भिंती बांधत गेले पण घर नाही मिळाले.. फ़ुंकर घालत गेले.. तरी रोज काही तरी जळाले..
|
असु देते आता मी वादळाला तसेच दारात पडुन.. मग ती अस्वस्थ झुळुक तशीच निघुन जाते दारा पुढुन...!!!
|
Manmouji
| |
| Wednesday, October 11, 2006 - 5:54 am: |
| 
|
कधि क्षुल्लक गोश्टीनीही उठते ह्रुदयात कळ कधि झुळुकही भासते जसे एक वादळ
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 5:59 am: |
| 
|
छोट्याश्या झुळुकीचच होत असतं वादळ सांभाळता येत नाही जेंव्हा स्वप्नातली गदळ श्यामली
|
Meenu
| |
| Wednesday, October 11, 2006 - 6:06 am: |
| 
|
बघ म्हणलं ना चांदणं आहे तुझ्याच मनात कशाला त्याला शोधत फीरतेस ईथे तिथे आड रानात बघ ना आपलेच शब्दसुद्धा आपल्या भावनांचे गुलाम नाहीत आवाज दिला की सलाम मारायला तेही तयार नाहीत तु मात्र उगाच भावनांची गुलाम होतेस पुन्हा पुन्हा का बरं त्यांना शरण जातेस
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 6:13 am: |
| 
|
आहेच ग चांदण पण स्वच्छ नव्हते इतके जपत होते मी उगाच पण ढग निघाले सगळेच वांझोटे श्यामली
|
आवरत नाही हुंदका..तर दुख्: थोड उधार द्यायचं उजाडत नाही तोवर रात्र संपायची वाट बघत बसायचं..!!!
|
लोपा,काय बहर आलाय..वा!! मनमौजी,मीनू,श्यामली..खुप छान
|
तुच हसत उभा दिसे.. झाले मन अनुरागी.. तु घडीभर स्पर्शात भासे.. झाले तन अनुरागी.. साक्षात समोर दिसे तु असा.. हरवलेला माझा कण कण जसा..!!!
|
लोपा, "साक्षात समोर दिसे तु असा.. हरवलेला माझा कण कण जसा..!!! ".... अग किती छान लिहावे माणसाने..पुरे पुरे...
|
Jayavi
| |
| Wednesday, October 11, 2006 - 10:03 am: |
| 
|
क्या बात है लोपा..... वा मान गये!
|
श्यामली, म्रुदगंधा... जया... भगिनिंनो... इतकी स्तुती नका करु...ग..( thank you ..... ह...)लिखो और लिखने दो... ..
|
Krishnag
| |
| Thursday, October 12, 2006 - 1:25 am: |
| 
|
ते तुझे रागावणे..... तुझे ते रुसणे असते कळते पण वळत नसते मनाला समजावणे तुझे तुलाच अवघड जाते म्हणुन स्वतच स्वतला त्रास करुन घेणे असते माझ्याकडे बघायचे असते पण डोळ्यांच्या कडांवर कुंपण घालते आसवांच्या लोटांना आतल्या आत थोपवते हे तुझे त्रासुन घेणे मग मलाही सतावून जाते डोळ्यांच्या आरश्यात तुझ्या सगळे स्वच्छ दिसते तु कितीहि म्हटले तरी ते रागवणे नसते....... रुसव्याच्या आवरणाखालचे अनुरागाचे लपणे असते
|
Princess
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:02 am: |
| 
|
अरे लोपा नावाचे वादळ येउन गेले वाटते इथे. लोपा... काय छान लिहिलय ग... एक दिवसात एवढे कसे सुचते? श्यामली, ढग वांझोटे... सुरेख... खुप आवडले. खरतर, परिक्षेसाठी अभ्यास करतेय सध्या. म्हणुन मायबोलीवर फ़क्त वाचायलाच चक्कर मारते मी. पण... दाद दिल्याशिवाय राहवलेच जात नाही. आता दोन महिन्यांसाठी भुमिगत होइन..
|
R_joshi
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:44 am: |
| 
|
दाद तुला देण्यासाठी शब्द मला सापडत नाहित कविता तुझ्या वाचल्याशिवाय कधीच मला राहवत नाहि लोपा फारच सुंदर लिहितेस.
|
R_joshi
| |
| Thursday, October 12, 2006 - 4:48 am: |
| 
|
नक्षत्रांनी भरलेले आभाळ नेहमीच सुंदर भासते मनातले दु:ख लपण्याची हि त्याची कसब असते. प्रिति
|
Princess
| |
| Thursday, October 12, 2006 - 5:08 am: |
| 
|
लोपा वादळ बनुन येते अन गुलमोहोर हलवुन जाते.. झुळुका तिच्या वाचताना मी मात्र हरवुन जाते.. लोपा... प्रिती मस्तय ग
|
Jaaaswand
| |
| Thursday, October 12, 2006 - 5:30 am: |
| 
|
डोळ्यांत पापण्यांची जुंपेल तेव्हा स्पर्धा लाजून अश्रू जेव्हा संपून उरेल अर्धा जास्वन्द...
|
Shyamli
| |
| Thursday, October 12, 2006 - 6:28 am: |
| 
|
भले शाब्बाश राजे काय रे बसली का कीक?
|
Jaaaswand
| |
| Thursday, October 12, 2006 - 6:55 am: |
| 
|
हो श्यामली.. बहुदा बसली बहुतेक मनातल्या कळ्यांनी डोळ्यांत दार केले ह्या ओठांनी अनेकदा हास्यास ठार केले जास्वन्द...
|