|
माझा हा अगदीच पहीला वहीला प्रयत्न आहे. बर्याच चुका, विस्कळीतपणा असेल-आहेच जरा समजुन घ्या हं. 'शी! किती ताण दिला तरी आठवतच नाही कोणी! यातला एकही चेहरा कसा ओळखीचा वाटत नाही?' मी खुप अस्वस्थ झाले. माझा खुप जपुन ठेवलेला खजिना आज मी उघडुन बसले होते. अगदी अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारख झालं होतं मला इतक्या विविध गोष्टी होत्या त्यात. आणि त्यात होते काही शाळेतले फोटो. लग्नाच्या वेळी आठवणीने जपुन बरोबर आणलेले. एक होता ४थी च्या निरोपसमारंभाचा. त्यावर नजर गेली आणि तो फोटो बघायला लागले. मन खुप वर्ष मागे गेल अगदी १९८३ सालात.२३-२४ वर्षापुर्वीचा काळ. त्या निरोपसमारंभात बर्यापैकी पाठ करुन केलेलं भाषण.इतकी वर्ष एक वर्ग एक बाई.आता मात्र इथुन पुढे प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक. पण उत्साह होता त्या दिवशी.शाळा एकच होती केवळ प्राथमिक मधुन माध्यमिकमधे जाणार म्हणुन हा निरोपाचा सोहळा! आता पर्यंत आपल्या शिक्षकानाच सर्वस्व मानणारे आम्ही,बरं-वाईट अगदी बाईंच्या कानात जाऊन सांगणारे आता हायस्कुलात जाणार. आतापर्यंत चारही वर्ष जोशीबाईच होत्या आम्हाला. आमच्या बरोबर बाईही वरच्या वर्गात जायच्या पण आता बाई म्हणत होत्या'आता इथुन पुढे तुम्हीच वर वर सरकणार आणि मी पुन्हा पहिलीत जाणार' त्यावेळचा फोटो! black & white . आठवणीही तशाच.आता काळोखात दिसेनाशा झालेल्या.आता त्यात बाई सोडुन सारेच अनोळखी भासत होते. वर्गातल्या खोड्या-दंगा-मस्ती-गडबड गोंधळ सगळ सगळ हळुहळु आठवल. अनेक मित्र-मैत्रिणी आठवले,पण त्याना चेहरेच नव्हते आठवणीत.आणि फोटोतले चेहरेही ताडुन बघता येत नव्हते.माझँ मला स्वत:लाही त्या फोटोत ओळखणं हाही निव्वळ अंदाजच होता.काळ्या-पांढर्या रंगातला आणि गणवेशधारी पन्नास मुलं बसलेला तो जुना गृप फोटो! एकेकाळचे पाण्यात साखर विरघळावी तसे एकमेकात विरघळुन गेलेले ते लहानगे जीव आज मला अगदीच अनोळखी वाटत होते मग दरवर्षी शाळेच्या रीवाजाप्रमाणे काढलेले एकएका वर्षाचे फोटो बघत गेले आणि कोण कुठला याचा अंदाज लावत गेले. एकेक इयत्ता मोठी होत गेले. आता दहावीत आले.१९८९ चा फेबृवारी महीना. निरोपसमारंभाचे बरेच फोटो होते त्यात. आता हाफ पॅन्ट मधुन फुल पॅन्ट मधे आलेली टाय लावलेली रुबाबदार मुलं आणि छान छान साड्या नेसुन दागिने घालुन मिरवणार्या मुली आठवल्या. त्या दिवशीच भारावलेपण आठवल.इतकी वर्ष मस्ती करत एकमेकांबरोबर घालवलेले आम्ही सारे एका घट्ट विणीत बाधंले गेलो होतो, ती विणच आता उसवणार होती! सगळ्यांची हळवी झालेली मन. आणि ते आजही हळवं करुन सोडणारे हवेहवेसे हळवे क्षण! क्रमश;
|
Abhijat
| |
| Wednesday, November 22, 2006 - 12:31 am: |
| 
|
खूपच सुन्दर! वाचताना मलाही माझे शाळेतले दिवस आठवले. पुढचा भाग आता लौकर येऊ दे.
|
आज आमच्यासाठी खास दिवस!फ़ेब्रुवारी १९८९! आम्ही आजचे उत्सवमुर्ती! आज आमचा निरोप समारंभ!दारावरच ईयत्ता ९ वी ची मुलं आमचे गुलाबाचे फुल आणि मोगर्याचा गजरा देऊन स्वागत करत होती.सनई वाजत होती. शाळेचे सभागृह छान सजवलेले. सगळेजण हळुहळु जमत होते. गप्पा सुरु होत्या. इतक्यात सगळे शिक्षक आणि मुख्याध्यापकांचे आगमन झाले. सोहळा सुरु झाला. आधी आमची मुलांची भाषणे. ४ थीच्या वेळच भाषण आणि आताच भाषण यात बराच फरक पडलेला. त्यावेळी बाईंनी आईनी तयारी करुन घेतलेलं, पाठ केलेलं भाषण होतं! पण आजचं थोडीशी तयारी केलेलंच पण तरीही बरचसं उत्स्फुर्त, अगदी आतुन आलेलं! या वळणावरुन आता आपले सगळ्यांचे मार्ग बदलणार. वेगवेगळ कॉलेज वेगवेगळ्या शाखा! याच भान आलेलं. आता ही इतकी घट्ट विण उसवणार हे जाणवुन गदगदुन आलेलं! ओल्या शब्दातलं ते ओलसर भाषण! मुलं मुली आणि शिक्षक इतकंच काय पण आजच्या वातावरणामुळे भारावुन जाऊन डोळ्याला रुमाल लावणारे शिपाईही आज आठवतात. अगदी ज्यांचा भरपुर मार खाल्ला त्या पी. टी. चे कडक सरांनाही हळुच पटकन डोळ्याच्या कडा रुमालानी टिपताना पाहिलं होतं आम्ही. शिक्षकांसाठी नेमेची येणारा निरोप समारंभ दर वर्षी प्रमाणे याही वर्षी होता. तरी का त्यांच्याही डोळ्यात पाणी येतं? का गुंतुन जातो आपण सारेच असे? हे एक मोठ्ठ कोडं पडलेलं. पण उत्सवी वातावरणातही आता परतुन नाही यायचे आणि कदाचित नाही पुन्हा भेटायचे म्हणुन होणारी कलवाकालवही होती. कुठेतरी एक उदास शांतताही जणवत होती. आता शिक्षक बोलत होते. अम्हा मुलांच्या आठ्वणी काही विशेष आठवणी सांगत होते, पुढच्या आयुष्यासाठी शुभेCच्छा देता देता उपदेशाचे डोसही पाजत होते आणि करंदीकरबाई बोलण्यासाठी उभ्या राहील्या. पण दोन वाक्य झाल्यावर त्यांना पुढच बोलताच येईना. दाटुन आलेलं फक्त "यशस्वी व्हा" म्हणुन पुन्हा खुर्चीवर जाउन बसलेल्या डोळ्याला रुमाल लावुन! परिक्षा निकाल आणि आता महाविद्यालयिन जीवन सुरु झालं. गणवेशाची सक्ती गेली आणि आमच्यातली बरीचशी शिस्तही गेली. आता रोज कुठला वेगळा ड्रेस घालायचा ही नस्ती विवंचना मागे लागली. नव-नवे मित्र-मैत्रिणी मिळत गेले स्वभावानुसार ग्रुप जमत गेले. आता शाळेतलं कुणी रस्त्यात भेटलं की सुरवातीला जसं थोडंसं थांबुन--- काय म्हणत्येस? कुठलं कॉलेज? कुठली साईड? आणि वेळ? अशी विचारपुस होई, तेही हळुहळु कमी होत केवळ हाय-बाय पर्यंत आलेल. क्रमश:
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:23 am: |
| 
|
छाने मनिषा... शाळेतल्या आठवणी.. , नशिबवान तुला.. अशा छान बाई मिळाल्या...!!!
|
Varsha11
| |
| Wednesday, November 22, 2006 - 4:26 am: |
| 
|
खरच शाळेतले दिवस आठवले. छान मनिषा, पुठचा भाग लवकर येऊ देत.
|
मनिषा छानच गं. नविन ड्रेस कुठला घालावा हा खरचं रोजचा प्रश्न असायचा. choice खूप कमी होती म्हणून.
|
>>>ओल्या शब्दातलं ते ओलसर भाषण!...... उत्तम... >>>शिक्षकांसाठी नेमेची येणारा निरोप समारंभ... 
|
Asmaani
| |
| Wednesday, November 22, 2006 - 9:18 am: |
| 
|
खूप छान लिहिलं आहेस मनिषा!
|
Agadi manatala lihila ahes....
|
Neelu_n
| |
| Thursday, November 23, 2006 - 12:10 am: |
| 
|
>>>ओल्या शब्दातलं ते ओलसर भाषण! व्वा मनिषा सुंदर!! पुढचे टाक की लवकर.
|
छान लिहल आहेस. अशीच लिहित जा.
|
Smi_dod
| |
| Thursday, November 23, 2006 - 5:24 am: |
| 
|
मनिषा..... छान माझे शाळेतले दिवस तरळले क्षणार्धात...
|
धन्स लोपा.वर्षा, श्रश्रीकुल,इंद्रा, अस्मानी, मराठी माणुस,निलु, विद्या, स्मि. खरच धन्यवाद माझा उत्साह वाढवलत. मी खुप वर्षांनी काहीतरी लिहीलय. जवळ जवळ एका तपानी म्हणा. आभार. उद्या संपवुन टाकीन. आजच लिहित होते पण तेवढ्यात दुसरंच काहीतरी सुचलं मग तेच लिहुन टाकलं, ललित मधेच लिहिलय तेही. जमलं तर तेही वाचा. }
|
Jayavi
| |
| Thursday, November 23, 2006 - 6:51 am: |
| 
|
सुरेख! मनिषा..... फ़ारच मस्त! छान फ़ुलोरा फ़ुलतोय तुझ्या लेखनाचा
|
मनिषा.. धमाल लिहिलयस.. मजा आली
|
मनिषा अगदि दहावीचा निरोपसमारंभ डोळ्यासमोर आला छानच लिहिले आहेस
|
Maku
| |
| Monday, November 27, 2006 - 12:05 am: |
| 
|
Khup chan lihile aahe good
|
>>>>उद्या संपवुन टाकीन. आजच लिहित होते.... मनिषा????????????
|
अहो, मनिषाबाई,, कुठे आहात?
|
Princess
| |
| Monday, November 27, 2006 - 6:25 am: |
| 
|
मनिशा, खुप छान लिहिलय ग... मलाही माझी शाळा आठवली. आणि मग जुन फोटो बाहेर काधुन त्यतले चेहरे मी पण आठवुन पाहिले... आणि खरच ग... खुप लोकांची नावच आठवेनात . तू खरच पाणी आणलस डोळ्यात
|
|
|