|
Meenu
| |
| Monday, December 11, 2006 - 4:48 am: |
| 
|
स्वाती हट्ट उच्च .. श्री मला शेवट कळला नाही हळदीची रांगोळी आणि वाढदिवस ..
|
श्री, स्मि,वैभव, मिनु, मृ छानच आहेत कविता.
|
Phatrya
| |
| Monday, December 11, 2006 - 7:20 am: |
| 
|
मीनु आमच्याकडे वाढदिवसाच्या दिवशी जेवताना ताटाखाली हळदीची रांगोळी काढायची पध्दत आहे. म्हणजेच ताटाखाली हळदीचा स्वस्तिक काढतात. सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री
|
Asmaani
| |
| Monday, December 11, 2006 - 9:27 am: |
| 
|
श्री, cute आहे कविता अगदी!
|
वैभव, ' मान' गये! मृद्गंधा, ' केवळ याचसाठी' मस्त! मीनू, ' अपरिहार्य'ची कल्पना छान आहे.
|
Asmaani
| |
| Monday, December 11, 2006 - 9:30 am: |
| 
|
वैभव मृ, नेहमीप्रमाणे झकास! स्मि, "वेडी" सही आहे. मनाला भिडली अगदी!
|
Ashwini
| |
| Monday, December 11, 2006 - 10:36 am: |
| 
|
वैभव, मान सुरेख. मृद्गंधा, मस्त. मीनू, श्री छान आहेत.
|
Zaad
| |
| Monday, December 11, 2006 - 5:53 pm: |
| 
|
स्वाती, हट्ट खूपच सही! वैभव, काय चपखल टाकला आहेस 'मान'जोडीतला!!
|
Zaad
| |
| Monday, December 11, 2006 - 5:57 pm: |
| 
|
भीती झोके घेताना दिसणार्या आकाशासारखा भासलास - कधी दूर, कधी जवळ ; हाताला मात्र कधीच लागला नाहीस की, मीच कधी सोडले नाहीत हात, पडण्याच्या भीतीने?
|
Devdattag
| |
| Monday, December 11, 2006 - 11:36 pm: |
| 
|
कधी एकट्या वाटेने जाई मोगर्याचा गंध आता भय चहुकडे झाली कशी वाट बंद दूर कुणाच्या गोठ्यात होत्या पान्हाळल्या गाई सय कुणाची येइना अन सादळली भुई काल पाडाच्या भुत्याला होता सापडला गाव पण एकट्या वाटेला नाही मोगर्याचा ठाव
|
धन्यवाद सर्वांना वा!! वैभव,"मान" मस्त. आहे. मीनू,..तु नसताना बहर ..? अपराधी मन, गुन्ह्याचा सल, वसंतात पानगळ .. वा!!!! श्री,मस्त... अगदी वेगळं स्मि.. कांचनगंधा,सुरेख आहे नाते.. झाड.. कमी शब्दात किती सुरेख बोललास... देवदत्त.. कविता निटशी कळली नाही.. सादळली म्हणजे काय?
|
Smi_dod
| |
| Tuesday, December 12, 2006 - 1:31 am: |
| 
|
धन्स विद्या,अस्मानि,मृ.... होरपळ!!!!! हे माझे नाही सगळे कळतय पण वळत का नाही मला लहान मुलासारख राहुन राहुन मन का ओढ घेतय तिकडे नको म्हणाले कि तितक्याच जोराने उसळी मारणारे हे मन कसे आवरावे हे हिंदोळे मनाचे कसे सांभाळावे दमछाक होते अगदी या सगळ्या उर्मी का दाटतात अशक्यतेच्या प्रदेशात का जातात सगळे कोडे पडते सुटतही नाही आणि थांबतही नाही उन पावसाच्या या खेळात मन मात्र होरपळते दिवसेनदिवस चढती भांजणी होरपळीची चढत जाते मनात लागलेला वणवा काही केल्या शांतच होत नाही अश्रुंनी आग ती विझतच नाही स्मि
|
कला काल एक जुनी वही सापडली.. किती हरखले मी.. पानं चाळता चाळता, कधी काळी सहज म्हणून त्यात ठेवलेलं पिंपळपान, माझ्याकडे बघून खुदकन हसलं.. सुरेख जाळी झाली होती त्याची.. मी अवाक, "खरंच.. वेदना हसत झेलून, जखमांना सुंदर करण्याची कला ते कुठं बरं शिकलं असावं???"
|
Meenu
| |
| Tuesday, December 12, 2006 - 1:34 am: |
| 
|
सजीव सृष्टी कुणी आहे का जिवंत ईथे ..? जगतय का कुणी.. अरे आम्ही माणसं कसली जगतोय मरतोय झालं, रोज पोटापायी त्या पक्षांना विचार बाबा .. कुणी आहे का जिवंत ईथे ..? जगतय का कुणी.. छे! प्रदुषणात घुसमटतोय आसर्यासाठी बरसं झाड शोधतोय त्या झाडांना विचार बाबा .. कुणी आहे का जिवंत ईथे ..? जगतय का कुणी.. ईतक्यात मरेपर्यंत एखादं, झाड जगल्याचं काही ऐकीवात नाही माशांना विचार जगत असतील कदाचित .. कुणी आहे का जिवंत ईथे ..? जगतय का कुणी.. रसायनं कधीही घेतील आमचा बळी जगतोय कसले ढकलतोय दिवस झालं हं कुणीच जिवंत नाहीये तर .. अन जगतही नाहीये कुणी .. मला आपलं उगीच वाटलं की, ही सजीवांची सृष्टी आहे...
|
Meenu
| |
| Tuesday, December 12, 2006 - 1:35 am: |
| 
|
मृ धन्यवाद आणि कला छान गं
|
Smi_dod
| |
| Tuesday, December 12, 2006 - 1:52 am: |
| 
|
अनपेक्षित!!!! माहित होते उत्तर तरी हव्या त्या उत्तरासाठी कौल लावला अपेक्षित उत्तर मिळाले अनपेक्षित उत्तराच्या प्रतिक्षेत रात्री जागल्या... अनपेक्षित पहाट चाहुललीच नाही खरच काय होते अपेक्षित अन काय अनपेक्षित... सगळे मनाचे खेळ वर्तमान अपेक्षित भविष्य अनपेक्षित.. मी अपेक्षित.. तु सततच अनपेक्षित स्मि
|
Jayavi
| |
| Tuesday, December 12, 2006 - 2:15 am: |
| 
|
अधीन किती वर्षं झालीत रे तुला मला भेटून.... किती वर्षं झालीत मी तुझी होऊन.... अजूनही आठवतो ना तो दिवस जेव्हा तुझ्या नजरेनं तू मला फ़सवलंस गाफ़िल क्षणी नाही रे.... चक्क उघड उघड फ़सले पण तुझ्याही डोळ्यात मला मीच दिसले तुझं माझं गणित तेव्हाच जमलं नजरेतलं कोडं काळजाला उलगडलं दोघांनीही बाजी एकाच वेळी जिंकली आणि तेव्हापासून आपल्यातली नसलेली स्पर्धाही संपली विजयाची माळ आपण एकमेकांना घातली मी पण सारं विरघळून गेलं द्वैतातून एक गोड अद्वैत जन्माला आलं मी मनात विचार करायचे आणि तू त्याला मूर्त स्वरुप द्यायचास माझे शब्द ओठावर यायच्या आधीच.... तू सारं वाचून काढायचास पण मला मात्र नाही जमलं तुला वाचायला तू बराचसा अनोळखीच राहिलास प्रत्येक वेळी तू नव्याने उलगडत गेलास पण तुझं हे नवेपण सुद्धा सुखावतं रे तुझ्या त्या नव्या प्रवाहात झोकून द्यायला मला खूप आवडतं कधी कधी किनारा कुठे.... हे सुद्धा माहित नसतं पण मी त्याची कधीच काळजी केली नाही एक विलक्षण कुतूहल, अनामिक ओढ आणि समर्पण हेच काय ते माझं बाकी सर्व तूच तू मी किनार्याची कधी मनिषा पण केली नाही तुझा माझा हा प्रवास असाच सुरु असावा अगदी अनंतापर्यंत....! मधेच कुठेतरी विसावतोस तेव्हा तुला डोळे भरुन बघून घेते न जाणो, इतक्या वेगाच्या प्रवासात तुझा हात सुटला तर.... नकळत तुझ्यावरची पकड थोडी घट्ट होते तुझ्या आणखी जवळ येते तुला सगळं कळत असतं सुखावत असतोस तू तुझा अहंकार जपत मीही आनंदानं तुझं श्रेष्ठत्व मान्य करते माझं अस्तित्व तुझ्या स्वाधीन करुन.... आणि सर्वस्वी तुझ्या अधीन होऊन. जयश्री
|
Peshawa
| |
| Tuesday, December 12, 2006 - 3:23 am: |
| 
|
तुझा गुरु दशमात आहे तसा निर्बलीच पण दशमात गुरु उत्तम अस्तो तसे कुम्भेचा म्हटल्यावर तो उच्चिचाच तसे अश्टमेशाचे फ़रसे दोश त्याला लागत नाहीत... पण सन्तती पासून सुख नाही तुला... त्यातून षष्ठेश शुक्र तिथे... माड्या चढता चढता पाय मोडल्या सारखेच हे! हॅ हॅ हॅ गुरु दशमात आहे तुझ्या... काळजी करु नको फ़क्त जमल तर गुरुजनांचा आदर राख... त्याचे काय आहे तू मागच्या जन्मी एक वासरू मारले आहेस (भृगु संहितेच्या पानावर ) तेंव्हा एखदि गाय (सोन्याची) दान कर... आणि येत रहा... अजुन बरेच ग्रह बर्याच अंशात बर्याच होर्यात बर्याच योगात विपरीत्त राज्योगात अर्धा काल्सर्पही जरा सविस्तर बघतो ये आता आज गर्दी आहे दक्षिणा बहेर दे मी स्वत्: घेत नाही... काळजी करु नको गुरु दशमात आहे तुझ्या!
|
पेशवा, हीच कारे ती कुन्डली????........ DDD
|
Princess
| |
| Tuesday, December 12, 2006 - 6:39 am: |
| 
|
मृ, पिंपळपानाची जाळी सुरेखच. जयु... काय लिहु... अगणित वेळा वाचली. अप्रतिम
|
|
|