Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चित्रकविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » काव्यधारा » चित्रकविता « Previous Next »

Santu
Sunday, January 28, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे आहेत सह्याद्रिचे कडे

Suvikask
Monday, January 29, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिव शंभु राजा ईथे जन्मला
कडी कपारीतुन सह्यगिरिच्या
खेळला, लढला, जिंकला
येथेच त्याने काढीला खानाचा कोथळा
करुनी अवघड विक्रम नवा ईतिहास घडविला
स्वराज्याचा भगवा झेंडा सह्याद्रिवर फडकविला


Nisha_v
Monday, January 29, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! वा!!! सुचेता ताई मस्तंच

करुनी अवघड विक्रम नवा ईतिहास घडविला
स्वराज्याचा भगवा झेंडा सह्याद्रिवर फडकविला

व्वा!!!


Ganesh_kulkarni
Monday, January 29, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे आहेत सह्याद्रिचे कडे
आतूर आजही ऐकण्या घुमनारे पोवाडे
विश्वास या वेड्यानां...
इथेले कवी...
लिहतील आजही असे पोवाडे!

गणेश(समीप)


Mankya
Friday, February 02, 2007 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chitrakavita

बर्‍याच अर्थाचे धनी आहे हे चित्र !
मनाची उद्विग्नावस्था, राग, निश्चय असं संमिश्र अवस्था दिसतात मला यामध्ये, बाकि आता नंबर आणि कौशल्यही तुमचे वर्णन करायला, अर्थात काव्यरुपात !

लोपा, टाकलं बघ गं !

माणिक !


Jo_s
Sunday, February 04, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक कसली भयंकर चित्रटाकतोस, कुठून आणतोस ही...
जरा हळूवार लिहीतायेईल अशी टाक

रामा नशिबी येई वनवास
रावण कपटी पळवे सीतेस
कौरव जिंकती् पांडवांस द्यूती
द्रौपदी नशीबी येई अनीती
काळ रात्र ग्रासे जेव्हा जगाला
आणि धर्म जाई जेव्हा लयाला
जनतेस वेठीस धरती सत्ता
धनिक शोशती परद्रव्य मत्ता
जेव्हा अन्याय सीमा गाठती
प्रक्षोभ उद्रेक तेव्हाच होती
पाकळ्या होती ज्वाळा अकाली
आणि फुलांच्या होती मशाली

सुधीर



Vasant_20
Monday, February 05, 2007 - 2:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम!!!!!
दुसरा शब्दच नाही.


Mankya
Monday, February 05, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर ... कविता मला खुप आवडेश !
चित्रांच म्हणशील तर मला हटके प्रकार आवडतो ... आणि चित्रकवितेसाठीही ते पोषकच आहे की !

माणिक !


Mankya
Monday, February 05, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aadhar

नुसतच बरोबर चाललो
तर ती सोबत होत नाही
कर्तव्य म्हणुन केलं
तर ती मदत होत नाही !

शेवटी आधार लागतोच मित्रांनो कुणाचातरी !

माणिक !


Lopamudraa
Monday, February 05, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक एकाहुन एक चित्र (कुठुन आणतोस रे..!!!)
सुधिर कविता छानच..


Jo_s
Monday, February 05, 2007 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वसंत, माणिक, लोपा धन्यवाद
माणिक हे चित्रही खासच आहे


Sherloc
Tuesday, February 06, 2007 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नागपुर साहित्य सम्मेलनात कवी प्रदीप निफाडकर यांनी वाचलेली गझल "प्रत्येक ठिकाणी भेटते मला माझी मुलगी, प्रत्येक मुलीत भेटते मला माझी मुलगी" (अशी काहीशी) इथे टाकायला आवडली असती.

Suvikask
Thursday, February 08, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाच राहो हातात हात
कधी ना सुटो जन्माची साथ
परस्परांच्या आधारावरच
चालु भविष्याची वाट


Santu
Saturday, February 10, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पहा सिंधुदुर्ग

Seemadhav
Thursday, February 15, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



हि रक्त फुलान्चि ज्वाळा
प्रत्येक जीव हा जळतो
काळोख दाटतो तरीही
अन्धार जगतसे जो तो

पाखरे पाहती दूरूनी
हा खेळ नवा फुलण्याचा
इथे जरा विसावे वाटे
पण ठाव नव्हे नित्याचा

कळले कधी न कोणा
हा जन्म फुकाची गेला
हे जीवन फुलण्याआधी
नभी गंध उडूनी गेला

फुलल्याची जाणीव होते
तोवर देह पाकळी झडते
मग हळहळ वाटे क्षणभर
अन मुक्त पाखरू उडते

हि रक्त फुलान्चि ज्वाळा
प्रत्येक पाकळी निखळते
काळोख भेदूनी तेव्हा
जीवज्योत क्षणी उजळते.....

माधव


Saurabh
Thursday, February 15, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहोत खूब! .. ..




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators