Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 05, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » कविता » Archive through January 05, 2007 « Previous Next »

Smi_dod
Saturday, December 30, 2006 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुशाफ़िर...

नेहमीच ठरलो गेलो जग़ण्याला नादार
फ़ुलांच्या देशात प्रवेशच मिळाला नाही
काट्यांनी पण आपले कधी मानलेच नाही
दगडांच्या गावात न्याय मला मिळाला नाही
थव्याने पक्ष्यांच्या पण मला नाकारले
माणुस म्हणुन जगण्याचा हक्क तर कधीच नव्ह्ता
फ़किरानी पण आपलेसे केले नाही
आता झालोय फ़क़्त
एक मुशाफ़िर.... ठाव ठिकाणा नसणारा
दिसेल तो गाव आपलाच मानणारा
मिळेल तो घाव कपाळी मिरवणारा

स्मि


Sumedhap
Saturday, December 30, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाट..

सख्या तुझा हात हाती
आणखी काय हवे..
विसरुनी दुःख सारी
पाहु स्वप्न नवे..

होता तो काळ वाईट
केव्हातरी यायचाच..
प्रसंगाचा असुर तो
आनंदाला गिळायचाच..

हलाहलाचा हा प्याला
वेळ म्हणते आता पी..
तुच असा हरलास तर
कशी बरं जिंकेन मी?

खरंतर हे दुःख मला
वाटते फार क्षीण.
उसवायचे बळ नाही
त्याच्यात आपली वीण..

दुर्भाग्य आलं देवालाही..
तु आणी मी तर काय..
तु चाल ना माझी वाट
नसुदे माझे पाय !

Smi_dod
Tuesday, January 02, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाळ!!!

आभाळ भरून खाली झुकलं
चहुबाजुनी डोक्यावर टेकल
भार त्याचा पेलवेना
सावळ गच्च मन झालं
हिरव्यागार वीजेन झपकनं चमकलं
कुठुन उठल्या विजांच्या ललकार्‍या
माग त्याचा मिळेना....
शिंपल्याच्या डोळ्यांनी शोधलं
पण थेंब काही गवसेना...
मग... विचारांच्या सरींनी ताल धरला
थेंब थेंब जमायला लागला
आभाळ हळुहळु पांगायला लागलं
हळुहळु चांदण ते विखुरलं
आभाळ सार निरभ्र झालं.......

स्मि


Meenu
Tuesday, January 02, 2007 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरं सांगु तुझी एक खास जागा आहे
माझ्या मनात ..
तुझ्या नसण्याची सतत जाणीव देणारी अशी,
एक पोकळी ..
हो पोकळीच ती, जिच्या खोलीचा अंदाज नाही
ना रुंदीचा आवाका ..
भरुन नाही काढता येत ना ...?
अशी कुणाची जागा ..
उलटली वर्ष म्हणुन सवय होईल फारतर,
पण भरुन कशी येईल रे ..?
तसच,
उलटली वर्ष म्हणुन,
नजरेआड करता येतील कदाचित ..
ते तुझे माझे सारे क्षण,
पण निरोप रे कसा देता येईल त्यांना ..?
भेटु ना आपण संध्याकाळी, तेव्हा,
परत भेटायचय मला त्या सार्‍या क्षणांना
तुझ्यासमवेत,
कदाचित तेव्हा तरी त्रयस्थपणे,
मला पाहता येईल त्यांच्याकडे ..


Mankya
Tuesday, January 02, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मित्रहो,

भरपुर कविता वाचल्या, खुप आवड्ल्या, काहीचा सन्ग्रह केला आहे. अद्भुत विश्व आहे हे कवितान्चे!

माझ्याकडे ५० निवड्क कविता आहेत हितगुज मधुन घेतलेल्या. (कवि: वैभव जोशि, निनावि, पमा, shyamli ई.). मला कवितेतल जास्त कळत अस नाहि पण त्यावरिल comments वाचुनच त्या निवड्ल्या आहेत. ज्याना हव्या असतिल त्यानी माझ्या Mail ID वर मेल करावे हि विनति.

आपल्या कवितन्चा रसिक,
माणिक जोशी
joshi.mb@gmail.com

Mankya
Tuesday, January 02, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळी नाव लिहिन कठिण आहे! पण सगळ्याच लिखाण अप्रतिम आहे!
लोभ आहेच, तो असाच वाढत रहावा हि प्रार्थना!


Nilyakulkarni
Tuesday, January 02, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा meenu .... smi ....
अतिशय सुरेख....


Daad
Tuesday, January 02, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि, सुमेधा वा! सुन्दर.
मीनू, कुणाच्या नसण्यानं निर्माण झालेली पोकळी, तिचं अस्तित्वं, त्यावर closure मिळवण्याचा प्रयत्न... सगळ अतिशय छान टिपलयस. खरच, "हरवलेलच" किती जपतो आपण? विसरायचं, विसरायचं म्हणत आठवत रहातो नाही का?


Smi_dod
Tuesday, January 02, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद निलेश,दाद...:-).....सगळ्याच्याच कविता सुरेख आहेत...

Smi_dod
Wednesday, January 03, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु अन मी...!!!!


तु तुझ्या दुःखात चुर
माझा तिथे वाराही नव्हता
कधी काळी आपण होतो....
आज तु अन मी आहोत

तुझे दुःख वेगळे
माझे सुख वेगळे
नाही तु मला आपले दुःख मानलेस
नाही मी तुला माझे सुख मानले
यातच स्वप्नपाखरु निसटुन गेले
आता आहोत फ़क़्त तु अन मी
कधीकाळी आपण होतो....

जाता जाता सलाम....
त्या आपले असण्याला
सलाम... त्या वाळवंटातील वनराईला
त्यात विहरलेल्या राव्यांना
सलाम... त्या धुंद बरसलेल्या मेघांना
त्यात भिजलेल्या मनमोराला
तेच हळव्या क्षणी जाणीव देतात
कधीकाळी आपण होतो....
आज तु अन मी आहोत

स्मि


Rajasee
Wednesday, January 03, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

majhi ek request aahe bagha konala kahi jamala tar ... majhya dhakatya bahinichya lagnapatriket chhapanyasathi mala padya majkoor hava ahe, koni kahi madat karoo shakel ka? patrikecha kavyatma masuda konakade asel to ithe takala tari chalel.

Thanks in advance.

Meenu
Wednesday, January 03, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका वेळी एक दिवस .....!!

एका वेळी एक दिवस जगता यायला हवं
झापड लावुन आयुष्याकडे बघता यायला हवं

करपलेल्या झाडालाही,
बुंध्याच्या सावलीला,
कोवळ्या अंकुराचं कोवळेपण,
जपता यायला हवं ..
एका वेळी एक दिवस ....!!

प्रत्येक दिवसाची शिल्लक,
जमा करुन बुडीत खाती,
शुन्य केवळ असता हाती,
राजा होता यायला हवं ..
एका वेळी एक दिवस ....!!

परतवुन अश्रु नयनीचे,
उरी कळ सोसुनही,
मस्त दिलखुलास असं,
हसता यायला हवं ..
एका वेळी एक दिवस ....!!

काळोख्या रात्री,
एकटे असु आपण जरी,
दुरच्या तार्‍यांकडे पाहुन,
मार्गक्रमण करता यायला हवं
एकावेळी एक दिवस ..!!


दुःखांना सुखानं भागता यायला हवं ..
एका वेळी एक दिवस जगता यायला हवं ..
झापड लावुन आयुष्याकडे बघता यायला हवं ..


Daad
Wednesday, January 03, 2007 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू एका वेळी एक दिवस काय मस्त कल्पना आहे. मस्तच कविता.

Kanchangandha
Thursday, January 04, 2007 - 12:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरून मी पावले.....

बंद कवाडाआड ओठांच्या
हुंदके दाबलेले रडले
होता अलवार स्पर्श तुझा
अलगद बाहेर सांडले
भरून मी पावले.........
अजुन आठवांनी तुझ्या
केली न बेईमानी
अनावर गहिवरले
होउ कशी उतराई
भरून मी पावले........
उन्हातही माध्यानींच्या
माझे चांदणे तु पांघरलेस
आता नाही काही मागणे
भरून मी पावले...........


Sumati_wankhede
Thursday, January 04, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांग सख्या...

सांग सख्या, कधी तुझ्या
मनासारखे घडले होते!
मिटून घेता डोळे कुणी
पापणीआड दडले होते!
झाला जवळिकीचा भास
वा.... थरथरलेला श्वास
अलगद कुणी ओठ चुंबून
हळूच निघून गेले होते!

सांग सख्या, कधी तुझ्या
मनासारखे घडले होते!
घरापुढून जाता तिच्या
पाऊल तुझे अडले होते!
झाली सळसळ पडद्याची
वा... थरथर हुदयाची
अलगद हसून स्वतःशीच
हळूच कुणी लपले होते!

सांग सख्या... बोल सख्या
कधी असं घडतंच ना!
नुस्ती आठवण येता अवघं
जग उजळून निघतंच ना!


Kanchangandha
Thursday, January 04, 2007 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घननीळा......

घननीळा....
स्वप्नात काल आलास
डोळेभर हसलास
अंगणभर नाचलास
गालावर गाल घासुन
मनभर पहुडलास
धडपडत होतो कधीपासुन
तुझ्या कुशीत यायला
होतीस कुठे तु
म्हणुन लटके रुसलास
माझ्यासाठी आता आभाळ
उतरले अंगणी
पाउलवाट सुध्दा झाली
मखमली....
असाच कायम येत रहा
स्वप्न माझी उमलवत जा


Shree_tirthe
Thursday, January 04, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांचनगंधा, स्मि, सुमेधा, मीनु तुमच्या कविता मस्त आहेत.

श्री


Ganesh_kulkarni
Thursday, January 04, 2007 - 5:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शब्दांवर प्रेम करणार्‍या सगळ्यांना...

" मी शब्दांवर प्रेम करतो
शब्द माज़्यावर प्रेम करतात
म्हणूनच की काय तिला...
मी लिहीलेले शब्द कळ्तात! "

गणेश (समीप )


Mankya
Friday, January 05, 2007 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल सन्ध्याकाळी मनात ह्या ओळी आल्या, त्या आपल्यासमोर ठेवतोय.

आशय्: सन्ध्याकाळ...एकाकी मन..काहुर..आणि..

कल्लोळ...

एकाकी मन
हरपले तन
अन
ह्रदया कळेना
का कल्लोळ कल्लोळ...

ओठी थरथर
मन सैरभैर
अन
ह्रदया कळेना
का कल्लोळ कल्लोळ...

जिवघेणी तिन्हीसान्ज
भावनाही वान्झ
अन
ह्रदया कळेना
का कल्लोळ कल्लोळ...

जागली रात
विचारशुन्य जगात
अन
ह्रदया कळेना
का कल्लोळ कल्लोळ...

ना कळे काही
का अश्रु नयनात
अन
ह्रदया कळेना
का कल्लोळ कल्लोळ...

थरथर... सैरभैर...
विचारशुन्य.... अश्रु....
अन
ह्रदया कळेना
का कल्लोळ कल्लोळ...

का कल्लोळ कल्लोळ...


माणिक!!




Shree_tirthe
Friday, January 05, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्र

लहानपणीच्या मित्राची
लई वर्षांनी चौकात गाठ पडली
त्याला अलिंगण देताना
आजु-बाजुची मंडळी बघू लागली.

लहानपणीच्या आठवणी
ताज्या झाल्या
पुन्हा त्याच चिंचच्या
झाडाखाली गप्पा रमल्या.

पूर्वीसारखा तो माझ्यासोबत
मनमोकळेपणाने बोलत नव्हता
माझ्यापासून काहीतरी
लपवण्याचा प्रयत्न करत व्हता.

झालेलं दु:खं
त्याच्या डोळ्यात साठलं
माझ्या डोळ्यातील
गंगनं समुद्राला गाठलं.

तो माझे डोळे पुसत म्हणाला,
"नियतीने माझ्यासोबत खेळ खेळला
निसर्गाने तो आवर्जून पाहिला

वारा नाचला, आभाळ हसलं
जमीन फाटली
माझ्या डोळ्यांसमक्ष तिने
आईला आत ओढून घेतली"

समुद्रातून वर काढलेल्या
माशासारखा मी लाचार झालो आहे
जाळं तोडण्यासाठी
मी अपयशी ठरलो आहे.

मी त्याला धीर देत म्हणालो,

"तुझा हा मित्र जिवंत असेपर्यंत
तुला येऊ देणार नाही अपयश
संकटांवर मात करून
मिळवायचं असतं यश"

त्याचं दु:खं
मला माझं दु:खं वाटलं
ऐकमेकांच्या सोबतीने
आम्ही आभाळ गाठलं.


श्री





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators