वाद्यांच्या ठेक्यावर टिपरीच्या तालावर चल राधे नाचु आज झुळुकेच्या गीतांवर रुप...
|
सखे तुझ्या ओल्या श्वासात माझा गुलमोहरी भास असु दे.. तुझ्या देहावर फ़ुलावा माझ्या स्पर्शाचा सडा तुझ्या मस्तवाल कळ्यांना माझ्या मिठीचा वास असु दे... धुंद रवी.
|
अहा, धुंद_रवी क्या बात है!!! ओल्या श्वासातल्या गुलमोहरात मिठीतल्या तुझ्या वासात सदैव मला बहरु दे आत्ता त्या धुंदीतच मला जगु दे... आत्ता त्या धुंदीतच मला जगु दे... रुप
|
Meenu
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:36 am: |
| 
|
चंदन सहाणेवर उगाळता सुगंध चंदनाचा सर्वत्र दरवळतो सहाणही झिजते कणाकणानी पण लक्षात कोण घेतो ..
|
Abhi_
| |
| Friday, September 29, 2006 - 12:22 am: |
| 
|
वा मीनू क्या बात है!!! सारं काहि संपलं वाटता पुन्हा नव्याने सुरुवात होते अंधार भरल्या गाभार्यातही समई शांत तेवत असते..
|
Shyamli
| |
| Friday, September 29, 2006 - 12:33 am: |
| 
|
असं संपत नसतच सगळ काही थोड घ्याव थोड सोडुन द्यावं आवडत्या आपल्या सुरांना नव्यानी आळवुन बघाव श्यामली!!! आहा मीनु,अभि
|
Smi_dod
| |
| Friday, September 29, 2006 - 1:09 am: |
| 
|
शेवटी तु हि कंटाळलास ना हळु हळु माघार घ्यायला लागलास सुरवातीच तो जोश कुठल्या कुठे गेला राहिल्या फ़क़्त खुणा असेच जर व्हायचे होते तर परत परत घडायला नको होते एकदा पट उधळल्यावर परत मांडायला नको होता परत परत चुकल्यावर चुका करायला नको होत्या निष्पर्ण वृक्षाला पालवी फ़ुटायची वाट बघता बघता स्वःताच संपून जायला नको होतस........ काट्यांशिवाय काही मिळणार नाही हे आधिच तुला कळायला हव होत कदाचित......... माझ्याकडे फ़क़्त काटेच आहेत हे मी तुला आधी सांगायला हव होत स्मि
|
Smi_dod
| |
| Friday, September 29, 2006 - 1:15 am: |
| 
|
कालच्या माझ्या हिरव्या स्वप्नावर तुझे मुक राहणे मला न बोलताही खूप काही सांगुन गेले हिरवे स्वप्न बघता बघता स्वप्न दोघांचे हवे होते हेच मी विसरून गेले मौनाने तुझ्या जाणवुन दिले हे केवल तुझे आहे... एकटीचे...... स्मि
|
वा स्मि एकदम सहीच
|
Heartwork
| |
| Monday, October 02, 2006 - 1:09 am: |
| 
|
देण्यासारखे, घेण्यासारखे काहिच नसते आपल्याकडे चिरन्तर रहाण्यासारखे..... आपल्या शब्दान्शीवाय
|
Heartwork
| |
| Monday, October 02, 2006 - 1:14 am: |
| 
|
सर्व मायबोलिकराना विजयादशमिच्या हार्दिक शुभेच्छा!!
|
Smi_dod
| |
| Monday, October 02, 2006 - 2:16 am: |
| 
|
काल बघितले पावसामुळे खुप पाने गळालेले एक झाड..... पण ते झाड शांत होते ती पाने स्तब्ध होती तक्रारीच सुर नव्ह्ता सगळे वातावरण निशब्द होते ईतकं शांत,ईतकं स्तब्ध रहात येईल मला गळालेल्या पानांची कैफ़ियत न मांडता जगता येईल निमुटपणे सगळ्या जखमा लपवता येतील? प्रश्नच प्रश्न...... पण उकलले ते गुढ मला सांगीतले त्या झाडाने अग वेडे कैफ़ियत मांडुन, दुःख करून येणारेत का ते क्षण परत जे झाले ते झाले आता परत नविन पालवी येईल परत बहरेल मी या पावसामुळेच........ स्मि
|
Smi_dod
| |
| Monday, October 02, 2006 - 4:40 am: |
| 
|
भेटता येण अशक्य आहे मान्य आहे मला पण भेटावेसे वाटतय ग तुला असे म्हणालास तरी हवय मला.... केला असता अट्टाहास थोडा माझ्यापर्यन्त पोहचण्याचा एखादा छोटासा प्रयत्न मला जाणवुन देण्याचा हवी आहेस तु मला असे अधिकाराने म्हणण्याचा स्मि
|
मुक्या झालेल्या बोलाना अपेक्षाच फार, भन्गलेल्या स्वप्नाना उमाळेच फार. विस्कटलेल्या बोलाची चौकट पुन्हा सान्ध, विखुरलेल्या स्वप्नाची मैफिल पुन्हा बान्ध.......! .... शैलेन्द्र
|
विजयादशमिच्या हार्दिक शुभेच्छा!! .... शैलेन्द्र
|
मैफील तुझी नि माझी संगत चार दिसाची अखंड राहिली साखळी भंगलेल्या स्वप्नांची सानिका...
|
Shirishk
| |
| Wednesday, October 04, 2006 - 4:45 am: |
| 
|
एवढ छोट अन्तर नाही हे पुढ अजुनही बरीच वाट आहे दिसत नसली तरी क्षितीजापुढेही खात्रीन माझी साथ आहे शिरीष
|
Meenu
| |
| Wednesday, October 04, 2006 - 6:54 am: |
| 
|
कीती दूर आलोय देश माझा सोडुन क्षणीक सुखाची का गेलीये सवय जडुन ...? वाटायच्या जाचक त्या परंपरा अन रुढी परदेशात मात्र पाळतो नियम समजुन तडजोडी
|
Shyamli
| |
| Wednesday, October 04, 2006 - 8:01 am: |
| 
|
देवा धाव की रे आता कीती बघशी परीक्षा जाण भक्ताचे रे मन मी रे लेकरु अजाण
|
स्मि अगदी बहरली आहेस... श्यामली, मीनु, निलेश, शैलेंद्र छान
|