Sharyu
| |
| Sunday, October 15, 2006 - 8:49 pm: |
| 
|
खुपच छान लीहीले आहे. पुढचे वाचायची उच्छुकता लागली आहे खुप.
|
Manuswini
| |
| Monday, October 16, 2006 - 1:24 am: |
| 
|
रचना खरेच छान गं मला सुद्धा हेच वाटते जीव गुंतवण्याचा, जीव ओतून टाकण्याचा स्वभाव हा वाईटच........ खुप त्रास होतो स्वःताला. आणी त्यात जर समोरची जवळची व्यक्ती कोरडी असेल तर आणखीन त्रास होतो कारण आपली मनाची आंदोलने त्या व्याक्तीला खरोखरच समजत नाही की जाणुन बुजुन ती व्यक्ती जाणुन घेत नाही हाच एक आणखी मोठा त्रास असतो काही म्हण आपल्या आई वडीलांना हेच वाटते जेव्हा आपण त्यांना सोडुन इथे येतो
|
Princess
| |
| Monday, October 16, 2006 - 1:44 am: |
| 
|
रचना, खुप सुरेख लिहिलयस तू... स्त्रिया भावनेला महत्त्व देणार्या तर पुरुष practical हे छान मांडता आलय तुला. संवाद तर अगदी सहजपणे उतरलेत. जणु काही आपल्या आजुबाजुला घडतेय ही कथा असेच वाटले मला.
|
Maudee
| |
| Monday, October 16, 2006 - 2:01 am: |
| 
|
रचना ख़ूप सुरेख़.... प्रियाला अनुमोदन
|
Bee
| |
| Monday, October 16, 2006 - 3:58 am: |
| 
|
रचना, माझी प्रतिक्रिया वाचून नाराज नको होऊस. मला नाही ही कथा, नाही तिचा आशय, नाही एकमेकांमधले संवाद, नाही कथेचा प्रवाह की नाही शब्दकळा.. कथेत नाविन्यता नाही! कुठल्याच कोनातून मला तुझी ही पहिला कथा असावी जी भावली नाही. एकतर अवी आणि वैदेही मधला अरेतुरेपणा खटकला. आजची पिढी जशी बिनधास्त आहे -- बायको एकमेकांना नावाने हाक मारते, अरेतुरे करते आणि नवरा तिला हो गं, नाही गं असे म्हणतो.. हे सर्व आत्ताच्या काळात चालणारे आहे. दुसरे म्हणजे, तू जो हळवेपणा दाखविला वैदेहीचा तो खूप common झाला आहे. त्याहून वेगळं काहीतरी अपेक्षित होतं. वडीलांचे त्यावरची उत्तरही तशीच.. कथा सो सो वाटली पण तू नियमित लिहिते त्याचे मात्र नित्यनेहमीप्रमाणे कौतुक :-)
|
Milindaa
| |
| Monday, October 16, 2006 - 5:47 am: |
| 
|
'पाश सुटत नाहीत' हेच थोडे पुढे नेले तर सगळ्या सासवा सुनांची भांडणे का होतात हे पण त्यात सहज कव्हर होईल चांगली मांडणी आहे!
|
Priya
| |
| Monday, October 16, 2006 - 8:09 am: |
| 
|
बी, तुझ्या प्रतिक्रियेवरची माझी प्रतिक्रिया वाचून नाराज नको होऊस. 'मला नाही ही ... ' हे जे दुसरे वाक्य आहे त्यात 'आवडली' हे क्रियापद विशेष कारणाने गाळले आहे का? नाविन्यता म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय? नावीन्य हा शब्द माहीत आहे पण नाविन्यता या शब्दाचा अर्थ कळत नाहीये. आणि हो - कुठल्याही कोनातून असा शब्दप्रयोग कधी ऐकल्या - वाचल्याचं आठवत नाहीये. 'दृष्टी'कोनातून माहीत आहे. इंग्रजीमध्ये from any angle हेही माहीत आहे. आई - वडिलांच्या वयाच्या नवरा - बायकोने एकमेकांना अरे - तुरे म्हणणे यात न पटण्यासारखे काय आहे? मुळात यात बिनधास्तपणाचा काय संबंध आहे? म्हणजे तुझे 'आजची पिढी जशी बिनधास्त आहे' हे विधान या संदर्भात असावे असे गृहीत धरले आहे. बरं, नवर्याने हो गं, नाही गं करणे यात काय वेगळे आहे? माझे वडिलही माझ्या आईला 'अग' म्हणतात आणि कल्पना कितीही ताणली तरी कुठल्याच निकषावर ते 'बिनधास्त' नाहीत. नवर्याने बायकोला 'अहो' म्हणणे निदान शहरी - माझी माहिती ब्राह्मणी कुटुंबातली आहे - कुटुंबात तरी केव्हाच बंद झाले असावे. हळवेपणा common झाला आहे म्हणजे काय? आणि आधी कधी नव्हता का? कुठे कॉमन झाला आहे? आणि तो जर कॉमन आहे तर तो कथेत आला तर त्यात आश्चर्य ते काय? कलाकृतीत माणसाच्या मनाचा, तत्कालीन समाजाचा संदर्भ येणं यात खटकण्यासारखे काय आहे? मुळात कथेची सुरूवात ज्या प्रकारे झाली होती त्यावरून वैदेहीची व्यक्तीरेखा लगेच लक्षात येतेच, मग 'त्याहून वेगळं' काय अपेक्षित असणार? ती हळवी असेल याचा अंदाज सुरूवातीसच येतो की! कथा अजिबात सो सो वाटली नाही, पण तुझी प्रतिक्रिया मात्र कथा समजून न घेताच लिहीलेली वाटली. प्रत्येक कथेत काही नवीन प्रयोग असणं आवश्यक आहे का? मिलिंदा - तुझं म्हणणं अगदी पटलं. हाच धागा पुढे नेला तर सासू झालेल्या स्त्रीला let go करणे अवघड होत असेल हे खरं तर सून असलेल्या स्त्रीला सहज समजायला हवे.
|
Sharyu
| |
| Monday, October 16, 2006 - 8:37 pm: |
| 
|
क्षमस्व मी 'अहंकार कथेची प्रतीक्रीया ईथे टाकली. (पुढचे वाचायची उच्छुकता) पण मला ही कथा ही खुप आवडली हं. खरेच स्त्री मन किती गुंतणारे असते ना.
|
रचना छान आहे गं गोष्ट नेहेमीसारखीच. बी फा. बु. वि. तु.
|
Savani
| |
| Tuesday, October 17, 2006 - 8:59 am: |
| 
|
रचना, खूप आवडली तुझी कथा. छानच.
|
Milindaa
| |
| Tuesday, October 17, 2006 - 11:38 am: |
| 
|
काय बी, तुझी आजची तिखट प्रतिक्रिया उडवलीस वाटतं?
|
Prajaktad
| |
| Tuesday, October 17, 2006 - 11:40 am: |
| 
|
रचना छान आहे कथा..
|
Kshipra
| |
| Tuesday, October 17, 2006 - 12:05 pm: |
| 
|
रचना, कथा आवडली. ..
|
Arch
| |
| Tuesday, October 17, 2006 - 1:13 pm: |
| 
|
रचना नेहेमीप्रमाणे छान. तुझी style शैलजा राजे किंवा जोत्सा देवधरांसारखी आहे. थोडक्या शब्दात मनाची पकड घेणार. 
|
खूप thanks सगळ्यांचे. गोष्ट वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया टाकल्याबद्दल मनापासून आभार..
|
Lajo
| |
| Tuesday, October 17, 2006 - 10:00 pm: |
| 
|
रचना, तुझी रचना अगदी उत्तम! डोळ्यात पाणी आले. आईँची आठवण आली. माझा नवराही एकुलता एकच. आई सुद्धा अश्याच हळव्या होतात आम्ही परत जायला निघालो की आणि पपा एकदम शांत होतात.. मी पहिल्यांदाच तु लिहिलेली कथा वाचली. छानच आहे. अशीच लिहीत रहा. तुला अनेक शुभेच्छा.
|
Sharyu
| |
| Wednesday, October 18, 2006 - 7:24 pm: |
| 
|
लाजो तु औस्त्रेलीया त कुठे आहेस? मी मेलबर्न मधे आहे. विशयांतरासाठी साॅरी. मराठीत लीहीणे बरेच अवघड आहे. सगळ्या कथा लीहीण्यार्रांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
|
Lajo
| |
| Thursday, October 19, 2006 - 12:10 am: |
| 
|
हाय शरयु, मी कॅनबेराला आहे. ९ वर्ष झाली मला इथे येउन. तु कधी आलीस मेलबर्नला?
|
Gs1
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:28 am: |
| 
|
रचना, सहजसुंदर कथा. प्रियाला अनुमोदन... >>>>>नेहमीच तुझ्या कथांमध्ये तू मनाची आंदोलनं अगदी अचूक पकडतेस आणि अतिशय साध्या, सुंदर भाषेत पण अगदी नेमकेपणाने मांडतेस. एकवेळ म्हातारीचा कापूस हातात येईल पण मन - तेही स्त्रीचं मन हे असं चिमटीत पकडणं फार अवघड आहे आणि तुला ते अगदी छान साधतं.
|
Giriraj
| |
| Thursday, October 19, 2006 - 6:55 am: |
| 
|
रचना,उत्तम! अगदी लहानसहान वाक्यांतून कथा अगदी जिवंत केली आहेस!
|
Upas
| |
| Thursday, October 19, 2006 - 3:43 pm: |
| 
|
कथा खूप आवडली.. खूप जवळची वाटतेय.. छान टीपलेयस आणि मांडलेयस मनं संवादाच्या माध्यमातून..
|
रचना एकदम छान मस्त लिहिले आहेस
|
Sharyu
| |
| Thursday, October 19, 2006 - 11:07 pm: |
| 
|
लाजो आम्हाला इथे येऊन ६ महीने झाले. मी सध्या घरीच असते. त्यामुळे मायबोली वरच पडीक असते. मला तुझा फोन नं. देउ शकते का?
|