Zakasrao
| |
| Saturday, November 25, 2006 - 3:41 am: |
| 
|
नलिनी वाचता वाचता डोळे कधी भरुन आले ते कळलेच नाही. काळजी घ्या.
|
नलिनी अक्षरशहा रडली सार वाचताना icu, ventilation, oxygen सार वाचताना मला माझ्या आजीची जिला मी आई म्हणत असे तिची खुप आठवण झाली. तिनेच मला वाढवल, माझ बालपण जिने घडवल, आई पेक्षा जस्त माया दिली... अस वाटत होत तुला कस कळल माझ्या आईची ही थोड्याफ़ार फ़रकाने अशीच अवस्था होती ते. मला वाचताना प्रत्येक क्षणाक्षणाला तिच आठवत होती. तिची ती भकास नजर, माझ्या कानात येउन सांगितलेले शब्द.... सगळ सगळ. तुझ्यानिमित्ताने आज मी तिलाच thanksgiving करते and thanks nalini u too मला तिचे आभार मानायला दिलेस.
|
Princess
| |
| Monday, November 27, 2006 - 6:36 am: |
| 
|
नलु... काय बोलु तेच कळत नाहीये मला... मी खुप वेळा वाचला तुझा हा लेख. २ दिवसापासुन दहा वेळा तरी वाचला असेल. तुला प्रतिक्रिया काय देउ तेच कळत नव्हते. तुला माहितिय ना, माझे वडिल पण ICU मध्ये होते...कोमामध्ये. देवाने खुप कठिन निर्णय घ्यायला लावला तुला. पण तू खरच खंबीर म्हणावीस... एवढ्या कठिण प्रसंगातही अश्रु ढाळन्याची देखील परवानगी नव्हती तुला... कसे ग झेललस हे सगळे काही. अशीच धैर्यवान बनुन राहा. आणि आइला वचन दिल्याप्रमाणे भावंडांची काळजी घे. देव तुझ्या आयुष्यात आता खुप आनंद देवो, हीच प्रार्थना.
|
Nalini
| |
| Monday, November 27, 2006 - 6:52 am: |
| 
|
गेले सहा महिने हे लिहायचा प्रयत्न करत होते पण जमले नाही... thanksgiving च्या निमित्ताने लिहुन काढले. किती बरं वाटतय मला आता. खरच तुम्हा सर्वांसमोर मन मोकळे केले की जगणे सुसह्य होऊन जाते. तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात म्हणून तर धैर्य जमा होते अशा वेळेला. हि माझी लग्नानंतरची पाचवी दिवाळी होती जी मी सगळे फराळ बनवुन साजरी केली.. सारखे वाटायचे की आई पहात असेल ना? आपण काय करतो ते. आपण दिवाळी साजरी करतोय. ती करायची ते सगळे फराळ आपण करु शकतो. ती नाही म्हणून मला सांजोरी मिळत नाही असे तिला वाटायला नको म्हणून तिही केली. आता तिला माझ्या जवळ असण्यासाठी visa, passport कसलेच बंधन नाही हेच एक समाधान. तुम्ही सर्वच जण माझे मनोधैर्य वाढवताय.. तुमचे खूप खूप आभार.
|
Divya
| |
| Monday, November 27, 2006 - 12:02 pm: |
| 
|
नलिनी खुप हेलावुन टाकणारे लिहीलेस.
|
Maku
| |
| Tuesday, November 28, 2006 - 5:57 am: |
| 
|
Khupchh chaan lihile aahe nalini
|
Maku
| |
| Tuesday, November 28, 2006 - 6:07 am: |
| 
|
मी एथे नविन आहे . तरी तुम्हि सगले सम्जुन घ्या. कारन मी पन लिहिते.तुम्च मला चांगला SऊPPओर्त मीलेल . खुप चांगले लिहिले आहे वाचुन पानिच आले .
|
Priyab
| |
| Tuesday, November 28, 2006 - 12:26 pm: |
| 
|
नलिनि खूप खूप छान लिहिले आहे..मला सहसा रडायला येत नाहि लवकर पण हे वाचुन तर मी office मधे बसुन रडायला लागले माझे बालपण सुद्धा Nagar ,Vidyapeeth,Rahuri ठिकाणि गेले तुझ्या लेखामधे ते उल्लेख वाचुन तर मी अजुनच हळवि झाले
|
Shonoo
| |
| Tuesday, November 28, 2006 - 10:35 pm: |
| 
|
नलिनी किती छान लिहिलं आहेस? परदेशातच नव्हे तर आई वडिलांपासून दूर परगावात रहाणार्या सर्व ( दुर्दैवी?) लोकांची कॉमन व्यथा आहे ही. पण तू इतक्या छान शब्दात पकडलीयस. आईला तुझ्या जवळ यायला व्हिसा पासपोर्टची गरज कधीच नसते गं. तुझ्या आठवणींचं बोट धरून ती कित्येक वेळा तुझ्याकडे आली असेल तुला कल्पना पण करता येणार नाही! तुम्ही सख्खी आणि मावस चुलत भावंडं इतकी एकमेकांना धरून सावरून आहात हे वाचून मनात खोल कुठेतरी अगदी म ऊ, छान काहीसं वाटलं. ही नाती सदैव अशीच राहू दे!
|
Raina
| |
| Wednesday, November 29, 2006 - 2:24 am: |
| 
|
नलिनी.किती धीराची आहेस. सगळे निभावून नेलेस.
|
Prajaktad
| |
| Wednesday, November 29, 2006 - 5:55 am: |
| 
|
नलु!अगदी काळजाला भिडणार लिहलस बघ!... उगाच मनं कातर होत अस काही वाचल की!...
|
नलिनि, लेख वाचुन झाल्यावर थोडा वेळ काही सुचलेच नाही ग काय लिहु?...पण मन मोकळे केलेस आता जर बर वाटेल बघ! खरेच धीराची आहेस
|
Chinnu
| |
| Wednesday, November 29, 2006 - 9:27 pm: |
| 
|
नलु, मन हलकं झालय थोडं. एवढ्या दुरुन फ़क्त वाचुन रडताच येतं गं.
|
Saee
| |
| Sunday, December 03, 2006 - 11:53 am: |
| 
|
नलिनी, बोलण्यासारखं काही ठेवलंच नाहीस. भरुन आलं वाचताना. याच संदर्भातला एक तुला माहित नसलेला प्रसंग म्हणजे हे सगळेजण जेव्हा तुम्ही निघण्याच्या आदल्या रात्री उशीरापर्यंत तुझ्याबरोबर बसुन होते तेव्हा संध्याकाळपासुन ते रात्री जवळपास साडेदहापर्यंत माझ्या घरी फोन करत होते. नेमकी माझ्याकडे त्या दिवशी घराची किल्ली नव्हती, नवर्याला ते माहीत नव्हतं, त्याला फोन केला तर तो लागेना, बहिणीकडे जादा किल्ली असते पण ती त्यादिवशी मुंबईत होती. मी खाली जिन्यात बसुन होते आणि वरती सतत वाजत असलेला फोन मला ऐकुही येत होता! केवळ अस्वस्थ होण्यापलिकडे मला काहीच करता येण्यासारखे नव्हते. दुसर्या दिवशी सगळ्यान्नी मला पुन्हा ऑफिसमध्ये फोन करुन हे सांगितल तेव्हाची हळहळ मी आत्ता सांगुन काहीच उपयोग नाही. योग नव्हता हेच खरं!!! त्यामुळे हे सगळं वाचल्यावर जास्तच वाईट वाटलं.
|
Ldhule
| |
| Thursday, December 07, 2006 - 10:56 am: |
| 
|
आता तिला माझ्या जवळ असण्यासाठी visa, passport कसलेच बंधन नाही हेच एक समाधान. शब्दच नाहीत काही लिहायला.
|
Tustin1
| |
| Thursday, December 07, 2006 - 9:50 pm: |
| 
|
nalini kay lihav suchatac nahi.khup radale g vachatana.
|
नलिनी gr8 मला सासरे नाहीत..माझा नवरा खूप अस्वस्थ होतो नुसता बाबा हा शब्द ऐकुन तुझा लेख वाचुन त्याच्या मनातल्या भावना जास्त चांगल्या कळल्या मला. त्यानंही वडिलांना cancer मधुन वाचवायचा खूप प्रयत्न केला त्याला काय वाटत असेल ते जास्त चांगलं कळ्ळं मला आज
|