मलाच आता जमायला हवे थांबवणे आसवाना... तुलाही आता आवरायला हव मनापेक्षा पावलांना.....
|
जाताना अस नेहमीच " ये ते " म्हनाव... त्या वेड्या आशेवर रात्री शांत झोपाव......
|
R_joshi
| |
| Thursday, January 04, 2007 - 11:20 pm: |
| 
|
पावलांपेक्षा मनाला आवरण जरा अवघड जात मन तुझ्याकडे ओढल की ते पावलांनाहि सोबत नेत. प्रिति
|
Daad
| |
| Thursday, January 04, 2007 - 11:32 pm: |
| 
|
ठसेही न ठेवता पाखरांसारखी अदृश्य होणारी मनं पाहीली की पावलंच आपली वाटतात. पावलं चाहूल देतात, पावलं माग ठेवतात! -- शलाका
|
" कधी वाटतं तिच्या केसातं फ़ुलं माळावीत! नंतर वाटतं इतक्यासाठीच का फ़ुलं तोडावीत ? " गणेश (समीप)
|
जाताना अस नेहमीच " ये ते " म्हनाव... त्या वेड्या आशेवर रात्री शांत झोपाव...... निलेश खुप छान... शलाका, प्रिती, गणेशजी सुंदर
|
तु फ़ुल माळुन आलीस की खुप सुंदर दिसतेस खरतर तुझ्यामुळेच त्या फ़ुलांना शोभा येते रुप
|
तु फ़ुल माळल्यावर आसमंत त्याने दरवळतो पण माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्यात तुझाच सुवास दरवळतो रुप
|
Kiru
| |
| Friday, January 05, 2007 - 1:43 am: |
| 
|
तुझ्या केसांतला मोगरा तु असताना काहीच बोलत नाही तु गेल्यावर मात्र हाच मोगरा तुझ्यशिवाय काहीच बोलत नाही
|
हम्म किरु चालु दे... तरीच ५ मिनिटांची धावती भेट वाट्ट... 
|
मला वाटत कधीतरी... मला वाटत कधीतरी एक वेडं पाखरु व्हावं दुर आसमंतात उडुन सगळं जग पाहुन यावं मला वाटत कधीतरी एक वेडं कोकरु व्हावं रानावनांत, सुंदर कुरणात मनसोक्त हुंदडुन घ्यावं मला वाटत कधीतरी एक सुंदर परी व्हावं सगळ्यांच्या ईच्छा, आकांक्षा जादुच्या कांडीने पुर्ण कराव्या पण नेहमीच मला वाटतं आपण रडकं बाळ व्हावं झोपुन आईच्या कुशीत पुन्हा बालपण अनुभवावं रुप
|
रुप शेवटचं कडवं खूप आवडलं. लगे रहो. श्री
|
Deep_tush
| |
| Friday, January 05, 2007 - 4:17 am: |
| 
|
वा आज झुळुक छान बहरलीय...... तुला पाहताच माझ हदय क्षणभर थांबल...... आणि तुझ्याच प्रतिक्षेत आयुष्य हे आजवर लांबल.... तुषार.....
|
"एके ठिकाणी फ़ुलांच मोठं प्रर्दशन भरलं होतं मला मात्र प्रवेशद्वारावरच.... काटयांनी घेरलं होतं! " गणेश (समीप)
|
"ज़िंदगी माज़ी फार कमी आहे तू सोबत आहेस म्हणून... ती जगण्याची हमी आहे !" गणेश (समीप)
|
धन्स श्री... व्वा!!! तुषार, गणेशजी सुंदर...
|
Mankya
| |
| Friday, January 05, 2007 - 12:54 pm: |
| 
|
एक भ्रम अन एक आस आपल अस कहिच नसत शिवाय एक शेवटचा श्वास माणिक!
|
Mankya
| |
| Friday, January 05, 2007 - 12:59 pm: |
| 
|
तु ज्यान्ची आहेस त्या सगळ्याना अर्थ आहे, भावना फ़क्त समजुन घे बाकी शब्द व्यर्थ आहेत माणिक!
|
R_joshi
| |
| Friday, January 05, 2007 - 11:25 pm: |
| 
|
झुळुकेवर गुलमोहराचा वर्षाव होतोय सर्वेच छान लिहित आहेत.... भावना समजुन घेता घेता मी भावनालिन झाले त्यांच्या जगात इतके बुडाले माझि मी न राहिले प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, January 05, 2007 - 11:29 pm: |
| 
|
माघ माझा घ्यावास म्हणुन पाऊलखुणा सोडित गेले जाणिव अंतराची समजुन पाऊलखुणा मीच पुसित गेले प्रिति
|