|
Giriraj
| |
| Thursday, October 19, 2006 - 6:42 am: |
| 
|
Sweet Romance.... गाण्यांच्या बद्दल लिहायचं म्हटलं की शब्द आपसूकच मदतीला धावून येतात.पण ज्यात शब्दच नाहीत अश्या एखाद्या Instrumental Piece बद्दल काय लिहावे हेच सुचत नाही.आपल्या भारतात मुळातच संगित म्हटले की चित्रपटसंगित नजरेसमोर येतं.जर भारतिय शास्त्रिय संगिताबद्दल अगदीच अंधार असेल तर वाद्यसंगित कुठून माहीत होणार!काही वर्षांपूर्वी अगदीच नादावलेल्या वयात एकदा दुकानात असाच TP करत असतांना त्या वयाला भुलावणाऱ्या नावाची एक cassette दिसली. Sweet Romance! कव्हरवरच्या सुंदर प्रकाशचित्रानेही मन मोहून घेतलं!cassette उचलून पाहिली तर त्यातल्या sweet romance या एका गाण्याने एक आठवण जागवली.शेखर सुमनच्या Movers & Shakers या कार्यक्रमात पं.शिवकुमार शर्मा यांच्या मुलाची म्हणजेच राहुल शर्माची मुलाखत घेतली होती.कार्यक्रम संपताना त्याने ह्याच गाण्य्यातला(?) छोटासा भाग संतूरवर वाजवून दाखवला होता.अगदी captivating वाटला होता मला तर! लगेच cassette घेतली.अश्या खरेदीची गंमत अशी की मला लगेच ती ऐकायची असते. कपडे खरेदी असेल तर घरी जाताच ते वापरायचे असतात.कधी कधी तर मी दुकानातूनच असे कपडे,चपला तश्याच घालून निघतो.त्यावेळी माझ्याकडे एक डबडा टेप होता.पण त्यावरही काम भागत असे.टेपवर Reverse / Forward काम करत नसेच.दुसऱ्या ्बाजूच्या असलेले sweet romance ऐकण्यासाठी पूर्ण cassette हाताने forward करावी लागली.बी साईडला प्रथम येते ते 'मेला'! टिपिकल गावच्या जत्रेवरून कम्पोज़ केलेलं हे गाणं अगदीच ताल धरायला लावतं.मात्र मला नंतर काही कामामुळे थोडा वेळ बाहेर जावं लागलं.संध्याकाळी परत येताच पहिलं काम पुन्हा कॅसेट ऐकणं.धुळ्यासारख्या ठिकाणची हिवळ्यातली सरती संध्याकाळ!खूपच गारवा हवेत होता.मी दूध गरम करून त्यात मस्तपैकी नेसकॅफ़े टाकून पुन्हा टेप लावून बसलो.अश्या वेळी अगदी मंद प्रकाशात संगित ऐकायला मला जाम आवडतं.पुढचं कम्पोज़िशन होतं Remembering Her!याची सुरवात होते अतिशय विरही स्वराने.उगाच कुणाची तरी आठवण आल्यासारखं मलाही वाटू लागलं.आवाज जरा मोठा करून मी बाहेरच्या ओट्यावर येऊन बसलो.आजूबाजूला अगदीच शांतता होती.थंडीमुळे कुणी बाहेरही पडत नसतं.अश्या वातावरणात संतूरचे सूर अधिक आत घुसत गेले.एका आर्त नोटवर ते कम्पोज़िशन संपले.दोन ट्रॅकमधली रिकामी जागा खूप लांबली असल्यासारखी वाटू लागली.आणि अचानक त्याच संतूरचे अतिव आनंदी स्वर कानावर पडले.संध्याकाळच्या वेळी आपल्या प्रिय माणसाची वाट पहात बसावं.माहीत असावं की ते माणुस येणार नाही.आणि अचानकच त्याचं येणं व्हावं.तीच भावना होते Sweet Romance हा ट्रॅक ऐकतांना.remembering her सारख्या उदास ट्रॅकनंतर आल्याने sweet romance अधिकच प्रभावी होते.संतूरचे स्वर खरं तर मला खूपच आवडतात.त्यात का कुणास ठावूक एक खूप मोकळेपणा वाटतो.सनई एका अर्थाने दुःखाचे प्रतिकात्मक स्वर घेऊन येते.त्याच्या अगदी उलट म्हणजे उत्कट आनंदाचे स्वर असणारे संतूर!(अर्थातच या माझ्या स्वतःच्या समजुति आहेत.)हा आनंद संयत असा नसतो तर अगदी नाचायला लावणारा आनंद!हिरव्यागार टेकडीवरच्या चढ-उतारांवरून पळापळ करत दमून जावे यातही एक आनंद असतो.अगदी तसेच वाटतात मला sweet romance चे स्वर! खरं तर हे नीट व्यक्तही करता येत नाही आणि शब्द नसल्याने त्याबद्दल लिहिताही येत नाही. पण खूप काही सांगावसं वाटतं.पण नाविलाज को क्या विलाज! तुम्ही ते ऐका स्वतःच!अल्ल्ड वयात तिच्या जवळपास असण्यानेही हुरळून जावे,तिच्या ओझरत्या नेत्रकटाक्षानेही हवेत उडायला लागावे,ती लाजली तर जीवच द्यावासा वाटावे,अचानक पाऊस यावा,तिने भिजत असता तिला आपल्या छत्रीत घ्यावे,तिचा ओझरता स्पर्श व्हावा,मग आपण उगाच तिच्या हाताला स्पर्श करावा,तिने लाजून चूर व्हावे आणि मग सारे जगच पावसात विरघळून गेल्यासारखे आपण दोघेच उरावे.. असाच हा पहिल्या प्रेमाचा स्पर्श.. A Sweet Romance! गिरीराज
|
Yog
| |
| Thursday, October 19, 2006 - 11:57 am: |
| 
|
"पुढील भागाची" आतूरतेने वाट पहात आहे... 
|
Shonoo
| |
| Thursday, October 19, 2006 - 1:09 pm: |
| 
|
आता त्या सगळ्या पीसेस ची MP3 करून टाका पाहू लवकर. इथल्या बर्याच पिकू लागलेल्या पानांना परत हिरवाई येईल! काय सुरेख लिहिलंत! गाणं ऐकण्याची असोशी पण फार छान टिपली आहे.
|
Prajaktad
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:45 pm: |
| 
|
अश्या खरेदीची गंमत अशी की मला लगेच ती ऐकायची असते. कपडे खरेदी असेल तर घरी जाताच ते वापरायचे असतात>>>>मी पण अशीच होते शाळा,कॉलेजात ... दमच निघायचा नाही. आईचा ओरडा खावा लागायचा " अग देवापुढे तर ठेव " . गिरि छान लिहलस.. गाणी तुझा weekpoint दिसतोय.
|
Saurabh
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:39 pm: |
| 
|
सही रे! मला अशीच एक आवडलेली instrumental म्हणजे Deeper Zones . अजय पोहनकर आणि त्यांचा मुलगा (अभिजीत) ह्यांची आहे. त्यातल्या मला आवडलेल्या रचना (अब तो आओ साजना आणि मनबसिया निभाओ मारी प्रीत) देखील पहाडी रागातल्या आहेत. ( आत्ताच नेट वरुन कळले की sweet romance देखील मिश्र पहाडी मधे आहे)
|
गिरी मस्त लिहिल आहेस. मला पण का कुणास ठाऊक सनईचे स्वर उदास आणि संतुरचे आनंदी वाटतात.
|
Bee
| |
| Thursday, October 19, 2006 - 11:23 pm: |
| 
|
गिरिराज, खरच सुंदर लिहिलं आहे! शोनूचे ऐक आणि आम्हाली हा आनंद मिळू दे :-) रचना, खरच गं.. असच वाटतं मलाही..
|
गिरी,मस्त लिहिलयस रे.... खरय रे सनईच्या स्वरात एक प्रकारची आर्तता असते... आणि संतुर म्हणजे आनंद,ऊल्हास
|
Gs1
| |
| Friday, October 20, 2006 - 12:47 am: |
| 
|
गिरी छानच लिहिल आहेस. पण काही वर्षांपूर्वी अगदीच नादावलेल्या वयात या वाक्यातून आताचे वागणे तसे नाही असे लेखकाला आडुन आडुन सुचवायचे आहे काय ? कृपया खुलासा व्हावा.
|
|
|