|
Jayavi
| |
| Tuesday, November 21, 2006 - 6:48 am: |
| 
|
मार्गशीर्षाची सुरवात रोमॅंटिक करायची का उन्मुक्त तू देहफ़ुले उमलवूनी मुक्त तू, उन्मुक्त तू तूफ़ानी प्रीत सरी उधळूनी रिक्त तू झेलूनी तुझा प्रपात नखशिखान्त नाहते प्रणयाचा मी मरंद मनमुराद चाखते दाहक कोसळ तुझा उतरतो नसानसात मदहोशी पसरते गात्रातून अंतरात वितळते मिठीत मुग्ध बेहोषी धुंद धुंद उन्मेषी श्वासांची लयकारी मंद मंद जयश्री
|
Chinnu
| |
| Tuesday, November 21, 2006 - 8:26 am: |
| 
|
जयु, आपण फ़िदा! मस्त लिहिलस ग. मुहुर्त मध्ये त्याला तीच्या लग्नाला जावे लागते, तेव्हा त्याचे भरुन आलेलं मन टिपण्याचा एक कासाविस प्रयत्न केला मी. प्रसाद छान रे.
|
जया.. हम भी फ़िदा... मागच्या बर्याच कविता.. निवांत वाचु म्हणुन प्रतीक्रिया द्याय्च्या राहिल्यात.. प्रसाद.. सुंदर..!!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 21, 2006 - 1:05 pm: |
| 
|
जयु, तेवढा मकरंद, हा शब्द सुधारुन घेणार का ?
|
जया मार डाला रे great ...
|
Ashwini
| |
| Tuesday, November 21, 2006 - 2:42 pm: |
| 
|
जया, छान आहे. कार्तिकातल्या काही शेवटी टाकलेल्या, वैभव, सारंग, शलाका सगळ्यांच्या कविता सुरेख आहेत. प्रसाद..... पहिल्या कडव्यातच जिंकलस. 
|
शलाकाताई, सारंगाने तांत्रिक बाजू सांगितली आहेच. मंत्र तुला already अवगत आहे. तू नक्कीच छान गज़ल लिहीणार लवकरच. कविता म्हणून सुंदर आहे. जया, छान सुरुवात. दिनेशदा, ' मरंद' पण बरोबर आहे.
|
Asmaani
| |
| Tuesday, November 21, 2006 - 4:00 pm: |
| 
|
सगळ्यांच्याच कविता, गझल, खूप सुंदर आहेत. वैभव, सारंग, आणि बाकी सगळेच जोरात आहेत. आता खरंच प्रतिक्रियांसाठी शब्द सापडेनासे झालेत!
|
Daad
| |
| Tuesday, November 21, 2006 - 8:16 pm: |
| 
|
आहा, जया! पुन्हा पुन्हा वाचतेय!
|
Sarang23
| |
| Wednesday, November 22, 2006 - 12:43 am: |
| 
|
वा जयश्री... खूप छान! आता आम्हालाही जरा अशाच कविता टाकाव्या लागणार म्हणजे...
|
Sarang23
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:01 am: |
| 
|
मीलन... बुडाल्या जळी केशरी लाल ओळी! अश्या सावळ्या मर्मरी सांध्यवेळी! दुरातून डोले नदीतील नौका... चुके कातळाचा थरारून ठोका... निळाईत हाले निळेभोर पाणी... कुणी शिकवली गोड झाडांस गाणी?! अशा धुंद वेळी सखी सोबताहे... नदीच्या प्रवाही तिचे बिंब वाहे... कधी माळते मोगरा वा अबोली; कुणाला कळावी अशी देहबोली? परी आज माळून दोघांस केशी, मला स्पर्शभासात ओढून नेशी!! अशा सांजवेळी जरा तोल जाता! नको धाक घालू, हळू बोल आता! पिसाटापरी वाहतो गार वारा! लपेटू बघे चांदण्याचा शहारा! उडू दे जरासे तुझ्या कुंतलांना; जरा मोजतो मी तुझ्या स्पंदनांना! नभी दूर तारा लकाकेल तेंव्हा... तुझा हाता हातात येईल जेंव्हा... तुझ्या बाहुपाशात घे पामराला... जसा भृंग जातोय कमलांतराला! पहा शुभ्र झाल्या तमातून काया नको घालवू ही अशी वेळ वाया पुन्हा कोण जाणे अशी वेळ येते... पुन्हा कोण जाणे कधी भेट होते... वळीवापरी वर्षु दे रात सारी सुगंधीत तू, मी धरा तृप्त सारी पुढे रात्र अंधारली खूप आहे; घडी दो घडीचे तुझे रूप आहे... जसा मत्त लोपून जातो सुवास... पुन्हा तापतो मृत्तिकेचा प्रवास... क्षणार्धात न्हाते धरेची उदासी घडी दो घडीचा तसा मी प्रवासी ... घडी दो घडीचा तसा मी प्रवासी (भुजंगप्रयात) सारंग
|
Shyamli
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:57 am: |
| 
|
क्या बात है, जया, सारंग अरे आम्ही टाकायच्या का नाही मग ईथे कविता ह्या मुडच्या कश्या सुचाव्या
|
Jayavi
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:02 am: |
| 
|
चिन्नु,लोपा, दिनेश, माधुरी, अश्विनी, स्वाती, शलाका, सारंगा...... धन्यवाद रे...... दिनेश, मरंद हा शब्द सुद्धा आहे. मला हा शब्द खूप आवडला होता. सगळ्यात पहिल्यांदा सुरेश भटांच्या कवितेत वाचला होता. "दुरुन कोण हा तुझा, मरंद रोज चाखतो" अशी ओळ होती ती. आणि स्वातीचा "प्रपात" हा शब्द पण मनापासून आवडला होता ;) सारंगा...... क्या बात है! बुडाल्या जळी केशरी लाल ओळी! अश्या सावळ्या मर्मरी सांध्यवेळी! अहा...... काय वातावरण निर्मिती आहे रे!
|
Chinnu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:02 am: |
| 
|
जियो सारंग! वाह, एक एक ओळ अगदी खल्लास.. पुन्हा तापतो मृत्तिकेचा प्रवास, वा!
|
Smi_dod
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:05 am: |
| 
|
व्वा झकास जया,सारंग....क्या बात है... सहि!!!
|
Jo_s
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:10 am: |
| 
|
जया मार्गशीर्षाची सुरवात जबरीच धुंद सारंगा घडी दो घडीचा तसा मी प्रवासी मस्तच
|
जया.. मस्तच सुरुवात केलीस.. चिन्नु, मुहुर्त खूप हळवे करुन गेली.. छान आहे. सारंग,.. तुझ्या बाहुपाशात घे पामराला... पहा शुभ्र झाल्या तमातून काया.. .. पुन्हा कोण जाणे अशी वेळ येते... वळीवापरी वर्षु दे रात सारी .. जसा मत्त लोपून जातो सुवास... ... खूप सुंदर
|
Shyamli
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:26 am: |
| 
|
प्रेमसत्र रोमांचित गारवा रात पुनव चांदवा धुंद धुंद ही हवा नको मंदही दिवा चुकार एक काजवा फितूर तोही साजणा कंकणी सलज्ज किणकिणाट हळूच हळूच कुजबुजाट स्पर्श स्पर्श फुलवितात देहावर पारिजात चढत जाई रात्र रात्र अधीर मदीर गात्र गात्र सरू नये कधीच हे, असे सुरेल प्रेमसत्र श्यामली!!!
|
Chinnu
| |
| Wednesday, November 22, 2006 - 2:35 am: |
| 
|
श्यामली, नक्की फ़ितुर कोण बर? सुंदर सुरेल आहे प्रेम कविता तुझी. mg धन्यवाद ग.
|
गीत हृदयात ऐक माझ्या तू गीत भावनांचे आत्म्यात मग घुमूदे संगित भावनांचे इतक्यात उगवेल क्षितीजावर नक्षत्रांचे गाव तू चंद्र हो अन स्पर्श माझे हात चांदण्यांचे दशदिशांत घुमेल आर्त होऊनी वारा हलकेच बरस होऊन मग तू सूर बासरीचे पानगळ संपली आता फ़ुलेल हा वसंत पसरूनी मधुगंध घेतले मी वेड फ़ुलांचे पहाटवेळी डोकाव जरा खिडकीतून बाहेर प्रतिक्षेत तुझ्या पावलांच्या,फ़ुल प्राजक्ताचे आता माझ्या डोळ्यांत हसतात तुझे डोळे हरवले कधीच मी,उरले अस्तित्व तुझ्या ध्यासांचे मग,अवेळी येते जाग रात्र सरण्या आधीच रोज भेटायास येते मज, ते गाव पाखरांचे
|
|
|