पुर्वार्ध त्या मोहाच्या क्षणांचा आधार घेउन तिचा निरागस प्रामाणिकपणा माझ्या श्वासातल्या आधिर वादळानं शांतपणे लुटला. आणि तरीही ती म्हणाली, मी तुझ्या पापात आर्धी वाटेकरी आहे. वाल्मिकी होण्याची पात्रता माझ्यात नसेलही कदाचित्… पण निदान्… माझ्या रक्तातला वाल्यातरी माझ्या लायकीशी प्रामाणिक हवा होता. .................. उत्तरार्ध तिनी मोहाचं अस्वस्थ वादळ ओल्या केसातुन मोकळ करत, असुसलेला मुसळधार पाउस त्याच्या श्वासावर बरसु दिला.. आणि…… तिच्या बेहोश निरांजनातली घायाळ ज्योत चौकटीत विझवुन जगण्यात अंधार रेटणा-या त्या शापित वाल्मिकीला मोहाच्या रानात गुलमोहरचे पंख़ लावुन तिच्या नभात उडणारा तो पापी वाल्याच जास्त समाधानी वाटला. त्या अलगद कातरवेळी ‘ तिच्या जगात स्वत्:ला उधळुन घेणं’ विसरण्यासाठी त्यानी बेचैन मनाचं ओझं पापण्यांवर ठेवत डोळे मिटले. आणि… तिच्या निरागस गालावरुन ओघळणारा अमृतचा थेंब स्वत्:च्या ओठांवर जपण्याच्या आठवणींनी त्याला जास्तच कैफ़ चढला. त्याच्या मिटल्या डोळ्यातल्या बेसुर असहाय्यतेला त्याचं मोहवरचं नियंत्रण समजुन त्याच्याकडे आदरने पहात ती म्हणाली ......................................तु महान आहेस. ह्यावर डोळे न उघडताच तो म्हणाला… "मी स्वत:पेक्षाही त्या मोहाच्या क्षणांशी प्रामाणिक रहायला हवय का? जर नाही.. तर मग मी महान असण्यापेक्षा वाल्या असतना जास्त सुख़ी, समाधानी का होतो? " धुंद रवी
|