Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चित्रकविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » चित्रकविता « Previous Next »

Tusharvjoshi
Thursday, October 26, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tear Drop

डोळ्यात व्यथेचे थेंब
रणरणता रस्ता लांब
मी हळवा पाऊस होईन
तू भिजण्यासाठी थांब

तुषार जोशी, नागपूर


Lopamudraa
Thursday, October 26, 2006 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हळवा पाऊस होईन
तू भिजण्यासाठी थांब>>>... khup sundar.. tushaar..!!!

Rupali_rahul
Friday, October 27, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपर्ब तुषार, अगदी मनाला भिडलं...
लोपा, तु पण लिहि ग...


Shyamli
Sunday, October 29, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! .. .. .. ..
छानच...


Jo_s
Tuesday, October 31, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुषात चाललो, साथ देत एकमेका
झालो एकरुप जणू, ह्रुदयांचाही एकच ठोका
सांग सखे असे कसे, सोसतेस तू हे सारे
आनंद दु़ :खांचे ग माझ्या, तुच वाहतेस भारे
सारख्याच जणू आता, भाग्यरेखा आपल्या भाळा
लागे ठेच माझ्या पायी, आणि पाणी तुझ्या डोळा

सुधीर

Lopamudraa
Tuesday, October 31, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनात नभ साचले..
सांग सखी अवचीत आज
डोळ्यात पाणी का साठले..
ज्या लोचनात सप्तरंगी..
भविष्य मी पाहिले..
का ग ते स्वप्न असे गोठले..
दे सोडुन जगाचे आरोप
जर नाही पटले...
काय बिघडले कुणी
स्वप्नास आपल्या हसले?
थोडी वाजली.. दुख्:ची पाउले
का झालीस उदास माझ्या छकुले..
कोसळुनही सर मनमोर..
वसंतात का नाही नाचले..
बेधडक झुंजीत..
दोन घाव वर्मी लागले..
का लगेच अनमोल हे थेंब
नयनी तुझ्या पाझरले...!!!



Vaibhav_joshi
Wednesday, November 01, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार .. मस्त रे
सुधीर ... सांग सखे असे कसे सोसतेस तू हे सारे ही ओळ फार आवडली आणि शेवट एSSSSSSSSSSकदम खास

लोपा .. दे सोडून जगाचे आरोप ... सही


Jo_s
Wednesday, November 01, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव धन्यवाद

लोपा मस्त....

सुधीर

Chinnu
Wednesday, November 01, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार, लोपा, सुधीर खुप खुप छान..
लोपा,
कोसळुनही सर
मनमोर का न नाचले
अस हवं होत का?

सुधीर भारे शब्द खटकला थोडा, बाकी छोटेखानी कविता मस्त!
तुषार, एकदा ती थांबली म्हणजे भिजलीच समजा! :-) Just Kidding! हळवा पाउस छान आहे.


Shyamli
Wednesday, November 01, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा.....
तुशार काय छान
>>> मी हळवा पाऊस होईन
तू भिजण्यासाठी थांब >
सुधीर क्या बात है....
ह्म्म वैशाली
सहिच आवडल ग


Dhund_ravi
Thursday, November 02, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळ्यातला हा थेंब पाहुन माझीच एक जुनी कविता आठवली…

पाऊल वाट ती भरली होती
स्पर्श आंधळ्या काट्यांनी
क्षणात केली पापणी ओली
शब्द कोंडल्या ओठांनी

जिवास वाटे तिची काळजी
ते काटे तिजला टोचु नये
पापणी ओली, मी घट्ट मिटतसे
ती वेदना नयनी साचु नये

मिटुनी नयनी तिजला घेता
ते काटे मजला पाकळ्या वाटे
फ़िरुन पहावे वाटेवर तर
फ़ुलही नव्हते नव्हते काटे

मला न दिसले काटे कारण
रक्तात भिजुन ते वाहुन गेले
मज पायांन स्पर्श न करता
तिच्या हातांवर राहुन गेले

धुंद रवी


Dineshvs
Thursday, November 02, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपाताई, आजकालच्या जगात ईतके हळवे होवुन चालत नाही. दोन घेतले दोन दिले, असे धोरण ठेवावे.
आणि श्यामली, हल्ली फक्त प्रतिक्रियाच का ?


Lopamudraa
Friday, November 03, 2006 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश्दा.. thank you.. !!!
सुधिर,वैभव,श्यमली,चिनु... धन्यवाद..
धुंद रवी खुप छान.. मस्त..!!!
क्षणात केली पापणी ओली
शब्द कोंडल्या ओठांनी....


Jo_s
Friday, November 03, 2006 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिनू, श्यामली, धन्यवाद

Dhund_ravi छानच आहे .....

सुधीर



Jayavi
Saturday, November 04, 2006 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार...... हे तुझ्या हळव्या पावसाला उत्तर :-)

भिजण्यासाठीच थांबलेय रे
तू कोसळणार कधी....
वाट पहातेय केव्हाची
तू बरसणार कधी?


Kiru
Thursday, November 16, 2006 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुषार..! क्या बात है!
बर्‍याच दिवसांनी आलास. मस्त वाटलं
सुधीर, लोपा, रवी.. खूप छान..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators