Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 22, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 22, 2006 « Previous Next »

Devdattag
Thursday, December 21, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको व्यर्थ चिंता करूहो भयाची
अताशा नसे भेट ती आसवाची

कुणी पाहिले का मुरलीधराला
दिसे फक्त काया अता यादवाची

जरी अहिल्या ती दिसे रोज आता
शिळेचीच आहे वाट रे राघवाची

दिसे शब्द माया खोटा कसा हा
असे वानवा आज त्या अतीरथाची

अघोरी असे का बळीला गाडणे ते
देवही मृदेचा रे शिक्षा कशाची


Ganesh_kulkarni
Thursday, December 21, 2006 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

application/msword" Charoli "
charoli.doc (20.0 k)


Kanchangandha
Thursday, December 21, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांज......

आकाश जेथे झेपावलेले
धरतीच्या कुशीत लपायला
तिथे पोहोचला दिनमणी तो
थकून भागून झोपायला
आरक्त जाहली पश्चिमा ती
लाली पसरे नभावरी
किलबील करीती द्वीजगण सारे
विसावती त्या तरुवरी
दुलई अभ्राच्छादीत
पसरे नितळ अंबरावरी
लुकलुकती तारकाफुले
जणू खडी काढीली जरतारी
लेऊनी भाळी चंद्रकोर ती
सजली सांज सावळी मनोहारी
रात जागवी कुशीत समीर तो
गोड शिरशिरी चराचरी


Ganesh_kulkarni
Thursday, December 21, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mee ganesh kulkarni,

Far deevasani MAAYBOLI SITE la bheet deto ahi, krupa krun mala koni marathi typing kase karyache sagel ka, help karel ka.

Mee reply che wat fahto ahe.

Dynawad.


R_joshi
Thursday, December 21, 2006 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार गणेश कुलकर्णि.
कविता किंवा इतर काहि पोस्ट करायचे असेल तर पोस्टच्या खाली देवनागरी असे लिहिलेला बॉक्स आहे. त्या बॉक्सवर टिचकी मारल्यावर अजुन एक साईट उघडेल. ज्यात एकिकडे इंग्रजीत टाईप करत जा, त्याच्या विरुद्ध बाजुला तुम्ही लिहित असलेला मजकुर मराठित येत जाइल.
लिहुन झाल्यावर कॉपी वर टिचकी मारा म्हणजे तुमचे लिखाण आपोआप त्या त्याबीबीवर येईल.


Meenu
Thursday, December 21, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणसं

हाताच्या अंतरावर असलेलीही,
दुरच असतात .. माणसं
आपली आपली वाटणारीही,
परकीच असतात .. माणसं
वरुन सौम्य वाटणारीही,
क्रुर असतात .. माणसं
गोर्‍या रंगाचीही,
आतुन काळी असतात .. माणसं
जोडतात नाती उथळ अन,
मनातुन द्वेष पाळतात .. माणसं
जाऊ दे !! नको घेऊस वाटुन फारसं,
इथुन तिथुन सगळीकडे सारखीच असतात ..
माणसं !!!


Smi_dod
Thursday, December 21, 2006 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु.. सही आवडली माणसं.. :-)

R_joshi
Thursday, December 21, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु "माणस" छानच लिहिलि आहेस :-)

Meenu
Friday, December 22, 2006 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं

कुणाच्या नावावर करुन जावं
असं आहेच काय माझं ..?
माझं माझं म्हणावं
असं आहेच काय माझं ..?
कशावरुन ओवाळुन टाकावं
असं आहेच काय माझं ..?
ज्यासाठी जीव अडकुन रहावा
असं काहीच नाहीये माझं
हं !! बरच आहे की एकंदरीत ..


Meenu
Friday, December 22, 2006 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि, R_joshi धन्यवाद .. ..

Kanchangandha
Friday, December 22, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घर.....

जपून ये..
बघ.... हे आहे आपल घर
याची खोली बघुच नको
अथांग आहे........
एकच खिडकी आहे बघ छोटीशी
हळुवार श्वास घ्यायला
आणि हे दार....येता येईल ना आत
पण एकदा आत आल्यावर
मात्र बाहेर नाही पडता येणार
तशी खूप मोठी आहे जागा
आपल्या दोघांना अणि पिल्लांना........
उबदार घरट्याचे स्वप्न झालेच ना साकार
आता फ़क़्त टिकवायचे ते
समजुतदारपणे...आपल्या हातात
तश्या भक्कम आहेत भिंती
पण तरी ही जपुनच
एखादा तडा सुध्दा खिळखिळे
करतो घर..........
काळजी घ्यायची त्यासाठी
पडझड होउ न देण्यासाठी...
आपला विसावा आहे हा
आणि हक्काची सावली.....
ह्या देहासाठी तरी
हीच मनाची खोली...



R_joshi
Friday, December 22, 2006 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु बहर येतोय कवितेला."माझ" ही छानच लिहिलिस कविता :-)
कांचन "घर"हि अप्रतिम:-)



Smi_dod
Friday, December 22, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेच तेच!!!

कंटाळा आलाय
त्याच त्याच गोष्टींचा
तेच बोलणे तेच रागावणे
तेच समजावणे.......
तेच आवंढे तेच उमाळे..
बदल असा नाहीच
तीच स्वप्ने..त्यांचे तसेच पुरे न होणे
तीच वाट बघणे
तेच वेडे हट्ट...तेच पुर्ण न होणे
तरी परत तेच करणे
सगळे मागच्या पानावरुन पुढे
सगळे तेच तेच
तेच शब्दाशी खेळणे...
तेच भावनामधे रमणे...
तेच अचानक त्रयस्त होणे
पावसाळ्यात साचलेल्या पाण्यासारखे
त्यावर असलेल्या तवंगा सारखे
कोळ्याने स्वःतभोवती विणलेल्या जाळ्यासारखे
असे वेगळे....मुक्त,तरल..............
काहीच नाही...
सगळे कायम तेच तेच


स्मि



Shree_tirthe
Friday, December 22, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु "माणसं" खूप छान लिहिलसं. त्याच शिर्षकासारखी मीपण एक कविता लिहिली आहे. कांचनगंधा "घर "मस्त आहे.

माणसं

माणसाने माणसाला माणुसकीने विसरले
माणसाने माणसाला पैशाने मोजले.
माणसाने माणसाला स्वार्थासाठी झिजवले
एकाच्या चूलीवर दुसर्‍याने अन्न शिजवले.
माणसाने माणसाला वर्णाने दुर नेले
माणसाने माणसाला गर्वाने चुर केले.
माणसाने माणसाला जातीने छेडले
माणसाने माणसाला मातीने वेढले.
माणसाने माणसाला वस्त्राने तारले
माणसाने माणसाला शस्त्राने मारले.
माणसाने माणसाला सुखाने त्रासले
माणसाने माणसाला दु:खाने ग्रासले.
माणसाने माणसाला श्रीमंतीने सतवले
माणसाने माणसाला गरिबीने दुखवले.
माणसाने माणसाला लायकीने खुनावले
माणसाने माणसाला मनाने दुरावले.
माणसाने माणसाला नात्याने रडवले
माणसाने माणसाला जात्याने रगडले.

श्री


Shriramb
Friday, December 22, 2006 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



कविता

शब्दामधुनि शब्द फुलावा
लयीत यावे गुणगुण गान
वार्‍यासंगत बागडणारे
जणु एखादे फाल्गुनपान

शब्दांची गुंफावी माला
आशयधागा हाती घेउन
मधुकर येता अवचित कोणी
शब्दपरिमळी जावा हरखुन

उंच रचावे स्वप्नमनोरे
आणि करावे हिमगिरि काबिज
शिखरावरती विसावताना
परी जपावे हळवे काळिज

जीवनगंगा अथांग अविरत
सहस्त्रावधी आविष्कार
ओंजळ एकच घ्यावी अलगद
आणि पहावा साक्षात्कार


Smi_dod
Friday, December 22, 2006 - 3:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग्निपरिक्षा!!!!!!

प्रत्येकाला आयुष्यात
एकदा तरी द्यावी लागते
अग्निपरिक्षा....
असते ती मधेच कुठेतरी
ईकडे ऐलतीर आणी तिकडे पैल
सीतेसारखी आग्निपरिक्षा
अवघड..बिकट
पण उत्तिर्ण झाली तर
मिळतो विसावा धरणीच्या कुशीत
काही जण हिमतीने देतात
आणि पैलतीरा वर विसावतात
त्याच्याकडे पाठफ़िरवुन पळणार्‍याना
पैलतीर कायम खुणावतो
ऐलतीरा वर पण स्वस्थता नाही
आणी पैलतीर गाठण्या साठी
अग्निपरिक्षा द्यायची हिम्मत नाही...
पण द्यावी ती
एकदातरी....

स्मि


Sarang23
Friday, December 22, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीराम, सुंदर!!!         

R_joshi
Friday, December 22, 2006 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि, श्री,राम छानच लिहिल्यात कविता:-)

R_joshi
Friday, December 22, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ जीवन

माझ जीवन...
मी चार ओळितच रेखाटल
त्यातच गुंफल
त्यालाच वाहिल

माझ्या जीवनात.....
तुझ असण मला भावल
ते तस भावल
म्हणुन तुझ्यासाठी जगल

माझ्या जीवनात.....
तुझ नसण मला
अनेक दु:ख देऊन गेल
म्हणुन मी ते कुरवाळल

माझ्या जीवनात.....
तु मला खुप काहि शिकवलस
जे शिकवलस तेच जगल
तेच मी या शब्दात बंदिस्त केल.

प्रिति:-)


Ganesh_kulkarni
Friday, December 22, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली मी तीला माज दुख
सहसा कदीच सागत नाही...
कारण तीच्या डोळ्यात पाणी आलेल...
मला पहावत नाही.
गणेश
९८८१६०३२५१





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators