पूनम.. thank you कभी कभी यु भी हमने अपने जी को बहलाया है.. जिन बातोको खुद नही समझे औरो को समझाया है..!!! प्रिति.. तु छान लिहितेस लिहित रहा... thanks ग
|
ह्म्म्म्म, लोपा! सहीच. श्यामली, जास्वंद.. मस्तच!
|
Arch
| |
| Friday, October 13, 2006 - 11:07 am: |
| 
|
गुलाबाच्या पाकळ्या झाकत होत्या कुंदकळ्या नजरेने मात्र तिच्या उधळून टाकल्या सगळ्या
|
Yogy
| |
| Friday, October 13, 2006 - 4:04 pm: |
| 
|
पाकळ्या गुलाबाच्या नजरेने मात्र तिच्या उधळून टाकल्या सगळ्या झाकलेल्या कुंदकळ्या
|
गुलाबाला काटे असतात याचच भान राहत नाही.. घसरलाय हात देठावर हे काटा बोचल्या शिवाय समजतच नाही
|
उगा सोबतीस शोधण्याचा प्रयास माझा उगाच हा वांझ चाललेला प्रवास माझा
|
Meenu
| |
| Monday, October 16, 2006 - 5:59 am: |
| 
|
तुझी मी आता आठवणही टाळते स्वप्नात आलास तर काय ..? या भीतीनं रात्र रात्र जागते
|
Devdattag
| |
| Monday, October 16, 2006 - 6:17 am: |
| 
|
दोष माझा नसे की मी टाळले आठवांना त्या ग्रीष्मास हि विचारा ज्याने जाळले दवांना
|
R_joshi
| |
| Monday, October 16, 2006 - 7:00 am: |
| 
|
तुझी आठवण मनात एवढ्या खोलवर रुतली जाई-जुईच जणु माझ्या प्रेमांगणात फुलली प्रिति
|
R_joshi
| |
| Monday, October 16, 2006 - 7:05 am: |
| 
|
माझे मीपण जगताना तु नेहमी अलिप्त राहतोस सुख सगळ्यांशी वाटतोस मग दु:खात एकटाच का अश्रु ढाळतोस प्रिति
|
R_joshi
| |
| Monday, October 16, 2006 - 7:08 am: |
| 
|
तुझ्या आठवणि पुसण्याचा मी प्रयत्न खुप केला या प्रयत्नांनीच अनेकदा घायाळ मला केला प्रिति
|
वा!! अर्च,वैभव,मीनू,देवा,.. छानच... प्रिती,.. छान ग.. पण,शेवटच्या चारोळीतील "घायाळ केला" हे चुकीचे वाटतेय त्यापेक्षा असे लिही.. "तुझ्या आठवणी पुसण्याचे मी प्रयत्न खूप केले या प्रयत्नांनीच अनेकदा घायाळ मला केले.."
|
R_joshi
| |
| Monday, October 16, 2006 - 7:34 am: |
| 
|
तु मातीचा ओला सुवास दवबिंदु मी झाले बाहुपाशात तुझ्या मी सर्वाथाने विरघळले. प्रिति
|
R_joshi
| |
| Monday, October 16, 2006 - 7:42 am: |
| 
|
म्रुदुगंधा सल्ल्यासाठी आभारी आहे.
|
होता विश्वास ज्यावर तो आरसा खरा वाटत नाही आता मला पूर्वीची माझी ओळख पटत नाही
|
सार तुझ आभाळ सखे चांदन्यांणी भरलेले.. अन आभाळा एवढे रितेपन माझ्या मनात उरलेले....
|
आठवणींची सोबत घेउन मन तुझ्याकडे धावत... ओळखीच्या वळणांवर वेड तुलाच शोधत राहत...
|
स्वप्नात चन्द्र घेउन तु त्यात पुरती हरवलेली सवयीन माझी पापणी मग ओल्यानेच मिटलेली...
|
निलेश, आभाळाचे रितेपण,आणि ओल्या पापण्या खासच..
|
Meenu
| |
| Tuesday, October 17, 2006 - 6:14 am: |
| 
|
कधीही आभाळ भरुन येतं वेळ नाही काळ नाही .... अन क्षितीज झाकोळुन टाकतं अचानक कधी सुटतो, सोसाट्याचा वारा कधी अचानक कोसळतात, शुभ्रशा गारा तसाच असतो तुझ्या, आठवांचा मारा वेळ नाही नी काळ नाही .....
|