Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 18, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through November 18, 2006 « Previous Next »

Swaatee_ambole
Friday, November 03, 2006 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केला केला मिलिंदा. :-)
आता पोस्ट्स पण मीच हलवू का?


Swaatee_ambole
Friday, November 03, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सख्या, थांब ना, झोकणे सोड आता
असे झोकुनी झिंगणे सोड आता!!

न हातात प्याला तुला नीट धरवे
किती फोडले!! फोडणे सोड आता!!

अरे हा महामार्ग.. येथे पसरशी?
वहाने वृथा अडवणे सोड आता

कसा तू निपजलास दिवटा, कळे ना
पुरे रे, दिवे लावणे सोड आता

तुझे बोलणे ना समजते कुणाला
नको ओरडू.. बरळणे सोड आता..!!


Gajanandesai
Friday, November 03, 2006 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे कशाचे विडंबन आहे?

Gurudasb
Friday, November 03, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सख्याच्या चांगुलपणाचं बरं का गजाभाऊ .

Gajanandesai
Friday, November 03, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मूळ गाणे कोणते आहे असे म्हणायचे होते गुरुकाका.
मूळ गाण्याच्या लिंक साठी मी सगळ्या निळ्या शब्दांवरून उंदीर फिरवून बघितला.

पण स्वतंत्र वाचायला पण चांगले आहे स्वाती.

सापडले सापडले. आता मी तरी कशाला सांगू मूळ कविता / गज़ल
इथे आहे म्हणून! :-)

Sarang23
Tuesday, November 07, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, आता दारू हा विषय काढलाच आहेस तर...

ही मुळ कवितेची
लिंक
कुठलंही वृत्त नसल्यामुळे मीही ती सुट घेतली आहे... :-)

माझा दारूनामा...

मी पिल्यावर बाटलीसाठी कुणी रडू नये...
बाटल्यांच्या नावाखाली, भांडण माझ्याशी काढू नये...

बांधावी मजसाठी, देशी बाटल्यांचीच चिता
रम आणि व्हिस्कीचा सहवास मला कधीच घडू नये... (वास आवडत नाही :-))

व्हावा मोकळ्या कुरणात, माझा टांगा पलटी
उगाच लेझीम खेळत खेळत, नाल्यामध्ये पडू नये...

पळावी मोकळ्या हवेत, माझ्या पायाखालची कुत्री
अशावेळी माझ्यासारख्याला शहाण्यानेही नडू नये...

मी झोपल्यावर काढाव्या सगळ्यांनी बाटल्या आनंदात
माझ्या पिण्याने कधीही, कुणाचे काही अडू नये...

मी पिल्यावर बाटलीसाठी कुणी रडू नये...

Devdattag
Wednesday, November 08, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, सारंग मस्तच..:-)
मूळ गाणे:
भरून भरून
डोक्यास धरून चॅपल आलाय
कुठल्या वटीन जड जड झालय
विंडिजचा आला दौरा, दरदरून घामाच्या धारा
झाला त्रास झाला भरला रे कापरा

तुला कंचा गोट्या देऊ काही देऊ काही रं
जरा सराव थोडासा करून घे तू ह्याचा आधी रं
कोण वाईड टाकुन जाई आणि उगाच देई बाई
ठेउन झुल आता, आरी थोडी वापरा

दादा निघुन जाताच राहुल आता झाला भाई रं
वीरु उगाच वेडा सच्यास पुसतो काही बाही रं
कशी पहिली घेऊ धावं, मला काहीच नाही ठावं
सरत्या कुंतलांचा, आहे हा छोकरा

बघ म्हमद्या आणिक रैना दोघे पळती भारी रं
त्यांच्या बॅटीला बॉलही लाजून पळतो दूर काही रं
एकदुजाला खो हे देई, अन पटकन परतून येई
हाती काय येई, ट्रॉफ़ी ना, ठोकरा
-देवदत्त

Psg
Wednesday, November 08, 2006 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्हावा मोकळ्या कुरणात, माझा टांगा पलटी
उगाच लेझीम खेळत खेळत, नाल्यामध्ये पडू नये...
मस्तच सारंग!!

देवा, पॉश!! सही झालय


Indradhanushya
Wednesday, November 08, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग मस्तच
टांगा लेझीम... ह. ह. पु. वा.


Swaatee_ambole
Wednesday, November 08, 2006 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, देवा, सहीच रे.

Swaatee_ambole
Friday, November 17, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनीच्या
ह्या मस्त कवितचं हे विडंबन.. अर्थातच तिची क्षमा मागून.

खंत

कालच्या मारामारीचे
वळ अजून ताजे होते
कोण जाणे कुठले हे
नवे शत्रू माझे होते

मी ही फार प्यायलो नव्हतो,
रस्त्यात ओल कुठेच नव्हती,
तरी दोन दात पडलेले
काय लागली ठेच होती?

मार खायची सवय आहे,
त्याचं फारसं दुःख नाही
खंत याची की मारणार्‍याचा
चेहरासुद्धा आठवत नाही!!


Ashwini
Friday, November 17, 2006 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, मस्त. मार खाणारेस पण तू आता...

Daad
Friday, November 17, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, देवदत्त, स्वाती धम्माल आली... मस्तच!!

Kmayuresh2002
Friday, November 17, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,देवा,स्वाती सगळ्यांचीच विडंबने जबरी... मजा आ गया

Vaibhav_joshi
Friday, November 17, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !!!! देवा , सारंग ... मस्तच ....
स्वाती ... मस्त ... तुला दारुड्यांची मनोगतं इतकी कशी कळतात गं ?
:-)


Psg
Saturday, November 18, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती शेवटचं कडवं सही आहे :-)

Jayavi
Saturday, November 18, 2006 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, अगदी तुझाच प्रश्न मी स्वातीला विचारणार होती :-)
बाकी मस्तच झालंय विडंबन!

देवा, सारंग, सही चाललंय!


Swaateemumbhai
Saturday, November 18, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हीहीहीही वैभव..

स्वाती खरच लाजवाब. बहुत मजा आ गया.


Indradhanushya
Saturday, November 18, 2006 - 4:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती विडंबन झकास
>>>>तुला दारुड्यांची मनोगतं इतकी कशी कळतात गं ?
वैभव... मनबेवडा अस काहीसं म्हणतात ना...

Sarang23
Saturday, November 18, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे... स्वाती सहीच
फक्त मारामारी ऐवजी हाणामारी केलसं तर...
म्हणजे बघ, मारामारीत दोन व्यक्ती एकमेकांशी भांडत असतात... पण हाणामारीत एक जण मार खात असतो आणि एक किंवा अनेक जण मारत असतात :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators