहीतरी सजा ठेवावी नाही

Sanghamitra
Monday, January 08, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी ठरवलं होतं जो कुणी असेल तो पहिला आणि शेवटचा. दोन मैल चालल्यावर कळणार की अरे हा रस्ता जातच नाहीये माझ्या गावाला.
काय अर्थ आहे त्याला? आणि अशा किती वाटा चालायच्या दोन दोन मैल?
त्या कंपॅटिबिलिटी चेक्स मधे मला काडीचा रस नव्हता.
एकदा ठरवलं की हाच तो की मग तोच तो.
बर आता हे त्यालाही वाटायला पाहिजे नाही का?
दोन मैल चालल्यावर तुम्हाला नाही समजा वाटलं तरी त्यालाही वाटू शकतंच की रस्ता चुकलाय असं.
आणि मला आत्ता तरी कमिटमेंटच्या गोंधळात पडायचं नव्हतं.
मी करत होते ते काम मला आवडत होतं. शिक्षण संपलं होतं. ऑफिसात छान ग्रूप तयार झाला होता. कॉलेजातला ग्रूप अजून संपर्कात होता.
घरात इकडची काडी तिकडे करत नव्हते.
हे असं सुखाचं आयुष्य त्या नजरेच्या खेळासाठी गमवायची आपली तयारी नाही बाबा.
वर माझ्या इतर कमिटमेंटमधे असलेल्या मित्रमैत्रिणींचं मी पहात होतेच.
खरं सांगू का? वाईट कुणीच नसतं. पण एखाद्याच्या मते चांगलं असेल ते आपल्या मते असेलच असं थोडंच आहे?
उगीचच कुठल्या गाडीवर भेळ खायची किंवा हेच गाणं ऐकायचं असल्याही बाबतीत त्याग करायचे तर तो माणूस त्या लायकीचा पाहिजे ना.
सुरूवातीला सगळे best foot forward च्या प्रयत्नात असतात त्यामुळं सगळं छान छानच वाटतं.
आत्ता नाही का मला वाटतंय की काय आहे दिविशमधे न आवडण्यासारखं? तसं.
तर थोडक्यात मी हे असं स्वतःला थांबवणार. जमेल तितकं. तसंच irresistable असेल कुणी तर त्यानं प्रूव्ह करावंच स्वतःला.
इतके दिवस arranged marriage ची चेष्टा करून झाल्यावर आता वाटायला लागलं की तेच बरंय निदान त्यात काही खात्रीचे फायदे तरी असतात.
अशी मी छान पैकी स्वतःच्या मनाची तयारी केली.
आणि कित्तीतरी गोष्टी सापडल्या मला. तो smoke करतो. त्याला मराठी समजतं पण बोलता येत नाही. आणि त्याला सरदारजीचे आणि हत्तीमुंगीचे जोक्स आवडत नाहीत.
आता मला माहितीय तुम्ही काय म्हणाल. स्मोकिंग चं ठीक आहे पण भाषा आणि pjs यात काय मोठसं?
पण खरंच मराठीच नीट नसेल कळत तर माझ्या कविता त्याच्यापर्यंत पोचणार कशा? आणि फालतू जोक्स वर जो नाही हसू शकत त्याला आनंदी रहायला किती प्रयत्न करावे लागत असतील?
हे आपले माझे फंडे बर्का. आणि वर त्यांचा परिणाम होणार की नाही कुठं माहिती होतं. एका बाजूला मला हे जाणवत होतंच की हे मी माझं मलाच जस्टीफाय नाहीये करू शकत.
सोमवारी दुपारी मला चिमणीने छोट्या मीटींगरूम मधे बोलावलं. मी चेहर्‍यावरचं आश्चर्य बाजूला ठेवलं आणि गेले.
" रसा ऑनसाइटला जाशील का? तू काम करतेयस ते मॉड्युल आता संपत आलंय. त्यानंतर integretion and deployment साठी ऑनसाईट रिक्वायरमेंट आहे. आणि पुढे पण या क्लायंटची पुढची लीड्स आहेत. साधारण एक ते दीड वर्ष. "
मी लगेच उत्तर दिलं नाही हे बघून " विचार कर आणि सांग अजून वेळ आहे. " लगेच मोबाईलची बटनं दाबायला सुरुवात. म्हणजे थोडक्यात ' आता निघा ' .
मी जागेवर पोचले आणि त्याक्षणी फोन वाजला.
.....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators