|
थोडं... थोडं... ये, चल भेटून घेऊ... कुशीत शिरून रडून घेऊ अहम आड आलाच तर... थोडं थोडं अडून घेऊ अजूनही गाणं गातच मन... बरसतोही श्रावणघन भिजलेल्या अन थिजलेल्या... मनात फुलतं पळसबन ये, चल धर हात....... बनात थोडं फिरून घेऊ अहम आड आलाच तर... थोडं थोडं अडून घेऊ अजूनही थरथर ओठांची... मुकी होऊन जाते वाणी अजूनही भरून येता आभाळ... अलगद बरसून जातं पाणी ये, नको रुसू आता........ डोळे जरा पुसून घेऊ अहम आड आलाच तर.... थोडं थोडं अडून घेऊ काही चुका तुझ्या होत्या... कळतंय, काही माझ्याही तरी तुझी सय येता..... पानांवरती झरते शाई ये, सारू दूर काटे.... फुले थोडी वेचून घेऊ अहम आड आलाच तर..... थोडं थोडं अडून घेऊ किती ताणून धरशील राजा.. सारंच तुटून जाईल ना एकदा मनं दुभंगली की.... जुळता जुळून येईना ये, जरी उसवली विण.... हलक्या हाती गुंफून घेऊ अहम आड आलाच तर.... पुन्हा थोडं अडून घेऊ.
|
R_joshi
| |
| Wednesday, December 27, 2006 - 2:29 am: |
| 
|
वैभव तुझ्या कवितांना दाद द्यायला शब्दच नसतात. केवळ अप्रतिम मीनु पुस्तक छानच. गणेशजी कविता उत्तम शलाक,सुमती छानच
|
Smi_dod
| |
| Wednesday, December 27, 2006 - 2:31 am: |
| 
|
संवेदना!! अपेक्षांची झुल उतरवुन ठेवली मोकळ्या श्वासांनी आभाळ मग दाटले गुदमरलेले ढग क्षणात मोकळे झाले उन्मुक्त झाल्या सरी बरसणार्या चुंबनानी त्या धरा तृप्त झाली अपेक्षाच्या ओझ्याने वाकलेल्या सुखाला निरपेक्षतेची साथ मिळाली शब्दांच्या पसार्याला स्पर्शाची झालर लाभली किती सहज.. समृध्द जणिवा या जाणिवांच्या पलिकडे असलेल्या संवेदना या............ स्मि
|
Meenu
| |
| Wednesday, December 27, 2006 - 2:39 am: |
| 
|
सुमति मस्तच .. .. !!!
|
R_joshi
| |
| Wednesday, December 27, 2006 - 2:45 am: |
| 
|
ओळख ओळख तुझी माझी खरच नवी होती.... जुन असुन नात हि नव्यानेच झाली होती एकांताच्या समयी नव्याने तुला आठवले जुन्या या ओळखीचे नवे फुलपाखरु भेटले नक्षत्रांची जुनी पालवि नव्याने तेजाळली होती ओळख तुझी माझी खरच नव्याने जन्मली होती प्रिति
|
सुमती दिदी, थोडं... थोडं... एकदम मस्त कविता आहे! "काही चुका तुझ्या होत्या... कळतंय, काही माझ्याही तरी तुझी सय येता..... पानांवरती झरते शाई ये, सारू दूर काटे.... फुले थोडी वेचून घेऊ अहम आड आलाच तर..... थोडं थोडं अडून घेऊ "
|
प्रितिजी, "ओळख " छान कविता आहे!
|
गणेशजी तुमच्या कवितेतल्या नंतरच्या तीन कडव्यातलया शेवटच्या प्रत्येकी दोन ओळींपाशी मी अडलो रोज फ़ुट्तो मी ख़ड्याच्या, तड्याने ना जुळलो तरी मी कुणाला. !! २!! रोज हसतो मी असा दु:ख़ाने ना रडवलो मी जराही कुणाला. !! ३!! रोज फ़ुलतो मी ड्कर् ०द्या काट्याने ना रूतलो तरीही मी कुणाला. !! ४!!. बराच विचार केला पण नाही समजलं .. माफ़ करा आणि शक्य झालंच तर अर्थ मेल कराल का प्लीज ? मीनू ... तर्काधिष्ठीत आडाख्यांनीही समाधान नाहीच झालं तुझ्यामाझ्या नात्याचं पुस्तक शेवटाविना अधुरच राहीलं सुंदर ओळी आहेत . बरेच अर्थ लागत गेले .. शलाका .. काय बोलू .. खूप वेळ विचार करतो आहे .. वाचतो आहे आणि पुन्हा .. पुन्हा .. पुन्हा हे पेंटिंग ( हो पेंटिंगच ) मला आवडतंय ... अतिशय .. अतिशय अप्रतिम कविता .. ( thanks for the christmas gift ) सुमतीताई ... प्रत्येक कडव्यात एकदा ना एकदा काळजाचा ठाव घेतला गेला अजूनही गाणं गातच मन... बरसतोही श्रावणघन अजूनही भरून येता आभाळ... अलगद बरसून जातं पाणी तरी तुझी सय येता..... पानांवरती झरते शाई किती ताणून धरशील राजा.. सारंच तुटून जाईल ना ह्या त्या ओळी ... खूप आर्त .. खूप छान प्रीती , स्मि ... छान कविता .. फक्त नीट वाचून अभिप्राय देतो .. किंवा मेल करतो जरासा गडबडीत आहे ...
|
R_joshi
| |
| Wednesday, December 27, 2006 - 4:42 am: |
| 
|
गणेशजी धन्यवाद आपण मला प्रिति म्हणुनच हाक मारा.शेवटचा जी नको. वैभव आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहे. काहि सुधारणा असतिल तर नक्कि सांगाव्यात. स्मि कविता सुंदर आहे
|
आस... आस दाटली आता मनाची एकतानता व्हावी क्षितीजा पल्याड नाते हेच व्हावे गुंफ़लेले हात आता रेशीमवीण व्हावे धुंद त्या मोरपिशी स्पर्शाची साथ अशी असावी काट्यांचा आठवही न यावा फ़ुलांची रास व्हावी झंकारलेल्या वीणेची थरथर केवळ उरावी काळजातल्या कळांची आवर्तने स्तब्ध व्हावी कैफ़ात त्या सुरांच्या आयुष्यओळ बुडावी धग चांदण्यांची पांघरुन रात सरावी हुळहुळणार्या कळ्यात पहाट उमलावी
|
प्रीती तुम्हीही मला गणेश हाक मारा एक चारोळी देतोय फ़क्त मित्रासाठी " खरे मित्र पाटी`च्या वेळीच ओळख़ता येतात जे कोल्ड ड्रिकच्या जागी फ़क्त चहाच मागवतात"
|
Princess
| |
| Wednesday, December 27, 2006 - 6:32 am: |
| 
|
सुमती ताई, खुप सुंदर लिहिलय हो... नकळत डोळे (काहीही कारण नसतांना)भरुन आलेत. प्रत्येक ओळ मनापर्यंत पोहचली. खुप म्हणजे खुपच आवडली मला ही कविता.
|
वेभवजी, कवीतेचा अर्थ मेल करातो! अभिप्रायासाटी धन्यवाद! मी मायबोलीवर नवीन आहे! मला अनुस्वार आणी रफ़ार टाईप करायला कळत नाही हेल्प करावे!
|
Jayavi
| |
| Wednesday, December 27, 2006 - 9:18 am: |
| 
|
सुमती, किती सुरेख गं! मला तुझ्या "चल शेवटचं फ़िरुन घेऊ' ही कवितेची आठवली स्मि, प्रिती, कांचनगंधा........ खूप खूप सुरेख! मजा येतेय!
|
Jayavi
| |
| Wednesday, December 27, 2006 - 9:22 am: |
| 
|
ए, ही माझी नवरसांवरची कविता...... ही संगीतबद्ध सुद्धा झालीये शृंगार रस शृंगार मी प्रेमी जीवांचा मीत हृदयी रुजवतो स्पंदनातून इश्क पसरुन मीलनी मी बरसतो स्वप्नील मी, मदहोश मी लाज-या प्रीतीत मी प्रणयाची साक्ष मी अन चांदव्यातील आग मी भयानक रस उरी धडधड जागते अन कापते का ही तनू प्राण का कंठास येतो बोबडी वळते जणू अस्तित्व माझे हे असूरी जागवी भय अंतरी उडे गाळण ही भल्यांची दृष्टी टाकीन मी जरी हास्य रस तुषार माझे उडती जेथे सुहास्य तेथे खळाळते चैतन्याचे अल्लड वारे मनी मानसी सळसळते भेदभाव ना कोणासाठी राजा रंका मी न वेगळा दु:खाला तो नाही थारा आनंदाचा सर्व सोहळा बीभत्स रस ओंगळवाणे रुप लाभले बघुनी मला जन शहारती नको वाटते दर्शन माझे टाळून मज परी ते जाती घृणाच सारी माझ्या पदरी एकांताची साथ मला तिरस्कार मी सदा झेलतो बीभत्स म्हणती सर्व मला करुण रस नजर ओली, उरी हुंदका मनात देवाचा धावा दोन जीवांची विरही तगमग तिथेच माझा जन्म नवा दु:खाशी मी जरी जखडलो मृत्यूशी झुंजतो सदा कारुण्याचा सागर मी जरी डोळे पुसतो मीच पुन्हा वीर रस शस्त्र शोभते माझ्या हाती मीच शायरी वीरांची रक्त उसळते,पेटून उठते ऐकूनी गाथा शौर्याची शूर शिपाई माझे साथी नाही जागा दुबळ्याला नको म्यान अन नको विसावा रक्त हवे तलवारीला अद्भूत रस स्वप्नी रमविते, स्वप्नी नेते बाग फुलविते स्वप्नी मी झिम्मा खेळत सवे प-यांच्या गीत गोजिरे गाते मी जादू, राक्षस, भूत, चेटकी दुनिया माझी ही न्यारी भूल पाडते, चटक लाविते या जगती मी राज्य करी रौद्र रस गुलाम माझी सारी दुनिया सैतानाचा साथी मी हाहाकार मी उडवून देतो दिसेल ते ते तुडवून मी आगमनाची नांदी माझ्या देई दर्शन भयकारी समोर येईल त्याला चिरडून तांडव करितो उरावरी शांत रस अवनीवरचा दूत शांतीचा आश्रय देतो सकल जना हारुन दु:खे जगताची मी सांत्वन देतो श्रांत मना ओंकाराचे संजीवन मी भक्तीरसाचा मी दाता पखरण करतो वात्सल्याची तिन्ही जगाचा मी त्राता जयश्री
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 27, 2006 - 12:12 pm: |
| 
|
छान शब्द जयु. श्रवणीय आहेच. यातल्या अनेक रसाना, तुम्ही कवि मंडळी हात पण लावत नाही. आता माझी हि तक्रारहि दुर कर.
|
Pama
| |
| Wednesday, December 27, 2006 - 1:03 pm: |
| 
|
नमस्कार लोकहो!!! खूप म्हणजे खूपच दिवसांनी येतेय. मागच बरच वाचल.. खूप छान छान कविता लिहिताय सगळे. बर्याच दिवसांनी माझा छोटासा प्रयत्न........ सारेच ओंजळीने, अर्पून टाकले मी, अलवार सावल्यांना उसवून टाकले मी.. निमिषात संपले जे, वेचून आणिले मी, हातात हात येता, उधळून टाकले मी.. निसटून जात होते, धरण्यास धावले जे, रितीच राहिले, बस, निश्वास टाकले मी.. थोडे हवे मलाही, मुठीत झाकले मी, नव्हतेच आत काही, उघडून टाकले मी.. देऊ कशी कुणाला, माझे कधी न होते, ओढून नेत गेले, अन प्राण टाकले मी..
|
Shyamli
| |
| Wednesday, December 27, 2006 - 1:57 pm: |
| 
|
पमे आधी तुला दोन दणके.... कुठे गायब होतीस???? आणि आता कविता वाहवा, क्या बात है!!! आता जास्ती छान वाटतय इकडे... जयु आधि वाचलि होतीच पण ऐकल्यावर,जास्तच मजा आली.. भेटीन म्हणते लवकरच तुला.... सुमती.... अहम आड आलाच तर..... शेवटपर्यंत काळजाचा ठाव घेणारी कविता....
|
Daad
| |
| Wednesday, December 27, 2006 - 4:58 pm: |
| 
|
सुमतीताई, 'अहम आड आलाच तर....' केवळ अप्रतिम. किती खरी भावना आणि किती खर खर चित्रण! तुटतं तेव्हा आपण सगळेच जुळून घ्यायच्या तयारीत असतो.... प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा 'अहम आड येतोच'. थोड थोड अडून घेण्याची कल्पना किती सुन्दर गुंफलीये तुम्ही.... very rational approach to a real life problem . खरच छान! स्मि, जाणिवांच्या पलिकडे असलेल्या संवेदना या............ प्रिती, नक्षत्रांची जुनी पालवि नव्याने तेजाळली होती कांचनगंधा, काळजातल्या कळांची आवर्तने.... छानच आहेत कविता. जयश्री नवरसांची कविता मस्तच. गाण्याच्या बैठकीत एखादी "रागमाला" जमून गेल्यासारखी वाटली. पमा, सारेच ओंजळीने, अर्पून टाकले.... मला कवितेचा एकूण भाव कळला. पण शेवटच्या दोन कडव्यांचा अर्थ तुमच्या शब्दांत ऐकायला आवडेल... इथे किंवा मला "मेलून"! वैभव, thanks रे. माझ्या कविता जास्त करून शब्दचित्र असतात... थोड्या अर्थाकडे झुकणारं लिहायच्या दिशेने प्रवास आहे. सध्या चित्रच! (विचित्र होत असल्यास तुम्ही सगळे सांगाल अशी अपेक्षा आहे)
|
Devdattag
| |
| Wednesday, December 27, 2006 - 11:56 pm: |
| 
|
सुमतिजी ग्रेट.. पमा वेलकम बॅक.. बैरागी.. बघा कफ़्फ़ल्लक वाटतो तरीही धनवान कोणी धरी पाय माझे म्हणे मुक्तता भयाते करी मी मागण्यास येती सहाय्य माझे मी जिंकले पाची महाभुतांना बोलण्या असे काय जाय माझे देई कुणी दक्षिणा रोज ऐसी वाटे असे त्यातले काय माझे वाटे आता सर्व सोडोनी जावे किर्ती असे रे दुर्भाग्य माझे वैराग्य माझे घेईल कोणि असे कोणते सद्भाग्य माझे -देवदत्त
|
|
|