Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
काहीच्या काही कविता ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » काहीच्या काही कविता « Previous Next »

Bepositive
Tuesday, February 20, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज एका मुलाच्या टी शर्ट वर एक मेसेज वाचला

' अतूट आमची एकता अविरत आमची पावले '

त्यावर पुढची ओळ सुचली आणि अशी कविता तयार झाली. .

अतूट आमची एकता अविरत आमची पावले
संघटनेचे भटके कुत्रे आम्हालाही चावले
- अपूर्व


Shyamli
Wednesday, February 21, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नसल जवळपास कुणी की
एकट्यानीच बडबडायच
कधी त्याला कविता तर
कधी वेड म्हणायच

चारच ओळी झाल्या तर
थोडस पाणी घालुन वाढवायच
इकडुन तिकडुन शब्द शोधुन
कडव हळूच चढवायच

कधी हिंदी तर कधी
संस्कृताने थोडस मढवायच
छान माझी कविता म्हणुन
प्रत्येकाला पढवायच

मार्गदर्शन करा गुरु
म्हणुन त्यांनाही पकवायच
नाहीच कुणी वाचल
तर हळूच येउन उडवायच

* ही कविता स्वत:वरच व्यंग आहे
बाकि कुणालाही टोमणा नाही याची कृपया नोन्द घ्यावी :-)



Princess
Wednesday, February 21, 2007 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहाहा... सत्य आणि मस्त:-)

वर केलेली स्तुती देखील स्वानुभवावर बेतलेली आहे. कोणालाही टोमणा नाही याची नोंद घ्यावी.


Meenu
Wednesday, February 21, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा श्यामले छान म्हणायलाच हवं आता

Kmayuresh2002
Wednesday, February 21, 2007 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शामले, गुड वन गं:-)..

Jayavi
Wednesday, February 21, 2007 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली..... :-) मस्त!
मार्गदर्शन करा गुरु
म्हणुन त्यांनाही पकवायच
....... :-)


Vaibhav_joshi
Wednesday, February 21, 2007 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीच कुणी वाचल
तर हळूच येउन उडवायच


सही ...........

त्या कविता ऐकव ना एकदा


Dineshvs
Wednesday, February 21, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, स्वतःवरच व्यंग करायला धाडस लागतं.
मानलं तुला !





Devdattag
Wednesday, February 21, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलि सहिच आहे..:-)
Good One


Meghdhara
Wednesday, February 21, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा श्यामली. स्वतावर हसणं सोपं नाही..

मेघा


Smi_dod
Wednesday, February 21, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली...वा... :-)मस्तय...वैभव म्हणतो तश्या त्या कविता कुठय?

Lopamudraa
Wednesday, February 21, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले हे आपलेच मनोगत ग..!!! मस्त..
(जया लक्षात आहे ह.. ही प्रतीक्रिया)


Shyamli
Wednesday, February 21, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तहो :-)
गुर्जी, का गरीबाची फिरकी घेताय :-)
स्मि,त्या कविता खाल्ल्या comp नी :D
दिनेशदा धाडस वगैरे काही नाही हो सगळ्यांना माहीत असत आपण किती पाण्यात आहोत ते :-)

Daad
Wednesday, February 21, 2007 - 9:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, मस्तच कविता. उगीच स्वत:वर व्यंग वगैरे म्हण तू, पण तुझ्या कविता वाचलेले कुणीही विश्वास ठेवणार नाहीत.


Neelkantee
Wednesday, February 21, 2007 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, मस्त म्हणजे मस्तच!
पु.लं. च्या शब्दात सांगायचे तर...
ट ला ट आणि री ला री
आणि म्हणे मी कविता करणारी...

अन मी कविता शब्दाची फोड अशी करते..
का विता...?
विणे म्हणजे...


Bhramar_vihar
Thursday, February 22, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले, लई ब्येस! पण तू असं म्हणणं म्हंजे कै च्या कै! निलुताई :-)

R_joshi
Thursday, February 22, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली अप्रतिम कविता. पण ही काहिच्या काहि नाहि वाटत.

Ganesh_kulkarni
Thursday, February 22, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ती दररोज पाहते मला
टक लाऊन लाऊन
मला मात्र लागतो चष्मा...
कविता लिहुन लिहुन!"

गणेश(समीप)


Mrinmayee
Thursday, February 22, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले, धमाल आली कवीता वाचून. ती तळटीप तेव्हडी काढून टाक! मग आणखी मज्जा!

Mankya
Thursday, February 22, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली .... जबरीच प्रकार आहे गं ! ह. ह. पु. वा. ! मस्तच गं !

माणिक !


Shyamli
Thursday, February 22, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तहो :-)
.. .. .. ..



Vaibhav_joshi
Friday, February 23, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मित्रांनो .. गज़लप्रेमी व गज़लेच तंत्र शिकण्यास उत्सुक कवी / कवयित्रींसाठी कार्यशाळा करण्याचा विचार आहे . अधिक माहितीसाठी मराठी गज़ल बीबी वाचावा


Devdattag
Thursday, March 15, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सभा का उन्हाळ्यात भरण्यास आहे?
अरे मागणी खास जोड्यास आहे

विदेशी नसावाच राष्ट्रात कोणी
असा काहिसा गंध वादास आहे

अम्ही ऐकले बाण तुटलेच सारे
अता भाव का रे कमळास आहे?

नसावे वावडे फुलांचे तयांना
तरी खाज थोडी हातास आहे

पुढे कोण जाईल पाडू तयाला
कशी लालसा हाय रंगास आहे?

अम्हा काय कोणी बसावे पडावे
कठिण चालणे या देवास आहे


Mankya
Friday, March 16, 2007 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे देवा .. मस्तच !
ह्या वेळेस मत तुलाच देणार रे !

अम्हा काय कोणी बसावे पडावे
कठिण चालणे या ' देवा ' स आहे .. खुप खुप आवडलं !

माणिक !





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators