Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
एक पाऊस न कोसळलेला ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » मार्गशीर्ष » कथा कादंबरी » एक पाऊस न कोसळलेला « Previous Next »

Mrudgandha6
Tuesday, November 21, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पहिलाच प्रयत्न आहे.कमीजास्त समजून घ्यालच :-)

"एक पाऊस.. न कोसळलेला.."


हवेत कमालीचा गारवा पसरला होता.. नुकताच पाऊस पडून गेलेला.. बाहेर पागोळ्या गळत होत्या.झाडांतून पाणि टपकत होते..जणू झाडे आसवं ढळत होती.पागोळ्यांच्या आवाजाचा जोर मघापेक्षा कमी झाला होता पण,रातकिड्यांची किर्किर मात्र वाढली होती.कुठूनसा एक काजवा तिच्या खिडकीत येऊन बसला..एरव्ही तिला कोण आनंद झाला असता त्याला पाहुन..पण आज अजून तो दुर्लक्षित होता..तिच्या आवडत्या जागेवर,खिडकीजवळच्या टेबलवर कॉफ़ीचा कप केव्हाचा पडून होता.मघाशी वाफ़ाळलेली कॉफ़ी आता पार थंड होऊन गेलेली..मेहंदी हसनची"खुली जो आंख तो वो था न वो जमाना था" ही तिची आवडती गझल वातावरण आणखीच गंभीर बनवत होती.पण,तिचे लक्ष कुठे होते?ती केव्हाच भूतकाळात शिरली होती.तिच्या मनातही एक पाऊस सुरु होता..तिचा अंतस्थ पाऊस.. एक वादळ तिच्या आयुष्यात आले होते.. आणि तिला पार विस्कटून गेले होते.

पाऊस किती आवडायचा तिला.. आणि तोही..

तो.. पावासासारखाच..धीरगंभिर..पण तितकाच हवाहवासा..वादळे घेऊन येणारा..भरभरून येणारा..वाटले तर वाटेल तेव्हाढा बरसणारा.. नाहितर कितीही आर्जवे केली तरी न बरसताच निघून जाणारा..

पावसाळी संध्याकाळीच तर भेट झाली होती त्याची अन तिची..
ग्रीष्म संपत आलेला..वर्षेची चाहुल देत आकाश अभ्रच्छादित झालेले.. अशावेळची दुपार आणि संध्याकाळच्या सीमेवरील त्यांची भेट तिच्या समोर जशीच्या तशी दिसू लागली..

तिचा best friend अमृत त्यानेच तर आज बोलावले होते तिला.ती तिथे पोहचली तेव्हा अमृत बरोबर तोही होता. आमृतने ओळख करून दिली..

"हे मधू meet my best friend आविष्कार"
"आणि अवि she is my sweet angel माधवी"

दोघेही एकमेकांना हस्तांदोलन करत किंचीत हसले..जणू ते एकमेकांना आधीच ओळखत होते.त्याही नजर तिच्या हृदयाचा ठाव घेत कधी आत्म्यापरयन्त पोहोचली तिलाही कळले नसावे.

ती जणु परी आणि तो परिकथेतील राजकुमार. जितकी ती सालस,सद्गुणी,हळवी, तितकाच तोही हुशार,कष्टळू,कमी वयातच उत्तुंग शिखरे गाठली होती त्याने.गर्भश्रिमंत असुनही वागण्यात विनय होता..कुठला गर्व नव्हता.स्वकर्तुत्वावरच त्याचा अधिक भर असायचा.

नव्या मैत्रीच्या पहिल्या दिवशी पहिला एकत्र कॉफ़ीचा कप समोर आला आणि त्याचा पहिला घोट घेताना मृगाचा पहिला पाऊस कसा टपटपा बरसायला लागला.. बघता बघता मृद्गंध दरवळू लागला.ऊर भरून घेतला तिने तो सुवास...पहिल्या पावसाची मजाच काही औरच असते.

[क्रमश]




Princess
Tuesday, November 21, 2006 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृदगंधा, मस्त लिहितेय. हं... कविते प्रमाणे इथेही तुम्ही छाप सोडणार असे दिसतय. लवकर लिही...:-)


Mrudgandha6
Tuesday, November 21, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स पुनम...
पुन्हा इथे टाकतेय..तिकडे आत कुणी वाचायचे नाही..


Asmaani
Tuesday, November 21, 2006 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, प्रिंसेसला अनुमोदन! लवकर टाक पुढचं.

Asmaani
Saturday, November 25, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ, काय झाले गं? पुढे लिही ना!

Mrudgandha6
Tuesday, November 28, 2006 - 1:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अगं sorry बाहेरगावी गेले होते.करते लवकर पुर्ण.:-)


Mrudgandha6
Wednesday, November 29, 2006 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पाऊस पडल्यामुळे धरती कशी अगदि नवे रूप ल्यायली होती,हिरव्या रंगाच्या विविध छटा तिच्यावर जणु मुघ्धपणे हसत होत्या,विविध फ़ुले बहरली होती,पिवळि,गुलाबी,निळी रानफ़ुले.. तसे यांच्या मैत्रीचे फ़ुलही हळुहळू उमलत होते,बहरत होते.

तसा तो मुंबईला रहायचा,पण व्यवसायानिमित्त त्याचे जाणेयेणे तिच्या शहरात व्हायचे.इतर्वेळी त्यांचा फ़ोन, emails ,आणि messenger वरुन संपर्क होताच.तिला त्याचा सहवास सुखद वाटु लागला होता,ती त्याच्या भेटीची, फ़ोनची वाट आतुरतेने बघायची.त्यालाही तिची ओढ वाटत असावी,त्याशिवाय का तो दर दोन दिवसाला स्वतहून फ़ोन करायचा,दोन दिवस contact नाही झाला तर उगाच का blank mail टाकायचा..

एकदा ती भेटून निघताना म्हणाली
"चल अवि,मी निघते."ती आविष्कार वरून केव्हाच अविवर आली होती.
तेव्हा,तो म्हणाला..
"थाम्ब ना माधवी,जरा बोल ना अजून"
तो मात्र अजूनही तिला माधवीच म्हणत होता,मधू नाही.
"नाहीरे जायला हवे,तिन्हीसांज झाली,सुसंस्कृत मुलींनी दिवेलागणीच्या आत घरात जावे."
त्याला ते पटले नसावे,किंवा त्याला ती अजून थांबावी असेच वाटत असल्यामुळे रुचले नसावे.
"जा,मग,मी देवूशी बोलत बसतो.फ़ोन करून"
देवू म्हणजे देवयानी,त्याची बाल्मैत्रिण,ती आणि नम्रता,अमृत लहानपणापसून एकत्र वाढलेले. अगदी जिवश्च कंठच मैत्री त्यांची.
"ठीक आहे,बोलत बस तिच्याशी,मी काय करू? bye "
"माधवी,थांब ना,रात्री मी नगरला चाललोय,थोडावेळ बोल ना."
"नाही"
"जा,मी आज किमान १४० km speed वर drive करनार आहे."
ती अवाक,या बोलण्यावर,मनात म्हणाली"हा काय emotional blackmailing करतोय की काय मला"
ती यावर काहीच बोलली नाही,
"माझा laptop,cds,dvd player सगळे अमृतला देयीन आणि जायीन.उगाच त्या वस्तू वाया कशाला?,कुणालातरि उपयोग तरी होईल."
ती.."अरे पण गाडीला का त्रास? laptop,cds,dvd player बरोबर गाडिही महत्वाची नाही का? "
तरी तो यावर काहीही बोलत सुटला.
आधी तिने सगळे हसत नेले.पन नंतर अगदिच अबोल झाली.
शांत बसली.आणि म्हणाली"काहिही बोलतोस तू.आज अमृतला फ़ोन करून सांगते तुझ्याबरोबर यायला."
यावर तो हसला,आणि म्हणाला,"अग वेडु,माझा हा नेहमीचाच speed आहे.मी काही suicide करणारा भ्याड मुलगा नाही."
तिचा काळवंडलेला चेहरा पाहून मात्र त्याला उगाच वातले आपण असा भलता joke करायला नको होता.
तो sorry म्हणाला तिला.
हं,तरीही,ही जर वेळ थांबलीचगदी बर्‍याच instructions देवून गेली त्याला, rash driving करू नकोस,केलेस तर याद राख "आशी धमकीही देऊन गेली.तो केवळ तिच्या डोळ्यातली त्याच्याबद्दलची कालजी निरख्त बसला होता,हसत बसला होता.
"हो ग बाई हो, dont worry about me "
"नगरला पोहचल्यावर फ़ोन कर मला,मी वाट पाहिन"
हं ति तिथून निघताना तिचं मन मात्र कालजीने अजून हुरहुरत होते.

तसा तिचा मुळचाच हळवा स्वभाव,सगळ्यांच्यावर प्रेम करनारा,काळजी घेणारा,पण यावेळची तिची हुरहुर वेगळी होति.ती प्रेमात पडली होती तर.

[क्रमश]


Kukku
Thursday, November 30, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ारच छान लवकर पुदच लिहि

Maku
Thursday, November 30, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोनिच क पुर्न करत नहि आहे कथा.

Sahi
Wednesday, December 06, 2006 - 9:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटायला लागले आहे कि ह्या लेखक मन्ड्ळीसाटी एखादी सोय हवी की जेथे ह्यान्ना त्यान्च्या कथान्चे भाग सवडीनी लिहिता आणी स्टोअर करता येतील.कथा पुर्ण ज़ाली की पब्लीश बटन दाबायचे की आम हितगुजकरान्ना अखन्ड वाचता येतील. माज़्या ओनलाईन क्लासमधे टर्म पेपर साठी ही सोय आहे

Mrudgandha6
Monday, December 11, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


प्रिय मित्र-मैत्रिणींनो,माफ़ करा, कथा पुर्ण करु शकले नाही,काही अपरिहार्य करणांमुळे.. अजून ३-४ दिवसही पुर्ण करु शकनार नाही,पण नंतर पुर्ण कथच टाकेन.


Radhe
Wednesday, December 20, 2006 - 11:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए जरा लवकर लीहीना खुपच उत्सुकता लागली आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators