|
Chinnu
| |
| Thursday, December 07, 2006 - 10:26 am: |
| 
|
वैभवा मस्त रे. अमृता, कृष्णा, KG , स्मि, छान.
|
Asmaani
| |
| Thursday, December 07, 2006 - 11:02 am: |
| 
|
कृष्णाजी, स्मि, कांचनगंधा, अमृता, सगळ्यांच्याच कविता सुंदर आहेत. वैभव, नेहमीप्रमाणेच नि:शब्द करणारा अनुभव!
|
Zaad
| |
| Thursday, December 07, 2006 - 11:28 am: |
| 
|
स्मि, स्वप्नझूला छान आहे. कल्पना आवडली. कांचनगंधा, क्रिश, अमृता, सही लिहीलंय सगळ्यांनी. वैभव, 'आज तू छिन्नी फेकून निघून गेलीस '...... शहारा आला रे वाचून!
|
Sarang23
| |
| Thursday, December 07, 2006 - 11:16 pm: |
| 
|
मुरणी एवढी सुंदर मुलगी, मला कशी ओळखेल? छट! ती तर मला भलताच समजली असेल… नाही, नाही नक्कीच हिला पाहिलं आहे कु्ठेतरी नजर मात्र तिच्या मुरणीवर थांबलीय खरी! ओळख पटली नाही; पण ती हसली नक्की आपण तिला ओळखतो- खात्री झाली पक्की कोण? कुठली? ओळख काय? विचारांच थैमान तिच्या रुपात न्हाऊन न्हाऊन मन सुद्धा बेभान पण सालं मुरणीच माझा एवढा जीव का घेतेय?! आयला! ती पण हसत हसत इकडेच चालत येतेय!! गोड गुलाबी, सोनपरी ती उंचीपुरी चिकार! तिच्यापुढे तर साक्षात सगळ्या अप्सरा पण भिकार!! केवढी सुंदर, केवढी छान, बोलण्यातही हुशार! तिचा शब्द म्हणजे सगळ्या अंगावरती तुषार! लाडेलाडे धावू लागली शब्दांमधून हरणी चांदीत हिरवा खडा घालून नाकात होती मुरणी! सालं आत्ता आठवलं मी हिला कुठे पाहिलं तिचा विचार घेऊन मन भुतकाळातच राहिलं दोन वेण्या, तेलकट चेहरा, नाकालाही धार मुरडण्याची हौस तिला; मुरणीवर प्रेम अपार! परिस्थिती गरीब घरची! घरात साधी गिरणी काँग्रेसच्या मग गवताची ती नाकात घाली मुरणी! खुदकन हसली ती अन तंद्रीमधून बाहेर पडलो ओळखलस का मला? म्हणताच मीही पुरता गडबडलो आता म्हणशील बावळट? बोलता बोलता खेटली तिला अपेक्षित सगळी उत्तरे डोळ्यांमधून भेटली पण तू मात्र साऱ्या, भलताच बदलला आहेस विशीत असून सुद्धा साठीत कलला आहेस! बोलणं माझं ऐकुन मित्रा तुला नक्कीच बसेल धक्का पुर्वीच होतास छान आता माकड झालायस पक्का अळवासारखा चेहरा झाला क्षणात खाल्ली हाय! बोलण्याआधीच बोलणं संपलं आता पुढं काय? देवा खरच पटलं मला अफाट तुझी करणी आयुष्यभर लक्षात राहील आता फक्त मुरणी! अरे वेड्या लगेच एवढा होवू नको उदास खरं सांगू? मी तुला केंव्हाचच केलय पास! आयुष्यभर मला बावळट म्हणत राहाशील का? बोलताना फक्त असंच डोळे भरून पाहाशील का? काहीच न कळून मी तिला बसलो पाहात माझ्या नकळत तिने घेतला हातात माझा हात! देवा खरच पटलं मला अफाट तुझी करणी गाढवावरही कधी कधी भाळून जाते हरणी!! आयुष्यभर समोर राहील आता फक्त मुरणी!!! सारंग
|
Devdattag
| |
| Friday, December 08, 2006 - 12:07 am: |
| 
|
एक पूज्य एक शून्य जगण्यामध्ये नाही मेळ एक असा एक तसा मांडता मांडता मोडला खेळ अर्धं माझं अर्धं तुझं वाटणीमध्ये संपला वेळ
|
धन्यवाद मित्रांनो .. बडी ... ब्लॉगवर अपडेट करणं होत नाहीये हे खरं ... पण आता प्रयत्न करेन . सारंग ... देवा खरच पटलं मला अफाट तुझी करणी गाढवावरही कधी कधी भाळून जाते हरणी!! वरकरणी लाईट वाटणारी ही दोन वाक्यं त्या मागच्या समर्पणाच्या भावना लक्षात घेतल्यावर ..... देवा ... अर्धं माझं अर्धं तुझं वाटणीमध्ये संपला वेळ मस्त
|
Jo_s
| |
| Friday, December 08, 2006 - 3:58 am: |
| 
|
सारंग छानच देवा "संपला वेळ" सहिच
|
Princess
| |
| Friday, December 08, 2006 - 3:59 am: |
| 
|
सारंगा... मज्जा आली वाचुन. लगेच नवर्याला वाचुन दाखवली देवा, ही कविता कशी सुचली तुला? खुप सुरेख जमुन आलीये... अंतर्मुख करणारी.
|
वा!! वैभव,, आज तू छिन्नी फ़ेकून निघून गेलिस.. ह्म्म.. अमृता.. मस्तच. कांचन्गंध.. आत्ममग्न कविता.खूप छान सारंग... मुरणी देवा.. अर्धं माझं अर्धं तुझं वाटणीमध्ये संपला वेळ .. वा!! कृष्णाजि.. सुरेख..
|
Devdattag
| |
| Friday, December 08, 2006 - 5:22 am: |
| 
|
लोकहो धन्यवाद.. ह्या महिन्यात बराच बॅकलॉग राहिलाय कविता वाचायचा.. निवांत बसायला लागेल त्यासाठी खास
|
Sarang23
| |
| Friday, December 08, 2006 - 5:51 am: |
| 
|
देवा मस्त रे!
|
उमाळा आठवणीतल्या आठवणींना उमाळा आला एकदा सारेच आठवु लागले जणु आताच घडत आहे पण सार्या आठवणीत तुझी आठवण ताजी आहे कितीही विसराविशी वाटली तरी तीव्रताच तिची जास्त आहे स्मरण होताच तुझ शरीर शहारत... मग फ़क्त तुझच स्मरण होत सार पुन्हा एकदा डोळ्यासमोर येतं प्रत्येक वेळी वाटत आता नाही तुला आठवायच... अस म्हणता म्हणता.. परत तुझ्याच आठवणीत मन माझ जात अस का रे घडत... मन माझ तुझ्याचपाशी का येउन थांबतं! आणि.. नकळत डोळ्यात पाणी दाटतं ह्या क्षणी... तु जवळ हवा हवासा वाटतो ...पण ते शक्य नाही तुझ्या माझ्यात बरच आहे अंतरही.. माझ्या भावना तुला कळणार नाहीत जेव्हा समजायच्या होत्या तेव्हा समजलासच नाहीस... तुला स्व:तहुन सांगण मला देखिल जमल नाही तु स्व:तहुन कधी कधी जवळ यायचास तेव्हा सार सांगायच... मी ठरवायची मनातल्या मनात पण सांगण्याआधीच दुरही जायचास तु अचानक न सांगताच मी मात्र सैरभैर व्हायची तुझ्यापासुन मग लांब रहायची मग तुही रागवायचास माझ्याशी अबोला धरायचास पण काही दिवसांनी परत तु यायचास माझी मात्र घालमेल व्हायची परत त्याच विचारात जायची .... असाच तु जातानाही आला होतास मीही कबुल करावयाची ठरविले पण.... परत तु गेलास आणि आलास तो जाण्यासाठी पुन्हा परत न येण्यासाठी मला न सांगताच.. न बोलताच तु गेलास जाताना फ़क्त बघत राहीलास मी मात्र तिथेच राहीले.... एक स्वप्न विसरण्यासाठी!! विद्या
|
Meenu
| |
| Friday, December 08, 2006 - 9:53 am: |
| 
|
आलाच कधी अवेळी पाऊस..... आलाच कधी अवेळी पाऊस.. तर परत का धाडता येतो? आलाच कधी अवेळी पाऊस.. म्हणुन कोरडं का राहता येतं? आलाच कधी अवेळी पाऊस.. तर मनापासुन उमलु दे प्रसन्न असं स्वागत.. तो तरी दुसरं काय असतो मागत ..? आलाच कधी अवेळी पाऊस.. तर अशी नको पाठ फिरवुस.. त्याला सहन नाही व्हायचं अशा अवेळी त्यानं तरी सांग कुठे जायचं ..?
|
Meenu
| |
| Friday, December 08, 2006 - 10:44 am: |
| 
|
सुर्यास्तानंतर ... सुर्यास्तानंतर मनात कुणीतरी... म्हणत असतं शुभंकरोती डोळ्यासमोर दिसु लागते.. गालावरची मऊ सुरकुती सुर्यास्तानंतर मनातुन.... एक गोष्ट ऐकु येते कुणा एका राजाची.... प्रजा सुखाने नांदु लागते सुर्यास्तानंतर अंधाराबरोबर उगवत जातात कितीक आठवणी... अशा वेळी ओठी येतात कुठली कुठली जुनी गाणी...
|
देवा, 'अर्धं माझं.. अर्धं तुझं..' मस्त. सारंग, सही. ( अश्या कवितांना ' हविता' म्हणायला हवं... ' हज़ल'सारखं!) आता भेटली आहे तर तिचं ऐकत जा. तिने ' माकड' म्हटल्यावर आपण ' हो' म्हणावं. ' नाही, मी गाढव आहे' म्हणून वाद घालू नये.
मीनू, ' सूर्यास्तानंतर' आवडली.
|
वैभव, ' छिन्नी फेकून निघून गेलीस..!' ......!! ( तिला ही कविता ऐकव.. येईल परत. ) ' तिच्या जाण्या'वरची माझी एक कविता आठवली. ती पोस्ट करत्ये.
|
हट्ट ' हो हो, जायचं हं.. संध्याकाळी नक्की जायचं!' - रोज समजावतो मनाला मग दिवसभर ते बरंच शहाण्यासारखं रहातं संध्याकाळी पुन्हा हट्ट.. 'चल की रे.. ती वाट बघत असेल की..' काय आहे, त्याला लळा आहे तिचा.. बरेच दिवस होतं ना तिच्याकडे.. आणि.. ती गेल्याचं मी बोललेलोच नाही त्याला अजून..
|
Chinnu
| |
| Friday, December 08, 2006 - 2:49 pm: |
| 
|
स्वाती mind Blowing! , कसं गं सुचतं अस छान छान तुला. अगदी स्पर्शुन गेलीये कविता तुझी. मस्त.
|
Asmaani
| |
| Friday, December 08, 2006 - 4:03 pm: |
| 
|
स्वाती, अप्रतिम! किती थोडे शब्द! केवढा जबरदस्त धक्का!
|
Smi_dod
| |
| Friday, December 08, 2006 - 10:56 pm: |
| 
|
स्वाती, विद्या, कृष्णा, सारंग मस्त!!... .... ...
|
|
|