|
Adm
| |
| Monday, December 25, 2006 - 4:32 am: |
| 
|
निघायची वेळ आली आणि राज नमस्कार करायला वाकला..कितीही नाही म्हंटल तरी आशीर्वाद देता देता निशाच्या डोळ्यात दोन चूकार अश्रू आलेच... आज तिचा मुलगा पहिल्यांदाच तिच्यापासून इतल्या लांब जाणार होता... त्याची प्रगती, यश पाहून तिला होत असलेला आनंद हा तो दूर जाणार ह्या हूरहूरी पेक्षा कितीतरी जास्त होता..."<Come on >आई मी वर्षभरासाठीच तर जाणार आहे...आणि फोन, <emails>हे सगळा आहेच ना..आणि तुला आनंद नाही झाला मी ऑफ़िस च्या <assignements> साठी अमेरीकेत चाल्लोय त्याचा?" निशाच्या डोळयातिल पाणी पाहून राज म्हणाला.. "झालाय रे राज...तुला नाही कळायचा ह्या अश्रूंचा अर्थ..तुझी मुलं मोठी होऊन अशी बाहेर जातील ना तेव्हा कळेल तुला..." "हॅ..मी नाही असा रडणारं..उलट त्यांना सांगेन तुम्ही ही जगा आणि मला ही जगू द्या..." राज तिला चिडवण्यासाठी म्हणाला..."शहाण्या..जसा काही मी तुला त्रासच देते..." निशा लटकया रागाने त्याला म्हणाली.. "आता तुम्ही माय लेक इथेच गप्पा मारत बसलात तर <flight new york> ला पोचेल पण.." गाडीत बसलेला सुरेश उतरून आत येत म्हणाला.. शेवटी राज गेला आणि सगळी धामधूम एकदाची संपली... निशा निवांतपणे बाल्कनीतल्या आराम खूर्ची वर डोळे मिटून बसली.. ही जागा तिला विशेष आवडत असे... भर पार्ल्यात असूनही घराबाहेर असलेल्या बागेतल्या दाट झाडी मुळॆ त्या ठिकाणी छान गारवा असे.. आणि बागेतल्या सोनचाफ़्याला असलेल्या बहरामुळे मंद सुवासही दरवळत असे... शहरी दगदगीतून बाहेर पडून <relax> व्हायला निशाला ५ मिनिट बाल्कनित बसलं तरी पुरत असे..डोळे मिटून शांतपणे बसल्यावर निशाला सहाजिकच राजची आठवण येत होती.. आणि अगदी त्याच्या लहान पणा पासून च्या गोष्टी डोळ्यासमोर तरळून जात होत्या..राज लहानपणा पासून तसा हुशार आणि <sincere>.. वर्गात जरी पहिला येत नसला तरी कायम पहिल्या दहात येणारा आणि मुख्य म्हणजे <consistant performer>.. एखादी गोष्ट ठरवली की मात्र ती तडीस नेणारा.. मग अगदी ते एका रात्रीत तयार केलेलं <scince exhibition>चं <project>असो किंवा <gathering>साठी महिना भर आधी <practice> करून बसवलेलं <guitar> वरच गाणं असो.. एकदा करायला घेतलं की ते उत्तम च करणार.. निशा आणि सुरेश ने पहिल्यापासून दिलेल्या निर्णय स्वातंत्र्यामुळे त्याची स्वत:ची ठाम मतं होती आणि आपल्याला नक्की काय करायचय ह्याचे <funde> अगदी <clear> होते... लोकं करतायत किंवा सांगतायत म्हणून मी हे करेन हे त्याला अजिबात पटत नसे...दहाविला उत्तम मार्क्स मिळालेली सगळी मुलं लांबच्या पण <well known> कॉलेज आणि <class> मधे <admission> घेत असताना हा मात्र घराच्या सगळ्यात जवळाच्या कॉलेज मधे जाऊन <admission> घेऊन आला होता... "बाबा, जर मी प्रॅक्टीकल चे मार्क्स सोडून कुठल्याही गोष्टी साठी कॉलेज वर <depend >असणार नाही तर मग उगाच कशाला इतक्या दूर जा.. आणि शिवाय ते ट्रेन ने ये जा करा.. मलाही त्रास आणि तुम्हाला काळजी.." त्याच हे <explanation>सुरेश ला एकदम पटलं होतं...}
|
ही किंवा अगदी हाच आशय असनारी कथा मायबोलीवर आधी प्रसिध्द झाली होती.
|
Adm
| |
| Monday, December 25, 2006 - 2:09 pm: |
| 
|
केदार, मला Link पाठवणार का please कारण मी कालच member झालोय मायबोली चा so मला महित नाहिये... anyways मी पुढचे थोडे भाग लिहितो... if you still find similarity, I will stop the thread...
|
Adm
| |
| Monday, December 25, 2006 - 3:08 pm: |
| 
|
बारावी चा अभ्यास राज नी अगदी मन लावून केला... अगदी पक्क धेय मनाशी बाळ्गून.. मात्र त्याच्या मनात काय हे निशा आणि सुरेश ला देखिल कळू शकले नाही.... PCM आणि PCB ह्या दोन्ही groups मधे उत्तम मार्कानी पास झाल्यावर admission कुठल्या side ला घ्यायची ह्यावर खल चालू झाला... राज ची ह्यावरची मत सुद्धा अगदी ठाम... सुरेश च्या त्याने मेडिकललाच जाव ह्या इच्छेला त्याने साफ़ फ़ेटाळून लावल... "बाबा मला VJTI Comp ला सहज admission मिळत असताना मला medical ला ज़ाण्यात अजिबात interset नाही... आणि तुम्ही बघा पुढची २० वर्ष IT ची असणार आहेत... " ह्या सगळ्यात सुरेश मात्र थोडा दुखावला गेला..."निशा, मुलाने आपल्या मताप्रमाणे वागलच पाहिजे अशी माझी इच्छा नाही पण निदान विचार करायला काय हरकत आहे... एव्हडा ठाम निर्णय घेउन मोकळ व्हावं? " "जाउदे रे सुरेश, त्याला आवड आहे ना त्याची मग करू दे त्याला computer Engineering आणि तुझा त्याच्या क्षमतेवर विश्वास आहे ना..तो ह्यात ही उत्तम तेच करेल.." वरुन जरी सुरेश काही बोलत नसला तरी निशाला महित होत तो कुठेतरी मनात थोडा दुखावलेला आहेच... पुढे राज college आणि आभ्ह्यासत busy होतं गेला आणि यश मिळवतच गेला..त्याच submission , परीक्षा, extra curricular activities हे जणू निशा आणी सुरेश च्या आयुष्याचा भाग च बनून गेलं होतं.. रात्री च्या जेवणाच्या वेळी जेव्हा ते एकत्र बसत तेव्हा मग चर्चांना उत येत असे... तिथेही राज आपली मतं आई वडिलांच्या गळी अगदी हिरिरीने उतरवत असे.....जणू पड खायची किंवा विरोध ऐकायची त्याला सवयच राहिली नव्हती.. "राज तू engineering ऐवजी law कराय्ला हवं होतस भल्याभल्याना पाणी पाजललं असतसं" निशा त्याला गमतिने म्हणत असे.. "राज तुला GRE किंवा gate नाही द्यायची?" निशा ने एकदा त्याला विचारलं... "आई, सलग १६ वर्ष मी आपला शिकतोच आहे... so मधे १-२ वर्ष जरा job करेन मग बघू pg चं पुढे... " "अरे, सलग शिक्षण होउन गेलेलं बरं असतं....आअणि आत्ता आम्ही कामावते आणि धड्धाकाट आहोत तोपर्यंत काही जाबाबदारी नाही तुझ्यावार.. उद्याचं कोणी सांगावं?" "आई, don't be so pesimistic तूझ्या आणि बाबांच्या retirement ला आजून कितितरी आव्काश आहे... अजून १-२ वर्षंनी पण तुम्ही कामावते आणि धड्धाकाट च असणार आहत.. " राज चं final year चालू झालं आणि कॉलेज मधे campus interviews चालू झाले.. राज ला पाहिल्याच interview मधे त्याच्या dream compnay मधे म्हणजे Infocom Infotech मधे भरभक्क्म ऑफ़र मिळाली Interview मधेही राज च्या जबरदस्त आत्मविश्वासावर Interview panel खूष झालं... Linux ह्या राज च्या आवडत्या विषयावर तर त्यांच्यातली Technical जुगल्बंदी चंगलीच रंगली..
|
ADM carry on पहीला भाग अगदी सिमीलर वाटला. क्षमस्व. लिंक सापडत नाहीये पण मिळाली तर नक्की देईन.
|
Sakhi_d
| |
| Monday, December 25, 2006 - 10:50 pm: |
| 
|
ADM छान लिहिले आहेस. पुढचा भाग लवकर येऊ दे.
|
Adm
| |
| Tuesday, December 26, 2006 - 2:04 am: |
| 
|
Interview Panel मधले एस. कर्तिक राजच्या technical knowledge वर खूप च प्रभावित झाले आणि त्यांनी राज ला कुठल्या client account वर टाकण्यापेक्षा research unit मधे टाकायची शिफ़ारस selection च्या वेळेसच केली.. हे अर्थातच राज ला अधी सांगितलं नव्हतं... Final Year ची परीक्षा झाली आणि result लागयच्या अधिच Infocom Infotech कडून Joining Date आली... राज काय तयार होताच... join झाल्यावर त्याला Research Unit बद्दल समजलं आणि त्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही... सगळे senior आणि हुशार colouges , नविन शिकायला मिळणार्या गोष्टी, उत्तम दर्जाचं infrastructure ह्या सगळ्यात राज खूप रमला आणि त्याच्या कुशाग्र बुध्दीला मेहेनतिची साथ मिळून अपेक्षेपेक्षा अधिक चांगलं output मिळू लागलं... राज रात्री उशिरापर्यंत ऑफ़िस मधे रमू लागला... कधिकधि निशा त्याला म्हणत असे "राज, तू रात्री तरी कशाला घरी येतोस.. तिकडेच झोपत जा ना ऑफ़िस मधे.. week end ला येऊन आम्हाला तोंड दाखवत जा फ़क्त..." "अगं आई हेच तर वय आहे झापाटून काम करण्याचं... तू म्हणतेस त्याप्रमाणे अत्ता काही responsibility नाही तोपर्यंत मी करून घेतोय मी सगळं... आणि तुला नाही वाटत आपल्या मुलाने खूप नविन गोष्टी शिकाव्या आणि चांगल काम करावं..." "वाटतं रे.कोणत्या आईला नाही वाटणार.. पण तू आमच्या बरोबर अधिक वेळ द्यावास असही वाटतं... " राज आणि निशा मधे हे असे संवाद अधे मधे घडत असत... Infocom Infotech मधे राज ला job ला त्याबद्दल सुरेश मात्र अगदी खूष होता.....त्याच्यामित्रमंडळी मधेही राज च खूप कोतूक होत असे... मधे engineering चा result लागाय्ची formality पार पडली.. राज अपेक्षेनुसार distinction ने पास झाला... मित्र परिवार, नातेवाईक सगळ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला.. निशा आणि सुरेश नी हे आन.दाचे क्ष्ण अगदी पुरेपूर उपभोगले... राज च्या कामाची नोंद त्याचे managers घेत होतेच...पण ही गोष्ट reseacher unit चे Deputy head सुशिल राधाकृष्ण्न ह्याचा पर्यंत देखिल पोचली.. योगयोगने ते त्याच वेळेस west AmericaN Bank ह्या Client साटइ च्या Performance Tunning Project साठी काम करत होते.. योग्या skill set अभवी च्या team ने लिहिलेला code हा अजिबातच चांगला नव्हता आणि client साठी अतिशय महत्त्वाच्या अश्या system मुळे त्यामूळे Performance Issues येत होते.. ह्या सगळ्यामूळे client कडून escalaation झालं होतं आणि ते Project सुधारणा कर्ण्यासाटई research unit कडे आलं होतं.. एकूण च हे खूप नाजूक पणे हाताळावं लागणर होत नहितर एक महत्वाचा client कंपनी गमावून बसणार होती..
|
फ़ारच छान ADM लवकर पुढचा भाग येवू दे म्हणजे countinity राहील
|
Adm
| |
| Tuesday, December 26, 2006 - 3:00 pm: |
| 
|
unix मधलं राजच विषेश प्राविण्य लक्षात घेऊन ह्या project वर राज ला घ्यावं असा विचार सुशिल करत होते..त्यांनी राज च्या managers शी बोलून त्याला त्याच्या चालू कामातून मोकळ केलं आणि ह्या project चं काम चालू करायला सांगितलं... राज साठी तर ही आनंदाची किंबहूना गोरवाची बाब होती... त्या संपूर्ण team मधे सगळे जण १० ते १२ वर्षांचा अनूभव असलेले आणि राज च सगळ्यात junior . Analysis नंतरची पहिलीच meeting अतिशय वादळी ठरली.. Unix scripts मधल्या चूकांएव्हद्याच oracle coding मधल्या चूका सुद्धा गंभिर आहेत आणि त्या सुधारून आत्ताची system तात्पुरती सुधारू शकेल आअणि तो पर्यंत unix scripts सुधारायला वाव मिळू शकेल असा निष्कर्ष राज ने मांडला.. स्वत सुशिल देखिल हे ऐकून जरा अश्चर्यचकित झाले होते कारण team मधल्या इतर कोणाचच हे म्हणण नव्हतं... राजच एकूण्च अतिशय मुद्देसुद विवेचन ऐकून सगळेच प्रभवीत झाले होते पण तरिही सगळ्यांना थोडी शंका येतच होती.. प्रत्येक गोष्टीच्या अतिशय खोलात शिरुन अनेक प्रश्ण विचारल्यावर देखिल राज ने प्रत्येकाला समाधान्कारक उत्तरं दिली होती.. आपण विचारच न केलेलेकाही मुद्दे राज सारख्या नवख्याने मांडले हेनाही म्हंटलं तरी प्रत्येकालाच कुठेतरी जाणवले होते.. काही ठिकाणी शाब्दिक खटके देखिल उडाले पण राज ने आप्ल्या नेहमीच्या पद्धतिने आपले मुद्दे सुशिल सकट सगळ्यांच्या गळी उतरवलेच.. अतिशय प्रभवित होऊन सुशिल नी राज नी सांगितलेला approach घ्याचच ठरवलं आणि आपोआपच राज project च्या द्रुष्टीने आतिशय महत्त्वाचा team member बनला.. अतिशय आनंदाने राज ने घडलेल्या घटना निशा आणि सुरेश ला सांगितल्या. दोघही खूश झाली पण तरिही सुरेशच्या मनात काहितरी चालू आहे हे निशाने जाणलं.. "हं.. बोल आता कासाला एव्हडा विचार करतोयस म्घापसून.." आवरून झोपायला येतायेता निशा सुरेशला म्हणाली.. ".. कुठे काय.. राजच्या यशबद्दल..भविष्याबद्दल.. बाकी काही नाही..." " Sir .. आपण स्वत्:ला जितक ओळखता ना त्यापेक्षा अधिक मी आपल्याला ओळखते.. का लपवतोस मनातल्या गोष्टी?" निशा हसून म्हणाली.. "कधिकधि खूप काळजी वाटते गं राज ची.. स्व:ची मत तो दुरर्याला पटवून देऊ शकतोय तोपर्यंत ठिक आहे.. पण वाटतं त्याला नकार पाचवाय्ची ताकदच राहिली नाहि तर?... कधितरी काही मनासारख नाही झालं तर? कसा react करेल हा?" "अरे, शेवटी तो आपला मुलगा आहे..काही गूण आपले घेईलच ना..तुझ्यासारखा संयम थोआतरी त्यात उतरलेला असेलच ना?" निशा सुरेशल समजवाण्यासाठी म्हणाली.. पण मनातून तिलाही हे थोडं जाणवलं होतच.. त्याचा aggressiveness त्याच्या अंगाशी येऊ नये असच तिलाही वाटत होतं... राजच्या project च काम जोरात चालू होतं.. oracle coding त्याला allocated नसलं तरिही तो orracle Team ला अतिशय चांगली inputs देत होता.. वेळ पडली तर त्याचं testing देखिल करत होता.. सुशिल स्व्त'ह देखिल ह्या project मधे जातिने लक्ष घालत होते आणि तित्येक वेळा oracle team च्या discussions मधे राज ला देखिल बोलवत होते.. राज च्या म्हणण्यानुसार oracle coding मधे सुधाराणा केल्यावर system performance मधे सुधारणा झाली होतिच आणि हे client ने देखिल मान्य केलं होतं.. एकीकडे राज unix scripts वर काम करत होताच.. हे तर आपलच field असल्याने त्यात त्याने भरपूर अभ्यस करून अधिकाधिक सुधारणा कश्या करता येतिल हे बघितलं होतं..
|
Adm
| |
| Tuesday, December 26, 2006 - 10:37 pm: |
| 
|
oracle code च पहिला demo client ला झाला आणि client कडून चांगला प्रतिसाद होता.. बिघडलेली system हाताबाहेर चालली नाहिये हे त्यांच्याही लक्षात आलं.. राजच्या कामावर सुशिल स्वत्:ह लक्ष ठेवून होते... राजच्या module च्या design च देखिल client कडून खूप कोतूक झालं... राज च्या अश्या अनियमित कामाच्या वेळंमुळे आणि आणि खाण्यापिण्याच्या वेळा न पाळ्ण्यामुळे निशाला त्याची तब्येत बिघडेल की काय अशी काळजी वाटत होती.. "राज, अरे कामाचं ठिक आहे.. पण जरा स्वत्:कडे पण लक्ष ठेव... gym ला जाणं खेळणं हे तर तू कधिच सोडलयस पण निदान जेवण तरी वेळेवार कर.." "आई, अगन आता शेवटचे काही दिवस उरलेत हे project एकदा संपलं की मी चांगली १५ दिवस सुट्टीच घेणार आहे.. मग आपण तिघे ट्रिप ला जाऊ.. तू सगळे माझ्या आवडीचे पदार्थ कर... म्ग तू बास म्हणेपर्यंत खाईन मी.." राज आईला बरं वाटाव म्हणून तिची समजूत काढात असे... आणि अखेर तो दिवस उजाडला.. client बरोबर Video conferencing आणि demo असा सुमारे ४ तासाचा कार्यक्रम होता.. सुटाबूटात तयार झालेल्या रुबाबदार राज ला पाहून निशाला त्याची द्रुष्ट काढून टाकावी की काय असं वाटत होतं... सुशिल ने प्रास्ताविक केल्यावर राज ने Demo सुरु केला...त्याच्या नेहमीच्या पध्दतिने प्रत्येक प्रश्नाला मुद्देसुद आणि अभ्यासपूर्ण उत्तर तयार होती... अगदी संपूर्ण माहिती असलेल्या computer ची disk crash झाली तरी विषेश काही नुकसान न होता ती माहिती परत कशी मिळवता येईल ह्यावर सुद्धा राज कडे उत्तर तयार होतं.. बघताबघाता संपूर्ण मिटी.ग राज ने आपल्या ताब्यात घेतली होती.. . आणि ४ तास ठरवलेली मिटीग सुमारे ६ तास चालली.. client बेहद्द खूष होते आणि त्यानी लगेच unix oracle च्या दुसर्या project साठी मिटिंग काधी ठेवता येईल ह्याची विचारणा सुशिल जवळ केली.. अट एकच होती... अर्थातच राज नविन team मधे देखिल असलाच पाहिजे... राज वर ऑफ़िस मधे अभिनंदनाचा वर्षाव झाला.. बंद पडेल की काय असं वाटत असणारं account वाचवल्याबद्दल खुद्द CEO अरून गुप्ता ह्यांच्याकडून email आला.. खुद्द client नी मागणी करून पुढच्या project साठी राज ला त्यंच्या अमेरिकेतील ऑफ़िस मधून काम करण्याची ऑफ़र आली.. राज तर तर ह्या संधीची वाटच बघत होत... निशा आनी सुरेश मनोमन आनंदून गेले... जायची तारीख पक्की झाली आणि तयारीला वेग आला.. सगळं जमवे पर्यंत निघायची वेळ आली..
|
Sakhi_d
| |
| Wednesday, December 27, 2006 - 12:51 am: |
| 
|
ADM खुप छान लिहितो आहेस. पण असच पटापट लिहित रहा म्हणजे continuity राहिल.
|
Psg
| |
| Wednesday, December 27, 2006 - 1:30 am: |
| 
|
adm मस्त चालू आहे कथा, राजसारखीच वेगवान भरभर लिही मात्र!
|
Jhuluuk
| |
| Wednesday, December 27, 2006 - 2:08 am: |
| 
|
ADM मस्त चालु आहे. पुढच्या भागाची वाट बघत आहोत.
|
Adm
| |
| Wednesday, December 27, 2006 - 10:43 am: |
| 
|
Thanks everyone for your comments..! Typing here in Marathi is bit of a trouble for me. its different than that of unicode. Please bare with the mistakes. !!
|
Adm
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:30 am: |
| 
|
"निशा balcony त काय झोपलीस.. चल उठ आत चल.." "अरे, आलास वाटत तू... झोपले नाही रे.. निवांत बसल्ये जरा.. " "हो गेले काही दिवस राज च्या धावपळीत दमली असशिल ना तू ही.." "ठरल्यावर फ़ारच घाई झाली निघायची.. बरं flight गेलं का वेळेवर.. सामानाचा काही त्रास?" "नाही.. काही त्रास झाला नाही... तू लाडक्या लेका बरोबर पाठवलेलं सगळा खाऊ गेला निट..." सुरेश चिडवत म्हणाला... "दिवस किती भराभर जातात नाही.. अजून लहानच वाटतो राज... आत्ता आत्ता शाळेत जायला लागलाय असं वाटतं अजूनही.. आणि आज गेला सुध्दा अमेरिकेला ते ही नोकरी साठी..." "खरय तुझं... आणि राज तर फ़ारच लवकर मोठा आणि स्वतंत्र झालाय.." "मला माहित आहे..कधिकधि तू दुखावला जातोस त्याच्या सगळे निर्णय स्वत:ह घेण्याच्या स्वभावामूळे.. पण जाऊ दे रे फ़ार विचार करू नको..." "काळजी वाटते एव्हडच...बाकी काय...मूलं मोठी होउन बाहेर पडायचीच.. बरं चल आत...उशिर झालाय बराच..." राज अमेरीकेत पोचाला आणि अगदी पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात झाली.. Client बरोबरचे संबंध जरी चांगले असले तरी सुरोवातिपासूनच सगळं व्यवस्थितच करायचं असं राज ने ठरवून टाकलं होतं.. कामाबरोबरच अमेरीका मनसोक्त enjoy करणं देखिल चालू होतं... फ़िरणं, फोटो काढणं, परत आल्यावर आई, बाबांना सगळं तासनतास फोनवर सांगण हे देखिल चालू होतं... कामावर cllients तसेच सुशिल पासुन सगळेच खूष होते... राज एकीकडे स्वत:चा अभ्यास देखिल करतच होता.. internet वरच्या technical forums मधे जाऊन लोकांना मदत करणं त्याला खूप आवडत असे.. एकदा असच forum वर फ़िरत असताना त्याला एक technical papaer writing ची स्पर्धा दिसली.. आणि भाग घेऊन बघाय्ला काय हरकत आहे म्हणून राज ने नोंदणी करून टाकली.. नेहमीप्रमाणे पूर्ण तयारी निशी त्याने pepar पाठवला... आणि त्या paper ला स्पर्धेत पहिलं बक्षिस मिळलं... योगयोगने बक्षिस समारंभ देखिल New York मधेच होता... तिथे प्रमूख पाहूणे म्हणून आलेल्या Lorenzo Inc ह्या कंपनीचे R&D Head John Edward ह्यांचे व्यक्तिमत्त्व राज वर चांगलेच प्रभाव पाडून गेले.. ह्या समारंभानंतर परत काधितरी भेटण्याची इच्छा राज ने व्यक्त करताच त्यानींही लगेच होकार दिला आणि पुढच्याच आठवड्यात पाल्या ऑफ़िस मधे भेटायला बोलावलं... John सारख्या तज्ञ माणसाला भेटायला मिळणार म्हणून राज खूप आनंदात होता पण John च्या मनात मात्र वेगळच काहितरि चालू होतं.. त्याने बाहेरुनच राज ची साधारण माहिती काढून ठेवली होती.. भेटीच्यावेळीही technical गोष्टींची चाचपणी कर्ण्यात्च तो जास्त रस घेत होता.. थोडक्यात त्याने राज चा Informal Interview च घेताला होता... निघायाच्या वएळॅला John ने राज ला सरळ Lorenzo Inc मधे येण्याची offer दिली.. राज ला शिकागो मधे सुरु होणार्या R&D Department Midwest Division चा Deputy Head केलं जाणार होतं.. पगर ही भर्भक्कम होता आणि बरोबर इतरही अनेक सुविधा होत्या.. राज ला आधी काय बोलावं तेच सुचत नव्हतं.. शेवटी विचार करून सांगतो आसं म्हणून तो तिथून बाहेर पडला..
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 28, 2006 - 3:45 am: |
| 
|
ADM मस्त छान लिहितो आहेस....
|
R_joshi
| |
| Thursday, December 28, 2006 - 3:49 am: |
| 
|
खरच छान लिहिलि आहे कथा.पुढिल भागहि लवकर येऊ देत. सलग कथा लिहिणे हा तुमचा दुसरा विशेष म्हणायला हवा
|
Jhuluuk
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:46 am: |
| 
|
ADM, ही खरी गोष्ट आहे काय? एवढे minute details देत आहात, म्हणुन विचारावेसे वाटले
|
Mahaguru
| |
| Thursday, December 28, 2006 - 11:20 am: |
| 
|
गोष्ट सत्यघटनेवरच असावी एस. कार्तिकराज, सुशिल राधाकृष्णन या नावाचे south indian साहेब, गुप्ता नावाचा CEO .. हे कसे एकदम वास्तवातले वाटत आहे :D लिही रे पुढे , चांगले लिहित आहेस
|
Adm
| |
| Thursday, December 28, 2006 - 11:22 am: |
| 
|
Sakhi_d , वेळोवेळी दिलेल्या अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद... R_joshi , धन्यवाद Jhuluuk , नाही खरी गोष्ट नाहीये.. सारा कल्पनेचाच खेळ... तसा पहिलाच प्रयत्न आहे माझा कथा वगैरे लिहिण्याचा... so चूक भूल देणे घेणे.. - Adm
|
|
|