|
अस म्हणतात की तलवारी सारखीच करीना लेखन दाखवते. हिंदुस्थानावर जेव्हा जेव्हा घाला परकीयांचा घाला आला तेव्हा तेव्हा तेगबहादरांसोबत अनेक कवी निर्मान झाले. त्यांचे कर्तुत्व लेखन चालवायचे होते. अशा काही बहादर कवींची आठवण मी आज काढनार आहे्आ छोटासा लेख त्या कंवीना अर्पण. अटल ठाट महिपाट, अटल तारागढ्यानं अटल नग्न अजमेर, अटल हिंदव अस्थानं अटल तेज परताप, अटल लंकागढ डंडिय अटल आप चहुवान,अटल भूमिजस मंडिय संघरी भूप सोमेस नृप, अटल छत्र ओपे सुसर कविराव वेन असीस दे, अटल जागां रजेसकर हा कवि वेन. चांद बदराई चा बाप. चांद बदराई ला हिंदी साहीत्यातील पहीला कवी असा मान आहे. (कारण त्याचे पृथ्वीराज रासो प्रसिध्द झाले व त्या आधीचे साहित्य अजुनही मिळायचे आहे). चांद बदराईने पृथ्वीराज व शहाबूद्दीन यांचा लढा काव्य स्वरुपात मांडला आहे. शहाबूद्दीन हा पहिला आक्र्मक की ज्यामुळे पांजाब वा राजपुताना काही आंशी भारताच्या हातुन गेले. त्या लढ्यात पृथ्वीराज ने शरन आलेल्याला आपला धर्म म्हनून सोडुन दिले राखि पंच्दिन साहि अदब आदर बहु किन्नो सूज हुसेन गाजी सुपूत हथ्थे ग्रही दिन्नो किय सलाम तिनबार जाहु अपन्ने सुथानह मतिं हिदुंपर साहि सज्जि आओ स्वस्थानह जब हिंदुदल जोर हुअ छुट्टी मीरपर भ्रम असम अरबस्तान चला करन उद्धसाक्र्म पुढे तो म्हणतो आज भाग चहुआन घर| आज भाग हिंदवान ईन जिवित दिल्लीश्वर गंज न सक्के आन्|| परत आक्रमन न करन्याचे ठरवुन तो निघुन गेला. पण शहाबूद्दीन उलटला त्याने परत चढाई केली. कवि त्याला संदेश देतो निर्लज्ज्य म्लेच्छ लजै नही हम हिंदु लजवान परत हारला, परत चढाई केली व त्यात पृथ्वीराज मारला गेला. आपली हार झाली. ह्याचे वर्णन करताना तो म्हणतो दुर्ग्गे हिंदुराजन बंदीन आयं जपै जाप जालधर तु सहाय नमसे नमस्त इ जालंधरानी सुरं आसुर नागपूजा प्रमानी धनी हिंदु प्रथिराज, जिन रजवट्ट उजारिय घनी हिंदु प्रथिराज, बोल कलिमझ्ह उगारिय घनी हिंदु प्रथिराज, जेन सुविहानह संध्यो बरबारह ग्र्हीमुक्की, अंतकाल सर बंध्यो. बदराई नंतर च्या सर्वात मोठा कवि म्हणजे कविराज भुषण. त्याने प्रत्यक्ष ओरंगजेबाला चलेन्ज केले लाज धरो शिवजी से लरो सब सैयद सेख पठान पठायके| भूषण ह्यां गडकोटन हारे उंहा तुग क्यों मठ तीरे रिसायके|| हिंदुन के पति नों न विसात सतावत हिंदु गरीबन पायके| लीजै कलंक न दिल्ली के बाल्म आलम आलम्गीर कहायके|| क्या बात है. अरे तिकडे काय बसलास हिंम्मत असेल तर शिवाजीशी लढ. कुंद कहा पय वृंद कहा अरुचंद्र कहा सरजाजस आगे तसेच इंद्र जिमी जंभ पर बाढ वसु अंभपर, भुषण सदंभपर सेर सिवराज है. शिवाजी सारखाचा आणखी एक माईचा पुत मध्य प्रदेशात ईस्लामी सत्ते विरुध्द लढत होता. त्याचे व शिवाजीचे एकच स्वप्न होते. " हिंदुपतपातशाही. " भुषण त्याची स्तुती करताना लिहितो हवर हरट्ट साजि, गैवर गरट्ट समपैदर थट्ट फोज तुरकान की भूषण भन्त रायचंपतीको छत्रसाल रोप्यो रनख्याल व्हैके ढाल हिंदवाने की. क्या बात है हा जन्म फिदा ह्या ओळींवर. छत्रसाल हा हिंदुस्थानाची ढाल आहे असे कवि म्हणतो. छत्रसाला त्याने पत्र लिहीले. तुम छत्री सिरताज्| जीत आपणी भूमीकों करो देशको राज्|| शिवाजी व छत्रसाल भेट झाली. तो लिहीतो हिंदु तुरक दीन द्वै गाये तिनसो वैर सदा चली आये लेख्यो स्रु असुरन को जैसो| केहरी करिन बखानो तैसो|| जबते शहा तख्तपर बैठे तब ते हिंदुन सों उर डाटे|| ह्याच काळात कवि रामदास जाणत्या राज्याला लिहीतात. स्वप्नी जे देखीले रात्री तें तें तैसेची होतसे हिंडता फिरता गेलों आनंदवन्भूवनी|| बुडाले सर्वव्ही पापी, हिंदुस्थान बळावले अभक्तांचा क्षयो झाला आनंदवनभूवनी|| पुढे काश्मीरी ब्राम्हणांवर म्लेच्छांनी हल्ला केला. ते गुरु तेगबहादुरांकडे गेले. त्यांनी त्यांना रक्षण करन्याचे वचण दिले व ईस्लामी राज्याला उत्तर पाठवले. तुम सुनो दिजेसु ढिग तुकेसु अवैसु इमगावो ईक पीर हमारा हिंदु भारा भाईचारा लख पाओ है तेगबहादुर जगत अजागर ता आकर तुर्क करो तिस पाछे तब ही फिर सबही बन है तुरक भरो - पंथप्रकाश त्यांना युध्दाला ललकारन्यात आले तर ते उत्तर देतात तिन ते सुन श्रि तेगबहादुर ध्रर्म निवाहन विषे बहादुर उत्तर भनयो घर्म हम हिंदु अति प्रियको किमकरे निंकंदु ह्याच शिख घर्मातिल १० वे गुरु पुढे म्हनतात सकल जगतमे खालसा पंथ गाजे जगे धर्म हिंदु सकल भंड भाजे - विचीत्र नाटक गुरु गोविंदसिंगजी. पुढे १८५७ मध्ये हिंदुस्थानचा नामधारी राजा म्हणतो गाझीयोंमे बु रहेगी जबतलक ईमान की तब तो लंडन तक चलेगी तेग हिंदुस्थान की गेल्या शतकात विर सावरकर लिहीतात हे हिंदुशक्ती संभुत दिप्तीतम तेजा हे हिंदु तपस्या पुत ईश्वरी ओजा हे हिंदु श्री सोभाग्य भुतीच्या साजा हे हिंदु नृसींहा प्रभो शिवाजी राजा वरिल सर्व कविच्यां कवितेत एकच आशय. एक्च वाक्य. हिंदु नी हिंदुस्थान. त्यांनी कलम चालवुन जनमाणसात क्रांती घ्डवुन आणली.आज परकीय आक्रमण नाहीत तरी पण एका कविची गरज आहे कारण हिंदु शब्दचा अर्थ वेगळा काढल्या जातोय व घेतल्या जातोय. हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक मणूष्य हिंदु मग भले तो कोणत्याही धर्माचा का असेना. फक्त त्याने त्याची निष्टा हिंदुस्थानाशी ठेवली पाहीजे. गुरु गोविंदसिंग काय किंवा गुरु तेग बहादुर काय ते जरी शिख म्हणवत असले तरी तो एक फक्त पंथ आहे व ते खर्या अर्थानी हिंदुअच आहेत असे त्यांचे स्व्:तचे म्हणने होते. आसिंधु सिंधु - पर्यन्ता यस्य भारत्-भूमीका पितृभू:पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत्: || - विष्नू पुराण ही व्याख्या जनसामान्यात रुढ करनारा कोणी कवि भेटेल काय?
|
Bee
| |
| Thursday, December 07, 2006 - 9:26 pm: |
| 
|
छानच रे केदार. काहीतरी वेगळं लिहिलस...
|
Ramani
| |
| Friday, December 08, 2006 - 8:42 am: |
| 
|
केदार, मस्तच!! ह्या सगळ्याबद्दल खुपच कमी माहिती होती. पण संदर्भ कुठुन मिळविलेत??
|
धन्यवाद बी व दिप्ती. दिप्ती, मी बर्याचदा ईतिहासाचे वाचण करताना काही गोष्टी लिहुन काढतो. त्यातुनच हे लिहिले. काल पुरांणावर माझी व माझ्या मित्राची चर्चा चालली होती त्यातुन तो श्लोक आठवला व हे लिहुन काढले. वरिल लिखानात दोन चुका आहेत. १९५७ नसून ते १८५७ आहे. व दिप्तीतप नसुन दिप्तीतम आहे.
|
Dineshvs
| |
| Friday, December 08, 2006 - 12:19 pm: |
| 
|
केदार, या काव्यपंक्तींचा आणखी विस्तृत, अर्थ लिही ना रे. तुला वेगळे भाष्य करायची गरजच नाही. तुझा मुद्दा यातुनच मांडला जातोय. तुझे संदर्भ शोधण्याची चिकाटी, अगदी सलाम करण्याजोगी आहे रे.
|
धन्यवाद दिनेश. वाईट एवढच की ह्यावर लोक संशोधन करत नाहीत किंवा ते सर्वांपर्यंत पर्यंत पोचत नाही. हा छ्त्रसाल राजा म्हणजे मध्य प्रदेशातील शिवाजी आहे पण आपल्या ईतिहासात त्याला काही स्थान नाही. लोकांना शिवाजी जेवढा माहीत आहे तेवढा छत्रसाल नाही. झालेच तर त्या कुप्रसिद्ध बाबरी मशीदी साठी गुरु गोविंदसिगांनी लढाई केली असा उल्लेख आहे. कदाचित हे सर्व धर्मनिरपेक्षते साठी दाबुन ठेवले जात असावे. असो.
|
Saee
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:21 pm: |
| 
|
एवढ्या चांगल्या आणि वेगळ्या विषयाचा चांगला परामर्ष घेतला आहेस. पण फारच थोडक्यात आटोपलास लेख. आणखी विस्ताराने का नाही लिहीलास? अजुनही लिहू शकतोस. तुझ्याकडे बर्याच नोंदी असतील असं एकंदरीत दिसतं आहे. आम्हालाही ते जाणून घ्यायला आवडेल.
|
वेगळा विषय छान वाटले पण बरच काही कळल नाही जर विस्तारने सांगितले तर नक्कि वाचयाला अजुन आवडेल.. अजुन लिही
|
धन्यवाद saee व लोपा. पुढच्या वेळेस सविस्तर लिहीन.
|
Radhe
| |
| Thursday, December 21, 2006 - 3:28 am: |
| 
|
केदार खुप चांगल लीहितोस. आपल्या राजकारणी लोकांनी "हिंदू" या शब्दाला प्रायव्हेट लिमिटेड बनवले आहे. त्या हिंदू शब्दाला तु ईतिहासाचे दाखले देवून व्यापक अर्थाने मांड्ले आहेस. गर्व से कहो हम हिंदू हे.
|
|
|