श्यामली... देवाचा असतो गाभारा... एकटाच तीथे तो बिचारा.. पन.. आपण का विसरतो आपल्या भोवतीचा.. प्रकाश सारा...!!!
|
R_joshi
| |
| Friday, October 06, 2006 - 6:49 am: |
| 
|
तु मला दिसला पाहिजेच हा हट्ट मी देवाकडे धरत नाही माझी भक्ति अन त्याची प्रिति ह्यात काहिच फरक नाही प्रिति
|
R_joshi
| |
| Friday, October 06, 2006 - 6:59 am: |
| 
|
तुझा भास आणि माझा श्वास एकरुप असे होतात मिलनाच्या आतुर क्षणी ही प्रेमाची बरसात करतात प्रिति नीटस जमल नाही
|
हल्ली संध्याकाळ एकटी येत नाही …… तुझ्या भेटीची आस आणते जातान एकटीच जाते पण रात्र बनुन येताना ………… सोबतीला तुझे भास आणते! धुंद रवी
|
ह्या पावसाच्या उनाडक्या की ही मातीच मला छळतीये? ओलं ओलं होताना ती तुझ्या केसांचा वास आणते.. ……….. सोबतीला तुझे भास आणते! धुंद रवी
|
तुझ्या आठवणिंची आता मला भिती वाटायाला लागलीये संधिप्रकाश पडला की ती थरथरलेला श्वास आणते… ……….. सोबतीला तुझे भास आणते! धुंद रवी
|
माझ्या कवितेलाही तुज़ं किती वेड लागलय तु नसशील तिच्यात सामावलेली तर ती प्रत्येक ओळ उदास आणते…. ……….. सोबतीला तुझे भास आणते! धुंद रवी
|
धुन्द रवी ही.... कशाने धुंदी आली...!!!!!
|
Devdattag
| |
| Saturday, October 07, 2006 - 4:47 am: |
| 
|
वाकलेल्या झाडाला आता फक्त काड्यांचा भार आहे त्याच्याच बुंध्याशी उरला एकटा उदास पार आहे
|
वा!! छान लिहलय सगळ्यांनीच
|
ह्या टेक्निकल जमान्यात... ई- च्या भुताने तुला झपाट्लंय .. अरे भवनांना तंत्रन्यानात मांडायला निघालीस तु .. सांग कुठल्या रोबोट ने तुला पछाडलंय....
|
प्रश्न हा सगळ्यांना आहे माझा... इथे एकट्याला का मीळते नेहमीच सजा.. एकटा राह्तो म्हणून हिनावता का तुम्ही त्याला.. समजुन घ्या तुम्ही पण त्याचा एकटेपणाच्या करणाला
|
सुर्यकिरण तुझ्या चौकटीतल्या कवितेसाठी.... भावनेला कुठं बांधता येतं भाषेच्या रेशीमगाठीत? ....... जेंव्हा शब्दांचे पाश होतात मोकळे थरथरत्या ओठांनी, न बोलताही सगळ सांगुन जातात .............. मर्मबंधातले ठोकळे धुंद रवी.
|
अरे सुर्यकिरण काल शब्दांऐवजी नुसते ठोकळे दिसत होते... म्हणुन वरची कविता टाकली... पुन्हा एकदा तिथं ठोकळेच बघुन वाच रे बाबा. नाहीतर अर्थच लागयचा नाही... धुंद रवी
|
क्षणा क्षणांनी आयुष्य ठिबकु लागले.. वेदनेचे ओहोळ बनुन वाहु लागले... कशा सोबत तरी वहायचेच असते शेवटी..!!!
|
Meenu
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:43 am: |
| 
|
श्यामली अजुन कशी नाही आली मी केव्हाची वाट पहातेय ..
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:54 am: |
| 
|
मीनु मी आले आज खुप दिवसांनि मनी चांदणं भेट्लं ओळख जुनी बघुन मनभर हसलं श्यामली!!!
|
जगात सार कस... शांत असतं जोवर आपल्या दारात येत नाही तोवर वादळ ही निवांत असतं..!!!
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 5:11 am: |
| 
|
वा क्या बात है वैशाली लिही ग अजुन
|
Shyamli
| |
| Wednesday, October 11, 2006 - 5:15 am: |
| 
|
वादळच ते उध्वस्त करुनच जाणार पण त्याचीही वाट पहाण फक्त आपल्यासारख्यांनाच जमणार
|