Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 01, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » काव्यधारा » कविता » Archive through December 01, 2006 « Previous Next »

Mrudgandha6
Thursday, November 30, 2006 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



"उगाच का?"

चांदण्या निजताना
तिच्या डोळ्यांतील,
स्वप्नदिवेही विझू लागले
तेव्हा..
आकाशही रडले होते..
पहाटे पहाटे
गवततृणांवर
उगाच का दव पडले होते?


Sarang23
Thursday, November 30, 2006 - 1:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!!! काय एकेक सुंदर कविता टाकल्या आहेत!

Mrudgandha6
Thursday, November 30, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वा!! छानच चाललय..स्मि,प्रिती,देवा,कंचन,कृष्ण,मीनू,सारंग,वैभव,मनिशा,मयूर, सगळेच..



Krishnag
Thursday, November 30, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि, शब्दांचे व्यसन सोडण्याची इच्छा व्हावी इतके का वाईट आहे ते??


शब्द...

बुडावे शब्दांच्या व्यसनी
जावे शब्दांच्या आहारी
भाळावे शब्दांना
भाळी लावावे शब्दांना
शब्द मनाचे सोबती
शब्द तमात सांगाती
शब्द तारु सागरात
शब्द वारु देशाटनी
शब्द सखे संकटात
शब्द हसती मोदक्षणी
शब्द मनाचा विसावा
शब्द भुरळ घालती
शब्द खड्ग समरांगणी
शब्द पुष्प प्रेमकुजनी
शब्द बोल आत्मारामाचे
वदावे ते मनोमनी
शब्द नसे हो व्यसन
विचारांचे हे वसन
लेऊनिया शब्दांना ते
येती काव्य रुपी

किशोर


Sarang23
Thursday, November 30, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाणी

आले ऊन
गेले ऊन
बगळ्यांची गाणी!

निळेशार
गार गार
पावसाचे पाणी!

धरेवर
सर्व दूर
सौंदर्याच्या खाणी!

अंगणात
पारिजात
त्याला आली नाणी!!!


सारंग


Meenu
Thursday, November 30, 2006 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ उगाच का मस्तच गं
सारंगा नाणी छान रे

कृष्णाजी काय हो एकदम ..?


Manishalimaye
Thursday, November 30, 2006 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि. किस्ना.....

मी म्हणते
एखाद तरी व्यसन
असावच माणसाला.
बरं पडत,
गरजेला,अडीनडीला कधीकाळी,
स्वत:ला त्यात बुडवुन टाकायला.
आणि काही काळ का होईना,
या अशा आपमतलबी जगाला विसरायला
आणि आपल्यापुरत तरी
हवेत तरंगायला.

मग दुसरं कुठलं तरी असण्यापेक्षा
ते शब्दांचेच क असु नये.
बरं पडत
आपल आपल्यालाच व्यक्त व्हायला.
अणि
समोरच्यालाही आपल्याला समजुन घ्यायला.

[ही कविता नाहिये हं त्यामुळे ती कविता म्हणुन वाचु नये.]






Mayurlankeshwar
Thursday, November 30, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

----------------------मी येण्यापूर्वी------------
------------------------------------------
मी येण्यापूर्वी-
उंबरठ्यावरची काजळ धूळ पुसून घे,
छपरातून फाटलेल्या चंद्रावर स्वगत हसून घे!

मी येण्यापूर्वी-
मातीचा स्पर्श ओल्या गंधात भिजवून ठेव,
पापण्यांच्या महीरपीवरती प्रतिक्षेचे तोरण सजवून ठेव!

मी येण्यापूर्वी-
चार गूजगोष्टी हलकेच आभाळाशी बोलून घे,
जरासे ह्या अनादी-अनंत पोकळीमध्ये आयुष्य तोलून घे!

मी येण्यापूर्वी-
कालचीच विझलेली चूल आज पुन्हा रांधून ठेव,
आणि हो!तूझ्या अंधारल्या पाठीवर ढाल-तलवार बांधून ठेव!

-------------मयूर---------------

Smi_dod
Thursday, November 30, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदपक्षी!!!!

एक झाड अंगणी माझ्या
बहरले...सुखाने डवरले
काय झाले विचारले
तर ओळख बघु तुच म्हणुन
गालातल्या गालात हसलें
आला एक आनंदपक्षी
गुणगुणला मस्त
गिरकी घेउन गेला
त्या गिरकीने बदललो मी ही
टप टप बरसल्या धारा सुखाच्या
आनंदाने मी न्हाउन निघलो
जीवनरस सगळा,आकंठ घेउन
मग असा डवरलो
ये तु पण भिजायला..
आनंदात त्या चिंब व्ह्यायला
बघ मग कसे सुख टपटपेल
तुला ही बदलेल....
सुखाच्या अंगणात
आनंदाचे झाड मोहरेल

स्मि



R_joshi
Thursday, November 30, 2006 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रिश 'शब्द वर्णन' अचुक जमलय.
स्मि, मयुर तुम्हि ही छान कविता लिहिल्यात:-)


Phatrya
Thursday, November 30, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोटाची खळगी भरण्यसाठी
कायी बी करावं लागतं.
तुमच्या सारख्या श्रीमंतांना म्हाईत नाय
पण आमच्या सारख्यालाच मरावं लागतं.

बा आजारी होता, गोळ्या औषधासाठी पैसा पाहिजेल होता,
नायतर घरला "यम" येणार व्हता.
मायनं मंगळ्-सुत्रासगट सम्दा दाग्-दागिना
त्या सावकराकडे गहान ठेवला व्हता.
तरी बी यम बाला संग नेतच व्हता.

पोटाची खळगी भरण्यसाठी
कायी बी करावं लागतं.

म्या लाकडं गोळा केली, बाला जाळण्यासाठी,
गसतेलच नव्हतं आग लावण्यासाठी.
डोळ्यातल्याच पाण्याचं गसतेल केलं मायनं,
हंबरड्याच्या ठिणगी संग पेट घेतला चितेनं.

आता घर मलाच सांभाळायंच व्हतं,
कोठतरी काहीतरी काम करायचंच व्हतं.

त्या सावकराकडे करत व्होतं चाकरी,
अन एका टायमाला मिळायची घरला भाकरी.

दुसर्‍या टायमाचं काय कायी बी खायचं,
घरला आलेल्या भिकार्‍याला कोणी कायी बी द्यायचं.

पोटाची खळगी भरण्यसाठी
कायी बी करावं लागतं.

भुकपायी त्या सावकराच्या कुत्र्याची बिसकिटं म्या खाल्ली व्हती,
तव्वा त्या सावकरानं मज्या कंबरड्यात जोराची लाथ मारली व्हती.
अन म्हणाला वरुन,
"हरामख़ोरा तुझ्या बानं बी मज्या ईथं कुत्र्यावणी चाकरी केली व्हती"

मज्या अंगातलं रगत सळसळत व्हतं
"म्या मायची शपत घेतली, बाला आठवलं.
अन त्या सावकराला गाडावं वाटलं."

बाचं आठवलं, बा म्हणायचा
"आरं लेकरा,आपण गरीब माणसांनी
कष्ट करुन स्वतःचा देह पिळायचा.
आलेला राग शांत करुन,
मुगावनी गिळायचा."

"आरं रोटी देणार्‍या धनीवर हात उगारायचा नाय,
मंग त्यानं आपल्याला कितीबी मारले तरी चालतील पाय."

पोटाची खळगी भरण्यसाठी
कायी बी करावं लागतं.
तुमच्या सारख्या श्रीमंतांना म्हाईत नाय
पण आमच्या सारख्यालाच मरावं लागतं.



Amruta_w
Thursday, November 30, 2006 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पर्श

स्पर्शताच तु तनाला
मनही वेडे खुलते,
मिळता नजरेला नजर
रोमरोम फ़ुलते..
उमलते हसु ओठी
पापणी ती लाजते,
येता जवळी तु
आस खुळी नाचते..
तुझ्या डोळ्यांतील काजव्यांत
तनमन उजळते,
मिणमिणत्या प्रकाशात
मिठी घट्ट होते...
हृदयाची धडधड
मग बोलू लागते,
मनांतील गुपिते
उलगडु लागते..
गरम श्वासात तुझ्या
मी स्वताला विसरते,
तुझ्या बाहुच्या विळख्यात
मी संपुर्ण विरघळते..
मी संपुर्ण विरघळते...


Swaatee_ambole
Thursday, November 30, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, ' कधी मागणारे.. कधी त्यागणारे..' छान.
मृद्गंधा, ' उगाच का..?' छान आहे.


Lopamudraa
Thursday, November 30, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ.. उगाच का?....
मस्तय... आज काल.. उगाच वेगळ्या वाटतहेत मला तुझ्या कविता.....
स्मिता चे आंनदाचे झाड... पण छाने... !!!!


Mayurlankeshwar
Thursday, November 30, 2006 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

--------नि:शब्द-------------
----------------------------
थेंब...थेंब नजर ओली
आभाळ जरासे भिजले,
श्वासात गंध कस्तुरीचा
प्राण चंदनास्तव झिजले.

खोल...खोल गर्भात तुझ्या
शब्दांना अर्थ मिळाला,
मावळ्तीचे पंख लावून
उदयासाठी सूर्य जळाला.

वाट...वाट नि:शब्द उभी
पाऊल कुठेतरी अडखळ्ले,
डाग पाहूनी चंद्रावरचा
काळ्जात चांदणे हळहळ्ले.
---------------मयूर्-----------


Laalbhai
Friday, December 01, 2006 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीकांत,

कविता, कथा हा माझा प्रांत नाही पण काहीबाही वाचत असतो.

आजकाल संताप व्यक्त करण्यासाठी अपशब्दांचा वापर करण्याची पद्धत रूढ झाली आहे असे कोणत्यातरी लेखात महिन्यापूर्वी वाचले. तुमची कविता वाचून ते खोटे होते की काय असे मला वाटले.

कोणत्याही अपशब्दांचा वापर न करता मागासलेल्यांची मनोवृती आणि दशा यांचे फार यथास्थित वर्णन तुम्ही केले आहेत. यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.

होतोय तो अन्याय आहे, ह्याचीच जाणीव कित्येकदा नसते. असो.

कविता छानच आहे. अभिनंदन.


Mrudgandha6
Friday, December 01, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


धन्यवाद लोपा,स्वाती,मीनू..

बाकी आजकाल इथे खूपच बहर आलेला दिसतोय,वसंत अजून लांब आहे तरी????.. छन आहे.

सारंग,नाणी मस्तच आहे.

स्मि,अनंद्पक्षी सुरेख आहे.

मयुर.. निशब्द.. केवळ अप्रतिम आहे
डाग पाहूनी चंद्रावरचा
काळ्जात चांदणे हळहळ्ले.
वा!!
मी येण्यापुर्वी छान

कृष्णा,.. शब्द खरच सुरेख.

अमृता.स्पर्श,छाने..




Kanchangandha
Friday, December 01, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रश्न.....

त्याला नेहमी प्रश्न असतात
मला उत्तरे हवी असतात
तो प्रश्नानी प्रश्न टाळतो
प्रतिप्रश्नाच्या जाळ्यात मला अडकवतो
उत्तरांच्या प्रतिक्षेत प्रश्नच संपुन जातात
प्रश्नचिन्हाचा गुंता मागे राहतो
त्यात अजून अजून गुंतत जाते
उत्तरांचा गुंता सोडवता प्रश्नच विसरून जाते
उत्तरांचे कोडे मग प्रश्न आठवित बसतात
प्रश्नांचे कोडे उत्तरांना पडते
कधी कधी प्रश्न एकदम उत्तर देउन जाते
आणि नव्या प्रश्नाला जन्म देते
प्रश्नांचे फ़ेर धरणे मात्र चालुच असते
प्रश्नोत्तराच्या भोवर्‍यात मी फ़िरत रहाते
चक्र हे असे कायम चालु असते
उत्तरांच्या प्रतिक्षेत ऋतु जागत असतात
प्रश्नाची युगे सरतच नसतात....


Mayurlankeshwar
Friday, December 01, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कांचन..'प्रश्न' आणि कशाला'उत्तर'
म्हणायचे तेच मला कळेनासे झाले आहे!!!
'प्रश्नोत्तरां'च्या शब्दात एवढे गुंतत गेलो
की काही विचारू नका!
शेवटच्या ओळी ख-या अर्थाने 'ईटर्नल' आहेत!
प्रश्नोत्तराच्या भोवर्‍यात मी फ़िरत रहाते
चक्र हे असे कायम चालु असते
उत्तरांच्या प्रतिक्षेत ऋतु जागत असतात
प्रश्नाची युगे सरतच नसतात....


Kanchangandha
Friday, December 01, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाकोळ....


कधी कधी अचानक ढग दाटुन येतात
बरसेल असे वाटत असते
पण सरी तश्याच दाटुन रहातात
बरसून काय उपयोग
हे त्यांनाही जाणवते
दाटुन आलेले ढग तसेच माघारी फ़िरतात
हळवे होउन, आतल्या आत बरसतात
वेदनेच्या विजा कडाडत असतात
पण....
सुखावत नसतात त्या अवनीला
उमलवत नसतात सृजनाला
बरसल्या का नाहीत हे माहीत असते
त्या मेघालाही आणि तृषार्त मृदेलाही
दोघेही अबोल होउन..
साहतात त्याउरीच्या जखमांना
तगमग सारी झाकाळते आसमंत
तो झाकोळ मग तसाच रहातो
नव्या सुर्याची वाट पहातो....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators