Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 08, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » झुळूक » Archive through January 08, 2007 « Previous Next »

R_joshi
Friday, January 05, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईच्या कुशीत
बालपण साजिर
आईच्या नजरेत
भविष्य जपर
आईच्या मनात
प्रेम अविरत
आईस नको विसरु
आईच तुझ दैव रं!!!!!

प्रिति:-)


R_joshi
Friday, January 05, 2007 - 11:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साद दे प्रेमाची
जन्म तुला वाहिन
अंतर देता प्रेमाला
आसवापरी बरसुन जाईन

प्रिति:-)


Mankya
Friday, January 05, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति मस्तच...

साद कशी देवु
सोप वाटतय का ते तुला
जगाची रीत..मनातली प्रित
सर्वान्चा विचार करायचाय मला...

माणिक


Mankya
Saturday, January 06, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति

बरसशील जरी तु
पण वाहुन मी जाईन
बरसलीस तरी उरशील तु
नन्तर मी कधीच दिसणार नाही

माणिक


Mankya
Saturday, January 06, 2007 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊस तुझ्या भावनन्चा
पण चिम्ब मी भिजे
आता हरलो.... आरश्यासमोर मी
आणि प्रतिबिम्ब तुझे?

माणिक


Rupali_rahul
Saturday, January 06, 2007 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>पाऊस तुझ्या भावनन्चा
पण चिम्ब मी भिजे
आता हरलो.... आरश्यासमोर मी
आणि प्रतिबिम्ब तुझे? <<< माणिक खासच...
प्रिति


Rupali_rahul
Saturday, January 06, 2007 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणच्यात इतकही गुंतु नये
की वास्तवाच भान न रहावं
आणि कोणच्या प्रेमात इतकही बुडु नये
की आरशात त्याचच प्रतिबिंब दिसावं...

कुणाच्या इतक्याही जवळ असु नये
की त्याच्या जवळ नसण्याने आपण गुदमरावं
आणि कुणची इतकिहि सवय नसावी
की ज्याच्या नसण्याने आयुष्य अर्थहीन व्हावं...

रुप


Deep_tush
Saturday, January 06, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा प्रिती छान लिहलस
माणिक मस्त
झुळुक छान बहरलीय.....


R_joshi
Saturday, January 06, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप,माणिक छानच:-)
तुषार धन्यवाद:-)

तुझ जवळ नसण
आतास जाणवत नाहि
भरलेल्या आभाळातुन
पाणी हि बरसत नाहि

प्रिति:-)


Mankya
Saturday, January 06, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुप छान...

आपल तत्व
नात्यात सत्व
दोन काया
अन.. एक अस्तित्व

माणिक


Mankya
Saturday, January 06, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिति, आवडली ग..

भरलेल्या आभाळाला बरसवेल
तो गारवा तुझ्यात राहिला नाही
मी म्हणत नाही चुक तुझी आहे
पण चुक नक्कीच आभाळाची नाही !

माणिक !


Mankya
Saturday, January 06, 2007 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रानो...

तु..
चिरसन्गिनी
एक ध्यास
पहिली सावली
अन.. दुसरा श्वास !

माणिक !

( पाहिला श्वास का नाही ते माहीत नाही.. )


Mankya
Saturday, January 06, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीट उतरली नाही अस वाटतय...
मित्रानो मदत.....

अन्तरबाह्य तुच आहेस
हेच सत्य जाण
लोका असतील पन्चप्राण
पण तु माझा सहावा प्राण !

माणिक !


Mankya
Saturday, January 06, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाऊलखुणा
माघ माझा घ्यावास म्हणुन
पाऊलखुणा सोडित गेले
जाणिव अंतराची समजुन
पाऊलखुणा मीच पुसित गेले

प्रिति

का पुसल्यास पाऊलखुणा
वेडे.. त्यावरच तर पाऊल ठेवणार होतो
पाऊलखुणानाही माझ्या
मी वेगळ अस्तित्व ठेवणार नव्हतो...

माणिक !


Mankya
Saturday, January 06, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरास हटके...

दु : खच माझ आता दु : खी होऊ लागलय
कन्टाळुन माझ्या जखमा भरू लागलय
दु : खात मी न रडलो कधी
पण माझ्या सहवासात स्वत्: दु : खच रडु लागलय !

माणिक !

too much senti.... I think...



Rupali_rahul
Saturday, January 06, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक Good one last & 2nd last tooo ...


Rupali_rahul
Saturday, January 06, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी केलेली पण पुन्हा एकदा देत आहे...
सुखाचे अश्रु आणि दु:खाचे अश्रु
ह्यात फ़क्त एकच फ़रक
एका वेळी मन आनंदी आणि
दुसर्‍यावेळी बसत कुढत

रुप...


Mankya
Sunday, January 07, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूप...

मानले तर सुख आहे
मानले तर दु : ख आहे
आपल्या द्रुष्टिकोनातच लपलेले
परीस्थितिचे रुप आहे !

माणिक !


Mankya
Sunday, January 07, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रूप.. सहज लिहिलय...

आज माझ्या मनात
एक ओळ आली निराळी
त्यातला शब्द झाला देखणा
आणि ती ओळ झाली " रूपाली " !

माणिक !

(तसा काहि अर्थ लागत नाही म्हणा)


Bhramar_vihar
Monday, January 08, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपालीच्या मनाला
लागली कुणाची चाहुल?
तोच श्वास, तोच सखा
नाव त्याचे "राहुल"

ह्यात बराच अर्थ आहे बरं :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators