|
Swasti
| |
| Saturday, December 30, 2006 - 1:27 am: |
| 
|
ग़ेल्या आठवड्यात Team मधले सगळे lunch साठी गेलो होतो. सोनाली जरा उशीरा आली आणि माझ्या बाजूला येउन बसली. मी जरा निरखून पाहिल आणि म्हटलं "Hey ! केस कापलेस ? " " हो कालचं " "ता .... जी " मी तिला जोरात टपली मारत ओरडले "ताजी ?? हे काय असतं ?" सोनालीचा भाबडा प्रश्न ऐकून सगळ्यांनी ( आपापल्या) कपाळावर हात मारला. " अरे यार तुझे ताजी नही पता ? कौनसे जमानेमें पैदा हुई थी ?" सगळ्यानी कलकलाट चालु केला . शाळेत असताना मित्र-मैत्रिणींना विनाकारण " ठेउन देण्यासाठी " ज्या कोणी माणसाने हा प्रघात पडला त्याला मानलं पहिजे. हे ताजी मारणारे कोणत्या जन्माचा बदला घ्यायचे काय माहित . तुम्ही आज केस कापुन आला आहात हे कोणाच्या लक्षात यायचा अवकाश की टपाटप बसल्याच . मुली एकमेकींना त्यामानाने जर प्रेमाने मारायच्या पण मुलगे ...... बाप रे ! जसं जतिन सांगत होता जरा केस आणखी बारीक केलेत (soldier cut) की मानेवरच्या मोकळ्या जागेवर सणसणीत टपल्या पडल्याच म्हणून समजा . मग तो बिचारा " बळी " डाव्या हाताने दूखरी मान चोळत - डोळ्यात वेदना , अगतिकता , राग अशा संमिश्र भावना दाखवत उजव्या हाताची तर्जनी नाचवत म्हणायचा "थांब, तुमच्या वेळेला याच्या डब्बल मारतो की नाही ते बघ ." ( अशा मारामारीतून अनेक theories निघायच्या . मानेवर मारु नये तिथे मज्जारज्जु असतो त्याला धक्का लागला कि माणुस मरतो. डोक्यावर मारलं तर लहान मेन्दुला धक्का बसतो . अर्थात ते सगळ खरंही होत म्हणा ) पण या सगळ्यातुन वाचायच असेल तर एकच उपाय होता " रामराम ". कोणी भेटल की पहिल्यान्दा त्याला रामराम घालायचा आणि मग ती समोरची व्यक्ती काही करू शकत नाही . ज्यान्चा मारायचा chance या रामराम मुळे चुकला असेल ते मग तिसर्याच्या कानात जाउन सान्गायचे " ताजी मार ताजी , केस कापले आहेत ". बरेच जण तर या सगळ्या झंझटातुन वाचण्यासाठी सरळ टोपी घालुन यायचे . ( पण टोपी ची idea ही college किंवा class मध्ये चालायची , शाळेत ती सोय नव्हती ) अलिकडेच आमचा एक manager सांगत होता की त्याच्या सहा वर्षाच्या मुलाच्या मित्र परिवारात कोणी " ताजी " किंवा "रामराम " म्हणतं नाही , त्यांच्यात "booking" म्हणण्याची पद्धत आहे. एकदा "booking" केलं की मग कोणी 7 दिवस मारायच नाही . असाच एक आणखी " मारखाउ " प्रकार म्हणजे Opingo किंवा Ops. इतर ठिकाणच्या मुलांबद्दल ठाउक नाही पण निदान मुंबईच्या मुलांमध्ये तरी हा प्रकार भयंकर चालायचा आपण उभे राहिलो की ज्याच्याशी ops -bats लावली आहे , त्याच्या पाठीत गुद्दा हाणुन opingo/ops म्हणायचं आणि खाली बसताना Batingo/bats मारुन बसायच. अस उठताना - बसताना जर तुमच्या लक्षात राहील नाही तर मग मेलातं .... समोरच्याने तुम्हाला धुतलच म्हणून समजा . सगळ्यात मजा यायची ती वर्गात शिक्षकांनी उत्तर द्यायला किंवा धडा वाचायला उभं केलं की . काही दुष्ट लोकांमुळे त्यावेळीही या गोष्टीचं व्यवधान बाळगाव लागे . 'Jolly' .... एक निरुपयोगी खेळ . त्याला हे नाव का होतं ते माहित नाही . jolly दाखवं म्हटल्यावर तळव्यावर कुठेतरी शाईचा डाग असणं आवश्यक होतं . कधी नुसता एखादा ठिपका किंवा एखादं टिंब चालायचं तर कधी व्यवस्थित कोरलेला J च लागायचा . कधी फक्त तळवाच तपासायचा नाहितर कधी पुर्ण कोपरपर्यंत मागे पुढे हात चालायचे .( अर्थात हे सगळे नियम आणि काय लावायचे - जसे 10 jolly चढल्यावर एक coffee bite ( तेव्हा तितकीच ऐपत असायची ) - jolly लावतानाच ठरलेले असतं ) त्यामुळे मग jolly लागु नये म्हणुन मग अगदी हाताचा कोपरांकोपरा तपासायचा , कुठेतरी छोटासा डाग पडला असेल या आशेतं . आणि jolly विचारण्याच्या पण tricks होत्या. शाळेच्या पहिल्या तासाला कारण तेव्हा अजून पेन हातात पकडलं नसतं , नाहीतर मधल्या सुट्टीनंतर / चित्रकलेच्या तासनंतर कारण हात धुतलेले असतात . एका ' ताजी ' च्या निमित्तने लहानपणीच्या काही आठवणी ताज्या झाल्या. आता मागे वळुन पाहताना वाटत , यातला एक तरी खेळ अर्थपूर्ण होता का ? केवळ 'TP' या सदरात मोडणारे निरर्थक प्रकार होते . आज माझा पाच वर्षाचा भाचा 'Pokemon' चे taazzo गोळा करतो , त्यासाठी मित्रांसोबत भांडाभांडी करतो तेव्हा - शाळेत असताना सचिन तेंडुलकरच्या ४ फोटोंच्या बदल्यात स्टीफ़न एडबर्ग च्या २ close up च 'tradding' करणारी मी - त्याला 'फालतुगिरी' म्हणते . शेवटी "मोठ्ठ्या लोकाना काही कळतचं नाही " हेच खरं .
|
Sayuri
| |
| Saturday, December 30, 2006 - 2:07 am: |
| 
|
स्वस्ति, थॅंक्स अ लॉट ! ऑप्स, जॉली, रामराम सगळं सगळं आठवलं. अशासारखा अजून एक प्रकार आम्ही करायचो तो म्हणजे 'मारुति'. दिवसभरात कधीही कुठेही मारुति कार दिसली (तीसुद्धा लाल रंगाची) की हाणा गुद्दा. एकमेकांना मारायचे बहाणे हे दुसरं काय! 
|
Sayuri
| |
| Saturday, December 30, 2006 - 2:46 am: |
| 
|
झिम्मा प्रकारात आम्ही बर्याचदा निरर्थक गाणी म्हणायचो. आ मिना सुपर सिना बिग बॉय लेझी गर्ल..(२) स्टॅच्यू! ओ, व्ही, ई, आर ओव्हर!!! किंवा वन डे एके दिवशी फ़ॉक्सेस कोल्हा गार्डनच्या बागेमध्ये फ़िरायला गेला रिव्हर नदीचे वॉटरचे पाणी संत्र, ऑरेंज पिऊन आला ला ला ला किंवा संत्र लिंबू पैशापैशाला शाळेतल्या मुली आल्या कशाला संत्र खाऊन खोकला झाला खो खो खो

|
Swasti
| |
| Saturday, December 30, 2006 - 8:24 am: |
| 
|
yeesss मारुती आठवलं . आणि ' आ ( की आय ) मीना '.. बरोब्बर आणि फ़ोक्सेस कोल्हा HHPV
|
Upas
| |
| Saturday, December 30, 2006 - 11:44 pm: |
| 
|
अगदी अगदी.. मी शिकवणीला असताना पाचवी सहावीत केव्हातरी एका मुलाशी जॉली लावली होती.. आम्ही अजून तो धागा पकडून आहोत.. मधे कही महिन्यांपुर्वी भेटला तेव्हा त्याला विचारलं मी जॉली? आणि दोघे जोरदार हसत सुटलो..!! :-) दुसर्याच्या शर्टाचा हाताची कड, मधलं बोट आणि बाजूच्या बोटांच्या चिमटीत धरून ओढत छान आवाज काढायचो आम्हि! तेही आठवलं.. :-) कोणाच्या पायाल चिखल लागला किंवा शेणात पाय गेला की सगळे अंगोठी धरायचो.. आणि हो वर्ग चालु असताना डबा खायची मौजच वेगळी!.. स्टॅच्यु सुद्धा जोरदार चालायचं लहानपणी.. Good old Days.. ahhh!! 
|
Sayuri
| |
| Sunday, December 31, 2006 - 12:53 am: |
| 
|
>>>कोणाच्या पायाल चिखल लागला किंवा शेणात पाय गेला की सगळे अंगोठी धरायचो.. .... असं झालं की आम्ही हाताच्या दोन बोटांची 'बिट्टी' करायचो. 
|
Swasti
| |
| Sunday, December 31, 2006 - 3:34 am: |
| 
|
>>>>> कोणाच्या पायाल चिखल लागला किंवा शेणात पाय गेला की सगळे अंगोठी धरायचो.. अंगोठी ..... चिंगोटी
|
Dineshvs
| |
| Monday, January 01, 2007 - 3:19 am: |
| 
|
हा रामरामाचा प्रकार आमच्याकडेहि होता, पण ताजी हा शब्द नव्हता. गुलजारच्या गुड्डीच्या वेळी स्टॅच्यु फ़ारच प्रचारात होता. त्या सिनेमातहि तो प्रकार आहे. त्याचा शेवटहि ओव्हर या शब्दाने होतो.
|
Srk
| |
| Monday, January 01, 2007 - 5:56 am: |
| 
|
स्वस्ति, मजा आली. खुप काही आठवलं. मी एका मैत्रिणीशी जॉली लावली होती. लाल रंगाच्या शाईचा ठिपका हवा. सकाळची शाळा असल्यामुळे तयारी झाली कि लगेच मी लाल शाईचा ठिपका काढत असे. आता गमंत वाटते, पण तेव्हा अगदी रिचुअली करायचे. आम्ही नव्याचे नऊ गुद्देसुधा मारायचो.
|
Manuswini
| |
| Tuesday, January 02, 2007 - 12:52 pm: |
| 
|
जॉली हा प्रकार तर अगदी college मध्ये असे पर्यन्त खेळायचो. ink pen ची जॉली आणी त्याच रंगातली म्हणजे ती ink pen चीच आणी सेम पाहीजे नाहीतर गुद्दे. statue तर अगदी खुप खेळायचो. माझ्या मैत्रिणी तर अगदी college च्या पहिल्या मज्ल्यावरुन ओरडुन statue करायच्या. आणी तिथेच open ground मध्ये मख्खा सारखे ऊभे राहयचे. ..... सगळी आजु बाजुची मुले हसायची...... उपास, जॉली मुले पण खेळायची? मला वाटायचे मुलीच खेळतात
|
खाताना खाउ खाली पडला की, तो उचलून पुन्हा खाण्यची इच्छा मनात असताना (पण घरच्यांनी सांगीतलेले असते खाली पडलेले खायचे नाही) अश्यावेळी एखाद्या मित्राला सोबत घेउन खाउ हातात उचलुन त्याला साफ़ करुन, बोलायचो राम की भुत? राम खाउ की नको? खा आज की उद्या? आज आत्ता की नंतर? आत्ता मग गट्ट करुन दोघे मिळुन खाउ खायचो
|
Jadhavad
| |
| Thursday, January 04, 2007 - 5:27 am: |
| 
|
ops/bats ला आम्ही उठीबैठी म्हणायचो. सरळ सरळ खेळण्यामध्ये जशी मजा असायची तशी उलटी खेळण्यामध्ये असयची. म्हणजे नॉर्मली, उठल्यावर उठी आणि बसल्यावर बैठी म्हणायच. पण उलटी मध्ये उठल्यावर बैठी आनि बसल्यावर उठी म्हणायचे. सगळ्यात जवळचा शत्रु असेल तर उलटी लावयचो म्हणजे गुद्दा टाकतांना मन मोकळ करुन गुद्दा टाकयचो. वर्गात सरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना पहिले उठीबैठी जोरात ओरडुन मग उत्तर द्यायचे, नाहीतर हीसाब्कीताब मधल्या सुट्टी मध्ये क्लीअर चायचा. अजुन एक आठवतय ते म्हणजे सिगमा. ह्या नावाची सिरीअल रविवारी सकाळी १० ला दुर्-दर्शन वर असयची. ज्याच्या बरोबर सिगमा खेळतोय, तो दिसल्यावर सिगमा बोलायचे. त्याचा response नाही आला की धुलाइ. अमित
|
Kandapohe
| |
| Saturday, January 20, 2007 - 3:27 pm: |
| 
|
स्वस्ती सहीच. अगदी अगदी. आणखी काही प्रकार. १. चिकटगुंडा. नक्की कुठले झुडुप असायचे माहीत नाही पण त्याला येणारे तुरे कपड्याला चिकटायचे. काही वेळा शर्ट भरलेला असायचा चिकटगुंड्याने. २. कुंपणाकरता लावलेले एक झुडुप असते त्याला पिवळी वायर सारखी फुट यायची. ती वायर नसेल तर मित्रांना बदडून काढणे. ३. चटक्याच्या बिया. फरशीवर घासुन जोरदार चटका देणे. नॉस्टालजीक झाले एकदम.
|
Chyayla
| |
| Saturday, January 20, 2007 - 6:52 pm: |
| 
|
एखादे माकड दीसले तर... बन्दर बन्दर हुप्प तुझ्या शेपटीला तुप, खाशील तर खा नाहीतर बोम्बलत जाSSSS
|
|
|