|
Cool
| |
| Monday, January 01, 2007 - 8:34 am: |
|
|
'अजुन तरी' या शिर्षकाची संदिप खरे यांची एक सुंदर कविता आहे. मुळ कवीची क्षमा मागुन याच कवितेवरुन विडंबनाचा एक छोटासा प्रयत्न करुन पाहिला आहे. मुळ कविता आणि विडंबन दोन्ही सुद्धा देत आहे. मुळ कविता : अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥ आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥ कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥ कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥ कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥ अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ... विडंबन: (आजच्या राजकारणी लोकांबद्द्लची स्थिती दर्शविण्याचा हा प्रयत्न) अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥ त्यांनी देखील खेळ मांडिला, बंदुक आणि धुर त्यांना सुद्धा दिसला दुष्काळ, पाउस आणि पुर अजुन तरी मनी त्यांच्या कसली ना हुरहुर शिव्या घालिती लोक, म्हणती जन हे तोबा तोबा खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥१॥ कुणी मिडियाचा मारुन बाण, दाखविली भिती कुणी धर्माची देउन आण, शिकविली प्रिती मद सोडुनी पद स्मरा हो, समजावली निती सगळे व्यर्थ तसाच राहिला, अवगुणांचा ताबा खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥२॥ दिसला त्यांना किसान राजा, घेउन हाती दोर कफन लुटले, जवान तरीही गनिमा दावी जोर वाघही त्यांनी जपला नाही, जपला नाही मोर निर्लज्ज हे केवळ जपती, 'म्याडम' आणि 'साहेबा' खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥३॥ मुले उद्याची सवाल करतील, उत्तर असेल काय तुमचे सगळे चित्त केवळ, चोरुन खाण्या साय मोहापायी जनतेची, फिकीर केली नाय जनकल्याणासाठी झगडा, सांगुन गेला शिवबा खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ॥४॥ अजुन तरी रुळ धरुन धावला नाही डब्बा खादी डगले घालुन सुद्धा चारित्र्यावर धब्बा ---- सुभाष डिके (कुल)
|
Dineshvs
| |
| Monday, January 01, 2007 - 9:16 pm: |
|
|
वा सुभाष, ईतरांच्या कविता वाचता वाचता, तु तयार झालास कि.
|
Devdattag
| |
| Monday, January 01, 2007 - 11:37 pm: |
|
|
कुल गुड वन रे.. मुळ गाणे: विकत घेतला श्याम विकत घेतला ताप..(बिग बॉस वर आधारीत) नाही करमणूक पैशाइतुकी, नाही फडाची थाप विकत घेतला ताप बाई मी विकत घेतला ताप कुणी म्हणे ती वेडी राखी, रुपालीही रडे सारखी जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजितसे रवि बाप राग काढुनी कॅरोलवरचा,बिगबॉस हा बनण्या घरचा हाच राहूल ज्याला मख्ख चेहर्याचा रे शाप एवढे भांडण एवढे दावे, जितकी तोंडे तितके चावे कुणी न ओळखी यांना तरीही सेलिब्रिटीचे माप
|
Shyamli
| |
| Tuesday, January 02, 2007 - 1:25 am: |
|
|
हे हे हे देवा मस्त अरे सेलीब्रेटी म्हणुन कोणि ओळ्खत नाही आता म्हणुन तर ईथे आलेत हे लोक की आता तरी कुणि ओळ्खेल आपल्याला
|
Sarang23
| |
| Thursday, January 04, 2007 - 8:52 am: |
|
|
मुळ कवितेची लिंक ढेकूण कितीदा पहाटे मला जाग आली तुला ढेकणा ना तरी लाज आली मला साहवेना, तुला राहवेना किती खाज आली, कुणाला कळेना तरी थांबती ना, तुझ्या हालचाली गडे झोप घे जा, तु जागा कशाला? तुझा खेळ होतो, तमाशा जगाला किती चावतो रे कडाडून गाली तुला आण त्या शोषल्या रक्तिम्याची तुला आण त्या वाढलेल्या दम्याची दुजा शोध बकरा जरा भोवताली सारंग
|
Shyamli
| |
| Thursday, January 04, 2007 - 9:01 am: |
|
|
सारंग.. .. .. ...
|
Dineshvs
| |
| Thursday, January 04, 2007 - 10:42 pm: |
|
|
छान सारंग. रार ने सांगितलेल्या एका पुस्तकातल्या ढेकण्या नावाच्या एका उपकरणाची आठवण आली. अगदी सहज म्हणुन, विचारतोय, दुसर्या कडव्यात, गड्या झोप घे जा, अगदीच बसत नाही का, मात्रांच्या हिशेबात ?
|
Sarang23
| |
| Thursday, January 04, 2007 - 11:54 pm: |
|
|
श्यामली, दिनेशदा धन्यवाद दिनेशदा, नक्कीच बसतय!
|
Milya
| |
| Friday, January 05, 2007 - 12:51 am: |
|
|
कूल मस्तच रे. सहीच जमलेय रे देवा : सहीच... कुणी न ओळखी यांना तरीही सेलिब्रिटीचे माप >>> सारंग :
|
Sati
| |
| Wednesday, December 27, 2006 - 12:26 pm: |
|
|
फार फार वर्षांपुर्वी आम्हाला दुसरीला एक कविता होती,"घाटातली वाट" तिच्यावर आधारीत ही नवी कविता म. न. पा. निवडणुकींसाठी मतांची वाट मतांची वाट काय तिचा थाट थिरकती फिरकती नेते पाठोपाठ खैरातींची परडी कुणी केली पालथी आश्वासने सांडली वरती आणि खालती निवडुनी जाता रिकामाच घडा मतदार राजा कधी शिकणार धडा मूळ कविता-- घाटातली वाट काय तिचा थाट मुरकते गिरकते लवते पाठोपाठ निळी निळी परडी कुणी केली पालथी पाने फुले सांडली वरती आणि खालती खाली खोल दरी वर उंच कडा भला मोठा नाग जणू उभा काढून फडा
|
Maudee
| |
| Thursday, December 28, 2006 - 1:20 am: |
|
|
gr8 सति, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मला ही कविता ख़ूप आवडायची, ही आणि ती धिवर पक्ष्याची
|
Mirchi
| |
| Thursday, December 28, 2006 - 2:01 am: |
|
|
तळ्याकाठी गाती लाटा लाटांमधे उभे झाड हीच ना......
|
Sonchafa
| |
| Thursday, December 28, 2006 - 5:09 am: |
|
|
सति, आश्वासने सांडली वरती आणि खालती वरच्या मूळ कवितेत माझ्या आठवणीप्रमाणे अजून दोन कडवी होती.. ती अशी.. भिउ नका कोणि, पाखरांची गाणी सोबतीला गात गात खळाळतं पाणी घाटातली वाट काय तिचा थाटं गाणी म्हणू टाळ्या पिटू जाऊ रुबाबातं
|
Maudee
| |
| Friday, December 29, 2006 - 9:19 am: |
|
|
.. .. exactly तीच तीच
|
Sati
| |
| Friday, December 29, 2006 - 9:26 am: |
|
|
धन्यवाद!मॉडी,सोनचाफा. सोनचाफा पूर्ण कविता दिल्याबद्दल धन्स गं! तशी मी पहिल्यापासूनच विसराळु.--साती
|
Meenu
| |
| Tuesday, January 02, 2007 - 3:14 am: |
|
|
साती मस्त गं .. माउडी, मिरची अगदी अगदी .. ती वर्गात चालीत म्हणायचो तश्शी आठवली आत्ता ..
|
|
|