Sarang23
| |
| Friday, December 01, 2006 - 6:56 am: |
| 
|
हलता देखावा मी दु:खी आहे ऐसा माझाही दावा नाही हृदयाच्या अस्तित्वाचा कुठलाच पुरावा नाही! जाताना भेट घडावी ही इच्छा खरेच झाली… मी वाट पाहिली होती आला सांगावा नाही… भरभरून दिधले त्याने; जमले ते भोगत गेलो! छोट्याशा जखमा म्हटलो, केला कांगावा नाही!! वळिवाच्या सरीच होत्या; आल्या अन पडून गेल्या! मृदुगंध तेवढा उरला, कोठे ओलावा नाही! का हळवा आहे म्हणते? का निष्ठुर आहे म्हणते? मी माणुस आहे वेडे; हलता देखावा नाही! सारंग
|
लिहताना चूका होणारच ना कधीतरी... नाही असे नाही.. मी अजूनही गझलेच्या प्रांतात प्रवेश केला नाही तरी एक मत मांडावेसे वाटते...(क्रुपया करून त्यातील हस्व दिर्घ,गण,मात्रा पाहू नये हे आत्ताच नमूद करतो!!) इथे इतकं प्रतिभासामर्थ्य प्रदर्शित केलं जातं... त्याला काही तोड नाही...पण तेव्हाच आपण हे देखील लक्षात घेतले पाहीजे की आपण जे काही लिहतो ते हव्यासापोटी किंवा प्रतिस्पर्धा म्हणून अहंकारच्या ओढीने लिहीत नाही ना? जे जे काही लिहतो ते आपण शुद्ध मनानेच लिहतो ह्यात शंका नसावी. सांगायचा हेतू हाच कि कुठे चूका झाल्यात ते अवश्य सांगावे,पण तेव्हाच मूळ रचनेतील आशयचाही आदर करावा... शेवटी गण,मात्र,व्रुत्त,छंद ह्यापेक्षा माणसाच्या जवळ पोहोचनारे साहित्य श्रेष्ठ नाही काय? कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर 'अजाणता' समजून क्षमा करावी!! (तुमच्यापैकी कोणी येथे 'गझल' ह्या प्रकाराची सर्वंकष माहीती क्रमश्: लिहली तर ते आमच्या सारख्या शिकाऊ लोकांसाठी मोलाचे ठरेल.. वाट पाहतो आहे..) ---धन्यवाद!! ----मयूर.
|
वा वा सारंग... क्या बात है... शेवटचे दोन शेर खूपच आवडले... हलता देखावा नाही... क्या बात है!
|
Meenu
| |
| Friday, December 01, 2006 - 7:11 am: |
| 
|
हं सारंग खास !!!
|
Ashwini
| |
| Friday, December 01, 2006 - 9:57 am: |
| 
|
सारंग, देखावा सुरेख आहे.
|
प्रसाद, ' आरास' छान आहे. विशेषतः मतला आणि मक्ता सही! सारंगा, ' श्वासांत' हा बदल बरोब्बर आहे! ( गणितासाठीच नव्हे, मला अर्थही जास्त छान आला आता असं वाटतंय.) ' हलता देखावा' सुंदर! सगळेच शेर छान आहेत. मतला तर अप्रतिम!! ( मला स्वतःला मक्त्यात ' म्हणते' च्या जागी ' म्हणशी' आणि तिसर्या शेर मधे ' म्हटलो' च्या जागी 'म्हटले' (मी म्हटलं.. असं) जास्त बरोबर वाटलं असतं. पण हे खूपच व्यक्तीसापेक्ष आहे.)
|
मयूर, गज़लच्या व्याकरणाबद्दल इथे वाचायला मिळेल.
|
प्रसाद मस्त रे . गझल आवडलीच . सारंगा क्या बात है !!!! दिल खुष कर दिया !!! फार मस्त . सगळे शेर ... स S ग S ळे S शेर ... मयुर ... स्वातीने लिंक दिली आहेच .. बाकी भावना दुखावण्याची वगैरे चिंता नसावी .... आपल्या इथे गैरसमज होत नाहीत ...
|
सारंग, वा!! मस्त गझल.. सगळेच शेर आवडले..
|
Sarang23
| |
| Saturday, December 02, 2006 - 8:03 am: |
| 
|
मित्रांनो... धन्यवाद. मयुर, स्वातीने जी लिंक दिली आहे ती म्हणजे आदरणिय सुरेशजी भट यांची गझलेची बाराखडी... त्यांचेच सुपुत्र श्री चित्तरंजन भट यांनी मोठ्या मेहनतीने ती नेटवर उपलब्ध करून दिली आहे. आणि भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही... आपल्या येथे सर्वसाधारणपणे चर्चा तेंव्हाच सुरु होते जेंव्हा ती कविता आवडलेली असते आणि ती अधिक दर्जेदार व्हावी ही सगळ्या मित्रांची शुभेच्छा असते!!! गैरसमज होत नाहीतच आणि झाले तरी चिंता नसते. कारण मुळात गैरसमजाचे आयुष्यच अल्प असते... वैभवराव आता आपली ती वाईची गझल टाका की राव... आणि round robin प्रमाणे पुढचा turn स्वातीचा! मयुर, आणि पुढचा तुमचा समजायला हरकत नाही...! मी तर म्हणतो की देवदत्त, शलाका आदी पण चांगले प्रयत्न करतायत तर त्यांनी पण इथेच त्या गझल का टाकू नये...?
|
Manyad
| |
| Saturday, December 02, 2006 - 9:51 am: |
| 
|
chan aahe re....Sarang Kavita tujhi मनोज देशमुख
|
सारंगजी तुमच्या गझलेला तोड नाही.... शेवटचा शेर काळजात घुसला चक्क!! अप्रतिम!! स्वाती..तुम्ही पाठवलेल्या लिंक बद्द्ल धन्यवाद! बाराखडी गिरवायला सुरु करतो...
|
मयुर .. सहमत ... मी आत्ता पुन्हा सारंगचा तो शेर वाचायला आलो होतो इथे ... लवकरच तुमची गझल इथे पोस्ट होईल अशी आशा करतो ...
|
मलाही मी कुठे दिसलोच तर कळवा मलाही एवढे फसलात तर फसवा मलाही मी गुन्ह्यांचा ठेवतो कोठे पुरावा ? सज्जनांच्या सोबती बसवा मलाही काय म्हणता ? ती मला स्मरते अजूनी ? वाटते आहे खरी अफवा मलाही हे पहा मी आणले डोळ्यांत पाणी या हसा हुकमी ! जरा हसवा मलाही मी कशाला पोळल्याचे दुःख मानू ? सोसतो आहेच की वणवा मलाही श्वास थकले की बरोबर मार्ग निघतो जीवनाचा समजला चकवा मलाही शब्द काही ठेवुनी जातो पुढे मी जीव लावा त्यांस अन जगवा मलाही
|
वा वैभव... 'मलाही' सुरेख!! पहिले दोन आणि शेवटचे दोन शेर विशेष आवडले...
|
Devdattag
| |
| Monday, December 04, 2006 - 12:53 am: |
| 
|
सारंग देखावा अप्रतिम.. वैभव.. मी कशाला पोळल्याचे दुःख मानू ? सोसतो आहेच की वणवा मलाही क्या बात है..
|
वा!! वैभव... मलाही... अप्रतिम!! शेवटचे तिन्ही शेर जास्त आवडले.
|
Meenu
| |
| Monday, December 04, 2006 - 1:53 am: |
| 
|
अरे वैभवच्या गजलेला दाद द्यायला कुणाला योग्य शब्द सापडले तर सांगा मलाही तोवर .. वैभव खासच !!!
|
Devdattag
| |
| Monday, December 04, 2006 - 2:05 am: |
| 
|
मीनु.. तुला कोठून देऊ शब्द कौतुकास शब्दांची भासतेच वानवा मलाही..
|
Bairagee
| |
| Monday, December 04, 2006 - 2:18 am: |
| 
|
मी कशाला पोळल्याचे दुःख मानू ? सोसतो आहेच की वणवा मलाही वा!!! सहजसुंदर. उत्तम लहजा.
|