|
कांचनगंधा मस्त. ओवी पहिली माझी ओवी गं प्रेम ह्या शब्दाला अडीच अक्षरासाठी स्वार्थ बघतात कशाला? दुसरी माझी ओवी गं प्रियकर नावाच्या व्यक्तीला का जागवितो तिच्यासाठी स्वत:च्या राक्षसी वृत्तीला? तीसरी माझी ओवी गं "त्याच्या" प्रेयसीला स्वार्थासाठी प्रियकराला का टांगते वेशीला? चौथी माझी ओवी गं त्यांच्यातल्या प्रेमाला शरीराच्या गरजेसाठी प्रेमाचा बहाणा कशाला? पाचवी माझी ओवी गं वडील नावाच्या सक्तीला का समजून घेत नाही कोणी त्या व्यक्तीला? सहावी माझी ओवी गं "आई" नावाच्या विश्वाला तिच्यासोबत विसरले वाटतं महाभारतातल्या त्या भिष्माला? सातव्या माझ्या ओवीने जागवा तुमचा आत्मा स्वार्थासाठी रोजच होतोय प्रेमाचा खात्मा. श्री
|
की मीच कधी सोडले नाहीत हात.. पडण्याच्या भीतीने..? झाड, सुंदर! देवा, ' एकटी वाट' मलाही नाही कळली रे. जरा पार्श्वभूमी सांगशील का? सारंगदेव, ' जीवनलहरी' interesting वाटतायत. अजून येऊ द्यात. गिरी, त्या दोघींनी मिळून तू लहान आहेस असा निष्कर्ष काढायची शक्यता जास्त वाटत्ये मला.
|
Mrinmayee
| |
| Thursday, December 14, 2006 - 11:06 am: |
| 
|
ती खिडकी फक्त माझी होती मला आपलीशी वाटणारी तिच्यापल्याडचं सगळंच निसर्गरम्य ती रंगांची उधळंण, हिरवीकंच झाडं-पानं मला वेडावून टाकणारी 'बाहेर ये' खुणावणारी अचानक काय झालं मला उमगलंच नाही खिडकी घट्ट बंद झाली की मीच केली ते कळलं नाही... आज अनेक वर्शांनी तीच बंद खिडकी पुन्हा उघडाविशी वाटली प्रयत्नांती कुरकुरंत का होईना पण अखेर उघडली अन अधीरतेनं वाकून बघताना एक धुळीचा लोट आत आला येताना आठवणींची चार दोन वाळकी पानं घेऊन ती पानं देखील वाटली गोंजाराविशी कशी आपली, हवीहवीशी.. का कुणास ठाउक पण ही खिडकी आता कायम उघडी ठेवायचीय चौकटीबाहेरची ती पर्णहीन झाडं-पानं सगळी सोबती घ्यायचीय फारसा विचार करंत नाही 'का आणि कशासाठी' त्या झाडांवरच्या सायंप्रकाशाकडे नजर लागलीय उद्याच्या पहाटेसाठी.
|
Chinnu
| |
| Thursday, December 14, 2006 - 4:13 pm: |
| 
|
मृण, अतीशय सुंदर ग. झाडा छान. फत्र्या मस्त. KG काही ओळी छान आहेत.
|
राधा...... घुमली वेणू यमुनातीरी जाहली राधा ती बावरी अधीर मनी होऊन गेली स्वरात त्या ती चिंब जाहली लोकलज्जा सोडूनी आली पाहुनी त्या श्यामसुंदरा परी होई ती लाजरी कृत्कोपाते नयनी ल्याली हास्यरेखा अधरी लपली आस भेटीची उरी दाटली रागामधल्या अनुरागाने फुलली ती सुंदरी जन्मो जन्मीच्या नात्यामधली ओळख पुनरपि कळूनी आली विरहव्यथा क्षणी लयास गेली समर्पित ती तना मनानी वर्षली मेघापरी
|
संध्या.... मावळतीला रवी तो आवेगाने शिरला सावळ्या संध्येच्या कुशीत गहिरे रंग ते उधळले सांजावल्या आसमंती बहरला निशिगंध धुंदावली रातराणी कळ्याची फ़ुले सारी सुगंधात नहाली जडावली रजनी मंदावली तारांगणे आतुरली उषःकाले...
|
Meenu
| |
| Friday, December 15, 2006 - 12:30 am: |
| 
|
नजर असा दिवस येईल, शब्द संपतिल .. त्यावेळी मौन होईल अर्थपुर्ण .. नजरा मिळतील, अन मनोगत, आपसुक कळतील .. नाही उरणार, गरज शब्दांचीही .. कविता असेल, नुसतं स्मितही .. वाटेल कविता, नुसता हुंकारही .. नाही बोचणार, शब्दांची धारही .. तेव्हा फक्त जपुन रहा, धारेपासुन नजरेच्या .. खरचं नजरा खुप काही बोलतील
|
Smi_dod
| |
| Friday, December 15, 2006 - 12:31 am: |
| 
|
संप!!!! माझ्या अश्रुनी संप करायचे ठरवले वर्षातले सगळे ऋतु,सगळे दिवस आपले कामच काम.... सुट्टी म्हणुन नाहीच जखम झाली म्हणुन वहायचे जखम भळभळली म्हणुन टपटपायचे वेदना सहन करत मुकपणे गळायचे सहन न होणार्या दुःखावर टाहो फ़ोडत ऊसळायचे अहो एवढेच काय आनंद झाला तरी आपले काम चोख करायचे खुपच कंटाळले ते या कामाला हक्काची सुट्टी नाहीतर नाही लिव्ह पण नाही बोनस, भत्ते अजिबात नाही मग जमले सगळे एकत्र वेदनेचे,जखमेचे,दुःखाचे विरहाचे,मिलनाचे अश्रु आणि संपच करायचा ठरवला त्यांनी माझी मात्र पंचाईत झाली आता काय करायचे? ही समस्या उभी ठाकली मग मी त्यांची समजुत काढली चला.. हक्काच्या सुट्ट्या लिव्ह सगळे सॅक्शन ओव्हरटाईम ही मिळेल आणि बोनस ही.. यावर सगळे अश्रु हसायला लागले हसणारे अश्रु बघुन मी मात्र कावरीबावरी झाले स्मि
|
श्री, कंचन्गंधा,मीनु, मृ, स्मिता.... सगळेच खुप रंगात आहेत लिहिण्याच्या.. मागचे archive वाचायचेय अजुन..!!!
|
खरा problem तुझ्या माझ्यातले अंतर मोजायला घेतले.. फ़ुटपट्टीवरचा आकडा दिसेना डोळे होते भिजले.. निरागस कोवळे क्षण अर्थ शोधता शोधता.. निबर झाले.. मग लक्षात आले मी तर त्याची expiry date बघायचेच विसरुन गेले, आता अंतर कापु म्हटले तरी संपता संपेना...कितीही धावले तरी तुझ्या पाशी पोहचेना मागची वाट अंधारलीये आणि पुढच्या वाटेवर फ़क्त तुझ्या पुढे गेल्याच्या खुणा.. आहेत मग लक्षात आले तुझ्या पुढे जाण्याचा वेग माझ्या मागे चालण्याच्या वेगापेक्षा नक्किच जास्त आहे.. पण ते जाउदे खर सांगु त्यापेक्षा तुझ्या मागे वळुन न पाहण्याचे दु:ख खुप जास्त आहे...!!!
|
Devdattag
| |
| Friday, December 15, 2006 - 6:10 am: |
| 
|
सांज अंधारून आली वेगळे काय झाले? पक्षीणी बावरून गेली नेमके काय झाले? अजवरी एकटेच होते जगणे माझे जरा लोक भेटावयास आले एवढे काय झाले? भासते आहे असे का हे झाडही एकटेसे काल होते सोबतिला ते रोपटे काय झाले? घात माझा असा का केला वैर्यापरी तो जन्मभरास साथ देऊ बोलणे काय झाले? नव्हते खोटे जराही पंखही गळून जाणे पुसति मलाच माझे ते उडणे काय झाले?
|
Chinnu
| |
| Friday, December 15, 2006 - 9:33 am: |
| 
|
KG , देवा, स्मि, मीनु सगळेच सुटलेत. मस्त चाललय लोक्स! देवा प्रयत्न आता परिपक्व होत आहे, छान वाटतय वाचायला. लोपा तुझ्या झुळुकी सुंदर जमल्यात. आणि खरा प्रॉब्लेम डोळे ओलावुन गेला ग! फार उत्कटतेने भाव उतरले आहेत कवितेत. खल्लास एकदम.
|
Poojas
| |
| Friday, December 15, 2006 - 11:12 pm: |
| 
|
'' शब्दबहर..." आज खूप दिवसांनी शब्दांना पालवी फुटली शब्दकळ्या शब्दफुले.. शब्द शब्द वेचत सुटली शब्द अधीर शब्द बधीर शब्द मुळी सुचत नव्हते सुचत होते शब्द जे.. ते मनापासून रुचत नव्हते अखेर शब्द विरुन गेले ओठामागे काळोखात पुन्हा सुरु पानझड मनामध्ये आतल्याआत असंच होतं जेव्हा जेव्हा तुझी माझी भेट होते शब्दामागून शब्द येतात वेळ मात्रं निघून जाते सांगायचं असतं तुला तेच नेमकं राहून जातं शब्दांना पूर येतो.. सुचलेलं वाहून जातं शब्दांच्या ओघात असं.. शब्दांचं हसं होतं काय सांगू कसं सांगू? कित्ती सांगू असं होतं म्हणून सांगते.. ऐकशील का??? माझ्या एका शब्दाखातर स्वप्नामध्ये येशील का मागायचं आहे तेच.. न मागता देशील का?? म्हणजे मन मोकळं होईल शब्द अडून राहणार नाहीत तुझ्या एका शब्दासाठी.. तुझी वाट पाहणार नाहीत…!!!
|
Zaad
| |
| Friday, December 15, 2006 - 11:12 pm: |
| 
|
अरे खरंय, सगळेच सुटले आहेत! शिशिरात मस्त बहर!! व्वा!!!
|
Zaad
| |
| Friday, December 15, 2006 - 11:16 pm: |
| 
|
त्याला एकदा मी विचारले, या सार्याचा अर्थ काय? त्याने हसून माझ्याकडे पाहिले फक्त. नंतर असेच कधीतरी पुन्हा त्याला विचारले, या सार्याला काही अर्थ आहे काय? त्याने पुन्हा तसेच (पण किंचित उदासवाणे) हसून माझ्याकडे पाहिले... माझ्या प्रश्नांचे स्वरूप बदलत होते, पण उत्तर मात्र मिळत नव्हते. आणि आज अचानक मला उमगले... तो अर्थाचे दान माझ्या ओंजळीत भरत असताना मी वाचू पाहत होतो त्याच्या डॊळ्यांमधली अवघड भाषा...! ती तर समजली नाहीच, पण ओंजळीतले दानही तसेच निसटून गेले....
|
साद.... तूच असशी माझ्या अधरी तूच असशी माझ्या श्वासी तूच असशी रंध्रो रंध्री परी व्याकुळता का मानसी क्षण ठेवले ते सारे जपूनी स्पर्शफुलांची माला गुंफुनी त्या मालेला कंठी लेऊनी मी हरवे तव चिंतनी कशी वदु व्यथा अंतरातली तव शब्दांना आतुरलेली एकवार दे साद ती अशी निवळे कळ ह्या उरातली
|
Jayavi
| |
| Saturday, December 16, 2006 - 3:58 am: |
| 
|
आई गं......... काय सुरेख आहेत सगळ्या कविता...... एकसे एक! स्मि, अश्रू, खूप खूप आवडली. लोपा......... अ प्र ति म! काही शब्दच नाहीत.
|
Smi_dod
| |
| Saturday, December 16, 2006 - 6:13 am: |
| 
|
धन्यवाद जया!! इथे सारेच मस्त लिहितायेत. अगदी बहरलिये कविता!!
|
Shyamli
| |
| Saturday, December 16, 2006 - 6:35 am: |
| 
|
धन्यवाद लोकहो...... सगळ्यांना प्रतीक्रिया द्यायच्या आहेत पण........ नीट वाचायला वेळ होत नाहिये तर समजुन घ्यालच
|
पूजा शब्दबहर अप्रतिम आहे. कंचन्गंधा,मीनु, मृ, स्मिता तुमच्या कवितापण छान आहेत. श्री
|
|
|