Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
गीता...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » गीता... « Previous Next »

Bee
Monday, December 04, 2006 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवसानंतर... नव्हे एखाद वर्ष उलटून गेले असेन मी माझा याहू चॅट उघडला. कुणाचे तरी निरोप नक्की असतील अशी मला खात्री होती. त्यात गीताचा एक निरोप वाचायला मिळाला. फ़क्त एक साधेसे 'हाय' लिहिले होते. ८-९ महिन्यांपुर्वी कधीतरी तिनी पाठवलेला तो निरोप आणि पुढे तीन टिंब टिम्ब टिंब!!! रविवारी अवचित मिळालेला निवांत साधून माझ्यासमोर जुन्या कागदपत्रांचे एक गाठोळे घेऊन मी बसलो होतो. २-३ तास जुने पत्र उपसून त्यातील एकेक पत्र वाचताना मला त्यातून आठवणींची ऊब मिळणार होती. घरी फ़ोन नसताना आलेले जुने पत्र, कविता, लेख, भेटपत्र, resume वगैरे खूप काहींचे एक गाठाळे तयार झाले होते. त्यातून एक सोनेरी कडा असलेले भेटपत्र माझ्या नजरेला पडले. चांगले ५-६ वर्षांपुर्वी गीतानीच मला हे भेटकार्ड पाठविले होते. 'अपना बाजार' मधे जाऊन खास माझ्यासाठी मराठी भेटपत्र विकत आणले अशी गीता तिच्या मुंबईच्या भाषेत 'बोलली' होती. खाली एक 'तळटिप' देखील लिहिली होती - "ह्या सर्वांचे वेगळे अर्थ काढू नकोस. तू मी फ़क्त एक सच्चे मित्र आहोत." खाली लिहिलेला दूरध्वनी क्रमांक बघुन मी लगेच गीताला फ़ोन लावला. पुर्वीच्या कंपनीमधे गीता receptiolist म्हणून काम करायची. दिसायला सुंदर आणि आवाजाला गोड होती म्हणून नव्हे तर तिच्यातील छोट्या छोट्या चांगल्या गुणांचे मला नेहमी अप्रुप वाटायचे. तिला फ़ोन लावला तेंव्हा अपेक्षा होती आता गीताचा सौम्य गोड आवाज कानी पडेल. इतक्या महिन्यांनतर तिला फ़ोन केला म्हणून तिची थोडी काकू होईल आणि मग अर्धा तास छान गप्पा होतील. अगदी फ़ोनचे कार्ड संपेपर्यन्त गप्पा व्हाव्यात म्हणून मी नविन कार्ड खरडले. फ़ोनवर गीताच्या थकलेल्या आणि क्षीण झालेल्या आईचा कण्हता आवाज मी ऐकला आणि माझ्या आनंदने भरलेल्या आवेशाचे बळ जणू निघून गेले. त्या आवाजात कमालीचे दुःख दडलेले होते. श्वासाच्या प्रत्येक लयीत मी चिरवेदना अनुभवली. मी काकूंना विचारलं -

"चाची गीता घरपर है? आप कैसी हो?"
"आप कौन, कंहासे?
"जी मै गीताका एक पुराना दोस्त. आपके घरपर भी आया हूं एकबार"
"बेटा गीता अब यहापर नही रहेती"
"तो फ़िर उसके ससूराल का नंबर दो. कब हुई उसकी शादी चाची?"
"बेटा गीताका देहांत हुवा."

काकूंचे हे वाक्य ऐकून मी माझे डोळे गच्च मिटले. खोलवर उसासे भरले. एक दोन मिनिटांनी काकूंनी देखील हळुच फ़ोन ठेवला तेही मला जाणवले. जे ऐकल ते शक्यच नाही असे मला वाटतं राहील. नंतर मी जुन्या office मधील काहींना फ़ोन लावला. सगळे जण आपल्याच विश्वास रममाण झालेले पाहून मला आणखीनच धक्का बसला. मनानी किती कोतं झालेलं आहे जग. काल परवाचा मित्रांचा समूह आज इतक्या मोठ्या घटनेला देखील सवेंदनशून्य झाला ह्याचे नवल वाटले. कुणालाच माहिती नव्हतं एकाएकी ती का गेली? असे काय झाले होते तिला की ऐन तारुण्यात हे जग सोडावे लागले? काहींनी कोण गीता असे देखील मला विचारले. ह्या प्रसंगावर प्रतिक्रिया देणारी फ़क्त एकच मैत्रीण भेटली, दिपा. म्हणाली, हे सर्व नशिबाचे खेळ आहेत.

गीता जेंव्हा पहिल्यांदाच मुलाखतीला आली त्यावेळी receptionlist च्या पदासाठी बाहेर मुलींची रांग लागली होती. अनेक नट्टापट्टा केलेल्या मुलींमधुन गीतासारख्या साध्या मुलीला घेतले गेले. गीता अमेरिकेहून १ वर्षांनी भारतात आली होती हे फ़क्त मला एकट्यालाच तिनी सांगितले होते. कारण इतरांना सांगितले तर तिची नोकरी जाईल ह्याची तिला भिती होती. त्यावेळी मुंबईचे संस्कृती माझ्यासाठी नविन होती. न कळून मी ही गोष्ट माझ्यापुर्तीच सिमित ठेवली. गीताला ह्या गोष्टीचा प्रचंड धाक वाटायचा. गीताचे लग्न व्हावे म्हणून तिच्या आईनी तिला अमेरिकेतून बोलावून घेतले होते. दिसण्यावरुन आणि चालण्याबोलण्यावरुन गीता श्रीमंत कुटुंबातील एकुलती एक कन्या वाटायची. पण मुळात ती पार्ल्याच्या एका जुन्या चाळीत राहणारी, वडील नसलेली, चार घरची कामे करुन दिवस कंठणार्‍या आईची एक अविवाहीत लेक होती. तिला एकच भाऊ होता जो वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला होता. जी बहिण अमेरिकेत होती ती खूप सुंदर सुशिल होती. एक जण तिच्या प्रेमात पडला आणि तिचे जग बदलले. गीताच्या घराचं छत टपराचं होत. आत खोलीत एक पलंग मावेल आणि चूल बसेल इतकीच जागा होती. गीताला नोकरी किती आवश्यक आहे हे मला आणि दिपाला त्यावेळी कळले आणि तिला साध्यासाध्या गोष्टींचा इतका धाक का वाटतो हेही उमजले. त्या दिवसांपासून गीता माझी चांगली मैत्रीण बनली. तिचं दुःख मला स्पर्शून गेलं. मी जेंव्हा गीताला माझी वहिनी गेली आणि बहिणीचा नवरा गेला हे सांगितले तेंव्हा ती अक्षरश रडली. भावाच्या आणि बहिणीच्या आयुष्याचे पुढे कसे होईल? माझ्या पुतणीला योग्य संस्कार आणि प्रेम मिळू शकेल का? तिची आबाळ तर होणार नाही ना? त्यावेळी हाताशी काहीही नसताना माझी ही काळजी गीतानी लगेच ओळखली आणि पदोपदी माझ्या भावविवशतेवर सांत्वनपर फ़ुंकर घालून माझे मन हलके केले. खरी मैत्री ह्यापेक्षा आणखी वेगळी असते का! ते म्हणतात ना a friend in need is the friend indeed! गीताच्या मैत्रीतून मला पदोपदी ह्या म्हणीचा प्रत्यय यायचा. जेंव्हा मला परदेशात नोकरी मिळाली तेंव्हा निम्मिशिम्मी खरेदी करुन देणारी आणि वेळ पडली तर आपल्या पर्समधले पैसे खर्च करण्याची तयारी ठेवणार्‍या गीतासारख्या व्यक्तीची मैत्री सोडताना प्रचंड दुःख झाले. मी इथे पोचल्यानंतर ऑफ़ीसमधील फ़ोन वापरुन तिने माझी चौकशी केली होती. नंतर कळले तिने तो फ़ोन स्वखर्चातून बाहेर जाऊन केला होता.

अतिशय सुदृढ बांधा असलेली गीता मी जेंव्हा २ वर्षानंतर बघितली त्यावेळी ती अर्धी देखील उरली नव्हती. त्यावेळी मी वजन कमी करते आहे हे फ़सवे कारण सांगून गीतानी विषय बदलला होता हे आज लक्षात येत आहे. गीताला हृदयाचा कसला तरी त्रास होता आणि झपाट्याने तिचे वजन उतरत गेले की एक २९ वर्षाची युवती फ़क्त ३० किलो वजनाची उरू शकते ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता. कित्येकदा गीता ऑफ़ीसमधे काम करताना चक्कर येऊन कोसळली, कधी बसमधे बेशुद्ध झाली, कधी तिला रक्ताच्या उलट्या झाल्या. हे सर्व वर्णन मला दिपानी सांगितले त्यावेळी हे फ़क्त चित्रपटामधेच घडू शकते असे वाटले. माझा जीव कळवळला. पिकले पान आज ना उद्या गळून पडणारच असतं. ह्या जगात शाश्वत अस काहीच नाही. पण असं एकाएकी एखाद हिरवगार झाड जे जगू पाहतं ते मुळासकट उखळून काळाच्या डोहात फ़ेकले जावे ही घटना सुन्न करुन जाते.

आमचे एक कवी म्हणतात,

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहीन कार्य काय
चंद्र झळकतील, सुर्य तळपतील
तारे अपुला क्रम आचरतील...

हे जरी खर असलं तरी गीता आता नाही हे दुःख खूप खोलवर उमटलं आहे. लग्नासाठी काळजी करणार्‍या अनेक मुली असतील. त्यातलीच, गीता माझ्या सर्वात जवळची मैत्रीण होती. पुढल्या जन्मी गीताचे सौभाग्य उजळून निघो अशी ज्या रुपात देव आहे त्याच्या चरणी प्रार्थना.


Ramani
Monday, December 04, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्रर्रकन काटा आला अंगावर! काळिज पीळवटुन टाकणारी गोष्ट आहे गीतेची!!
बी रडवलेत आज!!


Paragkan
Monday, December 04, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm .. .. !!!

Nalini
Wednesday, December 06, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परमेश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators