|
Mrinmayee
| |
| Saturday, December 30, 2006 - 4:38 pm: |
|
|
सध्या भानु आजींच्या घरी सगळं कसं शांत शांत आहे. सुनबाईंची नवर्याजवळ का ss ही तक्रार नाही, नातु देखील "कटकट नको ग करूस आजी" म्हणून खेकसंत नाही. आजोबा तर कमालीचे खूश आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर "पूर्वजन्मीची पुण्याई येते हो कामी! माझा विश्वास बसलाय यावर. कारण सांगतो.." मग अगदी हळू आवाजात.. "आमची 'भानामती' सध्या बीजी आहे बघा. तिला वेळच नाही माझं डोकं खायला. ४५ वर्शांच्या तपश्चर्येनंतरचा चमत्कार बरं का"! या सगळ्याला एकच कारण.. आणि ते म्हणजे आजींच्या वाढदिवसाला त्यांच्या लेकानं त्यांना चक्क कंप्युटर प्रेझेंट केलाय. आणि घरात नेट बसवून घेतलंय. आजी आजकाल चक्क 'नेट सर्विंग' (त्यांचेच शब्द) करतात! काल परवाच कुणीतरी त्यांना 'मायबोली' बद्दल सांगीतलं आणि आजींच्या फेर्या सुरु झाल्या.. पण सध्या फक्त रोमात!! टाइप करता येत नसल्यामुळे त्या इथे प्रतिक्रिया देउ शकत नाहीत, पण आम्ही त्यांच्या तोंडून त्या ऐकल्याच. त्यांच्या कंप्युटरला माइक आहे. आणि त्यात बोललं की नेटवर 'सगळ्यांना' त्यांना काय म्हणायचय ते कळतं असा त्यांचा समज करून देण्यात आलाय. त्यामुळे चिंगुल्या मायक्रोफोने मधे तोंड घालून त्या बरंच काही बोलतात. त्या जबरजस्त टिकाकार आहेत. सुनेच्या जेवणापासून घरच्या पाहुण्यापर्यंत सगळ्यावर त्यांची स्पेशल मतं आहेत. त्यामुळे 'मायबोली' देखील त्यांच्या तावडीतून सुटलेली नाही. मुख्यत: 'हितगुज'वर आल्यापासून तर त्यांना काय बोलु आणि काय नको असं झालंय. सध्या थोडक्यात त्यांची मतं अशी... "नाव छानंच ठेवलय हा साइट्चं, अगदी इथे 'सर्विंग' करावसं वाटलं नावावरूनच!" (लेकानी जरा net101 पाठ दिलेत) "पण जरा खटकलीच एक बाब!! 'हितगुजवर स्वागत' असं ल्याहायचं पण स्वागताला मेलं काळं कुत्र देखील नाही. हार बीर सोडा, पण वयानं मोठ्या माणसाला साधा हात जोडुन नमस्कार करताना दिसंत नाही कुणी! जाउ द्या, तरी मी माझे आशिर्वाद देतेच!" रंगीबेरंगी: "मेलं इंग्रजी शिकले अस्ते तर कळलं असत कुठे जायचं ते. का ss ही कळलं नाही. जागा घ्या, पैसे भरा.. नस्ते उपद्व्याप! अन काय करा टिचभर जागेचं?" माझ्या गावात: "पुन्हा मेलं इंग्रजीत.. तेच नडतंय. गाव सोडून ४५ वर्श झालीत मला. आता काय सांगायचं.. पंधयाव्या वर्शी उजवली मला. तेव्हा गावात वीज नाही, पाणी नाही. शांती अन मी चिंचा खात भटकायचो.एके दिवशी पाठीत दोन रट्टे हाणून आईनं परकर पोलक्यातून पातळात आणली अन..." इथली कथा बराच वेळ लांबली. त्यामुळे आजोबा आणि सुनबाईंनी मनसोक्त भटकून घेतलं. दोघांनी मिळून 'सौ दिन सासके' पण बघीतला. संस्कृती आणि समाज: "आजकाल समाजात कुठली राहीलीय संस्कृती! सगळा मेला नंगा नाच! ती गाणी काय चित्रपट काय.. सगळंच अचकट विचकट. पण चार दोन बरी गाणी पण दिसली हो! तेव्हडंच बरं वाटलं." आहारशास्त्र आणि पाककृती: इथे मात्र आजींना बोलण्यासारखं बरंच असतं. पण सुनबाई आजुबाजुलाच असल्यामुळे, "बरंच बरं लिहिलंय हो. काही पदार्थात जरा कमीजास्त दिसतंय अंदाजात पण आमच्या घरच्या स्वयंपाकापेक्षा नक्कीच बरे अस्णार हे पदार्थ!जरा मोकळा वेळ मिळाला की सांगीन दुरुस्त्या." धार्मिक: "पुजेची माहिती, शंका निरसन बरं लिहिलंय. बाळाच्या उष्टावणाची माहिती सांगीन सविस्तर. अध्यात्मिक अनुभव तर विचारुच नका. धाकट्याच्या वेळी दिवस असता.. हे लांबण बरंच चाललं! भाषा त्या फक्त जिभेचं वळण म्हणून वापरतात. आणि साहित्यात खास रस नाही. त्यामुळे आरोग्यात जाऊन दोनचार कामाच्या गोष्टी सांगीतल्या भानुआज्जींनी. बाळंतपणातला आहार आणि इतर बर्याच समस्यांसाठी आज्जींना विचारता येईल त्यांचं अकाउंट इथे उघडल्या गेलं तर. 'तंत्रज्ञात' पण फारशी बोलायची सोय नाही त्यांना. पण आधी 'आगीचं धन कशाला' असं विचारणार्या आजी आजकाल गॅस सिलिंडर लवकर आलं नाही की आणि वीज गेली की सरकार पासून आजोबांपर्यंत सगळ्यांच्या नावानी ठणाणा करतात. 'परदेशात रहाताना' सदरासाठी पण त्यांच्याकडे बरेच सल्ले आहेत. पण सध्या त्यांनी "असाल तिथे जपून सुखी रहा रे बाबांनो!" येव्हडाच प्रेमळ सल्ला दिलाय. त्यांना सध्या मदत नकोय कश्यातच. त्यामुळे 'मदत हवी आहे?' साठी त्या काही खास बोलल्या नाहीत. फक्त "काही लागलं सवरलं तर कळवा. हे अन मी घरीच आहोत सध्या." येव्हडच सांगीयलंय! 'तुम्हाला काय वाटतं' या बीबी साठी असलेली त्यांची मतं केवळ विस्तारभयानं आणि जरा जास्तच वादळग्रस्त होतील या भयानं देता येत नाहीत. पण इथे त्या मतं द्यायला बसल्या की तो दिवस सासरे आणि सुनबाईंचा 'आनंदीआनंद गडे' चा दिवस असतो. अगदी थोडक्यात सांगायचं तर इथल्या चर्चेपेक्षा त्यातल्या मतांवर आजींची खास मतं आहेत. त्या कुठल्याच राजकीय पक्षाच्या पुरस्कर्त्या नाहीत. जगातला हिंसाचार थांबायला हवा असं त्यांनाही वाटतं. काही जण 'उठता लाथ अन बसता बुक्की शिवाय सुधरणार नाहीत' असं त्यांचं मत आहे. काहींच्या मताबाबत त्यांना चक्क कौतुक आनि आदरही वाटला. "काय गं बाई. आजकालच्या मुलांना इवल्याश्या वयात काय पण अकला असतात. आमच्या अकलेचं घोडं मेलं नको त्या जागी पेंड खातं. हे अन सुनबाई नाहीयेत इथे तेव्हा तुम्हाला म्हणून सांगते. आपल्याजवळच ठेवा." असंही त्या माइकमधे कुजबुजल्या. 'माझा अनुभव' मधे तर रोज चार गोष्टी सांगायचं त्यांनि ठरवून टाकलंय. अश्याच सुखदु:खाच्या गोष्टी बोलाव्या अन मन मोकळं करावं. पण घरची लक्तरं चव्हाट्यावर मांडताना जरा जपून!" असा सल्ला द्यायला त्या विसरलेल्या नाहीत. दिलेल्या काही सल्ल्यांवर होणारी वादावादी बघून कुणाची म्हैस अन कुणाला उठ्बैस' असं बोलायला आज्जी विसरल्या नाहीत. 'प्रतीभेच्य गुलमोहोरात' बागडायला सध्या भानुआज्जींना फुरसत नाही. त्यांची मैत्रीण 'शारदा' उर्फ 'चंडीका नंबर दोन' ह्या चार बुकं जास्त शिकलेल्या आणि साहित्यात रस घेणार्या (म्हणजे 'नवर्याची रोजनिशी' चोरून वाचु शकणार्या) असल्यामुले त्यांच्या संगतीत गुलमोहोराचं चांगलं रसग्रहण करता येईल असं भानु आज्जींना वाटतंय. बोलून बोलून घसा धरल्यामुळे दोन दिवस त्या रोमात येउ शकल्या नाहीत. तसं पाहाता read only असं त्यांचं धोरण नाही. त्या टाइपण्याच्या ऐवजी बोलून आपली मतं देतात. पण अद्याप सगळीजण त्यांच्या सुनेसारखीच त्यांच्या मतप्रदर्शनावर 'मूग गिळून गप्प आहेत' याचा त्यांना त्रास होतोय. पण त्यांच्या खाक्याप्रमाणे कुणी ऐको वा न ऐको, 'बोलणं आणि अर्थात मतप्रदर्शन हाच त्यांचा प्राणवायु असल्यामुळे मायबोली हे भानुआज्जींचं राखीव कुरण झालंय आणि आजोबांनी 'अशी सुंदर सोय' करणार्या व्यक्तीचा मी आजन्म ऋणी आहे' असं अगदी मनापासून सांगीतलंय.
|
Surabhi
| |
| Sunday, December 31, 2006 - 1:30 am: |
|
|
वा मृ, मस्त मिष्कील लिहीलयस.... अगदी शीर्षकापासून... शेवटपर्यंत.... वाचताना मजा आली...
|
Shyamli
| |
| Monday, January 01, 2007 - 9:19 am: |
|
|
lol मृ, भानु आज्जीच कशाला, ईथे तुझ माझं कुणाचही नाव चालल असत नाही का?
|
Dineshvs
| |
| Monday, January 01, 2007 - 9:50 am: |
|
|
श्यामली, तु आज्जी झालीस कि काय ?
|
Shyamli
| |
| Monday, January 01, 2007 - 12:34 pm: |
|
|
तेव्हढच नाहीये दिनेशदा बाकी एकदम perfect
|
R_joshi
| |
| Tuesday, January 02, 2007 - 1:50 am: |
|
|
मृ फारच सुंदर मिश्किल लिखाण केले आहेस.
|
Srk
| |
| Thursday, January 04, 2007 - 5:52 am: |
|
|
मृण्मयी,मजा आली. माझ्या ओळखीतल्या एक आजी मस्त गेम्स खेळत असतात. गेले की म्हणतात,"अगं ये. कसलं काम खेळत होते मजेत!" ऐकलं की गम्मत वाटते.
|
Nalini
| |
| Thursday, January 04, 2007 - 6:36 am: |
|
|
भन्नाट!
|
Savani
| |
| Thursday, January 04, 2007 - 8:32 am: |
|
|
मृ, भानू आज्जी जोरात आहेत.. जबरी.. आवडलं.
|
Arun
| |
| Tuesday, January 09, 2007 - 11:40 pm: |
|
|
मृण्मयी : छान लिहिलं आहेस. मजा आली वाचताना ..........
|
Chaffa
| |
| Wednesday, January 10, 2007 - 4:53 pm: |
|
|
मृण्मयी, मानलं बुवा काय अप्रतीम लिहीलेयस.!! ईथे आल्याचं चिज झालं
|
Sas
| |
| Wednesday, January 10, 2007 - 6:09 pm: |
|
|
मृण्मयी सहि सहि सहिच लिहलय good imagination खरच इथे आल्याच चिज झाल.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, January 10, 2007 - 6:36 pm: |
|
|
सुरभी, रुपल, शृती, नलु, सावनी, अरुण, चाफ्फा आणि सास, तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! श्यामले, तुझं किंवा माझं नाव चाललं असतं? माझं नाही गं बाई! अजून बालपणच सरलं नाही! 'मायक्रोफोनमधे बोललं की नेटवर सगळ्यांना ऐकु जातं' ही कल्पना खर्या प्रसंगातून सुचली. ओळखीच्या एक आजी भारतातून इथल्या नातवाशी बोलतात. त्यांना आणखी चार नातेवाईकांशी बोलायचं असतं, त्याचवेळी. म्हणजे "अर्णव, तुझ्या पमाआत्याशी बोलु दे.तु पण बोलत रहा रे बाबा. मग आदित्यला पण बोलव गप्पा मारायला." असा गोतावळा गोळा करायचा असतो. तर आजींच्या मुलानी त्यांना सांगीतलं, 'तु बोलत रहा. इथे नेटवर सगळ्यांना ऐकु जाईल तुझं बोलणं! फक्त तुला सगळी काय बोलतात ते ऐकु येणार नाही. चालेल?" आणि आजींना चक्क ते चालतं! आपण बोलल्याशी काम!
|
Chyayla
| |
| Thursday, January 11, 2007 - 12:51 am: |
|
|
भानु आजी मस्त... पण हे रोमात म्हणजे काय? कळले ना आम्हाला. म्रुण्मयी... तरी छान लिहिले आहेस मजा आली. सास हे आल्याच चीज कसे बनवतात "आहारशास्त्रामधे" दे बघु तुझी Recipie
|
म्रुण्मयि, मस्तच लिहल आहेस, हसुन हसुन पोट दुखल.
|
Sas
| |
| Thursday, January 11, 2007 - 2:15 pm: |
|
|
Chyayla 'आल्याच चिज' कस करायच??? 'चाफ्या' ला विचारल पाहिजे त्याच वाक्य मी ढापलय.
|
|
|