|
"द्वंद्व" रोज कातरवेळी एक दाटते हुरहुर, मनाला नाही शांती विचारांचे माजते काहुर रोज विचारतात सगेळे, "झाली का खरेदी??? कुठे करणार शॉपिंग???" चेहर्यावर उसनं हसु आणुन उत्तरं देउन थकलेय, आत्ता या प्रकाराला मीच विटलेय... कित्ति हसावं आणि काय कराव??? मनातली उर्मी कोणाला सांगावी??? गळा दाटुन आला तरी, चेहर्यावरचे हसु पुसले जाणार नाही याची खात्री घेतेय दिवसातुन कैक वेळ मनाला समजावतेय... पण कस शक्य होईल हे सगळं विसरण??? एवढ्या वर्शांची सवय इतक्या लवकर मोडणं?? लहानपणि पप्पांच्या कुशीत झोपुन अनुभवलेली आश्वासकता आईच्या मंडीवर झोपुन बघितलेली सिरियल रोज रोज टीव्हीवरुन भावाशी केलेल भांडण हे सगळ सोडुन जायचय मला पप्पांशी केलेली भांडणं आईने रोज तयार दिलेला डबा नेहमी रक्षाबंधन, भाउबीजेला भावने ताम्हणात ठेवलेला १ रुपया... सगळं सगळं डोळ्यासमोरुन झरझर जातय.... काहीतरी निसटतय याची जाणिव फ़ार प्रकर्षाने होतेय... का रोज एवढ्या हायपरली वागतेय मी??? घरी जाउन उगाच सगळ्यांशी भांडतेय मी??? नाही, असह्य होतय हे मला दोन महिन्यांनी जगच बदलेल माझं "उठ रुपु, बघ कित्ती वाजले" म्हणुन रोज सकाळी कोण उठवणार???? संध्याकाळी रिमोटवरुन कोणशी भांडणार??? रोज नवनवीन पदार्थांच्या फ़र्माईशी कोणाला देणार?? अस वाटत सगळ सोडुन परत लहान व्हावं, पुर्वीसारख़ं घरात बागडत रहावं कुठुन मिळणार मला पप्पांच्या प्रेमाची सावली रोज आईच्या सुरक्षित पंखांची उब??? असंख्य प्रश्न आणि अगणित कोडी सुखाचे क्षण आणि वादळचं थैमान ह्याचे "द्वंद्व" चालु आहे सध्या माझ्या अंतर्मनात.... भिती वाटते फ़क्त एकाच गोष्टिची ह्या "द्वंद्वात" त्यांच्यासमोर मुखवटा गळुन न पडावा... रुप
|
Princess
| |
| Saturday, December 02, 2006 - 8:57 am: |
| 
|
वाह वाह वाह वाह.... आवडले... लग्न ठरले होते तेव्हा असेच झाले होते माझे
|
Krups
| |
| Monday, December 04, 2006 - 5:13 am: |
| 
|
छान लिहिल आहेस ...
|
पुनम, कृपा वाचल्याबद्दल आभार...
|
रुपाली मस्तच ग. मनाची हुरहुर छान रेखाटली आहेस.
|
Shivam
| |
| Friday, December 08, 2006 - 3:21 am: |
| 
|
रुप, "परीवर्तण हा निसर्गाचा नियम आहे." अन तो प्रत्येकाला लागू आहे. फार छान लिहिलं आहेस.
|
Mrdmahesh
| |
| Friday, December 08, 2006 - 3:52 am: |
| 
|
बेश्टच गो रुप्स, तुज्या मनाची हुरहूर मस्तच उतरली हा... प्रत्येक चेडूक तेचा लगीन ठरल्यार exactly ह्याच वाटता. पण माकाव काय वाटतां की लगीन जाल्यार काही दिसांनीच परत हय येवन तुजा नवजीवन कसो सुंदर हा याचो चित्र तुया रेखाटशीत.. बग... तुजा ह्या "द्वंद्व" जावन "प्रेम" येवो हीच तुका शुभेच्छा.. रे शिवमा तुजा लगीन जाल्यार तुज्यात कसलो परिवर्तन जाला? तुया सासरी रवूक गेलंस काय रे?
|
|
|