|
श्यामली.. सरु नये कधीच हे सुरेल प्रेमसत्र.. वा!! मस्तच
|
Jayavi
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:57 am: |
| 
|
श्यामली...... अहा..... क्या बात है! असंच सुरु राहू दे तुझं प्रेमसत्र. मृ, अहा.......!! सगळंच आता धुंद धुंद झालंय
|
Smi_dod
| |
| Wednesday, November 22, 2006 - 3:55 am: |
| 
|
क्षण अतृप्त!!! श्वासाची गंधमाखली सुरावट बरसली अधरात अलवार,मखमाली ओल्या रेशमी सुगंधात उत्फ़ुल्ल,उन्मेषात त्या रोमांच शहारता....... बेधुंद तन,बेधुंद मन आवेगाचे आवर्तन मग मोहरते मिठीत धग चांदण्यांची फ़ुलवते अंग संग स्पर्शकळ्या मुग्ध फ़ुलतात कायेत कण कण तृप्त क्षण अतृप्त स्मि
|
Chinnu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:04 am: |
| 
|
कण तृप्त, क्षण अतृप्त मस्त ग स्मि! mg छान आहे तुझा नक्षत्रांचा गाव.
|
मार्गशीर्ष म्हणजे विषेष काही असतं काय ?
सही . " सुटलेत ' सगळेच . जया ... उन्मेषी श्वासांची . सलाम ! सारंग ... i rate this as one of your best .. अर्थात अजून गझल वाचाय्ची आहे ...
मी मागेच म्हट्लं .. you are surpassing yourself each day बहोत अच्छे !! श्यामली .. चुकार काजवा मस्त आहे मृ .. पहाटवेळी डोकाव .. कल्पना इतकी मस्त आहे .. वाह ! स्मि ... छान .. पण मी क्षण तृप्त आणि कण अतृप्त असं वाचलं तर मला खूप मजा आली ... चिन्नु .. तुझ्यी कविता वाचली होती .. शलाकाच्या म्हणणयाप्रमाणे सुट्या सुट्या कल्पना अप्रतिम होत्या .. असो .. चालू देत मंडळी .. काही दिवस नसणार आहे .. पण फॅमिली मेंबर म्हणून माझी कॉन्ट्रिब्युशन देऊन जातो ... छ्या .. काहीच्या काहीच मूड धरलाय तुम्ही लोकांनी
|
आवर्तन ही शांत रात आता बघ यौवनात आली सारेच स्तब्ध केवळ श्वासांत हालचाली तू सांग का म्हणूनी मी सावरू स्वतःला उधळून आज माझी काया मला निघाली स्पर्शांमधून उठल्या अधिर्या हजार लाटा प्रत्येक लाट फिरुनी स्पर्शांमध्ये बुडाली हलकेच चाललेला हा दंश रेशमाचा हलकेच उतरणारी ओठांवरील लाली एकेक गंध माझा आहे तुझ्याच नावे मी मोगर्यास आता केले तुझ्या हवाली डोळ्यांत शोध वेड्या आमंत्रणे जराशी ना वादळे अजूनी पुरती तशी निमाली अवचित कसे म्हणावे अंगांग चिंब झाले ? लाजे कळी कशाला ? कुठल्या दवांत न्हाली ? ह्या पावसात आले संकेत श्रावणाचे आवर्तनास ओल्या सुरूवात फक्त झाली
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:32 am: |
| 
|
तू चंद्र हो अन स्पर्श माझे हात चांदण्यांचे>>>>>>मृ शेवटच्या ओळी पण खास आहेत.., प्रसाद.. पहिल्या दोन ओळीत वातावर्ण खुप छान सांगितलस.. सगळीच कविता खुप सुंदर.. श्यमले.. क्या बात है..!!! फ़ार जोरात.. स्मिता.. मस्त कविता आहे,तुझ्या झुळुकेवरच्या झुळुकाही छान असतात.. ...!!! वैभव तुला.. प्रत्येक वेळी काय म्हणु? ..
|
Smi_dod
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:41 am: |
| 
|
धन्स चिन्नु,लोपा,अणि वैभव.... लोपा वरच्या कवितेला तु झुळका म्हणालीस का?माझा जरा गोंधळ झाला वैभव सुचना आवडली मला...आणि कविता नेहमी प्रमाणे छान आहे तुझी...
|
कुणात मन गुंतलं की... अलगद त्याच्या मनात उमलतं फूल ओढावी वाटते... स्वप्नांची झूल शब्दांचा दरवळ झुळझुळतो मनात हवासा मोर...... मधूबनात डोळ्यांतली स्वप्नं ओसंडून वाहता कुणाला काहीदेखील कळू न देता बावरल्या क्षणी... रिमझिम गाणी झरणारा झरा.... तसंच असतं कुणात मन गुंतलं की... हे सारं असंच असतं कधीमधी दारात... कधीमधी घरात दिसते ती त्याला... कणा... कणात बहरते काया... ओसंडते माया कशी न अल्लद बिलगते छाया रात्र न दिवसा... उठता न बसता वरून-खाली, खालून-वर येता न जाता भांबावतं झणी... जन्माची ऋणी जपलेला श्वास... तसंच असतं कुणात मन गुंतलं की... हे सारं असंच असतं
|
वा वैभव... क्या बात है! सारंग, अतीशय सुरेख कविता! एकुणातच मस्त चालू आहे इथे... लगे रहो!
|
Jayavi
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:02 am: |
| 
|
वैभवा, वालेकुम सलाम अरे जाता जाता कसली कविता टाकून गेला आहेस रे......!! बाद्शहा आहेस रे तू प्रेमकवितांचा! (काहीच्या काही मूड काऽऽऽऽय ) स्मि.... फ़ार फ़ार सुरेख! श्वासाची गंधमाखली सुरावट बरसली अधरात ........ अहा! सुमती, खूप दिवसांनी! पुन्हा एकदा एक सुरेख कविता!
|
Shyamli
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:29 am: |
| 
|
बाप रे पूर आला की ईथे तर........ धन्यवाद मंडळी... मृ,वाह स्मि, क्षण अतृप्त क्या बात है वैभव, अरे काय तुझ्या कवितेच्या पुढे मागे कविता असली कि रेशमी साडिपुढे गोधडी ठेवल्यासारख वाटत रे ....... सुरेखच..... सुमती क्या बात है
|
Abhijat
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:52 am: |
| 
|
वैभव, ही कविता वाचताना सुरेश भटान्च्या मालवून टाक ची आठवण आली. लगे रहो!
|
Sarang23
| |
| Wednesday, November 22, 2006 - 6:53 am: |
| 
|
श्यामली, जयश्री, चिन्नु, स्मि, सुधीर, मृ, वैभव आणि प्रसाद, मनापासून धन्यवाद... वा! आता कुणाकुणाला काय काय म्हणू?! जयश्री तुझे आभार मानले पाहिजेत... असा विषय काढून... श्यामली... कंकणी सलज्ज किणकिणाट! आहाहा! मृ... मी तर आत्म्यात मग घुमू दे... इथेच अडकलो... खल्लास! स्मि... कण कण तृप्त क्षण अतृप्त!... सही आहे! वैभवा... ... ...!!! सुमती... स्वप्नांची झूल छान!
|
वैभव आवर्तन छानच सुमति अगदि अनुभवल्यासारखे वाटले एकदम सहीच
|
Ashwini
| |
| Wednesday, November 22, 2006 - 12:51 pm: |
| 
|
अरे वा, मस्त चाललय की इथे. सारंग... सुरेख कविता श्यामली.. सुंदर मृद्गंधा.. मस्तच ग सुमती.. छान वैभव, काय लिहायचे रे यावर? सारेच स्तब्ध केवळ श्वासांत हालचाली .. केवळ अशक्य आहे.
|
Ashwini
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:02 pm: |
| 
|
ही कविता मी साधारण दोनेक वर्षापूर्वी टाकली असेन. आत्ता चाललेला मूड पाहून, परत टाकाविशी वाटली.. प्रीति माझा देह फुललाय तुला सुगंध येत नाही? पाकळी पाकळीवर लिहीलेलं तुझं नाव दिसत नाही? हे असं उमलून येणं मला कुणी शिकवलं? माझ्या देहाला तर कधी तुझं बोटही नाही लागलं तुझ्या नुसत्या स्मरणाने माझी अशी अवस्था होते मी माझी उरत नाही तुझ्यामध्ये मिसळून जाते हां, तू कधी दिसत नाहीस पण मग कृष्ण तरी कुठे दिसतो? ज्या निष्ठेनं मी भक्ति करते तोच विश्वास मला प्रीति देतो
|
Chinnu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:14 pm: |
| 
|
अश्विनी, अमेझिंग लॉजिक! तु दिसत नाही पण कृष्ण तरी कुठे दिसतो, वाह! सुमती.. भांबवतं झणी, जन्माचा ऋणी, गोड कविता. आणि लाजे कळी ते का? कुठल्या दवात न्हायली? वैभवा.. अशी तुझी हवीहवीशी कवितेची आवर्तनं कधी संपुच नयेत.. खरच जया सर्वंना व्यवस्थित कामास लावलस! निल्या तुझी कुठाय कविता? स्वाती, तुस्सि कहा हो?
|
Asmaani
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:16 pm: |
| 
|
अगदी.. .. .. जया, स्मि, मृ, श्यामली, वैभव, सारंग,सुमती, खूप खूप अप्रतिम लिहिलं आहे सगळ्यांनी. सगळ्यांना मनापासून धन्यवाद इतक्य सुंदर कविता इथे लिहिल्याबद्दल. सारंग, बुडाल्या जळी केशरी लाल ओळी.... सही आहे. डोळ्यांसमोर चित्र उभे राहिले अगदी. एक एक शब्द सुंदर आहे तुझा! पण "पुन्हा कोण जाणे अशी वेळ येते..." पासून, "घडी दो ग़्हडीचा तसा मी प्रवासी" पर्यंत उदास वाटले रे फार. मृ, नक्षत्रांचा गाव फारच मोहक आहे. वैभव गुरुजी, नक्की कुठल्या ओळीचे आणि मुख्य म्हणजे कसे कौतुक करवे ते न समजल्याने जास्त काही लिहित नाही. एक एक ओळ म्हणजे कहर आहे!
|
Asmaani
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:21 pm: |
| 
|
अश्विनी, I AM STUNNED !!!!!!!!!!!!!!!!!!. अगं काय लिहिलं आहेस ग! केवळ अप्रतिम! शेवटचं कडवं म्हणजे तर कळस आहे. so simple! so sweet !
|
|
|