Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
एक पाऊस न कोसळलेला ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » कथा कादंबरी » एक पाऊस न कोसळलेला « Previous Next »

Mrudgandha6
Tuesday, November 21, 2006 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पहिलाच प्रयत्न आहे.कमीजास्त समजून घ्यालच :-)

"एक पाऊस.. न कोसळलेला.."


हवेत कमालीचा गारवा पसरला होता.. नुकताच पाऊस पडून गेलेला.. बाहेर पागोळ्या गळत होत्या.झाडांतून पाणि टपकत होते..जणू झाडे आसवं ढळत होती.पागोळ्यांच्या आवाजाचा जोर मघापेक्षा कमी झाला होता पण,रातकिड्यांची किर्किर मात्र वाढली होती.कुठूनसा एक काजवा तिच्या खिडकीत येऊन बसला..एरव्ही तिला कोण आनंद झाला असता त्याला पाहुन..पण आज अजून तो दुर्लक्षित होता..तिच्या आवडत्या जागेवर,खिडकीजवळच्या टेबलवर कॉफ़ीचा कप केव्हाचा पडून होता.मघाशी वाफ़ाळलेली कॉफ़ी आता पार थंड होऊन गेलेली..मेहंदी हसनची"खुली जो आंख तो वो था न वो जमाना था" ही तिची आवडती गझल वातावरण आणखीच गंभीर बनवत होती.पण,तिचे लक्ष कुठे होते?ती केव्हाच भूतकाळात शिरली होती.तिच्या मनातही एक पाऊस सुरु होता..तिचा अंतस्थ पाऊस.. एक वादळ तिच्या आयुष्यात आले होते.. आणि तिला पार विस्कटून गेले होते.

पाऊस किती आवडायचा तिला.. आणि तोही..

तो.. पावासासारखाच..धीरगंभिर..पण तितकाच हवाहवासा..वादळे घेऊन येणारा..भरभरून येणारा..वाटले तर वाटेल तेव्हाढा बरसणारा.. नाहितर कितीही आर्जवे केली तरी न बरसताच निघून जाणारा..

पावसाळी संध्याकाळीच तर भेट झाली होती त्याची अन तिची..
ग्रीष्म संपत आलेला..वर्षेची चाहुल देत आकाश अभ्रच्छादित झालेले.. अशावेळची दुपार आणि संध्याकाळच्या सीमेवरील त्यांची भेट तिच्या समोर जशीच्या तशी दिसू लागली..

तिचा best friend अमृत त्यानेच तर आज बोलावले होते तिला.ती तिथे पोहचली तेव्हा अमृत बरोबर तोही होता. आमृतने ओळख करून दिली..

"हे मधू meet my best friend आविष्कार"
"आणि अवि she is my sweet angel माधवी"

दोघेही एकमेकांना हस्तांदोलन करत किंचीत हसले..जणू ते एकमेकांना आधीच ओळखत होते.त्याही नजर तिच्या हृदयाचा ठाव घेत कधी आत्म्यापरयन्त पोहोचली तिलाही कळले नसावे.

ती जणु परी आणि तो परिकथेतील राजकुमार. जितकी ती सालस,सद्गुणी,हळवी, तितकाच तोही हुशार,कष्टळू,कमी वयातच उत्तुंग शिखरे गाठली होती त्याने.गर्भश्रिमंत असुनही वागण्यात विनय होता..कुठला गर्व नव्हता.स्वकर्तुत्वावरच त्याचा अधिक भर असायचा.

नव्या मैत्रीच्या पहिल्या दिवशी पहिला एकत्र कॉफ़ीचा कप समोर आला आणि त्याचा पहिला घोट घेताना मृगाचा पहिला पाऊस कसा टपटपा बरसायला लागला.. बघता बघता मृद्गंध दरवळू लागला.ऊर भरून घेतला तिने तो सुवास...पहिल्या पावसाची मजाच काही औरच असते.

[क्रमश]







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators