|
कल्पना फारच अप्रतिम... कविता आवडली... मनापासून, मृदगन्धा.....
|
Shyamli
| |
| Saturday, November 25, 2006 - 6:08 am: |
| 
|
सुमती, परत एक छान प्रवास...... मृ,........ कांचनगंधा, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारख वाटतय आवड्ल "सहजीवन"
|
Athak
| |
| Saturday, November 25, 2006 - 6:26 am: |
| 
|
wowwww नक्की काहीतरी जादु आहे मार्गशीर्षात अपुन तो बेहोष होगेला बाप
|
धन्यवाद,स्मि,सुमतिताई,श्यामलि, कंचनगंध, आयुष्य व्यापून दशांगुळे राहिलेलं वेगवेगळ्या घरट्यात राहुन एकाच खोप्यात जपलेलं ..क्या बात है!!! सुमतीताई, माझं गाव... माझी नदी... माझं पाणी सापडतील का शिंपल्यात.... मोत्यांची दाणी कधीतरी पाण्याच्या प्रवाहानं दाटलेलं ..वा!!
|
Asmaani
| |
| Saturday, November 25, 2006 - 9:58 am: |
| 
|
मृ, खूप सुंदर! नेहमीप्रमाणेच, काळजाला भिडणारी कविता...
|
Zaad
| |
| Sunday, November 26, 2006 - 2:57 pm: |
| 
|
मंडळी खूप दिवसांनी आलो आणि अधाशा सारख्या सगळ्या कविता वाचून काढल्या. गुलमोहराची सर्वात सुंदर आणि सर्वात जास्त बहरलेली डहाळी म्हणजे गेल्या महिन्यातल्या कविता असतील! वैभव, प्रसाद आणि सारंग तुमच्या गझला तर आहा! सगळ्याच कविता अतिशय अप्रतिम!
|
Jo_s
| |
| Monday, November 27, 2006 - 4:15 am: |
| 
|
अश्रूंचे मुखवटे आता सगळीच मनं, डोळे इतके आटलेत, म्हणून तर अश्रू स्पेशल मुखवटे आम्ही बनवलेत घेता का घेता? पाहिजे तो मिळेल प्रसंगानुरूप, हवे तेवढेच, अश्रू तो ढाळेल हो, हल्ली त्यालाही पैसे पडतात फायदा नसेल तर तिथे अश्रूही अडतात सगळ्या प्रकारचे अश्रू आमचेकडे मिळतील त्याच्यासाठी त्यांचे रिमोटही मिळतील वैयक्तिक दु:खासाठी घळाघळा, आसपासच्यांसाठी थोडे कमी ढाळा सामाजीक प्रश्ण? डोळे, फक्त पाणावतील लुच्चे असाल तर मगरीचेही मिळतील अजूनही आहे बरीच व्हरायटी फक्त तुम्ही मागायची खोटी बालकांच्या डोळ्यांतून म्हणे पडतात निर्मळ मोती अशीही एक डिमांड पूर्वी आली होती माफ करा, आमचेकडे तेवढीच कमी आहे हां पण खात्री बाळगा बाकी साऱ्या्ची मात्र हमी आहे बाकी साऱ्या्ची मात्र हमी आहे सुधीर
|
Smi_dod
| |
| Monday, November 27, 2006 - 4:21 am: |
| 
|
व्वा सुधीर.... अगदी सुरेख..सहि..
|
Krishnag
| |
| Monday, November 27, 2006 - 5:45 am: |
| 
|
स्पर्श!!! स्पर्श असा.... जो मोरपिसासारखा दुधाच्या सायी सारखा पिंपळपानी जाळी सारखा शरदाच्या चांदण्या सारखा शिशिरातल्या उन्हासारखा कोकिळेच्या कुजना सारखा मृगाच्या सरी सारखा मातीच्या गंधा सारखा हिरवळीच्या गालीच्या सारखा त्या स्पर्शाची भाषा सारी स्पर्शानेच सांगायची स्पर्शातूनच वाचायची अन स्पर्शातूनच उमगायची स्पर्शानीच लिहायचे अन, स्पर्शानेच चितारायचे काव्य असो वा शिल्प स्पर्शानीच घडवायचे स्पर्शानीच अनुभवायचे स्पर्शानीच प्रतिसादायचे स्पर्शाचीच स्पंदने सारी स्पर्शानीच झेलायचे स्पर्शानीच हुंकारायाचे स्पर्शानीच वदायचे स्पर्शातच मिसळून स्पर्शविहिन व्हायचे किशोर
|
मैत्र....... मैत्र म्हणजे काय विचार मनात आले एकत्र खाल्लेल्या चिंचा,बोरे,पतंगाची मांजा दोरे एकत्र खाल्लेली बोलणी,भेंड्या खेळता गायलेली गाणी घातलेले वाद,झालेली भांडणे... डोळ्यातील आसवांनी भिजलेली मने एकत्र बघितलेली स्वप्ने,त्या स्वप्नात रमून जाणे न होता मना सारखे,मनोमन खट्टु होणे मग पुसलेले आसु,घातलेली समजूत,दिलेला दिलासा सार्या क्षणांचा कॅलिडोस्कोप फ़िरला आणि वाद घालायचा हक्क बजावणारी... रडताना हक्काचा खांदा असणारी धीर देणारी,प्रसंगी दटावणारी दुःखात आणि सुखात,पहिल्यान्दा आठवणारी हिरवळी आणि वाळवंटे,दोन्हीतही सोबत असणारी भांडल्यावरही माझेच चुकले कदाचित..म्हणणारी एकमेकांच्या सुखासाठी,धडपडणारी भावना असलेली भरभरून असणारी सुखाची ओंजळ म्हणजे मैत्र...
|
Meenu
| |
| Tuesday, November 28, 2006 - 12:44 am: |
| 
|
आला दिवस जगत गेले .. आला दिवस जगत गेले, जगते आहे .. दिल्या दिवसासाठी तुझे आभार ..! कशासाठी ..? माझे काम मीही चोख करत गेले, करते आहे आला दिवस जगत गेले, जगते आहे .. वसंत आला म्हणुनही फुलवली कळी कधी शिशिर आला म्हणुनही पानं गाळली कधी आला दिवस जगत गेले, जगते आहे .. कुठल्याही रंगाचा नाही लावुन घेतला लळा आला तर जगुन टाकला दिवस, जरी काळा आला दिवस जगत गेले, जगते आहे .. कीती काळे अन सोनेरी याचा नाही हिशेब केला असो काळा की सोनेरी जाणार होता, गेला आला दिवस जगत गेले, जगते आहे .. गेल्या दिवसांना मनापासुन निरोप दिला थांबवण्याचा त्यांना कधी मी प्रयत्न केला ..? आला दिवस जगत गेले, जगते आहे .. दिल्या दिवसासाठी तुझे आभार ..! कशासाठी ..? माझे काम मीही चोख करत गेले, करते आहे आला दिवस जगत गेले, जगते आहे ..
|
Jo_s
| |
| Tuesday, November 28, 2006 - 12:57 am: |
| 
|
Smita thanks Krishnag, Kanchangandha, Meenu mastaacha
|
तू निघुन गेलीस, मला मागे ठेवुन. पण गंम्मत माहित्ये का? तुला कळलच नव्हत, की मला फसवुन तुला जाता यायचंच नाही ते! कारण तुझ्याच रांगेत मीही होते उभी तुझ्याच बसमधे चढण्यासाठी. तुला वाटत राहीलं, मी बाहेरुनच तुझ्याशी बोलत्येय. अश्रुंच्या पडद्यामुळे दिसत नव्हतेच तुला मी. पण नाही ग, तुझ्या मागच्या सिटवर मीच तर होते बसलेली. स्टॉपवर पटकन उतरुन गेलीस. हात हलवुन निरोप द्यायचही भान नाही उरल. तुला तर माझ्या तिथल्या अस्तित्वाची जाणिवच नव्हती. आणि मी तर माझ भानच हरवुन बसले होते. एकमेकींकडे मनं मोकळी करता करता, कधीतरी जाणवायला लागलं तू मोकळी होत्येस, पण मी? मी मात्र अचानक घुसमटायला लागले, तुला जपता जपता. मला मग मोकळ व्हायची संधीच दिली नाहीस ग. आणि आज आत्ता अशी उतरुन गेलीस तुझ्यामगे मीही तिथेच चढले आहे, हे न जाणवताच. लवकरच माझाही स्टॉप येतोय आणि आता, मीही आहे उतरण्याच्या तयारीत. गंम्मत आहे नाही! वेगवेगळ्या थांब्यांवर उतरुनही, शेवटी भेटणार आहोत लवकरच, एकाच ठिकाणी! मला अपेक्षित आणि तुला अगदीच अनपेक्षित! ,
|
सुधीर ... कांचंनगंधा .. मीनू .. सही चाललंय .. क्रिश ... शेवटची ओळ फार आवडली ... मनिषा .. गंम्मत आहे नाही! वेगवेगळ्या थांब्यांवर उतरुनही, शेवटी भेटणार आहोत लवकरच, एकाच ठिकाणी! मला अपेक्षित आणि तुला अगदीच अनपेक्षित! , खास !!!
|
Jayavi
| |
| Tuesday, November 28, 2006 - 3:21 am: |
| 
|
मनिषा......... अगं काय लिहिली आहेस गं कविता.......... अक्षरश्: काटा आला माझ्या अंगावर!
|
DO YOU KNOW THIS ? तुम्हाला हे माहीत आहे का दोन डोळ्यांत एक समुद्र मावतो फक्त रोज कुणीतरी .... खळाळती लाट व्हायला हवं नाही ? बरं हे माहीत आहे ? एका मनात आणखी एक मन मावतं फक्त कुणीतरी .... तुमचं अंतर्मन व्हायला हवं ... असो ... मग हे ही माहीत नसेलच .... एका शब्दात एक आख्खी कविता मावते फक्त ... तो शब्द कुणाचंतरी नाव असायला हवं आणि अर्थातच कविता लिहायला बसलं की ते माणूस सुचायला हवं !!!!!!!!
|
Smi_dod
| |
| Tuesday, November 28, 2006 - 3:36 am: |
| 
|
निवडुंग वरवर काट्यांनी भरलेला निवडुंग बघितलाय कधी फ़क़्त काटेच जाणवले ना तुम्हाला त्या काट्यांच्या आवरणाखाली असतो मृदु गर...... जीवनरसानी ओतप्रोत भरलेला कितीहि शुष्कतेत, कितीहि प्रखर उन्हात चिवट जिजीविषेने तग धरून राहिलेला नेहमी नाही पण कधीतरी येते त्या निवडुंगालाही फ़ुल नाजुक,सुंदर बहरतो तो ही अंगोपांगी असणार्या काट्यांचा विसर पडुन जाणवले हे सौंदर्य काट्यांमधले अनुभवली कधी त्यातल्या गराची स्निग्धता उपेक्षित नसतो तो.... तो तर असतो वाळवंटाचा मुकुट्मणी त्या रुक्ष वाळवंटाचे वैभव.... निवडुंग असतो तुम्हा आम्हासाठी वाळवंटासाठी नाही... स्मि...
|
छान मांडल आहेस मनिषा.
|
वैभव, >>एका शब्दात एक आख्खी कविता मावते फक्त ... तो शब्द कुणाचंतरी नाव असायला हवं आणि अर्थातच कविता लिहायला बसलं की ते माणूस सुचायला हवं !!!!!!!! << एका शब्दात कविता मावते की नाही कोणास ठाऊक? पण निशब्दतेत मात्र कितीतरी हळुवार कविता सहजच सामावुन जातात, हे मात्र नक्कि माहीती आहे मला! शब्दाविना कविता असते, फक्त ती वाचता यायला हवी, हे मात्र नक्कि माहीती आहे मला आणि हेही ठाऊक आहे मला, की तिला दादही तशीच देता यायला हवी, केवळ निशब्द!!!!!!!
|
वैभव (सहीच आहे), सुधीर, मनिषा तुमच्या कविता मस्तच... स्मि... तुझी कविता अगदी मनाला भिडली. खरच आपण फ़क्त बाह्यांगाचाच विचार करतो, अंतर्मनात डोकावुन कोणी बघितलय????
|
|
|