अरे कुठे गायब झालेत सर्वजन फ़राळ आणि फ़टाके अजुन संपले नाहीत का
|
पौर्णिमेच्या रात्रीची, काही औरच होती बात, तुझ्या माझ्या मिलनाला, होती चांदण्यांची साथ रुप...
|
हातात हात घेतलास तेव्हा स्वप्नातच गुंतले मी कोणास ठाउक तेव्हापासुन, माझ्यात कित्तिशी उरले मी??? रुप...
|
सतत तुझ्या विचारात, दिवस मावळुन जातो तुला सांगु म्हणता म्हणता विचार बदलुन जातो रुप...
|
माझ्या प्रत्येक कृतीत तुझाच आभास आहे, आणि हृद्यातल्या श्वासात फ़क्त तुझीच आस आहे रुप...
|
रुपाली दिवाळी जोरात साजरी झाल्याचा परिणाम का ग हा? ... मस्त य लिहि ग अजुन..!!!
|
Neelu_n
| |
| Wednesday, October 25, 2006 - 4:01 am: |
| 
|
रुपाली खरच दिवाळी अगदी जोरातच साजरी झालेली दिसतेय. पण आता अमावस्या गेली पौर्णीमा यायचीय. बाकी मस्तयत चारोळ्या...
|
ह्म्म्म्म रुप्स! ऑफीसात काम करतेस ना ग? राहुलला ऐकवल्यास ना सगळ्या?
|
रुपाली एकदम छान....... दिवाळी जोरात साजरी झालि का अरे आणि बाकि सर्व जण कोठे आहेत
|
पुस्तकात काल मिळाल्या गुलाबाच्या पाकळ्या जपलेल्या थोडावेळ मनात जागल्या आठवणी त्यात लपलेल्या
|
Meenu
| |
| Thursday, October 26, 2006 - 5:17 am: |
| 
|
दाट काळोख पडला की नाही करणार सोबत कुणीही .. हो ! अगदी तुझी सावली असेल तरीही ..
|
लोपा, नीलुताई, भ्रमर, निलेश धन्स. पण खरच असे काहीच नाहीय. ह्या सगळ्या चारोळ्या दिवाळी अगोदर केलेल्या आहेत. लाडु अणि करांजीत घालयला नकोत का??? निलिश, मीनु मस्तच चारोळी.
|
अग सावलीच ती फ़क्त प्रकाशापुरतेचे तिचे अस्तित्व काळोख़ातल्या उदास मनाला फ़क्त आठवणींचा आधार रुप…
|
अंधाराशी सूत जमले की प्रकाश लागत नाही मन आधाराला तेव्हा सावली पण मागत नाही तुषार जोशी, नागपूर
|
Daad
| |
| Thursday, October 26, 2006 - 9:59 pm: |
| 
|
जेव्हा मन बुडतं घन प्रकाशाच्या डोही तेव्हा सावलीच काय पण, कायाही रहात नाही -- शलाका
|
Daad
| |
| Thursday, October 26, 2006 - 10:41 pm: |
| 
|
सावल्यांच्या कुंतलांतून बोटं सायं-तेजाची फिरतात... तेव्हाच रात्रींच्या उदरांत गर्भ सुर्याचे संभवतात --शलाका
|
R_joshi
| |
| Friday, October 27, 2006 - 4:30 am: |
| 
|
अरे वा! झुळुकेवर आतिषबाजी होतेय. फारच छान लिहिता आहेत सगळे. सावली असते फार लबाड पाठशिवणिचा खेळ खेळते अंतरंग माझे ती माझ्यासमवेच उलगडते. प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, October 27, 2006 - 4:35 am: |
| 
|
तुझे हासणे तेजाचे तुझे लाजणे दिप्तीचे मिळतिल का मज कधी भाव बंध हे स्पर्शाचे प्रिति
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 4:39 am: |
| 
|
तव पदराची सावली देहाला माझ्या स्पर्शते चंद्रचांदण्यांची भिती सैल मनाला बिलगते..
|
R_joshi
| |
| Friday, October 27, 2006 - 4:39 am: |
| 
|
तुझी साथ लाभली चांदण्या रात्रिंसारखी अवचित दिसुन आठवणित जागणारी प्रिति
|