Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
तुझ असं जाणं.....पुन्हा परत येण.... ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » तुझ असं जाणं.....पुन्हा परत येण.... « Previous Next »

Manishalimaye
Thursday, November 23, 2006 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझं जाणं,
मला फारसं रुचत नाही.
तरीही,
तुझी तयारी मी करतेच.
अगदी अठवणीनं,
एकेक गोष्ट आठवुन भरतेच,
काही विसरु नयेस म्हणुन.
पण,
मला मात्र तू आठवणीनं
इथेच विसरतोस.

जाताना तू जातोस अन,
माझ मात्र,
सारं सारं घेऊन जातोस.
मला रिती--
अगदी रिकामी करतोस.
काही, काही उरतच नाही मग.

तुझ्या जाण्या बरोबरच,
माझं घड्याळ बंद पडतं.
ते तिथेच असतं
पण टिकटिक मात्र थांबते,
तुझी वाट पहात.
आलास की पुन्हा धडधडत,
सुरु होतं.

मग मी विचार करते,
मधला काळ कुठे गेला?
युगायुगांसारखा एकेक दिवस ढकलते.
तुझ्यातच स्वत:ला बुडवुन टाकते.
दिसत नाहीस मला,
तरी जाणवतोस.--
मग खुप खुप जाणवत राहातोस.
ऐकु येतोस,
मी मन लावुन ऐकत राहाते.
फक्त पुतळा होऊन.

पण पुतळा रडत नाही,
कोणी कावकावला म्हणुन!
चिडत सुध्दा नाही,
कोणी शीटला म्हणुन!
पण मी मात्र--
कोणाच्याही येण्यानी
रडत राहाते,
चिडते-चिडचिडते सुध्दा.

माझ्यावर? तुझ्यावर? त्यांच्यावर?
की आणखी तिसर्‍याच कोणावर?
असहाय्य, घायाळ होऊन.
अस्वस्थ होते,
सैरभैर होते.
सारे प्रश्न फेर धरतात.
कोणाला हाक मारु?
कोणाला सांगू?
कोणाच्या छातीवर विसावू?
कोण? कोण? कोण?

कोणी नसलंच--
तर प्रश्नच नसतो.
असुन नसलं--
तरच असं होतं.

मनाच्या बेभान अवस्थेत शिरते,
ठरवते,
आपलं असं होता कामा नये.
खंबीरपणे उभी रहा.
पण कुठे?
उभं राहायला जमीन लागतेच.
विश्वासानं पाय ठेवू?
कुठे?
माझी जमीन?
मझ्यापासुन दूर तिकडे.

माझ्या मनात घुमत राहातं
"रेकॉर्डिंगची गरजच नाही,
तुझा आवाज इथे आहे"
आठवतं,--
आठवतच राहातं मग.
मी मग मुकी होते,
बोलताच येत नाही मला,
शब्दच फुटत नाहीत.
मनही बंद पडत.
शरीरच फक्त सुरु असतं

मी आक्रंदत राहाते,--
"फक्त आवाज नाही रे,
माझ सर्वस्व तिथेच आहे"
तुच इथे नाहीस,
मग इथे काय आहे?
'फक्त हे शरीर'
एवढं एकच उत्तर.

माझ्याआकाशात,
नव्हे,
अवकाशात
पुन्हा पुन्हा घुमत राहातं
नुसत शरीर.
रिकामं-रितं,
म्हणुनच अर्थहीन---
चेतना हरवलेलं, प्राण हरवलेलं,
अचेतन--निष्प्रण---

आणी तू येताच पुन्हा,
चक्क श्वास घ्यायला लागत.








Rupali_rahul
Thursday, November 23, 2006 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. ..

Mrudgandha6
Thursday, November 23, 2006 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मनिषा...
अप्रतिम!! किती सुंदर आणि अचुक शब्दात पकडले आहेस मनाचे आंदोलन.. त्याच्यापसुन दूर असण्याचे दुःख..
कोणी नसलंच--
तर प्रश्नच नसतो.
असुन नसलं--
तरच असं होतं. .. वा!



Lopamudraa
Thursday, November 23, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा.. मनिषा great .... !!!
खुप खुप आवडलं.. अग असच मी लिहिलय.. (थोडे शब्द वेगळे.. इतकच.पण भावना तीच... इकडे टाकायल्लावेळच नाही मिळाला... )
तुझी ही बाजु माहित नव्हती.. अगदी आतपर्यन्त जाउन पोहचलं तुझं लिखाण... !!!


Yogi050181
Thursday, November 23, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा मनिषा.. खुप खुप फरच फरच छान.. :-)

Bhramar_vihar
Thursday, November 23, 2006 - 3:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, छान लिहिल आहेस. अभिनंदन!

Jayavi
Thursday, November 23, 2006 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा....... अगं कसलं भारी लिहिलं आहेस गं! अ प्र ति म! शब्दच नाहीत काही बोलायला. अगदी अस्सच होतं खरं आपलं माणूस कुठे बाहेरगावी गेलं तर!

Nandini2911
Friday, November 24, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा.. this is incredible
असेच काहीतरी लिहत राहा...


Athak
Friday, November 24, 2006 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा good one
विशाल मना ... अश्या मोजच्या अन अचुक शब्दात कसा रे सापडलास :-)


Nalini
Friday, November 24, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा, खुपच सहज आणि सुंदर लिहिलेस.
अगदी असेच होते बघ.


Shyamli
Saturday, November 25, 2006 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म!!!
छान आहे ग..........
और आने दो


Vidyasawant
Saturday, November 25, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहल आहेस ग. एकदम heart touching

Madhuri_sane
Monday, November 27, 2006 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिषा,

मनातले भाव एक एवढ्याशा लिखाणात कसे ग सहज बसवलेस.
खरचcअह अगदी अ!प्र!ति!म!!!!!
तुझए कवतुक करायला माझे तर शब्दच अपुरे आहेत.

खरए तर मी रोज वाचते. इथे प्रतिक्रिया देत नाही, तेवढा वेळच नसतो माझ्याकडे. पण तुझ कवतुक की तु आज मला बोलायला लावलएस्व.

मधु-मधुरी


Radhe
Thursday, December 21, 2006 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मनिशा, तुला मानलं बुवा, एकेका शब्दात काय आशय आहे. तुला हे सर्व कस सुचते. मी पण अधून मधून लिखान करतो. त्यातीय एक उतारा मायबोलीकरांसाथी.

''मी तुज़्या येण्याची आतूर होवून वाट पहाण.. मात्र तुज़ अस अचानक येण...माज़्याकडे पाहूनही न पाहील्यासारख करण...कळ्तच नाही तुला तुज़ हे वागन. माज़्यासाटी टरतय जीवघेण. मला नेहमीच वाटत तुज़्याशी मनमोकळ बोलाव...तु फ़क्त बोलत रहाव अन मी मात्र तुज़्या डोळ्यात मला शोधत रहाव. पण... पण अस होइल का? मी वाट पाहील्यावर तू खरच येशील का? आली तरी माज़्याकडे पाहशील का? मला पाहील्यावर तुज़्या गालावरची हास्यखळी पुन्हा एकदा फुलेल का?....मला माहीत आहे तु येनार नाहीस...तू न आल्यामुळे मला आवड्णारी हास्यखळी फ़ुलणार नाही. हे बघ तुज़ हे अस न येण आता माला सहन होत नाही अन तुज़्याशी असलेला अबोला मला चळ्ल्याशीवाय राहत नाही.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators