अरे वा! गज़लसाठी स्वतंत्र विभाग? मग आता राहिलेले अभिप्राय इथेच देते. वैभव, ' कबीर' मधून अजून बाहेर पडू शकले नाहीये. पुन्हा भेट होईल तेव्हा पायावर डोकं ठेवावं म्हणते. कबीराने मराठीत लिहीलं असतं तर ते असंच असतं नक्की. सहसा गज़ल चं सौंदर्य चमकदार कल्पना / शब्दरचनेत दिसतं. मन आणि बुद्धी दोन्हीसाठी ' खाद्य' असतं गज़लेत. पण हिची झळाळी त्याच्या पलिकडची, खूप निराळ्या पातळीवरची आहे. माझं हे खूप आवडतं वृत्त म्हणून त्यात लिहायची विनंती केली होती. ही गज़ल वाचल्यावर असं वाटतंय की आज या वृत्ताचं सार्थक झालं. कुठलाच शेर ' हा आवडला' म्हणून वेगळा काढणं अशक्य आहे, सगळेच दैवी (divine ) आहेत. ' असे कसे जाणले न मुक्ती सुखासुखीही मिळून जाते सहज तुझे नाव घेतले श्वास श्वास हा बेफिकीर झाला..' या ' सुखासुखी' आणि 'सहज' वरून मी माझ्या सगळ्या कविता ओवाळून टाकायला तयार आहे. त्यांचा अर्थ आणि placement जी काही साधली आहे..!! ते ' सुख' आणि ती ' सहजता' आणि त्यांची किंमत ' जावे त्याच्या वंशा' म्हणतात तेव्हाच कळणारी आहे. आणि मक्त्याबद्दल बोलायचा तर मला धीरच होत नाही. Let it be left unsaid.
|
Yog
| |
| Tuesday, November 21, 2006 - 3:39 pm: |
| 
|
अरे वा! गझलेला अस मानाचं वेगळ स्थान दिल हे बाकी ब्येश केल.. 
|
सारंगा, तुला सूर गवसलेला दिसतोय. श्वापद आवडली. लाज होती लक्तराने झाकलेली अन चढ्या बोलीत त्यांचे भाव होते.. आणि एकट्याने चालताना जाणले मी काळजाने सोडलेले ठाव होते.. हे विशेष आवडले. प्रसाद, चांगली आहे गज़ल. विशेषतः पहिले दोन शेर सहजसुंदर.
|
Chinnu
| |
| Tuesday, November 21, 2006 - 5:15 pm: |
| 
|
वैभवा, तुला काही प्रतिक्रिया देऊच शकत नाही मी. माझे शब्दच थिटे पडले रे. या विभागात लिहितांना, वैभव, प्रसाद, तुशार आणि स्वाती आणि इतर गझल लिहीणार्या आणि लिहु पाहणार्या सर्वांनी असेच विवेचन केले तर आम्हा वाचकांना थोडे ज्ञान मिळेल आणि तुम्हा लोकांना ज्ञानदानाचे पुण्य मिळेल. तेव्हा होउन जावु द्या!
|
Sarang23
| |
| Wednesday, November 22, 2006 - 12:16 am: |
| 
|
ते व्यथा ऐकण्या रात्रभर जागले ते! कथासार ऐकून रागावले ते... तसा मीहि होतो निमंत्रीत त्यांचा उपेक्षीत आल्यापरी वागले ते! असा कोणता खास पक्षी पळाला? उभे रानही पेटवू लागले ते! म्हणालो न मी कागदी वाघ त्यांना! कशाने बरे काल संतापले ते? पुन्हा वार पाठीवरी झेलण्याला; गुलामापरी आजही वाकले ते! (भुजंगप्रयात) सारंग
|
Yog
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:30 am: |
| 
|
क्या बात है! शेवटचा शेर आवश्यक आहे का? विरोधाभास फ़क्त त्यातूनच व्यक्त होत आहे म्हणून असेल कदाचित?
|
वा!! सारंग, "तसा मीहि होतो निमंत्रीत त्यांचा उपेक्षीत आल्यापरी वागले ते! " ..... "पांडवांच्या सभेत कर्ण गेल्यावर असेच होते.." असे एकदा माझे गुरु म्हणाले होते.. अर्थात याचा अर्थ खूप खोल आहे.लक्षात येतोय का बघ.
|
स्वाती ... humbled and speechless ................................... सारंगा ... मस्त रे ... तसा मीहि त्यांचा निमंत्रीत होतो ... वाह वाह !! भेटू .
|
वा सारंग शेरांमधल्या कल्पना छानच आहेत... मात्र दुसर्या शेरात मीही, निमंत्रित आणि उपेक्षित या शब्दांच्या वेलांट्या भुजंगप्रयातासाठी बदलल्या आहेत ते जरा खटकत आहे... अजून एक म्हणजे तिसर्या शेरात 'रानही' पेटवू लागले च्या ठिकाणी काही वेगळी रचना करता येईल का? (रानही पेटवत आहेत म्हणजे अजून इतरही काही पेटवत आहेत का?) बाकी मस्त!
|
Sarang23
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:09 am: |
| 
|
धन्यवाद मंडळी, प्रसाद खरं आहे, मलाही ते लघू गुरूच जरा खटकतय... पण शेवटी "आपण सगळे अर्थासाठी " (मृ हे तुझ्यासाठी पण उत्तर समज...) आणि... रान आणि पक्षीची सांगड घालायची आहे म्हणून...
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:52 pm: |
| 
|
सारंग, कदाचित उभे असलेले म्हणजे अजुन जिवंत असलेले रान पेटवणे अपेक्षित असावे. आडवे म्हणजे वाळलेले रान, पेटवले तर काहि नुकसान नाही, हो ना ?
|
Sarang23
| |
| Thursday, November 23, 2006 - 12:01 am: |
| 
|
होय दिनेशदा, रान उभे असलेले म्हणजे जिवंत हे तर खरच. प्रसाद, रान आणि पक्षी या नुस्त्या उपमा आहेत...त्यामुळे ते नुस्त रान घ्यायचं की आणखी काही अर्थ काढायचे हे ज्याचे त्याचे अनुभव ठरवतील... हो ना!
|
Phatakal
| |
| Thursday, November 23, 2006 - 5:55 am: |
| 
|
ग़ज़लेसाठि नवा विभाग, मानाचं स्थान. खरंच बाकी ब्येश केल.. :-) ग़ज़लवाल्यांनू आता गमजा कर. वैभव ग़ज़ल झ्याक. तूझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. स्वाति कबिरानं असं लिहिलं असतं का ते माहित नाही पण सुरेश भटांनी असं नक्कीच लिहिलं असतं-------------जसे तूझे नाव घेतले मी तुझ्या दयेचा सुगंध आला अजुनही अंतरात माझ्या फुले तुझा मोगरा मुहंमद सारंग पक्षाचा शेर सवाशेर आहे.
|
आजकाल मी मनातल्या मनात बोलतो! काय वाटते मला कशास कोण ऐकतो? आजकाल मी मनातल्या मनात बोलतो! रंग वेदनांस देत राहतो नवे नवे शेवटी मनात मी सुखेच सर्व रेखतो मानले ललाटरेष खोडता न येतसे चौकटी हव्या तशाच पत्रिकेत मांडतो माझिया मनात काय, ऐक एकदातरी... जीवना तुझ्यासवे कधीकधीच भांडतो... रोज रोज मी भिकार, सावकार रोज तू डाव जाणतो तुझा, तरी मजेत खेळतो!
|
Sarang23
| |
| Friday, November 24, 2006 - 1:37 am: |
| 
|
वा!!! माझिया मनात काय, ऐक एकदातरी... जीवना तुझ्यासवे कधीकधीच भांडतो... वा! वा!! रोज रोज मी भिकार, सावकार रोज तू डाव जाणतो तुझा, तरी मजेत खेळतो! काय सहज मक्ता! छान गझल...!
|
Meenu
| |
| Friday, November 24, 2006 - 5:30 am: |
| 
|
वा प्रसाद सुंदरच रे .. जीवना तुझ्यासवे कधीकधीच भांडतो वा क्या बात है !!!
|
सारंगा, ' ते' छान आहे. मक्ता सही! प्रसाद, आवडली गज़ल. सगळेच शेर.
|
प्रसाद ... सही .....
|
नाद लांघली असतील क्षितिजे आपल्या नादात मी दगड मैलांचे कधी ना ठेवले लक्षात मी हे खरे की सूर्यवंशी जन्म नाही लाभला लावतो कोठे परंतू काजव्याची जात मी श्वास घ्यायालासुध्दा नव्हती तिथे जागा मला ह्याचसाठी थांबलो ना माझिया हृदयात मी एवढ्या सहजी कुठे गंधाळती दाहीदिशा दर्वळाया लागलो होतो तुझ्या गजर्यात मी तू सजा ठोठावुनी मज दूरदेशी धाडले काढशी आता खबर की कोणत्या देशात मी चारभिंतींशी कसा झाला घरोबा एवढा पाचव्या भिंतीप्रमाणे वाढलो त्यांच्यात मी आज माझ्या अंगणी हे शब्द गोळा जाहले जाणिवांच्या पार जेव्हा जायच्या बेतात मी
|
गझल माझ्या डोक्यावरून जाते रे वैभव.... पण भावली. प्रसाद_शिर.... लाजवाब.
|