|
Sarang23
| |
| Thursday, December 28, 2006 - 5:48 am: |
| 
|
वा मिनू! छान कविता
|
Shyamli
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:13 am: |
| 
|
धन्यवाद गणेश स्मि,सखी,सारंग... अरे सारंग मी जीवंत आहे की अजुन म्हणुन ही जाणिवही नको बाकी तु म्हणतोयस तेही पट्तय मग जाणिवेच्या पलिकडेच असेल सगळ
|
Sarang23
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:30 am: |
| 
|
आभाळ प्रत्येकाने ओढून घ्यावी आनंदाची झालर कण्हता कण्हता जपत राहावी आपली ताठ कॉलर थोड्या पैशात सुद्धा करून घ्याव्या चैनी कधी आवाज खोल जाता फक्त व्हावे मौनी तसा साधा वारा सुद्धा उडवून लावतो जगणं जमलं पाहिजे वादळ झेलून आभाळाला बघणं सारंग
|
Shyamli
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:36 am: |
| 
|
तसा साधा वारा सुद्धा उडवून लावतो जगणं जमलं पाहिजे वादळ झेलून आभाळाला बघणं>>> वा वा... खासच
|
Princess
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:39 am: |
| 
|
श्यामली, काय सुरेख लिहितेस ग. तुझे वैशिष्ट्य म्हणजे, कमी शब्दात खुप खुप सामावलेले असते. अगदी लहान कवितेत सुद्धा खुपदा "जोर का झटका" देउन जातेस. आणि मग किती तरी वेळ मनात तेच घोळत राहते. great आहेस तू.
|
Jayavi
| |
| Thursday, December 28, 2006 - 7:50 am: |
| 
|
श्यामली..... कहर गं नुसता! अप्रतिम! शब्दच नाहीत काही...... लिहित रहा गं राणी
|
Jayavi
| |
| Thursday, December 28, 2006 - 7:58 am: |
| 
|
सारंगा...... सही! जमलं पाहिजे वादळ झेलून आभाळाला बघणं खासच!
|
Daad
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:23 pm: |
| 
|
देवा, तसा साधा वारा सुद्धा....किती साध्या सोप्प्या शब्दात लिहिता, सुंदरच!! स्मि, आठवणी, 'मैलाचे दगड आहेत माझी दु:खे', उ:शाप सार्याच कविता सुंदर गं! मीनू, पिंपळ-पहिल्या ओळीपासून जखडलस. अनेकदा वाचली ही कविता..... तुझ्या मनातलं गावही किती छान उतरलय कागदावर. कान्चन्गन्धा, गुलमोहराच्या कुशीतही बहरलेला बहावा अप्रतिम! श्यामली- जिवाला चटका लावणारी कविता! पहिलाच शब्द - "सणकन" - अगदी सबंध कविता या एका शब्दातून (ओळीत) उठलीये...... खूप सुंदर.
|
"तुला दिसला बाहेर... धोधो कोसळ्णारा पाऊस! पण.. तुला दिसला नाही... माज़्या डोळ्याआड... रिमज़िमणारा पाऊस ! " गणेश
|
Sarang23
| |
| Friday, December 29, 2006 - 1:22 am: |
| 
|
गणेश... छोटी पण छान कविता. मला ही अशी वाचावीशी वाटली तुला दिसला बाहेर... रिमझिमणारा पाऊस! पण... तुला दिसलाच नाही... माझ्या डोळ्यांआड मुसळधार बरसणारा पाऊस!
|
निरोप.... भरल्या मैफ़िलीतुन जड पावलांनी जायची वेळ आली निरोपाची घटिका अबोल झाली तरीही शेवटचे आभार ऐन वैशाखात माझ्यासाठी मल्हार गायलेल्या सुरांनो- आभार! वणव्यात त्या माझ्यासाठी बरसलेल्या मेघांनो-आभार! निष्पर्ण माझ्या देहवेलीवर बहर फ़ुलवणार्या वसंता-आभार! विराण रात्री, काळोख्या निजेत उमलणार्या स्वप्नकळ्यांनो-आभार! सावळ्या सांजवेळी कुशीत विसावलेल्या रवीराजा-आभार! शीतल शारद चंदेर राती मिठीत आलेल्या चांदव्या-आभार! आणि कळतनकळत अजाणतेपणे दुखावल्या गेलेल्या माझ्या फ़ुलांनो-क्षमा!!!
|
Krishnag
| |
| Friday, December 29, 2006 - 2:09 am: |
| 
|
स्वागत!!! उषेच्या कुशीतून उमलणार्या किरणांनो.... स्वागत! पाना फुलांवर चमकणार्या दवबिंदुनो... स्वागत! तरुशिखरी भुपाळी गाणार्या पक्षीगणांनो.... स्वागत! रवि किरणांनी उमलणार्या कौमुदींनो.... स्वागत! अवकाशी जल पेलणार्या जलदांनो... स्वागत! मृदगर्भात विकासणार्या अंकुरानो.... स्वागत! निशेच्या पदरी फुलणार्या चन्द्र चन्द्रिकांनो.... स्वागत! निराशेच्या तमी तेजाळणार्या आशाकिरणांनो.... स्वागत! किशोर
|
Meenu
| |
| Friday, December 29, 2006 - 4:04 am: |
| 
|
वा कांचनगंधा आणि कृष्णाजी सुंदरच निरोप आणि स्वागत दोन्हीही ...!!!
|
Smi_dod
| |
| Friday, December 29, 2006 - 4:39 am: |
| 
|
वा कांचन... निरोप सुंदर आणि किशोर त्याचे उत्तर स्वागताने...सही... स्वागत झकास!!!
|
Krishnag
| |
| Friday, December 29, 2006 - 4:51 am: |
| 
|
धन्यवाद स्मि,मीनु.. मीनु,कांचनची कविता मला २००६ ला निरोप देणारी वाटली आणि त्याला उत्तर म्हणून ही समोर आली. त्यामुळे आभार कांचनचे मानायला हवे.. कांचन, निरोप मस्तच!!
|
Shyamli
| |
| Friday, December 29, 2006 - 9:33 am: |
| 
|
बाय हे बघ दोनच दिवस राहिलेत तुझा सगळा पसारा आवरून ठेव आणि घेऊन जा बरोबर वर्षभर तूच घातलेला गोंधळ, दोन दिवसांच पूर्णं स्वातंत्र्य तुला, काय वाट्टेल ते कर बघणारही नाहीये तुझ्याकडे पण शेवटच्या क्षणी मागे न बघता गुपचुप निघून जायच. आणि हो, फक्त बाय म्हणायचं, सी यू मनातसुद्धा नाही पुटपुटायचं.... कारण, निरागस बाळाला घडवतात्; तसं नव्या वर्षाला घडवायचय मला श्यामली!!!
|
Shyamli
| |
| Friday, December 29, 2006 - 9:57 am: |
| 
|
कांचन, क्रिश छानच, मजा आली वाचायला पुनम अग एवढ कौतुक नको ग करुस झेपायच नाही मला, भावना पोचल्या इतकच पुरेस आहे ग, नाही का शलाका, अगदी बरोबर ओळ्खलस त्यातुनच आलीय सगळी कविता, जयु,
|
Jo_s
| |
| Friday, December 29, 2006 - 10:31 am: |
| 
|
धुसर ….. माघातली सांजवेळ मखमली किरणांचा नाजूकसा खेळ पश्चीम क्षितिजी ढगांची लोकर हट्टी थंडीची अनामीक थरथर शेतं मात्र, उदास वृध्द, सुरकुतलेली जवानिच्या आठवणींतच खोल हरवलेली बाभळीचे झुंबे, तृणपुष्पांची राने सारं काही लुटून नेलं त्या विरक्त शिशिराने आकाशाकडे, सहजच पाहीलं आणि मन लगेच तिकडेच धावलं विश्वासच बसेना, पटेना मनी पण खरच होत्या तिथे पावसाळी ढगांच्या पलटणी समोरचा डोंगर, धुक्यातून डोकावला बाभळीच्या अंगावरही काटा आला कपाशीची फुलं उगीचच थरथरली अन् पाऊलवाट जागीच बावरली वाऱ्यालाही चढला, जोम नवा पिंपळही झपाटला, लागताच ती हवा लखलखत्या किरणांचा पंखा, उघडताच पश्चीमेने बाजुच्या ढगांची लोकर, भिजली सोन्याने इतक्यात एक अवखळ सर, गिरकी घेत आली वृध्द शेत, शुष्क मातीत, थरथरली, झिरपली कौलांनीही लहानांसमं, थेंब फुले जमवली सळसळत सळसळत पिंपळ ओरडला “पाऊस पाऊस” खालची देवबाभळ ओरडली चल खोटारड्या मला थंडी वजत्ये तुझी ही कसली हौस पिंपळाने मग पानांच्या ओंजळीतले कोवळे थेंब तिच्यावर ओघळवले जणू तिला स्वप्नातून जागे केले गिरक्या घेत, फेर धरत थेंब येत होते अजून पश्चीमही घेत होती आता किरणांचा पंखा आवरुन ढगां आड सारे, रंग आता दडले काही क्षणात असे, नाट्य सारे घडले अन् आषाढातले तारुण्य, मातीला परत मिळाले एखाद्या आश्चर्या सारखा पाऊस दाटून आला अन भिजलेल्या मातिचा सुगंध दरवळू लागला…. सुर्य, केव्हाच मावळला अजूनही पाणी ठिबकतय कौलावर ताशा वाजतोय मातीचा सुगंध, सारं भारुन टाकतोय आकाश मात्र निवळलय एकिकडे शुक्राचा तेजस्वितारा आणि बाकी आसमंत सारा, सुगंधी, स्वप्नमय, धुसर धुसर धुसर धुसर् धुसर् धुसर् …… (मंगेश पाडगावकरांच्या “धुसर” या लेखावरुन स्वैर……) सुधीर
|
Sumedhap
| |
| Friday, December 29, 2006 - 11:43 pm: |
| 
|
आपल्या कडे एका मुलीचं लग्न ठरल्या नंतर तिच्या मनात काय विचार असतात याचं वर्णन या कवितेतुन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मला भेटला ग माझ्या, मनाजोगा राजपुत्र ठरलंय लग्न आता संपलंय शोधसत्र मनी भिती दाटुन येते, कसं असेल सासर सर्व माणसं नवीन, आणी माझं नवं घर साथीदार आयुष्याचा, नवी स्वप्ने ही लोचनी असेल का तो तसाच, जसा आहे माझ्या मनी? मैत्रिणींची चिडवाचिडवी, माझं हसणं लाजणं संसार होईल का नीट, न निघो काही उणं माहेरवाशीण मुलगी, जशी तुळस अंगणी वसा तश्या पावित्र्याचा, घ्यावा बांधुन कंकनी सांभाळुन घे सर्वांना, कर सुखाचा संसार म्हणे माऊली ती नेत्री, आणुन मोती ते हजार पिता म्हणे माझी चिमणी, बघा झाली किती मोठी सांभाळ रे देवा तिला, नांदो सुख तिच्या ओटी सासरवाशीण मी होणार, घेऊन माहेरच्या आठवणी सोबतीला असतील माझ्या, इथल्या प्रेमाच्या साठवणी.
|
Krishnag
| |
| Saturday, December 30, 2006 - 12:08 am: |
| 
|
परतीचा प्रवास!!! आज निघालोय परतीच्या प्रवासाला उद्या इतिहास होणार माझा काही दिवस तुम्हालाही चुकल्या चुकल्यासारखे वाटेल पहिले काही दिवस नव्याच्या ऐवजी माझाच उल्लेख कराल मग स्वःतवरच चिडाल काय हे वर्षभराची खोड जात नाही म्हणून माझ्या उरी साठलेल्या तुमच्या कडू गोड आठवणी काढून कधी रडाल तर कधी हसाल कधी मनोमन गंभीर होउन आपण हे असे करायला हवे होते म्हणाल तर कधी झाले हे छानच झाले म्हणाल असाच मी नेहमी येणार नव नंबर घेउन तुम्हाला वाटेल नविन आलय आता नविन घडवूया पण मित्रानों.... मी तोच असणारे नविन (का जुणे?) तुम्ही होणार आहात नविन तुम्ही घडवणार आहात मी तोच असणार तरी नाविन्य तुम्ही पहाणार माझ्यात आणि पुन्हा माझे जुने नंबर आठवत तेंव्हा होते तेच छान होते म्हणणार!! आणि पुन्हा माझ्या नव्या नंबराची वाट पहात बसणार! किशोर
|
|
|