पारा..... काल म्हणालास.... जाऊया का कुठे तरी लांब मस्त पण कुठे जायचे माहितच नाही ठिकाणे मला आज म्हणालास काल मस्त फ़िरुन आलो फ़ार छान ठिकाण होत.... काल म्हणाला.... काय आणावे तुझ्या साठी सुचतच नाही असाच आहे मी मला कळतच नाही आज म्हणतोस मस्त फ़ुले दिसली टोपलीभर घरी नेली... काल म्हणालास..... मी नेहमी कमीच बोलतोस काय बोलावे ते सुचतच नाही मला आज सांगतोस ईतक्या गप्पा मारल्या रात्र कशी सरली ते कळलेच नाही काल म्हणालास..... जागत नको जाऊस रात्र रात्र कशाला जागायचे आज सांगतोस रात्रभर जागाच झोपच आली नाही असा कसा रे तु पार्यासारखा ईकडुन तिकडे जाणारा हातात घ्यायला जावे तर सुळकन निसटुन जाणारा
|
Shyamli
| |
| Tuesday, December 19, 2006 - 1:44 am: |
| 
|
अरे ईथे टायपा की कुणितरी काय मरगळ आलीये एकदम सगळ्यांनाच
|
R_joshi
| |
| Tuesday, December 19, 2006 - 2:04 am: |
| 
|
श्री ओवी छानच जमलिय. बाकिचे सर्वजनही सुंदर लिहित आहेत. मी पाहिलय तुला.... मी पाहिलय तुला माझी नजर चुकवत मलाच अनेकदा बघताना मी पाहिलय तुला माझ्याशी बोलण्याचे कारण शोधताना अन ओठांवरच्या शब्दांना मागे परवताना मी पाहिलय तुला मनातल प्रेम मनात ठेवुन माझ्यावरच प्रेम करताना मी पाहिलय तुला अस्वस्थपणे माझ्याभोवती घुटमळताना स्वत:च्या अबोल्याचा स्वत:वर राग काढताना मी पाहिलय तुला माझ्यासाठी तिळ तिळ झुरताना प्रेम माझ्यावरचे कधी ही व्यक्त न करु शकताना मी पाहिलय तुला मी तुझ्यापासुन लांब जाताना असमर्थपणे माझ्यासाठी अश्रु ढाळताना प्रिति
|
मनोगत.... माझ्या भावना जाणतोस तर वागत का नाही तसा? कमलपत्रा सारखा जलविहिन रहातोस कसा?.. हा तुझा प्रश्न कळत का नाही मला? कळते पण वळत नाही असा मी नाही गं..... शब्दाच्या अधारावर मनाचे ईमले उभारतो इमल्याच्या सावलीत त्या क्षणभर विसावतो.... प्राप्त परिस्थितीच्या झळाया तेथेही कधी जाणवतात पण क्षणाच्या सावलीचं मोल मोठ असतं मनात.. आहे ते विसरता येत नाही हे सारखे जाणवते सावलीला उभं रहायला ही मन भयाकुल होते.... ही सावली हक्काची असावी असे नेहमी मनात येते पण पुन्हा उन्हातच जायचय ह्याची जाणिव होते.... ह्या जाणिवेनेच फ़ुललेल्या वसंताची पानगळ होते नंदनवनाचे बहरलेल्या वाळवंट मग होते.... तरी ह्या रणात एक सुख आहे तुझ्या निरागस हास्याची हिरवळ ईथे आहे ह्या हास्याचा गारवाच केवळ ईथे आहे विसावा तेच सुंदर डोळ्यात हसणे आयुष्यभराचा ठेवा....
|
Meenu
| |
| Tuesday, December 19, 2006 - 11:04 pm: |
| 
|
काळ काही जीवघेण्या वेदनांवर केवळ काळ हेच औषध आहे सांगीतलं तीला कुणीतरी ... तेव्हापासुन ... तेव्हापासुन अनेक जीवघेण्या जखमा आणि वेदना पदरात घेऊन, ती वाट पहातेय काळाच्या येण्याची ... ज्योत विझण्यापुर्वी ... विझण्यापुर्वी मोठी होते वात जशी त्याचप्रमाणे एकच वेदनेचा आघात आणि मग सारं काही ... शांत शांत .... शांत शांत.
|
Krishnag
| |
| Tuesday, December 19, 2006 - 11:21 pm: |
| 
|
तुझे!! नको म्हटले तरी नाही रहावत शब्दांचे वेड नाही संपत तुझ्या हसण्या रुसण्यावरही त्यांचे स्त्रवणे रहाते सतत तुला पाहताच ते येतात तुला न पाहिले तरी ते येतात पाहण्या न पहाण्याने त्यांचे धागे गुंफत जातात तुझ्या शब्दावर श्वास घेतात तुझ्या निःशब्द होण्यावर निश्वासतात श्वासोश्वासाचे नियमन ते तुझ्याच शब्दांवर करतात तुझ्या साठी फुलतात तुझ्यात वसंत पहातात वैशाखाच्या वणव्यातही तुझ्यासाठी मेघ होतात हे सारे शब्द तुझेच आहेत तुझ्याच प्रतिभेचे तेज आहे मी केवळ निमित्तमात्र ह्या सार्यात तुझेच ओज आहे तुझ्या साठी मी आहे माझ्यासाठी तू आहे तुझ्या माझ्यासाठी इथे सारे आभाळ एक आहे किशोर
|
Smi_dod
| |
| Tuesday, December 19, 2006 - 11:54 pm: |
| 
|
भिती!!! भुसभुशीत जमीन कायम धड्धड थरथरणार्या भिंती हलणारी जमीन सगळी कडे कंप घट्ट धरून ठेवलेली एक फ़ांदी तरेल का नाही सततची धाकधुक जाणवणारी पडझड... घेतलेला कानोसा... आणि अनाम भिती विखुरलेले कवडसे.. पांगलेले ढग... अशाश्वत श्वास स्मि
|
Smi_dod
| |
| Wednesday, December 20, 2006 - 12:38 am: |
| 
|
खोपा!!! खोपा केला...खुप खपून अंधार पडला मग जावे लागले खोपा तसाच सोडुन सकाळी येउन बघितले तर खोपा मोडलेला मोठ्या लाटेने जमीनदोस्त झालेला डोळ्यातले पाणी पुसत परत दुसरा केला... सगळे म्हणाले जागा चुकली म्हणुन खोपा मोडला जरा लांब केला असता तर टिकला असता नाही खोपा ईथेच हवा आणी असाच हवा.... हट्टाने परत परत केला जागा न बदलता ही तसाच टिकवला सान्गु एक खोपा टिकवण्याची धमक असणार्यानीच करावा तो परत परत लाटा तर येतच असतात... आलेल्या लाटेतले फ़क़्त शिंपले वेचायचे असतात स्मि
|
किशोर, स्मि छान. मनातल्या भावनांना सांगु कोणाकडे तुला सांगायला तु आहेस तरी कुठे? तु दुर आहेस पण नजर माझी शोधतेय तुला वाटतं क्षणभर तु आहेस बाजुला मनातल्या मनात सर्व तुला सांगते मनातल्या भावनांना सरळ तुझी वाट दाखवते डोळे मिटुनी तुझीच होते मग मन माझे तुझ्याशी बोलु लागते खुप बोलते.. खुप बोलते.. पण डोळे उघडताच वास्तव जाणवते आणि... स्वत्:च्या वेडेपणावर हसते हेच प्रेम आहे का स्वत्:ला विचारते. विद्या.
|
प्रिति, "मी पाहिलंय तूला" अगदी मस्त आहे कविता. कांचनगंधा, मीनु, किशोर, स्मि, विद्या तुमच्या कविता पण छान आहेत. श्री
|
Devdattag
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:17 am: |
| 
|
इतके दिवस कधी लक्षच गेलं नाही खरं तर वेळच झाला नाही या चित्राकडे बारकाईने बघायचा आपल्याकडे असलेलें हे चित्र पाहतांना यात काय दडलय ते सापडवतांना डोकं गरगरतंय तरीही उत्सुकता आहे मन अधीर आहे पण च्छे काहिच कळत नाहिये काय करावं?? विचारावं कुणाला? की आपणच सापडवायचं?? जाऊ देत झालं, कळेल कधीतरी आपल्यालाच एखाद्या बेसावध नजरेत
|
Meenu
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:29 am: |
| 
|
हो देवा असं होतं खरं कधी कधी ..
|
अपराध काय केला? सखे असा कोणता अपराध घडलेला? आज मी मृत्युच्या शय्येवर सजलेला. माझा फक्त एक अपराध? तुझ्यावर प्रेम केलं जीवापाड माझ्या प्रेतावर दोन अश्रुंची भीक वाढ. असंख्य वेदना होतील मजला तुझे अश्रु पाहून तरीपण माझा आत्मा मुक्त कर दोन अश्रु वाहून. वरात घेवून ये माझ्या घरी तु म्हणायचीस मूळा किनारी. आता मला सांग वरात कशी येणार? मला जाळण्यासाठी त्याच मूळा किनारी नेणार. तू मला दिलेले वचन का पाळले नाही? पिंड स्पर्शासाठी आज येथे कावळे नाही. माझ्या पिंडाला तूझ्या पायांनी कर अलगद स्पर्श शेवटच्या क्षणी सुध्दा मला होईल हर्ष. श्री
|
Sarang23
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:46 am: |
| 
|
सगळ्याच कविता छान!
|
R_joshi
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:20 am: |
| 
|
सर्वानीच छान कविता केल्या आहेत.
|
माज़े माग ने
|
स्मरणगाथा.... स्मरणमणी ओघळत रहातात किती मोती वेचलेले.....सांडतात हास्याच्या कारंज्याचे दुःखाच्या तळ्याचे किती लोभसवाणे सगळे दिलखुलास हसलेले उर्मीत त्या व्याकुळलेले रंगाच्या आतिशबाजीत चिंब भिजलेले... बसलो त्या सुगंधी कट्ट्यावर सांडलेले पहुडलो त्या गवताच्या गालिच्यावर रुतलेले भिरभिरणार्या पानावरुन अल्लाद स्वप्नात उतरलेले.... मी तु च्या भोवर्यात सापडलेले भांडताना रागाने तडतडलेले.... काळजी मधे हरवलेले... आठवांच्या ओघात विसरलेले विसरता विसरता अचानक आठवलेले.... अशी बघता बघता स्मरणगाथा तरुन येते... पिसा सारखे हलके वाटते
|
Smi_dod
| |
| Thursday, December 21, 2006 - 1:51 am: |
| 
|
मागोवा!!!!! शान्तपणे मागोवा घेतला त्यातला फ़ोलपणा जाणवला फ़ुटकी खेळणी,तुटक्या बाहुल्या सांभाळुण ठेवण्यासारखे काही अर्थ नसल्या सारखे आहे माझ्याकडे पण म्हणुन उराशी कवटाळलेले.. पण निरुपयोगी... शेवटी उपयोगी आणि निरुपयोगी सगळे मानण्यावर तुमच्या रंग उडालेली बाहुलीपण आठवण करुन देत असते तीच्या रंगीत दिवसांची प्रत्येक खेळण्यामागे दडलेल्या हजारो आठवणी... सांगतात ते जमलेले डाव... उठलेले ओरखाडे सांगतात त्या प्रत्येक ओरखड्यामागच्या वेदना......... वेळ हवा पण तितका... त्यात खोलवर शिरायला ईथे सगळी घाई जुनी अडगळ.... लवकरात लवकर साफ़ करायची.... स्मि
|
Meenu
| |
| Thursday, December 21, 2006 - 3:19 am: |
| 
|
स्मी छान गं मागोवा ..
|
फ़लश्रुती...... जरी सगळ्यांमधे असले वेढलेली तरी तु असतोच समोर बोलताना प्रत्येक वेळेस तुझ्या नजरेतले भाव वाचत असते मी तुझ्या प्रतिक्रिया अजमावत असते मी जेव्हा तु त्या शब्दात देतोस तेव्हा त्यामुळेच आश्चर्य वाटत नाही मला त्याची पावती आधीच मिळालेली असते.. कामात असताना पण जाणवत असते मला न्याहाळणारी तुझी नजर पण तु देखिल सतत मलाच बघत असतो... हे आत्ता कळाले मला...म्हणालास अग वाचताना तुलाच समोर बसवुन वाचुन दाखवत असतो तेव्हा...... तरीच बर्याचदा वाचताना मला जाणवते हे तर मी आधीच वाचलेय... हे असे एकमेकांच्या मनात रहाणे सतत एकमेकांना जाणवणे हीच नाही का फ़लश्रुती आपल्या सहजीवनाची....
|