Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 08, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through December 08, 2006 « Previous Next »

Nagarchadeepak
Monday, November 27, 2006 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा एका नेत्याने
केला मोठा घोटाळा
जाउन म्हणालो मी त्याला
करु का तहेलका

तो म्हणाला मला
नको कल्ला करु
वाट्ल तर आपण दोघ
मिळुनच खाउ

दुस-या दिवशी पेपरमध्ये
त्याचा मोठा फ़ोटो आला
जनहितासाठी त्याने म्हणे
मोठा निधी दिला

पेपर घेउन माज़्याकडे
तो नेता आला
जनता गप्प, पोलिस गप्प
मामला फ़िट्ट केला

असे किती तहेलके
आम्ही आहे पचवले
म्हणुनच तर का आमचे
पोट आहे सुटले


असे म्हणुन त्याने
माज़्याकडे असे रोखून पाहीले
जसे काही सारे घोटाळे
मीच उघडे केलेन

मी त्याला म्हणालो
जरा कळ काढ भाउ
पुढ्च्या निवडणुकीला
तुला मजा दावु

-- नगरचा दिपक काळे


Asmaani
Monday, November 27, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपक, छान! मस्त आहे कविता!

Manishalimaye
Tuesday, November 28, 2006 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू निघुन गेलीस,
मला मागे ठेवुन.
पण गंम्मत माहित्ये का?
तुला कळलच नव्हत,
की मला फसवुन तुला जाता यायचंच नाही ते!
कारण तुझ्याच रांगेत मीही होते उभी
तुझ्याच बसमधे चढण्यासाठी.
तुला वाटत राहीलं,
मी बाहेरुनच तुझ्याशी बोलत्येय.
अश्रुंच्या पडद्यामुळे दिसत नव्हतेच तुला मी.
पण नाही ग,
तुझ्या मागच्या सिटवर मीच तर होते बसलेली.

स्टॉपवर पटकन उतरुन गेलीस.
हात हलवुन निरोप द्यायचही भान नाही उरल.
तुला तर माझ्या तिथल्या अस्तित्वाची जाणिवच नव्हती.
आणि मी तर माझ भानच हरवुन बसले होते.

एकमेकींकडे मनं मोकळी करता करता,
कधीतरी जाणवायला लागलं
तू मोकळी होत्येस,
पण मी?
मी मात्र अचानक घुसमटायला लागले,
तुला जपता जपता.
मला मग मोकळ व्हायची संधीच दिली नाहीस ग.

आणि आज आत्ता अशी उतरुन गेलीस
तुझ्यामगे मीही तिथेच चढले आहे,
हे न जाणवताच.

लवकरच माझाही स्टॉप येतोय
आणि आता,
मीही आहे उतरण्याच्या तयारीत.

गंम्मत आहे नाही!
वेगवेगळ्या थांब्यांवर उतरुनही,
शेवटी भेटणार आहोत लवकरच,
एकाच ठिकाणी!
मला अपेक्षित
आणि
तुला अगदीच अनपेक्षित!

,






Vaibhav_joshi
Tuesday, November 28, 2006 - 1:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

this is good , a real good one मनिषा तिकडे कविता बीबी वर टाक

Manishalimaye
Tuesday, November 28, 2006 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय वैभव! कशी टाकणार आता? पुन्हा हे सगळ्;अ लिहु?

Vaibhav_joshi
Wednesday, November 29, 2006 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DIALOGUE


मोबाईल लावला सिध्दीविनायकाला
म्हटलं
" खुश तो आज बहोत होगे तुम"
म्हणाला
" कहां यार , मेरी तो सिट्टीपिट्टी है गुम
पता नही किसने कानून को लगाया चुन्ना
एक रात में बन गया भाई फिर से मुन्ना
सब मिले हुए है , ठरवून करते है राडा
अरे वो नवस बोलने आया था
तब भी उसके जेब में था टाडा"


Smi_dod
Wednesday, November 29, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव सहि... मान गये उस्ताद..

Swaatee_ambole
Wednesday, November 29, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Touche', वैभव! :-)
     

Kmayuresh2002
Thursday, November 30, 2006 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभ्या, सही रे मित्रा

Devdattag
Friday, December 01, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसादची गज़ल वाचता वाचता सुचलेल काही
ओरिजनल नाही म्हणून इथे

बांधले ज्या क्षणांचे कयास मी
लेखतो त्या क्षणांनाच श्वास मी

झेलतो जे जे खडे मी पाहतो
केवढे जपतो उराशी त्रास मी

ठेच जी लागायाची ती लागते
घेतले पाठीस अता जन्मास मी

संपले होते जरी ते माझ्यामते
घेतो त्यांचा अता अदमास मी

बोलले होते मला नास्तिक मी
भेटलो होतोच जेंव्हा देवास मी



Chinnu
Friday, December 01, 2006 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा प्रयत्न छान आहे. थोडी गडबड नक्किच आहे. पण जन्मालाच पाठिवर घेतले, सही!

Devdattag
Wednesday, December 06, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा भारत महान हा माझा क्लेम आहे
चिंतेचं कारण नाही इथे सगळं क्षेम आहे

रोज हरतो तरी उद्या जिंकु असा इथे वादा आहे
बुडत्याला काडी म्हणून परतलेला दादा आहे
खेळण्या आधीच तसा रोज हरलेला गेम आहे
चिंतेचं कारण नाही इथे सगळं क्षेम आहे

बातम्यांमध्ये रोज इथे घसरलेली गाडी आहे
अपघाताची यादी ही द्रौपदीची साडी आहे
नफ्यामध्येही वाढ असा रेल्वेचा फेम आहे
चिंतेचं कारण नाही इथे सगळं क्षेम आहे

केंद्राने राज्याचा गोठवलेला निधी आहे
पक्षीय राजकारणातला हाही एक विधी आहे
घडलं ते तुमच्यामुळे हा प्रत्येकावर ब्लेम आहे
चिंतेचं कारण नाही इथे सगळं क्षेम आहे

उत्तरेतल्या द्वेषापायी दक्षिणेत फुटकी डोकी आहेत
दंगल घडवण्यासाठी पोचवलेली खोकी आहेत
फांदीवर बसलेल्यांनीच तोडलेलं स्टेम आहे
चिंतेचं कारण नाही इथे सगळं क्षेम आहे

पैशाच्या बळावर निर्दोष सुटलेली लोकं आहेत
कोर्टाच्या फेर्यांपायी खिशांना भोकं आहेत
न्यायाधीशाच्या पाठी फक्त मोडकी फ़्रेम आहे
चिंतेचं कारण नाही इथे सगळं क्षेम आहे


Princess
Wednesday, December 06, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान रे देवा... पण इथे का? काहीच्या काही वाटते तुला ही कविता... मग आमच्या सारख्यानी कुठे लिहावे?

R_joshi
Wednesday, December 06, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा कविता फारच सुंदर आहे. कवितेच्या बीबीवर टाक रे.

R_joshi
Wednesday, December 06, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आले आले आले
नेते हे आले
पाच वर्षानी का होईना
त्यांनी आपले चेहरे दाखवले

'मी आहे ह्या पार्टिचा
वोट मलाच द्या"
वोट देऊन आल्यावर
हात तुम्ही जनतेचेच खेचा

आश्वासनाची पायघडि
जनतेच्या पायाशी पडते
जनता हि भोळीभाबडि
नेमकी आश्वासनांनाच भुलते

केसांनी गळा कापावा
तसे नेते मतांनी गळा कापतात
आपलेच झाले थोडे,म्हणुन
केंद्र सरकारलाही लुटतात

अजब सरकार गजब सरकार
हे असेच चालणार
फोल आश्वासनांनच्या झगमगाटि पुढे
गरिब जनता आपले गुडघे टेकणार

प्रिति:-)



Devdattag
Friday, December 08, 2006 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप
विचारता मला लागली ही धाप का
पाहिला आहे तुम्ही तिचा तो बाप का

फिरतो सदा हाती घेउन बंदुक तो
बोलण्याची आहे कुणाची रे टाप का

गेला कुणी बोलण्याला सामोपचारी
माहीत ना त्याचेच काढीतो माप का

गेलोय मदतीस त्याच्या मी नैकवेळा
पडली कधी पाठीवरी ती थाप का

भाळली होती तशी ती अमुच्यावरी
जाऊ दे उगी मज पामरा तो ताप का


R_joshi
Friday, December 08, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा फारच छान लिहिली आहेस "बाप" पण त्याचे नामकरण "बाप रे बाप" नाहितर " बाप कि डोक्याला ताप " असे कर. बाकि कविता उ त्त म आहे:-)

Devdattag
Friday, December 08, 2006 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, प्रिती धन्स..:-)
ती कविता इथेच असु देत.. कवितेवर नको.. शब्दांचा मेळ तितकासा जमला नाहिये


Sarang23
Friday, December 08, 2006 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा...
थोडा प्रयत्न केला असतास तर सुंदर हज़ल झाली असती :-)


Devdattag
Friday, December 08, 2006 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग प्रयत्न चालु आहे.. पण मोडतोड करावी लागतेय जरा..:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators