|
Yog
| |
| Tuesday, November 21, 2006 - 5:08 pm: |
| 
|
Melting Moments या नावात काहितरी खास आकर्षण होत खर. ज्याला हे नाव सुचल त्याच्या मनात सर्व सुख आणि सहवासाचे क्षण सुटतात कधी ना कधी वितळतात वगैरे असा उगाच विरही सूर आला असेल का..? का "ते" सम्पण्यापूर्वीच त्याच्या प्रत्त्येक थेम्बाचा चघळून चघळून आस्वाद घ्यावा असे काही सुचवायचे असेल? का कितीही थन्ड अचल दिसले तरीही एखाद्या हळुवार नाजूक गरम स्पर्शाने ते सुध्धा वितळते असे सान्गायाचे असेल..? ice cream बद्दल बोलतोय मि. पण melting moment हे फ़क्त आईस क्रीम नाही निदान त्या दोघान्साठी तरी खास नाहीच नाही. तस असत तर तीचा हट्ट पुरवायला अगदी भर बर्फ़ात, बाहेरच्या -30 डिगरी तापमाना मधे अर्धा तास पायपीट करून तो तिला घेवून गेला नसता. बाहेर सर्व अस गोठलेल असताना मुद्दामून melting moment चे तीचे आवडते ब्रॅन्ड चघळताना ती कुठल्यातरी आतल्या जखमा तर गोठवायचा प्रयत्न करत नसावी ना..? छोट्याश्या कोनामधे साचलेली गोठलेली ती संवेदना तीच्या गळ्यात उतरताना एक कायमचा सोबती मिळाल्याचा आनन्द उपभोगत नसेल ना? पण त्यातही तीच्या चेहेर्यावरील तो आनन्द पाहताना त्याचे मन तुडुम्ब भरत असे मग तिच्या हातातील आईस क्रिम साठी पोटात जागा शिल्लक कशी राहील? मग त्यातून उगाच भान्डण.. हे काय फ़क्त मी एकटीच खाते आहे, किती बोअर आहेस तू.. आता हे उरलेल कोण सम्पवणार वगैरे वगैरे.. तिच्या त्या लटक्या तक्रारी आईस क्रिम वरून ओघळणार्या caramel पेक्षा ही भरकन आत आत झिरपायच्या अन मग तिच्या हातून ते आईस क्रिम सम्पवण्याचा मोह त्याला आवरत नसे. तिचा लाडीक राग हा त्याला आईस क्रिम ची अशी भुरळ पाडण्यास पूर्णपणे जबाबदार. ice cream एकत्र खाण्याचे ते नविन सन्केत तो तिथेच शिकला असावा तीच्याचसोबत. एरवी उन्हाळ्यात तापमानाचा पारा तीस च्या वर पोचला की घशाला ओढ लागायची meling moments ची. पण तीच्याबरोबर खाताना मात्र फ़क्त मनाची कोरड घालवायची एव्हड एकच कारण त्याला पुरेस असाव. घर आणि शाळेपासून अगदी चार चौक लाम्ब असणारं, येता जाता कुणालाही सहज आकर्षीत करणारी दुकानाची मान्डणी, अन मुख्ख्य म्हणजे एकत्र ice cream खायला जमलेल रसरशीत तारूण्य. त्या वातावरणात जादू होती हेच खर. लहान मुलाला वेगवेगळी रन्गीत खेळणी बघून एक गोन्डस हसू फ़ुटाव तस तिथल्या वेगवेगळ्या ice cream चे रन्ग बघून तिच्या चेहेर्यावर उमटणार स्मित, गालाला पडणार्या खळ्या, ती उत्कटता अन पहिला स्कूप घेताना तिच्या डोळ्यात उमटलेली तरल उत्सुकता.. त्याचा पहिला स्पर्श होताना लाजलेल बुजलेल तिच शरीर असच डोळ्यात उमटल असाव. तो आणि ती यान्ची ओळख झाली त्या पहिल्या दिवशी खाल्लेल chocolate waffle sundae मात्र तीचं नहेमीचं आवडीचं. कधी भान्डण झाल, मूड ऑफ़ असेल तर ते ice cream म्हणजे जणू जादूची कान्डी. एरवी उगाचच एकमेका बरोबर सहवास भोगायचा म्हणून रेन्गाळत सम्पवलेले कोन आणि हे chocolate sundae यात मात्र खूप फ़रक. सर्दी ताप असला तर तिच्या ice cream खाण्याच्या हट्टाला काय वेगळच उधाण येत असणार, अन मग "नको खावूस,आजारी पडशील" या अशा त्याच्या सर्व विनवण्या तीच्या गालावरील खळ्यान्पुढे चटकन वितळून जायच्या. आजारी पडली तरी तिच डोक त्याच्याच मान्डीवर ठेवून झोपणार होती याची खात्री असावी का त्याला? अताशा सवय झालेली, खिशात सुदैवाने पैसेही जास्त तेव्हा हट्ट पुरवणे अवघड नव्हते. मग हे आवडल नाही तर ते दुसर घे, असे लाड चालू शकत होते पण आधी आधी दोघान्च्याही खिशाला परवडत नाही म्हणून लहान कपात दोघाने शेयर केलेल्या त्या single scoop ice cream ची चव मात्र कायम शिल्लक राहिली असावी. त्याशिवाय का melting moments चे small cups single scoops जास्ती खपायचे? melting moments च्या आवारात असे बरेच क्षण त्यान्नी मागे सोडले आहेत. प्रकार, रन्ग, रूप थोड बदललय त्या ice cream च. नव्या तरूणाईच्या नव्या चवीचे सन्केत दुकानाच्या नव्या मान्डणीतूनही दिसत आहेत पण आजही दुकानाच्या बाहेर ते दोघे असेच अनेक वेळा फ़क्त एकमेकाच्या हातात हात घालून उभे राहिलेले दिसतात, त्यान्चे चेहेरे बदललेले असतात इतकच. काळानुसार चेहेरेपट्टी बदलणारच नाही का? तीच निसर्गाची रीत आहे पण बदलले नाहीयेत ते क्षण, त्या आठवणी. नाहीतर मला सान्गा तो एकट्यानेच आज ते ice cream खात असला तरी त्या क्षणान्चा ओलावा त्या ice cream मधे कसा उतरतो..? अन ती तरी कधी एकटीच त्या रस्त्यावरून जाते तेव्हा त्या तरूणाईच्या घोळक्यातील एका single scoop वरचे ओघळ काचेआडूनही कसे स्पष्ट दिसतात..? melting moments..... as someone named it!
|
Chinnu
| |
| Tuesday, November 21, 2006 - 5:41 pm: |
| 
|
काय लिहु? ह्या मनातल्या मनात मेल्ट होत जाणार्या आईसक्रीमची चव मात्र खुप खुप छान आहे योग!
|
Daad
| |
| Tuesday, November 21, 2006 - 10:47 pm: |
| 
|
योग, खरच छान! मस्तं शब्दात पकडले आहेत melting moments !!
|
एकदम आईसक्रिम सारखाच वाटतय सुरेख यमी
|
योग, खरच खुप सुंदर पकडलेत तु शब्दांत Melting moments!!!
|
ह्म्म्म्म्म्म्म.. I have a sensation at the present moment as though I were dissolving .... मस्त आहेत melting moments
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 22, 2006 - 1:44 pm: |
| 
|
सुंदर लेखन. मेल्टिंग मोमेंट्सला समर्पक मराठी शब्दच आठवत नाही. या गंगेमधि गगन वितळले, अशी एक बहुदा बालकविंची कविता आम्हाला अभ्यासाला होती. त्यावेळी आमच्या प्राध्यापिकेने, वितळणे आणि विरघळणे, यातला फरक छान समजाऊन सांगितला होता.
|
अप्रतिम!!!! सोनेरी भुतकाळ आठवला
|
Maku
| |
| Sunday, November 26, 2006 - 11:41 pm: |
| 
|
Bore aahe Yogg mala nahi aavdale lok nehmi yog chech vachatat bakichyanche vachat nahii
|
Meggi
| |
| Thursday, November 30, 2006 - 6:59 am: |
| 
|
अजुन एक du id का? योग... आइसक्रीम सारखचं मस्त
|
Savani
| |
| Thursday, November 30, 2006 - 8:20 am: |
| 
|
maku अगं मग तू पण लिही.. वाचतील तुझं पण लिखाणं.. योग, छानच.
|
|
|