|
Meenu
| |
| Friday, December 01, 2006 - 7:03 am: |
| 
|
न्याय शब्दवेध दशरथाचा, पोरका करुन गेला, श्रावणाच्या मातापित्यांना. अंधारात सहजच मारलेला तीर तुझा, माझ्यातला सारा जीवनरस घेऊन गेला. दशरथही पुढे, पुत्रशोकानं गेला ... तुझं काय ....?
|
Niru_kul
| |
| Friday, December 01, 2006 - 8:57 am: |
| 
|
म्हणून..... हल्ली मला झोप येत नाही, तुझी आठवण घडावी म्हणून; तरीही मी झोपण्याचा प्रयत्न करते, तुझीच स्वप्नं पडावी म्हणून... लाजतात सार्या कळ्या, तुझे मुग्ध हास्य पाहून; त्यासाठी मी तुला बागेत नेत नाही, कळ्यांची फुले व्हावी म्हणून... न लागे थांग मजला, तुझ्या गहिर्या नयनांचा; मला कदाचीत पोहता येत नाही, मी डोळ्यांत तुझ्या बुडावे म्हणून... वेड मजला सुगंधाचे, तसे फार पूर्वीचे; गजरे मी माळत नाही, मोगरा तू बनावे म्हणून... ह्रदयाचे फूल माझ्या, कसे वाहू तुझ्या चरणी? मी तुझी होत नाही, तू मला आपलेसे करावे म्हणून...
|
Niru_kul
| |
| Friday, December 01, 2006 - 10:20 am: |
| 
|
वाटते मजला..... वाटते मजला असे की, तू मलाही आठवावे; माझीया अश्रुंचे खाते, ओंजळीत तू साठवावे.... मागणी माझी अशी की, प्रीत मजवर तुझी जडावी; गीत तू ओठांत तुझीया, भावनेचे आळवावे.... शांततेचा भंग व्हावा, निःशब्द माझ्या नयनांनी; नजरेचे सारे इशारे, मनाला तुझ्या जाणवावे.... बंध सारे मुक्त व्हावे, त्तुझ्या हळव्या ह्रदयावरचे; रोज स्वप्नी येऊन तुझीया, मी निशेला चाळवावे....
|
Phatrya
| |
| Saturday, December 02, 2006 - 4:13 am: |
| 
|
मी श्रीकांत तीर्थे. लालभाईजी आपले मन्:पूर्वक धन्यवाद. कारण आपण मायबोली वरचे एकमेव व्यक्ती आहात ज्यांनी माझे अभिनंदन केलेले आहे. मायबोली वरची माझी पोटापायी ही पहीलीच कविता आहे. तुमच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. धन्यवाद.
|
छान आहे.... प्रारब्धाला नावं ठेवायची नाही आहे ते खूप छान आहे... वार्यावरचं जग आपलं छान आहे नाही वादळाची भिती नाही उन्मळुन पडण्याच भय कल्पनेतलं विश्व आपलं छानच आहे... रुसवे भांडणे फ़क़्त सत्यात ते पण छान आहेत.... तडफ़डण्यातली मजा काही औरच आहे दुःखालाही सुख म्हणायची तुझी सवय छानच आहे... बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात पण कधी कधी खरं खरं असण्यातली मजा ही और आहे शेवटी काय कल्पना आणि सत्य दोन्हीही छान आहे......
|
चक्रीवादळ... खिन्नतेचे वर्तुळ गिरक्या घेते.. बघत बघता त्याचे चक्रीवादळ होते.. कळतही नाही त्यात.. जेव्हा आयुष्य लपेटले जाते..! प्रश्नांची अतर्क्य वळणे स्वता:भोवती.. आतल्या " स्व " ला मोडत.. भिरभिरत जातात... खचलेल्या धीराचा पाया सांभाळत चक्रीवादळातली काया.. सरावान प्रत्येक क्षणाला थिरकत जाते शुन्य होउन त्या चक्रात गरगरत राहते.. कधी थांबलेच तर... मनातले प्रदेश बदललेले दिसतात... दुर कुठेतरी अज्ञात स्थळी.. एकट्याने वादळातुन उरलेला साया.. त्याकडे पाहुन... मग मी उगाच हसते...!!!
|
सवयीच.... नेहमीच झालय तुझं माझ्या बोलण्यावर गप्प होणं अस नाही रे म्हणणं पण मनात काय असत ते अस न बोलुन दाखवणं झालय सवयीचे असे म्हणायचे आणी परत त्याने विध्द व्हायचे नेहमीचेच झालेय..... अपेक्ष्यांच्या परिसावर घासून बघायचं आणि विन्मुख व्हायचं नेहमीचच झालय.... कळत असुन ही न कळतय अस दाखवणं माहीत असुनही मुद्दाम बोलणं टाळणं आता सवयीचे झालय...... माझ असं वागण ही सवयीच झालय तुला येणारा प्रत्येक शब्द मनातल्या मनात दडपून टाकणं अजून सवयीच व्हायचय मला....
|
Laalbhai
| |
| Monday, December 04, 2006 - 6:59 am: |
| 
|
श्रीकांत, अहो, मीही फक्त तुमच्याच कवितेला प्रतिसाद दिलाय, हेही तुमच्या लक्षात आले असेलच. गंमत अशी असते की ज्याचा त्याचा प्रत्येकाचा असा एक पिंड असतो. काहींना आत्ममग्न, दुःखगर्भ, कशाचा तरी शोध घेणार्या कविता आवडतात. काहींना प्रणयाच्या गुलूगुलू गोष्टी करणार्या कविता आवडतात. काहींना केवळ मनोरंजन करणार्या विनोदी कविता आवडतात. ज्यांना जे आवडते, त्यावर तो / ती प्रतिसाद देतात. तुमच्या कविता वेगळ्या धाटणीच्या आहेत. ज्या आयुष्याबद्दल तुम्ही लिहिले आहे, ते आयुष्य बर्याच जनांनी पाहिलेलेही नसेल कदाचित. त्यामुळे अशी कविता सगळीकडेच appreciate होत नाही. ह्यात कुणाचीही चूक नाही. कोणी योग्य नाही, कोणी अयोग्य नाही. तुम्ही लिहित चला. मला फारसे कळत नाही. पण तुमची भावना आतून आलेली आणि सच्ची आहे, असे वाटले. कवितेच्या आकृतीबंधाबद्दल जाणकारांकडून मार्गदर्शन घ्या. भरपूर वाचा आणि भरपूर जग पहा. अस्सलता तर तुमच्यात आहेच. त्याला बावनकशी बनवणे हे मेहनतीचे काम आहे. टाळ्यांची वाट पाहू नका. त्या आपोआप तुमच्या मागे येतिल. तुम्ही टाळ्यांचे गुलाम होऊ नका इतके मात्र आवर्जून सांगणे आहे. धन्यवाद.
|
Phatrya
| |
| Monday, December 04, 2006 - 7:26 am: |
| 
|
धन्यवाद. लालभाईजी माझा उद्देश तसा नव्हता, पण मला वाटतं होतं कि माझं काही चूकत तर नाही ना? म्हणजे हा पहीलाच प्रयत्न होता. असो. तुम्ही मला असचं मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.
|
>>> अपेक्ष्यांच्या परिसावर घासून बघायचं आणि विन्मुख व्हायचं कांचनगंध, कल्पना छान आहे, पण तपशिलात जरा घोटाळा झाला का? तुम्हाला बहुधा ' कसोटी'वर म्हणायचंय. पण मला या प्रतिमेने विचारात पाडलं. असं होतं खरं.
|
Asmaani
| |
| Monday, December 04, 2006 - 9:57 am: |
| 
|
घालमेल माझ्या आसुसलेल्या मिठीत चिंब भिजूनही तू कसा कोरडाच रहातोस तुझ्या स्पर्शानं झंकारत असते माझी देहवीणा तू मात्र मैफिलीपासून शेकडो मैल दूर असतोस तुझ्या श्वासागणिक उमलत असतात माझ्या स्वप्नकळ्या तू मात्र माझ्या वेडेपणाला हसत रहातोस तुझ्या प्रत्येक भेटीत वाढत रहाते माझी घालमेल अशांत मी, अतृप्त मी तू मात्र अलिप्त असतोस.
|
Peshawa
| |
| Monday, December 04, 2006 - 7:09 pm: |
| 
|
गंज चढत नाही म्हणुन एकदा हातावरती परीस घासून पाहिले... पोलाद नसलेल्या आत्मभानात मनगट साक्षात्कारी नाचले... लुबाडणारे तसे अश्रयास येणारे... जिव्हाना त्यांच्या नालस्तीचाच लाळ केवळ निर्लज्ज, गुंता झालेले, हात माझे उकलणे भोगण्यात समाधिस्त होते... माणसावर ज्यांचे प्रेम होते सर्वांगाला त्यांच्या कत्तलीचा सुगंध होता... मानेवर माझ्या अशा संताचा मोक्ष दायी सुरा हवा होता...
|
कांचनगंध, कल्पना छान आहे, पण तपशिलात जरा घोटाळा झाला का? तुम्हाला बहुधा ' कसोटी'वर म्हणायचंय>>>>नाही स्वाती.तपशीलात घोटाळा झालेला नाही. आपण म्हणता तसे कसोटीवर पण बरोबर वाटते...मला अभिप्रेत अर्थ आहे की सोन्या साठी अपेक्षांचे परिस घासले परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला कि जसे त्याचे सोने होते तसेच अपेक्षाचे आहे...त्याच्या परिसावर समोरच्याचे वागणे घासले कि अपेक्षापुर्ती होते..पण बर्याचदा विन्मुखही व्हावे लागते. अर्थात व्यक्ती सापेक्ष अर्थ भिन्न होतात. पण आपल्या अभिप्राय बद्दल धन्यवाद!!
|
तृप्ती.... पटल जलाचा सारत अलगद आले रविकर सळसळले पानन पान स्पर्शानं त्या उबदार विळखा वेढला रश्मींचा शिरशिरली नव्हाळी प्रफ़ुल्लित झाले अणुरेणु किमया अवेळी घडली अमृताचा घडा जणु रिता कळीत जाहला लाजे मिटुन पाकळी गंध उरात साठला तटतटले बंध सारे साय दाटली सुखाची टपोरली ती रसरसुन लाली उमले रक्तिम्याची श्वासनश्वास आरोहले सुगंधाच्या लहरीवर सुखात पाकळ्या विलग त्यावरी विलसे दहिवर...
|
इंद्रधनू जेव्हा.. सकाळ शुभ्र होती रात्र काळी.. या दोन रंगातच साऱ्या आयुष्याचे चित्र रेखाटत होते मी, कुठून तू आलास, स्पर्शलास मला आणि माझ्या ओंजळीत एक राजवर्खी फ़ुलपाखरू थेवून हसलास, तेव्हा, तेव्हाच.. क्षितीजावर.. इंद्रधनू चमकले होते.. -सुप्रिया
|
लोपा,मस्तच आहे चक्रीवादळ. कांचनगंधा.. सगळ्या कविता.. मस्त आहेत.. आत्ममग्न.. गंभिर. निरू,नेहमीप्रमाणे सुरेख. पेशवा.. कविता दुर्बोअध आहे पण मला जशी कळली.. तशी खूप सुरेख
|
Krishnag
| |
| Tuesday, December 05, 2006 - 5:20 am: |
| 
|
जगावं कसं!!!! जगाव कसं? जगावं वाघा सारखं फ़णा उभारल्या नागासारखं आयाळ पिंजारल्या सिंहा सारखं जलभरल्या ढगा सारखं डौलदार शृंगी मृगासारखं उंच आकाशीच्या खगा सारखं कमलदलातील भृंगासारखं वादळी उभ्या नगा सारखं नीरक्षिरी हंसासारखां अमृतोदर फणसा सारखं देव्हार्यातील धुपा सारखं धान भरल्या सुपासारखं जात्यामधल्या कण्या सारखं मंथनी मेरुमण्या सारखं झेपावत्या प्रपाता सारखं वसनी विणल्या सुता सारखं असावं स्वयंप्रकाशी काजव्यासारखं नको परप्रकाशी चंद्रा सारखं किशोर
|
Asmaani
| |
| Tuesday, December 05, 2006 - 9:55 am: |
| 
|
मृ, "इंद्रधनू" नेहमीप्रमाणेच सुंदर! short and sweet! btw तू कथा का थांबवलीस अर्ध्यावर? आणि सध्या गझलेच्या प्रांतात काही नवीन additions ?
|
Zaad
| |
| Tuesday, December 05, 2006 - 1:27 pm: |
| 
|
लोपा, कविता आवडली. पेशवा, कल्पना मस्त आहेत पण कविता नाही समजली. सुप्रिया, इंद्रधनू खासच!
|
मीनू, न्याय खतरनाक आहे गं! पेशवा, कविता छान वाट्तेय, पण नीटशी समजली नाही. कृष्णाजी, जगण्याची प्रत्येक तर्हा सुरेख! मृ, स्वप्नील आहे "इंद्रधनू"! अस्मानी, "घालमेल" अस्वस्थ करुन गेली. कांचनगंधा, " छान आहे..." खरंच छान आहे!
|
|
|