Ashwini
| |
| Monday, December 11, 2006 - 10:38 am: |
| 
|
सारंग, छान आहे रे.
|
Poojas
| |
| Monday, December 11, 2006 - 1:11 pm: |
| 
|
प्रसाद.... एकदम सहीच. !!! काय म्हणतात सगळे..?? मी आज खूप दिवसांनी गुलमोहोर वर आले. ''गझल'' च्या BB वर पहिल्यांदाच Enter करताना जे वाटलं होतं आणि जे पाहिलं.. आणि त्यातली इतक्या दिवसांची ही gap या झक्कस गझलेने भरुन काढली.. it was surprising प्रचंड आवडली बरं का प्रसाद तुमची गझल !! सारंग....मस्तं !!! आणि V.J as usual.... हटके reply !!!!
|
Zaad
| |
| Monday, December 11, 2006 - 5:49 pm: |
| 
|
प्रसाद, सारंग केवळ अप्रतिम!!!
|
सारंग छान.... पहिला, शेवटचा आणि भात्याचे शेर आवडले... प्रसाद...
|
वा! मी गाणे म्हटले आणिक; तो फकीर हळहळलेला शब्दांशी खेळत होता, अर्थाने तळमळलेला! जगण्याचा अवघड रस्ता! कळता कळता वळलेला!! मस्त
|
Rockstar
| |
| Tuesday, December 12, 2006 - 10:02 am: |
| 
|
mala kavitetla kahi kalat nahi pan manala bhidnaara kahi aasel tar aawadata wachayala ikade changla kahi milel wachayala hi apeksha aahe
|
सारंग ... हा जीव असा जळलेला ... वा ...!!! विशेषतः मतला हा जीव असा जळलेला पण कुणास ना कळलेला दर्द सही उतरलाय .. एक शेर आठवला (बहुतेक दुष्यंत कुमार ) दोस्त मिलते हैं यहां दिल को दुखाने के लिये उंगलिया रखते हैं वो हम पे उठाने के लिये वो हवाओं की तरह रुख को बदल लेते हैं हम नसीबों से लडे थे जिन्हें पाने के लिये
|
hi frens m here juz to read ur gazals btw prasad "sahi" zakaas mrudgandha tumcya pan kahi gazals post kara aawadel mala ikade wachayala
|
i m diehard fan of mrudgandas poems
|
सापळे... बोलणे तिचे ना मला कळे शब्द वेगळे ! अर्थ वेगळे ! नजर भेटता श्वास थांबतो नजर चुकविता प्राण तळमळे हासणे तिचे नादमय असे .... पैंजणातही न्यून आढळे ती फुलांसही गंध देतसे अत्तरातही तीच दर्वळे काय ही तर्हा जीव घ्यायची दूर राहुनी फास आवळे ही धरा तिची, ह्या दिशा तिच्या जायचे कुठे ? लाख सापळे
|
Sarang23
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:12 am: |
| 
|
आहाहा!!! काय मक्ता आहे... क ह र... वैभवा!!! एक से एक शेर आहेत... नजर भेटता श्वास थांबतो नजर चुकविता प्राण तळमळे वा...! सहज सुंदर!
|
Kiru
| |
| Thursday, December 14, 2006 - 2:22 am: |
| 
|
वैभवा.. क्या बात है!! हासणे तिचे नादमय असे पैंजणातही न्यून आढळे ओ हो!! खर तर मी तुला सांगीतल्याप्रमणे इथे प्रतिक्रीया देणार नव्हतोच. पण रहावलं नाही. 'नाद', 'मलाही', 'कबीर'... एकापेक्षा एक..!! 'पुनर्जन्म' तर खूप आवडली. लगेच एक शेर आठवला.. दिल के चोटों ने कभी चैन से रहने न दिया जब चली सर्द हवा मैने तुझे याद किया इसका रोना नही क्यों तुने किया दिल बरबाद इसका गम है के बहोत देर में बरबाद किया मला स्वातीचा फार हेवा वाटतो. अरे तिच्याकडे तुझ्या या काव्यावर ओवाळण्याकरता तेवढ्याच तोडीच्या कविता तरी आहेत.. आमचं काय? असो.. बाकी सारं प्रत्यक्ष भेटीकरता राखून ठेवतो.. सारंग, प्रसाद तुम्ही महान लिहिताय.. सारंग.. तुझ्या कविता,गझला खूप मजा आणतात. 'केवडा' मला अतिशय आवडली.. त्यावर बरीच चर्चा झाली. नियमांबाबत मी अगदी अज्ञानी आहे. पण भाव कळतो आणि तोच आवडतो. एक बरं असतं.. आपल्याला नियम कळत नसले की बाकी काहीही खटकत नाही. कुठल्याही अडसराशिवाय थेट 'आंत' पोहोचता येत. तरी आपल्याकडल्या अधिकारी व्यक्तींच्या सूचना स्विकारुन अधिकाधिक आनंद देशील ही आशा.. मिनू.. 'सूर्यास्तानंतर', 'अवेळी पाऊस' दोन्ही प्रचंड आवडल्या. लिहीत रहा. खूप छान उतरतं काव्य तुझ्याकडून. अश्विनी.. कमी लिहितेस पण 'खंत' सारखं अफाट लिहून जातेस. आणि तेही असं की त्यावर विडंबन ही छान व्हावं..!! मृ, स्मिता, झाड, कांचन, देवा तुम्ही सगळेच अप्रतिम लिहिताय. एकेक कविता दाद देण्याजोगी. त्यात ही.. झाड, 'भीती' लक्षांत राहिली. स्वाती.. तुझ्याकडे quantity कमी पण quality तुफान आहे.. quantity वाढवलीस तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच.. आणि काय लिहू? सगळ्यांना शुभेच्छा. खूप लिहा.. खूप वाचू द्या..
|
आहाहा वैभव... क्या बात है! एकसे एक बढिया शेर... जियो!! प्रसाद...
|
Giriraj
| |
| Thursday, December 14, 2006 - 4:47 am: |
| 
|
सारंग,तुला मतला म्हणायचेय का? वैभव,सापळा सहीच.. मतला तर खूप वेगळा वापरलास! शेवटचा शेर inspired का? कल चौदहवीं की रात थी मधला एक शेर आठवला रे...! बाकी गज़लेतली अतिशयोक्ति आणि चमत्क्रुति 'हासणे तिचे.. ' मध्ये तर ओप्तप्रोत भरून वाहतेय! मलाही शिकव ना गज़ल लोहायला
|
Psg
| |
| Thursday, December 14, 2006 - 6:03 am: |
| 
|
वा! सहीच आहे सापळा..
|
Sarang23
| |
| Thursday, December 14, 2006 - 7:25 am: |
| 
|
आमची पोहोचपावती इथे वाच रे वैभवा... गिर्या, लेका पहिल्यांदाच शेवटाचा उल्लेख केला म्हणून एवढ गडबडू नये सापळा हा शब्द मक्त्यातच वापरला आहे... आणि तोच मला आवडलेला शेर आहे...
|
Jayavi
| |
| Thursday, December 14, 2006 - 7:46 am: |
| 
|
वैभव, फ़िर से कमाल! काय ही तर्हा जीव घ्यायची दूर राहुनी फास आवळे हं........ तर कत्लेआम यहा भी चालू है
|
Ashwini
| |
| Thursday, December 14, 2006 - 10:00 am: |
| 
|
वैभव, तुझ्या कवितेबद्दल पण हेच म्हणावं लागेल... काय ही तर्हा जीव घ्यायची दूर राहुनी फास आवळे
|
वैभव, ' सापळे' सुंदर! सुंदरच!! सगळेच शेर खास!! ती फुलांसही गंध देतसे अत्तरातही तीच दर्वळे.. प्रत्यक्ष भेटीतला आनंद आणि स्मरणातला!! क्या बात है!! मजा आ गया!! हे वृत्त पण आवडलं खूप! गालगालगा गालगालगा.. म्हणायला काय मजा येत्ये!
|
किरूभाऊ, लाजवताय. मनापासून धन्यवाद. माझ्या हातून म्हणावं तसं सातत्याने नाही लिहीलं जात हे खरं आहे. (त्यावरून बोलणी मात्र अगदी सातत्याने खात असते. ) मी त्या दृष्टीने नक्की प्रयत्न करीन. बाकी तुझी दादही एखाद्या कवितेच्याच तोडीची आहे!
|