|
हे असं का होतं? हे असं का होतं.. खरंच कधी कधी माझंच मला कळत नाही. आता हसणारी मी अचानक हुंदका दाटून येतो. आता संतापाने थरथरणारी मी खुदकन का हसते? दूर कोणीतरी किंचाळतं आणि मला आनंद होतो. रस्त्यावर गाडीखाली मांजरीचा चोळामोळा होतो आणि मी रडते. भावनाचे हे सगळे कल्लोळ मलाच का घेरतात? तसं बघायला गेलं तर माझ्याकडे काहीच नाही.. बुध्दाची शांती नाही आणि हिटलरचा क्रूर वेडेपणा नाही. मग तरीही हे असं का होतं? अंधारात कुठंतरी वाट भटकत चालते मी. काट्यात खड्ड्यात अडखळते मी. पण म्हणून चालण काहि सोडत नाही. वाट संपत नाही म्हणून धावतही नाही. कुठून निघाले ते आठवत नाही.. कुठे चालले त्याची पर्वा नाही.. कशासाठी ही भटकंती हा प्रश्न मी विचारत नाही. मग तरीही मी का चालत राहते? जग जिंकायची अभिलाषा होती. माझी की सिकंदरची? एक छोटीशी झोपडी पण बांधायची होती. कुणासाठी बरं? हातात पैसा सत्ता सगळं हवं होतं.. पण कशासाठी? मिळालं तेव्हा सर्वच लाथाडलं... कुणासाठी? नंतर एक तुकडा भाकरीसाठी वणवण फ़िरले ती मीच होते ना? आयुष्यात सगळ्याच प्रश्नाची उत्तरं हवी म्हणुन का अट्टहास केला? उत्तराशिवाय जगतात ना लोक? आणि प्रत्येक उत्तराने प्रश्नच वाढत गेले त्याचं काय? समोर आलेला हात धरला ते स्वत्:ला बुडण्यापासून वाचवायला. त्या हातानेच माझा गळा घोटला तर माझी काय चूक? मग तरीही मी परत तोच हात का धरते? स्मशानातल्या काळ्याकभीन्न रात्रीसारखं माझं जीवन... जिथे चोवीस तास अंधार पहुडलेला असतो तिथे कसल्या सुर्योदयाचं स्वप्न बघतेय मी? तहानलेल्या माझ्या डोळ्याना का अजून वैराणाची सवय होत नाही? कसल्या पावसाची वाट पाहणं चालू आहे? हजारो वर्षापूर्वी संपलेली मी आजही कसल्या गर्तेत फ़िरतेय मी? अश्वत्थामाला शाप होता तेल मागायचा. मला हा कसला शाप श्वास मागायचा? कुठे संपणार आहे हे चक्र? का जिथे संपणार आहे तिथूनच परत सुरू होणार आहे? प्रश्न... नुसते प्रश्न फ़िरतायत...... अधांतरी... माझ्यासारखेच...
|
Radhe
| |
| Thursday, December 21, 2006 - 9:26 am: |
| 
|
नंदिनी खूप चांगल लिहीतेस. प्रत्येकाच्या जीवनात एकदा तू वर्णन केलेला प्रसंग आलाच असणार. अगदी मनाला भिड्णारं तूज़ लिखाण सगळ्यांनी वचाव मनाने अनंत काळ हिंदोळ्यावर स्वार होवून केलेला प्रवास अनूभवता ये ईल.
|
very good नंदिनी.. .. 
|
|
|