|
Prajaktad
| |
| Wednesday, December 06, 2006 - 2:43 pm: |
| 
|
सुट्ट्यांचा इतका चांगला उपयोग!फ़ारच छान उपक्रम बी..
|
Hems
| |
| Wednesday, December 06, 2006 - 3:16 pm: |
| 
|
हा असा bee आम्हाला वारंवार भेटू दे ! बी , तुझी या उपक्रमाची कल्पना आणि त्यासाठी तू दिलेला वेळ ... अगदी स्तुत्य आहे !
|
मस्तच रे, बी! पुस्तकाची निवडही सुंदरच!!
|
Sunidhee
| |
| Wednesday, December 06, 2006 - 4:27 pm: |
| 
|
खरंच रे बी, सुंदर उपक्रम आणि लिहीलेस पन सुरेख, एकदम मनापर्यन्त पोचलं. आम्हाला पण एक छान कल्पना मिळाली. लगे रहो बी भाई.
|
Yog
| |
| Wednesday, December 06, 2006 - 5:09 pm: |
| 
|
अरे वा! लगे रहो बी भाई.. 
|
Peshawa
| |
| Wednesday, December 06, 2006 - 5:28 pm: |
| 
|
आधि बिज एकले! ... मस्त रे B
|
Bee
| |
| Wednesday, December 06, 2006 - 9:13 pm: |
| 
|
वाटलं नव्हतं सर्वांना हा अनुभव इतका आवडेल म्हणून. धन्यवाद जनहो!
|
Abhi_
| |
| Wednesday, December 06, 2006 - 11:37 pm: |
| 
|
बी स्तुत्य उपक्रम. आणि छान लिहिलंयस.
|
Meenu
| |
| Thursday, December 07, 2006 - 12:48 am: |
| 
|
वा बी मस्तच उपक्रम की आणि वर्णनही छान केलं आहेस आसपासच्या परीसराचं .. वाचायलाच ईतकं छान वाटलं ऐकणार्यांना मस्तच वाटलं असेल की
|
Jhuluuk
| |
| Thursday, December 07, 2006 - 3:57 am: |
| 
|
मस्त, सुट्टी इकडे-तिकडे वाया न घालवता, स्तुत्य उपक्रम...
|
बि, अतिशय स्तुत्य उपक्रम आणि ओघवत्या शब्दात लिहिलेय.. आवडले..
|
Ajjuka
| |
| Thursday, December 07, 2006 - 6:50 am: |
| 
|
मस्त.. पण त्रोटक. स्मृतिचित्रे वाचलंय.. पण या गावाकडच्या आयाबायांच्या प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडेल. शक्य झालं तर प्रकरणांप्रमाणे किंवा खंडांप्रमाणे प्रतिक्रिया, उदगार, त्यावेळेला त्यांना आठवलेल्या ओव्या हे सगळं खूप मस्त असेल.. ते लिहून काढ आणि इथे किंवा तुला योग्य वाटेल तिथे प्रसिद्ध करत रहा.
|
Deemdu
| |
| Friday, December 08, 2006 - 1:04 am: |
| 
|
वा रे बी, अतिशय स्तुत्य उपक्रम, सुट्टी सार्थकी लावलीस तर
|
Laalbhai
| |
| Friday, December 08, 2006 - 7:47 am: |
| 
|
वा, चांगले काम केलेत आपण. अभिनंदन.
|
Ramani
| |
| Friday, December 08, 2006 - 8:38 am: |
| 
|
अज्जुकाला अनुमोदन. बी, खरोखरच स्तुत्य उपक्रम. आम्हाला आयाबायांचे अनुभव ऐकायला आवडतील. अजुन येउ द्यात त्याबद्दल.
|
मस्त रे बी. .. .. ..
|
Dineshvs
| |
| Friday, December 08, 2006 - 10:44 pm: |
| 
|
बी, छान उपक्रम केलास. आजहि त्या बायका लक्ष्मीबाईंशी नाते जोडु शकतात, हे वाचुन समाधान वाटले. विजया मेहतानी, या पुस्तकाचे दुरदर्शनसाठी सादरीकरण केले होते, त्यात त्या स्वतः आणि सुहास जोशी, यानी लक्ष्मीबाईंची भुमिका केली होती. महर्षी कर्व्यांच्या पत्नीचेहि, आत्मकथन उपलब्ध आहे. बहुतेक माझे पुराण असे नाव आहे त्याचे.
|
Shonoo
| |
| Saturday, December 09, 2006 - 11:50 pm: |
| 
|
बी माझी आई अमेरिकेत आली की दर वेळेला हट्टाने मी तिच्या कडून कवितांची पुस्तकं वाचवून घेते. आम्ही लहान असताना ती कानडी पुस्तके पण वाचून दाखवत असे. आम्हाला वाचता येत नसे पण वाचलेलं बर्यापैकी कळत असे. तिच्याकडून आम्ही कारंत, बी ची, तेजस्वी, अनंतमूर्ती, भैरप्पा वगैरेंची पुस्तकं ऐकली आहेत. कोणीतरी पुस्तक वाचून दाखवणे म्हणजे आनंदाची किंवा ऐश ची परिसीमा. त्यात पुन्हा श्रोत्यांच्या आवडीचं, त्यांच्या काळजाला भिडणारं पुस्तक निवडलस तू. परदेशातून घेऊन गेलेल्या कुठल्याही भेटवस्तूंपेक्षा तू त्या सर्वांना दिलेला तुझा वेळ अतिशय मोलाचा आहे. फुलं दिल्यावर देणार्याचे आणि घेणार्याचेही हात सुगंधित होतात तसंच काहीसं. Keep it up !
|
|
|