मित्रांनो खूप दिवस इकडे फिरकलो नाही .. गडबडीत गझल पोस्ट करून निघून गेलो .. दिलगीर आहे ... मस्त चाललंय सर्वांचच ... पण आत्ता निघताना ह्या पानावरच्या रेंगाळणार्या ओळी म्हणाल तर ... तुझ्या स्पर्शानं झंकारत असते माझी देहवीणा तू मात्र मैफिलीपासून शेकडो मैल दूर असतोस एक शेर आठवला ह्या सतारीची अशी तक्रार आहे छेडणारा दूर क्षितिजापार आहे शुभेच्छा
|
Smi_dod
| |
| Wednesday, December 06, 2006 - 12:34 am: |
| 
|
स्वप्नझुला!!! कधी एकदम आकाशी तर कधी धरेवर झोका असा चढतो उंच उंच घेउन जातो वर वर अजून वर म्हणता पार आकाशी टेकतो डोळे मिटता हळुच धरे वर आणुन सोडतो प्रत्येक वेळी धडधड हुरहुर नविन अनुभुती देउन जाते लय त्याची भिनते श्वासात आणि नसा नसात थांबला तरी मन झुलते त्याच्या तालात असते धुंदी मग त्याचीच विश्व सारे माझे व्यापणारी कोणीच नसते तिथे असतो फ़क़्त मी आणि माझा स्वप्नझुला स्मि
|
छान आहे स्मि ... surprisingly मला तो जीवनाचा paradox वाटत गेला सुरुवातीला ... असतो फ़क़्त मी आणि माझा जीवनझुला असंच आलं वाचताना .. मज्जा आली .. धन्यवाद
|
Smi_dod
| |
| Wednesday, December 06, 2006 - 1:19 am: |
| 
|
वैभव धन्स रे.. हल्ली बिजलास का तु दिसत नाहीस फ़ारसा?..तुझ्या कवितांची वाट बघत असतो आम्ही.....
|
धन्यवाद,सर्वांना अस्मानी.. मी काल अन्वधानाने तुझी कविता वचलीच नाही. तुझ्या स्पर्शानं झंकारत असते माझी देहवीणा तू मात्र मैफिलीपासून शेकडो मैल दूर असतोस .. वा!! खरेच खूप सुरेख आहे. क्रिश, वा!जगण्याची तर्हा मस्तच. स्मि,विश्व सारे व्यापणारी धुंदी.. स्वप्नझुला मस्तच.
|
Smi_dod
| |
| Wednesday, December 06, 2006 - 3:43 am: |
| 
|
मृ...धन्स तुझ्या सगळ्याच कविता लाजबाब असतात.. मेल ला री केला नाहीस..
|
Asmaani
| |
| Wednesday, December 06, 2006 - 9:00 am: |
| 
|
चन्द्रकोर, वैभव आणि मृ, मनापासून धन्यवाद! तुमच्यासारख्यांची दाद मिळाली की खरंच हुरुप येतो.
|
Asmaani
| |
| Wednesday, December 06, 2006 - 10:02 am: |
| 
|
स्मि, स्वप्नझुला खूप आवडली
|
Smi_dod
| |
| Thursday, December 07, 2006 - 12:17 am: |
| 
|
धन्स अस्मानी!!! ... ..
|
Smi_dod
| |
| Thursday, December 07, 2006 - 12:33 am: |
| 
|
चिरशांती!!! सगळे क्षण पोरके झाले नेणिवा शुन्य झाल्या खूप दुर दुर गेल्या जाणिवांच्या देशात एक शुन्य पोकळी व्यापुन राहीलेली व्योमाला एखादी अस्फ़ुट चाहुल, थरथर काहीच नाही नीरव शांतता गच्च दाटलीये किरण झेपावतोय यायला पण नकोच.. गोंगाट त्या भावनांचा कोलाहाल तो विचारांचा आता हवीये फ़क़्त चिरशांती स्मि
|
Princess
| |
| Thursday, December 07, 2006 - 12:46 am: |
| 
|
स्मि, सध्या बहरलीयेस एकदम.... छान छान कविता लिहितीय...सगळ्याच छान. मृ, इंद्रधनु मस्तच . तसेही तुझ्या सगळ्याच कविता सुरेख असतात.
|
रातराणी... गंधभरली रातराणी बहरली.... सांडली कुपी अत्तराची सुगंधाच्या त्या वादळात उघडले दुमडलेले कोपरे फ़ेर धरला आठवांनी प्रत्येक बहराचे मोती ओघळले.. अन विखुरले आठवले ते धुंद चांदणे त्यात फ़ुललेल्या नक्षत्रकळ्या..... मादक त्या गंधाने भारली देहवेल लकेर सुगंधाची उमटली..... बहरात त्या विरून गेली
|
पुनर्जन्म ... बरं केलंस ... नाहीतरी लोक हसू लागलेच होते मी पूर्वीसारखा वागत नाही म्हणून त्यांची चूक नव्हती खरंच ... तू भेटण्याआधीचा अन नंतरचा मी ह्यात एका जन्माचा होता फरक ... आजकाल मी गुलजार वगैरे बडबडायचो " सलोना सा सजन " ऐकून तर ... चक्क रात्र रात्र रडायचो . सांगत फिरायचो जगाला " दगडाचा माणूस होऊ शकतो " कळलंच नाही ..... तो तुझा फक्त विरंगुळा असू शकतो आज तू छिन्नी फेकून निघून गेलीस अन जाणवलं ... प्रत्येक दगडातून शिल्प - बिल्प घडत नसतं .... आज मी जगाला सांगू शकतो " दो SS स्त्स , पुनर्जन्म वगैरे बिल्कुल बकवास असतं "!!!
|
Smi_dod
| |
| Thursday, December 07, 2006 - 2:21 am: |
| 
|
" दगडाचा माणूस होऊ शकतो " कळलंच नाही ..... तो तुझा फक्त विरंगुळा असू शकतो आज तू छिन्नी फेकून निघून गेलीस अन जाणवलं ... प्रत्येक दगडातून शिल्प - बिल्प घडत नसतं .... >>> वैभव...!!!!.. ... .. लिहायला शब्द नाहीत...
|
Badbadi
| |
| Thursday, December 07, 2006 - 2:56 am: |
| 
|
वैभव, जितका नियमित इथे लिहितोस तितकाच नियमित blog वर का नाही लिहित???????
|
Psg
| |
| Thursday, December 07, 2006 - 3:41 am: |
| 
|
वैभव, कसलं लिहिलस रे.. मस्त!
|
Sarang23
| |
| Thursday, December 07, 2006 - 5:33 am: |
| 
|
तो तुझा फक्त विरंगुळा असू शकतो आज तू छिन्नी फेकून निघून गेलीस अन जाणवलं ... वा! छान आहेत या ओळी!
|
वैभवा, काय सही लिहीलयस रे..
|
Krishnag
| |
| Thursday, December 07, 2006 - 6:26 am: |
| 
|
सय!!! ती येते तेंव्हा.. पावसाची सर येते मनाच्या मृदेला भिजवूनी जाते ती येते तेंव्हा... तिरीप उन्हाची मेघातुन येते गारठल्या तनमना उब देउनिया जाते ती येते तेंव्हा... स्वर संवादिनी गाते गाण्याला जीवनाच्या सूर देउनिया जाते ती येते तेंव्हा... हास्य पानोपानी फुलते शिशिरी शाखांना वसंत देऊनिया जाते ती येते तेंव्हा... डोळे बोलके आणते जाणिवांना अंतरीच्या मुग्ध करुनिया जाते ती येते तेंव्हा... शद्ब फुलांचे आणते गाभार्यात हृदयीच्या गंध भरुनिया जाते ती येते तेंव्हा... स्पर्श असंख्य आणिते पापण्यांना नकळत ओलावून जाते किशोर
|
Amruta_w
| |
| Thursday, December 07, 2006 - 6:35 am: |
| 
|
नशा दरवळ या क्षणांचा मंद सुगंध प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन बेधुंद वळव्याच्या सरीत चातक दंग स्पर्शाने मनी वाजला मृदंग पहाट कोवळी दवबिंदुत चिंब नशा तृप्ततेची झिंगणारी धुंद धुंद
|