Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
बटाटेवडे, सामोसे आणि seamless integr...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » ललित » बटाटेवडे, सामोसे आणि seamless integration « Previous Next »

Meenu
Wednesday, November 22, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


असच एका संध्याकाळी जरा हापिसचं काम करुन कंटाळा आला म्हणुन मी आणि माझा मित्र जरा पाय मोकळे करायला बाहेर पडलो. कोपर्‍यावरच्या स्वीट मार्टला पोचलो तेव्हा वडे, सामोसे यांच्या खमंग वासानी आमचे पाय नकळतच त्या दिशेला वळले. त्याच्यासाठी सामोसा आणि माझ्यासाठी बटाटेवडा घेऊन पुन्हा आम्ही बोलत उभे राहिलो. कशावरुन नक्कि आठवत नाही पण गप्पा सीमलेस शब्दाकडे वळल्या. आणि झटकन मित्र म्हणाला "माझ्या वडिलांनी सीमलेस खुप छान समजाऊन सांगितलं मला, सामोसा आणि बटाटेवड्याचं उदाहरण देऊन. बटाटेवड्याचं आवरण आहे ते सीमलेस किंवा दोषरहीत आहे पण सामोश्याचं आवरण मात्र तसं नाहीये."

त्याच्या जसं ते उदाहरण कायमचं लक्षात राहीलं तसच माझ्याही. खरच काही उपमा, उदाहरणं कायमची लक्षात रहावी अशी चपखल असतात नाही ...? नंतर जेव्हा जेव्हा seamless integration शब्द आला तेव्हा तेव्हा मला हा प्रसंग आठवल्याशिवाय राहीला नाही.

एक होणं, एकरुप होणं, अविर्भाज्य भाग असल्याप्रमाणे मिसळुन जाणं तितकं सोप्प नाहीये, जितक्या सहजपणे आपण हे शब्द वापरतो. खरच आयुष्यात खुप वेळा आपल्यावर ही वेळ येतच असते जीथे असं मिसळुन जावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रत्येक नविन नोकरीच्या ठीकाणी, नविन जागेत रहायला गेलं की, नव्या नवरीला सासरी, नवनवीन मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात हो हो अगदी मायबोलीवरही आवश्यक नाहीये का आपल्या आवडत्या गटात सहजपणे मिसळता येणं ..? खुप वेळा असं होतं की हे नाही जमलं तर उगाच ओढाताण होत रहाते. पण खरच कशामुळे येत असेल असं सहज मिसळता ..? यात मात्र सारण अन आवरण दोघांचाही सहभाग महत्वाचा आहे.

सारण चांगलं व्हायला हवं की ही आवरणाची करामत आहे. हम्म आधी आवरणाबद्दल बोलु या ... बटाटेवड्याचं पीठ आणि सामोश्याचं ... बटाटेवड्याचं पीठ नक्कीच जास्त तडजोड करता येण्यासारखं आणि सैलसर असतं पण सामोश्याचं मात्र त्यापेक्षा घट्ट त्यात बदल करणं जरा अवघडच. म्हणजे आवरण किंवा ज्या वातावरणात मिसळुन जायचय तेही लवचिक असायला हवय तरच दुसर्‍या कुणाला सामावुन घेणं शक्य होईल त्याला.

हो पण सारणाचीही हवीच की तयारी त्या पीठात घोळुन घ्यायची आणि आपलीही चव त्यात मिसळायची. असं सारण अन आवरण दोघांचीही तयारी असेल तर मग पदार्थ चविष्ट होणारच की .....

नाहीतर मग सामोश्यासारखं वर वर पाहता एकत्र आहेत असं वाटलं तरी प्रत्यक्षात आत मात्र सारण एका कोपर्‍यात फुरंगटुन बसलेलं आवरणाशी फटकुन असलेलं. आणि सारणाच्या कडाही एकमेकांशी जणु काही जबरदस्तीने मिळवलेल्या, जोडल्याच्या खुणा तशाच मागे उरलेल्या ....

मग अनेक वेळा मला जेव्हा कुठे असा तणाव जाणवतो तेव्हा मी याच उदाहरणाशी तुलना करायचा प्रयत्न करते. नक्की दोष कशात आहे सारणात की आवरणात ...? मग एकदा का उत्तर सापडलं की त्याप्रमाणे पुढे काय करायचं याची आखणी करणं सहज सोपं होतं.

खरच किती तरी शिकायला मिळालं मला या छोट्याश्या घटनेतुन ...

(समाप्त)


Sayonara
Wednesday, November 22, 2006 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान. विचार करायला लावणारं.

Himscool
Wednesday, November 22, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, मायबोली वरच्या सगळ्यांनी आवर्जुन वाचावा असे ललित लिहिले आहेस...
एकदम मस्त.. आता प्रत्येक वेळेस हा लेख आठवणार नविन मित्र जोडताना


Milindaa
Wednesday, November 22, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो पण सारणाचीही हवीच की तयारी त्या पीठात घोळुन घ्यायची <<<

विचार करायला थोडं खाद्य घे Meenu .

सारण कसलेही भरले तरी सामोश्याचे कव्हर seamless नसेल... बटाटेवड्यात सामोशाचे सारण भरले तरी कव्हर seamless च होईल..

आता विचार करुन लेखात additions/modifications कर. :-)


Raina
Wednesday, November 22, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू- सरळ आणि समर्पक लिहीलं आहेस. आवडलं.

Sarang23
Wednesday, November 22, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलींदाने मांडलेल्या विचाराशी सहमत... त्यावर खरच सशक्त विचार करावा...
खरं तर या प्रमेयाचा पुर्ण व्यत्यासही मांडला जाऊ शकतो नाही का!

आणि अविर्भाज्य असा शब्दप्रयोग नाही... अविभाज्य आहे...


Dineshvs
Wednesday, November 22, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमलेस चा मुद्दा छान विचार करण्यासारखा आहे.
थोडेसे विषयांतर करायचे तर, मी कुठेतरी वाचल्याचे आठवतेय, कि अंड्याचे कवच सीमलेस वाटले तरी तसे नसते.
आणखी एक वेगळा मुद्दा, म्हणजे असे आवरण आतल्या सारणाला लपवुन ठेवते. असे आतमधे काय दडलेय हे लपवणारे खाद्यपदार्थ प्रत्येक भागात आहेत. आपल्या मोदकासारखा, हो अगदी तस्साच प्रकार अफ़गाणिस्तानात करतात, पण त्यात खिमा असतो.


Kmayuresh2002
Wednesday, November 22, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु,खूपच छान लेख.. छोटा पण अतिशय विचार करायला लवणारा. बटाटेवडा आणि सामोश्याचं उदाहरण तर एकदम चपखल.

Limbutimbu
Wednesday, November 22, 2006 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिलबीला काय म्हणता येइल? :-)

Meenu
Wednesday, November 22, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारण कसलेही भरले तरी सामोश्याचे कव्हर seamless नसेल... बटाटेवड्यात सामोशाचे सारण भरले तरी कव्हर seamless च होईल.. >>> हो मुद्दा बरोबर आहे पण आवरणाबद्दल बोलताना फक्त seamless बद्दल बोलतोय आपण पण integration साठी सारणाचाही सहभाग आवश्यक आहे असं म्हणायचं होतं मला .. कदाचित तसं मांडता नसेल आलं मला .. anyways सर्वांनाच प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद .. आत्ता तरी बदल करण्याईतका वेळ नाहीये .. सगळ्या सुधारणा आता पुढच्या वेळी जे लिहीन त्यात

जिलबीला काय म्हणता येइल? लिंबुभाऊ तुमीच सांगा की ..


Limbutimbu
Thursday, November 23, 2006 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोप्प हे मीनू, जिलबीला "गोड कडबोळे" म्हणता येइल
बाकी लेख छान हे!
सीमलेस? हममऽ! एखादि आयडी किन्वा व्यक्तिरेखा देखिल सीमलेस असु शकेल काय?
मानवी मनाला अनेक कन्गोरे, काही गुळगुळित तर काही टोकदार असतात! कुणाचे मानवी मन देखिल सीमलेस असु शकेल काय?
(बघ घे हे अजुन काही "सशक्त विचार"!)


Chintochimnaji
Thursday, November 30, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी काही मौलिक विचार - भारतीय फलंदांजांसाठी seamless ball वापरले पाहिजेत. ती pollock वगैरे मंडळी ' seam के सहारे गेंद move/cut' फार करतात. तेवढे seamless balls वापरले तर जरा SA च्या खेळाडूंना मजा येईल . थोडी काहीतरी स्पर्धा होइल - work satisfaction मिळेल त्यांना.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators